अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिद्दु जी खुप छान माहिती दिलीत आणखी लिहीत राहा.
आपण मला नवनाथ कथासार पारायणा संबंधी सांगु शकाल

जिद्दु, नाविन्यपूर्ण माहिती....दक्षिण कोकणातील गावर्हाटी/बारा पाचं या प्रकाराबद्दल माहिती असलेला कुणी माहीतगार माणूस आपल्या संपर्कात आला असल्यास त्याची संपर्क माहिती द्यावी....

माझ्या मावशीच्या सासऱ्यांच्या बाबत झालेली घटना जी आम्ही सगळ्यांनी पाहिली आहे. साधारणतः १९८५ च्या दरम्यान घडलेली. माझी मावशी नाशिकला पंचवटी भागात राहते व तिचे सासरे प्रिंटिंग press मध्ये कामाला होते. एकदा काम संपवून रात्री 11 वाजता ते घरी आले आणि सरळ खोलीत जाऊन पडून राहिले. जेवायचे आहे का वगरे विचारले तर कोणाशी काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी उठले तेच काहीतरी विचित्र बरळत .. ते भेटले होते आणि मला त्यांच्या बरोबर नेणार म्हणून. काकांना प्रकार जरा विचित्र वाटलं म्हणून त्यांनी देवळातील त्यांच्या ओळखीच्या एका वयस्कर पुजार्याला बोलावले. त्यांनी त्यांच्याकडे पाहून सांगितले कि यांना बाधा झालीये आणि जर आज रात्री हे बाहेर गेले तर परत येणार नाहीत. मावशीचा ३ माजली वाडा आहे (तो आज हि आहे) , त्यांना सहज बाहेर पडता येऊ नये म्हणून तिसऱ्या मजल्यावर ठेवले. त्यांनी दिवसभर काहीही खाल्लेले नव्हते ते कोणाशीच काहीही बोलत नव्हते पण डोळे मात्र एकदम लालबुंद झालेले, जसे ११ वाजले तसे एकदम violent झाले आणि मला बाहेर जाऊद्या म्हणू लागले. २-३ माणसांना पण आवरत नव्हते (त्यांची शरीरयष्टी अतिशय किरकोळ होती). ते वाड्याबाहेर उभे आहेत मला बोलावताय, मला जाऊ द्या असे काही तरी बडबडत होते. वरून खिडकीतून पहिले तर बाहेर कोणीही नव्हते. शेवटी वाड्याच्या दरवाजाला आतून कुलूप घातले आणि त्यांना अंगारा लावला तेव्हा ते थोडे शांत झाले. सगळी मंडळी रात्रभर जागी होती. जशी सकाळ झाली तास त्यांना एकदम ताप आला आणि ते झोपले. तो पूर्ण दिवस ते झोपून होते, मग उठल्यावर विचारले तर म्हणाले मला फक्त एव्हढाच आठवतं कि मी रात्री घरी परत येतांना शॉर्टकट म्हणून रामसेतू पुलाच्या खालचा रस्ता घेतला आणि तिथे मला एक बाई आणि पुरुष दिसले. ते काहीतरी पूजा करत होते आणि मला म्हणाले कि पूजेत विघ्न आणलं आता बघतोच तुझ्याकडे. त्यापुढील त्यांना काहीच आठवत नव्हते.
पण पुढे आठवडाभर तापाने फणफणले होते आणि मधूनच रात्री दचकून उठायचे.

@जिद्दू नक्कीच! आपणास वेळ मिळेल तसे येउद्या किस्से! आपण इथे लिहाच किस्से आणि इतर माहिती, पण तुम्ही स्वतःचा एक ब्लॉग का नाही काढत म्हणजे सगळी माहिती एकत्रितपणे वाचता येईल!

क्षितिज - नंतर एकदम ठीक झाले, वयोमानाने त्यांचे निधन झाले, परंतु आम्ही कोणीच ती घटना कधीच विसरू शकत नाही

@क्षितिज @ DShraddha काल रात्रीच माझी इथली पोस्ट पाहून एका परिचितांचा मेसेज आलाय . त्यांचं म्हणणं आहे कि हे असली माहिती इथं दिल्यावर बरेच भामटे ती उचलून वेगवेगळ्या फेसबुक अन व्हाट्सऍप ग्रुप्स वर टाकतात आणि पुढील गोष्टींसाठी खाली संपर्क देतात . त्यावर काही भोळी कोकरे ते वाचून भुलतात आणि फालतू ठिकाणी फसगत करून घेतात . मी वरील दोन्ही गोष्टी वापरात नाही आणि मला कोणी काही उचलेगिरी केली तरी फरक पडत नाही पण अपवादानेही कोणाची फसगत होत असेल तर त्याचा काही दोष मलाच येईल म्हणून मी आता फक्त किस्सेच टाकत जाईल .
बाकी ब्लॉग वगैरे लिहुन काय मिळणार मला ? त्यापेक्षा इथं चार-दोन लोक माझ्या पोस्ट वाचतात . त्यात त्यांना काही आनंद/माहिती/करमणूक मिळाली तरी तेच फार आहे मला ... तरी पण काल म्हटल्याप्रमाणे स्मशान विद्येची काही माहिती टाकतो रात्री वेळ भेटल्यावर

@halloween_born कोकणभागात नाही राव आपली काही ओळख .. काही माहिती भेटल्यास सांगतो वरील गोष्टींची

म्हणून मी आता फक्त किस्सेच टाकत जाईल .>> चालेल. मला आणखी एक विचारायचे होते. शिवलिलामृत प्रमाणे Particular अध्याय वाचु शकतो का नवनाथ कथासाराचा?

कोकणभागात नाही राव आपली काही ओळख .. काही माहिती भेटल्यास सांगतो वरील गोष्टींची>>>> धन्यवाद जिद्दु..

@जिद्दू : आता फकीर लोक एखाद्या पिराची सेवा करतात तेव्हा त्यांना त्या पिराच्या अंडर असलेली जीन मंडळी मदत करतात >>>>>>>>> जीन हा काय प्रकार असतो नेमका? नेट वर search केला तर जीन आणि परी असे दोन प्रकार वाचनात आले. काय असतात हे जीन आणि परी? आणि ते चांगले असतात की वाईट? काय करतात ते?

@क्षितिज मला फार कंटाळा आलाय आज .. लिहतो निवांत मुस्लिम तंत्रावर कधीतरी .. जीन आणि परी हि भूतेच असतात एकप्रकारची ... स्त्रि-पुरुष असा फरक असतो फक्त .. या परीताई लोकांची पण बाधा जबर असते बरीच .. हे गोष्टीत पंख वगैरेच छान वर्णन असतं ते काल्पनिक आहे .. खुश असतील तर मदत करतात नाहीतर जगणं मुश्किल करतात . इथं मी किस्से वाचायला आलो पण मीच फक्त लिहीत बसलोय. आता जोपर्यंत बरेच नवीन किस्से येत नाही तोवर मी काही टाकणार नाही .. बाकीच्यांना पण थोडी स्पेस द्यायला हवी ..खिखिखि

@जिद्दू बापरे भयंकर विद्या आहे ही! गरुडपुराणात मी असंच काहीसं ऐकल्याचं आठवतंय पुसटसं Sad Sad

लिहतो निवांत मुस्लिम तंत्रावर कधीतरी>>हो चालेल!

@जिद्दू @ अश्विनी
धन्यवाद.
जिद्दू तुम्ही चांगली माहीत देताय तीही संयमितपणे

@जिद्दू तुम्ही चांगली माहीत देताय, कृपया ती थांबवू नका किमान किस्से तरी टाका

@तनमयी - लिंक बद्दल धन्यवाद. आता वाचन सुरु

@ रमेश रावल ...बरे झाले ही माहिती पण सांगितली. ...अशा गोष्टीचे साईड इफेक्ट ही माहिती हवेत

@रमेश रावळ बरोबर आहे तुमचं .. सामान्यतः स्मशान विद्येत तेच प्रकार असतात म्हणून मी सामान्य वाचकाला वाचताना थोडा रंजक वाटेल आणि उगाच घृणा नको अशी toned down पद्धतीची माहिती दिली . मी फक्त शुद्ध अध्यात्माच्याच वाटेला शोध घेत होतो पण त्यात मग बाकीची माहिती पण हळूहळू मिळत गेली . मी स्वतः कधी निम्नविद्येच्या साधकाला भेटलो नाही (माझ्या माहितीत आहेत तसे काही ) कारण ह्यांच्या संपर्कात येन म्हणजे स्वतःला खड्यात घालण्यासारखं आहे. अघोरी नावाने लोकांना घृणा येते पण खरे अघोरी साधू फक्त मोक्षप्राप्तीसाठी साधना करतात आणि ते आपल्या भागात फार कमी आहेत. त्यांचा मार्ग थोडा वेगळा आहे म्हणून ते कधीही विनाकारण सामान्य लोकांत येत नाहीत . जे टीव्ही/यूट्यूब वर त्यांचे विडिओ आहेत ते लोक खरे नाहीत. हो जर आपण स्वतः होऊन शोधच घायचा म्हटलं तर कदाचित सापडतील पण तरी काही आपल्याला त्यांचा उपयोग नाही होणार कारण कोणताही खरा साधक उठसुठ कोणाला काही सांगणार नाही कधीही .
खऱ्या गुरुची वाट पाहण्यात वेळ न घालवता स्वतः योग्य मार्गाने उपासनेला सुरुवात केल्यास काही वर्षात नक्की अनुभव यायला सुरुवात होते असा माझा अनुभव आहे . प्रत्यक्ष देव जरी भेटला तरी कधी आपलं प्रारब्द्ग बदलणार नाही त्यामुळे शांत सामान्य जीवन जगून उपासना करत राहिल्यास नक्की अधिभौतिक आणि भौतिक अश्या दोन्ही मार्गाने प्रगती होत राहते. बाकी हि अमानवीय गोष्टींची ओढ फक्त छंद आणि ज्ञानवर्धनापुरतीच चांगली आहे . मी सुरुवातीला ह्यात फार रंजक अनुभव घेतले आणि पाहिलेत पण आता पोरसवदा वय निघून गेल्याने यात पूर्वीसारखी मजा नाय वाटत . किस्से वाचायला फार रंजक असतात पण प्रत्यक्ष ते पाहताना आणि अनुभवताना भल्या भाल्यांची लागते चांगलीच आणि त्यात मजा नसते काही . अध्यात्म आणि यांचा फार संबंध नसल्याने जास्त फंद्यात पडल्याने चांगली माणसं गोत्यात आलेली पाहिली आहेत .

Pages