पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रजत कपूर महेश अंकल ( महेश कोठारे ) नाही गं सूलु. तो एक सिनेमा होता ज्यात रजत कपूरने व्हिलनचे काम केले होते. शेफाली छाया ( सत्या- सपनेमें मिलती है वाली ) त्याची भाची की पुतणी असते आणी तो तिचा लहानपणी विनय भंग करतो अशी स्टोरी आहे. त्यात त्याचे नाव बहुतेक महेश होते.

>> मान्सून वेडिंग हे त्या पिच्चर चे नाव

खलिबली गाणे योग्य की अयोग्य, खिलजी असा नाचत होता का वगैरे लॉजिक बाजूला ठेवले तर मला एक डार्क डान्स म्हणून आवड्लं ते गाणं म्हणजे actually तो डान्स. त्या पात्राचा सगळा evilness दिसून आलाय त्या नाचात. कोरिओग्राफी मस्त आहे.

त्या गाण्यात जो माहौल होता तो टिपीकल निगेटिव्ह शेडचा होता. पण महालाची भव्यता, पेटलेल्या मशाली, त्या काळातले पोशाख. खरच रंगतदार बनवतात त्या गाण्याला. गाणे असेल आचरट पण कोरीओग्राफी मस्तच आहे. गणेश आचार्यच आहे ना कोरीओग्राफर?

भारतीय चित्रपट म्हणल्यावर नाच, गाणे, सामुहीक कवायती आल्याच. पुष्पक, सवत माझी लाडकी ( मराठी ) आणी काही सिनेमे सोडले तर मला नाही वाटत कुठलाही चित्रपट गाण्यांवाचुन असेल. राहता राहीला भन्साळी, त्याने बाजीरावला नाचवले मग खिलजी क्या चीज आहे? उद्या राणा प्रतापसिंग, छत्रपती शिवाजी महाराज यांना तो क्लासिकल गाणे गातांना पण दाखवेल.

रणवीरचे विशेष कौतुक.

काल पाहिला.
वर अमांनी लिहिलेलं परिक्षण एकदम चपखल.. विशेष उल्लेख अत्तराच्या प्रसंगांचा !
भव्य राजवाडे, उंची कपडे पट, दागदागिने हे आवडले. मुरारबाजी प्रमाणे लढणारा गोरा सिंगजी आवडला. दिल्लीतले, मेवाडमधले युद्धाचे प्रसंग पण आवडले.
आता एक एक करुन बाकी सगळं ..
दिपीका - पद्मावत सिनेमाच्या पोस्टर मधे ती जशी निर्विकार दिसते.. तशीच अख्खा सिनेमाभर वावरते. फक्त लाल झालेल्या डोळ्यांचा लहान-मोठेपणा, त्यातलं पाण्याचं प्रमाण, यातच काय तो फरक आहे. या सगळ्या बद्दल मी तिला दोष न देता, संलीभ ने अश्याच प्रकारे तिला वावरण्यास सांगितलं असेल असं समजून घेतलं. कारण याच मोठ्या डोळ्यांच्या बळावर 'ओम शांती ओम' किंवा 'चेन्नई एक्स्प्रेस ' सारखे सामान्य सिनेमे तिने चांगले साकारलेत. एरवी बच्चन बहू अभिनयाच्या बाबतीत आवडत नसली , तरी जोधा अकबर मधे फार आवडली होती.
शाहीद - लहानगा वाटत असला तरी, छान वाटलाय. फक्त त्याचे त्याच त्याच प्रकारचे संवाद ऐकून भर थेटरात 'उफ्फ तुम्हांरे ये आदर्श, ये उसुल' असं ओरडावंसं वाटलं ! एवढे सगळे आय ओपनर प्रसंग होऊन गेल्या नंतरही सरतेशेवटी युद्धाच्या प्रसंगात रतनसिंगाचे अल्लाउद्दिनला हट्टाने एकट्याने सामोरे जाणे हास्यास्पद वाटले..
आदिती - जे थोडेफार प्रसंग मेहरुन्निसा च्या वाटेला आलेत, त्यात ती फार आवडली. इतकी की दिपीका आणि आदिती दोघींच्या भूमिकांची अदलाबदल केली असती तरी चाललं असतं असं वाटून गेलं !
रणवीर - नाही आवडला. क्रूर, बेरकी, तरी शूर असं दाखवायचा प्रयत्न केला असला तरी सिनेमाभर तो वेडसरच वाटला. या भूमिकेबद्दल त्याने केलेल्या मेहनतीबद्दल इतकं काही वाचायला मिळालं , तरी तो नाही आवडला. सतत खोटाखोटाच वाटला..
जिम सर्भ - आवडला. फक्त नजरेतून बोलतो हा माणूस बर्‍याचदा. याची आणि रणवीरच्या भूमिकांची अदलाबदल पण चालली असती !
रझा मुराद - डायलॉग डिलिव्हरी, दिसणं दोन्ही आवडलं.
घूमर गाणं आवडलं.
साखळीने झुंबर खाली-वर करणे, ठीकठीकाणी पणत्या लावणे, वगैरे संलीभ स्टाइल गोष्टी छान वाटल्या.
अ‍ॅनिमेटेड हरीण, शहामृग, हत्ती अजिबातच आवडले नाहीत.
खिलजींच्या ओपनिंग सीन पासून, अल्लाउद्दिन च्या चित्तोड मधे उभारलेल्या छावणी पर्यंत या सर्व खिलजी मंडळींचं वागणं, कपडे, खाणं वगैरे एकदम जंगलीच वाटलं. असं का दाखवलंय ते समजलं नाही..
रजपूतांची मोठ्ठी मोठ्ठी दालनं, त्यात कुठेतरी कोपर्‍यात गरजेपुरतंच असलेलं फर्निचर वगैरे डिटेलिंग खुपलं..
शेवटचा जौहर चा प्रसंग खरंतर सिनेमाची जान आहे. बराच चांगला जमलाय.. परत दिपीकाबाई विझलेल्या डोळ्याने तो साकारतात, त्यामुळे थोडा इंपॅक्ट कमी होतो. कोणीतरी वर या सिन च्या बॅक्ग्राउंड म्युझिक बद्दल लिहिलंय, ते पटलं. 'रंग दे बसंती' मधला जालियनवाला बाग प्रसंग रेहमान टच मुळे जसा अंगावर येतो.. वाईट वाटणं, भिती, चीड, संताप हे सगळं हळूहळू त्या प्रसंगात बॅकग्राउंड म्युझिक मधल्या गायिकेच्या (?) आवाजातून उतरतं. ... तसं या जौहरच्या प्रसंगात होत नाही !

थोडक्यात.. सिनेमा एकदा पाहण्यासारखा आहे, तो ही थेटर मधे !

'रंग दे बसंती' मधला जालियनवाला बाग प्रसंग रेहमान टच मुळे जसा अंगावर येतो.. वाईट वाटणं, भिती, चीड, संताप हे सगळं हळूहळू त्या प्रसंगात बॅकग्राउंड म्युझिक मधल्या गायिकेच्या (?) आवाजातून उतरतं. ... तसं या जौहरच्या प्रसंगात होत नाही !>>> अगदी अगदी. विहिरीत बायका उड्या मारतात व जीव देतात. तेव्हा मला सिनेमा घरात पण अगदी उन्मळून रडू आले होते. व मला कधीही अश्या रडण्याची लाज वाटत नाही. रंगदे बसंती मध्ये असे जीव कालवल्यासारखे होते असे खूप प्रसंग आहेत. लुकाछुपी सुद्धा. अजूनही ऐकताना रहमानचा आवाज आला की रडू आलेच. विनाकारण कोणाचा जीव जावा हेच मला सहन होत नाही.

ऑन अ डिफरंट नोट. संलिभ म्हणजे एक कुच्कट एच आर मॅनेजर आहे. सर्व ह्युमन रिसोर्से कुजवतो आणि मारतो.
कधीच कोणी सुखी आनंदी जीवन जगत नाही ह्याच्या सिनेमात. मला मान्य आहे दु:खातूनच कथा बनतात पण अफाट दु:ख सहन करूनही लोक पुढे येतात व समाधानी होतात हे त्याच्या सिनेमात कधीच दिसत नाही.

हम दिल दे चुके सनम : ती सलमान कडे परत जाते. सुखी प्रेमळ सहजीवन.
देवदासः ब्रेक अप मधून बाहेर येणे व उत्तम वकील बनणे किंवा प्रेयसीला घेउन कोलकात्याला जाणे वकिली हे शक्य होते पण त्याने तसे मांडले नाही आहे.

घूमर इज ऑलरेडी अ पार्ट ऑफ पॉप्युलर कल्चर. टनानी व्हिडीओ अपलोड होत आहेत. लोकांनी गाणे उचलले आहे. व कालच मी ह्यावरचा एक स्केटींगचा पर्फॉरमन्स पाहिला.

अमा, ही पोस्ट भारी आहे.. एखाद्या प्रसिद्ध कथानकाची एक वेगळी आवृत्ती सादर करण्याची कल्पना फारच आवडली आहे!! It'll be great fun to pull off such a thing

हम दिल दे चुके सनम : ती सलमान कडे परत जाते. सुखी प्रेमळ सहजीवन.>>>>>
तिच्यासाठी वनराज जास्त योग्य होता. सलमान पपी लव होते.

देवदासः ब्रेक अप मधून बाहेर येणे व उत्तम वकील बनणे किंवा प्रेयसीला घेउन कोलकात्याला जाणे वकिली हे शक्य होते पण त्याने तसे मांडले नाही आहे.

हे करता आले असते, पारो चंद्रमुखी सिनेमॅटिक लिबर्टीने एकत्र नाचू शकतात तर हे का नाही? पण मग तो देवदास राहिला नसता. एकत्र नाचण्याने चित्रपटाच्या एकूण परिणामावर फारसा फरक पडत नाही, पण देवदास चिरकालिन दुःख विसरून आयुष्य परत सुरू करतो हे बरोबर नाही.

काही चित्रपट कथांवर बेतलेले असतात, जिथे असे बदल करणे सयुक्तिक वाटते. जसे अमोल पालेकरच्या अनकहीमध्ये मूळ शेवट बदललाय. पण रिमेक करून त्यात मूळ कथेचा प्राणच बदलणे बरोबर नाही असे मला वाटते. अर्थात संलीभ गल्ल्यावर लक्ष ठेऊन काम करतो, तो काहीही करू शकेल.

एक राहिलंच. ते सुई दोर्‍याचं काय कौतुक संलीभ ला एवढं..
पद्मावती रतनसिंगच्या आधीच पहनलेल्या आणि उसवलेल्या पगडीला टीप मारतीये..
बडी रानीसा.. पद्मावतीला भेटण्याऐवजी काहीतरी शिवत बसते.. येत नाही जा असं दासीला सांगून.
राजपूत परंपरा वगैरे असले म्हणावं तर.. तिकडे ती मेहरुन्निसा पण अल्लाउद्दीन च्या शेजारी बसून काही तरी शिवत बसलीये..
तिन्ही प्रसंगात, सुई-दोरा एकदम व्यवस्थित दिसेल याची कॅमेराचे योग्य अँगल लावत संलीभ ने तजवीज केलेली दिसते Happy

छान परीक्षण लिहिलंय सर्वांनी. आज विचार आहे जायचा. रणवीर आवडतो. दिपिकाने काही केले तरी ती आवडते. शर्मा, चोप्रानी सर्जरी करूनकरून चेहर्‍याची वाट लावल्याने दिपिकाच योग्य इथे कदाचीत.

खलीबली गाण्यात रणवीरची उर्जा, जोश बेफाट. खुप आवडल्या त्याच्या स्टेप्स. अगदी त्या एक पायावरच्या जबरदस्त स्टेपनंतर मांडीवर हात मारत गोल फिरतो ते पण कसले डौलदार केले आहे त्याने. आणि बहुधा शेवटी बाण लागतात तेव्हा चेहर्‍यावर वेदनेचे भाव त्याने फार मस्त दाखवलेत. कपाळाची फुगलेली शीर कशी दाखवली असेल त्याने? टाळ्या. पोरगं गुणी आहे.

पद्मिनी - श्रेया बुगडे
रतनसिंग - भाउ कदम
खिल्जि - निलेश साबळे>>>>>>

पद्मिनी - सागर कारंडेला करा नाहितर दात पुढे आलेला कुशाल बद्रिके ! खिलजीच काय, करणी सेना देखील पळुन जाइल घाबरुन

गाणे असेल आचरट पण कोरीओग्राफी मस्तच आहे.
?>>>>>>>

अहो अ‍ॅक्चुअली मी कोरीओग्राफीलाच आचरट बोल्लोय. गाणी चांगली असण्याची अपेक्षा हल्ली मी बॉलीवूड चित्रपटांकडून ठेवतच नाही. मेलोडीला मरून काही काळ लोटला आहे.
तर कोरीओग्राफी वरून जो खिलजी समजला तो आचरट वाटला. खिलजी चित्रपटभर क्रूर कपटी न वाटता असाच वाटत असेल तर अवघड आहे. हे म्हणजे टिपिकल सायको, सणकी, वेडगळ पद्धतीने व्हिलन सादर करणे. ते सुद्धा नकली. त्यात असलीपणा दाखवायला एखाद्या नानालाच जमावे. येस्स, मराठीत खिलजी निघाला तर नानाला पर्याय नाही जर खिलजी असा दाखवायचा असेल. तो हे कॅरेक्टर जास्त विश्वासार्ह बनवेल. हे तर नुसते लाऊड कॅरेक्टर बनवून टाळ्या खेचायचा प्रयत्न वाटतेय. अर्थात बहुतांश लोकांना हे आवडत असेल तर संजयने बॉ चि प्रेमींची नस बरोबर पकडली आहे असे बोलू शकतो.

मला रणवीरची ती अदाही फार आवडली, चित्तोड वाले आगीचे बाण सोडतात, खिल्जींच्या छवणीत आग लागते.
खिल्जीच्या तंबुतही एक बाण शिरतो, तो फक्त बघतो आणि काय कटकट आहे टाइप लुक देउन पुन्हा झोपून जातो, जणु काही आग नाही, डास शिरलाय तंबूत Proud
बिन्ते दिल गाण्यात ४ बायका ४ आरसे घेऊन उभ्या असत॑त, स्वतःला ४ वेळा पाहून स्वतः वरच फिदा होतो आणि तुझपे कुर्बान टाइप एक्स्प्रेशन देतो, एकदम झकास !
BTw त्या खलिबलि सुरु होण्या आधी fractionnof seconds जे म्युझिक आहे ते ऐकून यम्मा यम्मा गाणं सुरु होईल असं वाटतं, शोभेल खिल्जीला Wink
मला जाम आवडलय् खलिबली आणि कोरिओग्राफी.

येस्स, मराठीत खिलजी निघाला तर नानाला पर्याय नाही जर खिलजी असा दाखवायचा असेल. तो हे कॅरेक्टर जास्त विश्वासार्ह बनवेल.>>>>> होक्का? मग तू भालु नावाचा उमा आणी प्रकाश भेंडेंचा शिणुमा बघ्घच. त्यात नाना व्हिलन हाये. हिरवीणी चा विचार करतांना तो खुर्ची घेऊन नाचतो ना तो सीन भन्नाट आहे, अगदी टिपीकल खिलजी! मग मी रणवीरला वेडा का म्हणू? आँ!

अख्खा भालु पिक्चर आहे यु ट्युब वर. बघच, बघच तू. Proud नानाच्या अ‍ॅक्टिंगला पर्याय नाही हे मान्य आहे पण म्हणून रणवीरने तसे नाचु नये की क्वाय? आणी कोरीओ ग्राफी कसली आचरट? आता काय सुवर्णसुंदरी आणी झनक झनक पायल बाजे सारखे पिक्चर बनणार आहेत काय रे? म्हातारा झाला की काय तू इतक्यात? Light 1

सुवर्णसुंदरी आणी झनक झनक पायल बाजे ???? हे काय आहे?
एखाद्या आचरट कोरीओग्राफीला डिफेन्ड करताना काहीतरी आणखी आचरट उदाहरणे आणली आहेत का? मला नाही माहीत ही गाणी वा चित्रपट. पण नावावरून माझ्या आजोबांचा काळ वाटतोय Happy

मी फक्त नानाचे पोटेंशिअल सांगितले सनकी भुमिका विश्वासार्ह करण्यातले. पण कित्येक चित्रपटांत त्यानेही माती खाल्ली असेलच. कारण चित्रपट हा शेवटी दिग्दर्शकाचा असतो. जे त्याला हवे ते नानाने दिले असेल ईतकेच
आणि ईथेही मी दोष रणवीरला न देता संजय आणि नृत्य दिग्दर्शकालाच देत आहे.
एखाद्या रामगोपाल वर्मा के शोले (कि आग?) मध्ये अमिताभने वैताग आणला तर मी शिव्या अमिताभला नाही तर रामगोपाल वर्माला देणार तसे आहे हे..

बाकी आपले शेवटचे वाक्य ईंटरेस्टींग वाटले. <<<<< म्हातारा झाला की काय तू इतक्यात? Light 1 >>>> म्हणजे ही कोरीओग्राफी यंगिस्तानसाठी बनवली आहे, हल्लीच्या यंग जनरेशनला हे असलेच आवडते असे म्हणायचे आहे का? Happy आक्षेप !!!!

सुवर्णसुंदरी आणी झनक झनक पायल बाजे ???? हे काय आहे?>>>>> घ्या! म हा न आहेस! हिंदी चित्रपटातले हे मैलाचे दगड तुला माहीत नाही? बाप्पा! काय बोलुन र्हायला हा? मग आता हे काय आहे त्याचा विचार करत रात्रभर यु ट्युब नाहीतर पिडलेला विकी चाळत बस. Biggrin

मी पण पाहिला पद्मावत काल.
खिलजी विक्षिप्त दाखवलाय उगाच. क्रूर करायचा असता तर तसाही दाखवता आला असता. पण जे काही दाखवायचं होतं भन्साळीला ते रणवीरने छान दाखवलय. जबरदस्त आहे तो. सगळे हावभाव, आक्रस्ताळेपणा, अगतिकता ही छान दाखवलीय.
पद्मावती भयाण! सुंदरा मनामधी भरली असं एकाही प्रसंगात वाटलं नाही. कपडे नी दागिने छान आहेत म्हणून छान वाटली. नाहीतर तिचा मक्ख चेहेरा नी डबडबले डोळे का आवडावे असं वाटलं. मेहरून्नीसा पद्मावतीचे स्वागत करायला येते नी तिची स्तुती करते तिथे तर मेहरून्नीसा भारी दिसते.
मेहरून्नीसा सगळीकडेच भारी दिसते. छान अभिनय केलाय. आवडली एकदम.
शाहीद. मला नाही लहानखुरा वाटला दीपिकापुढे. छान वाटला. आवडला. ताठ, रुबाबदार. पण ते उफ तुम्हारे ये उसुल ये आदर्श अगदि म्हणावसं वाटतं.
मलिक लयच भारी. त्याचा तो टोन नाही आवडला सुरुवातीला पण नंतर सवय झाली. मै पद्मावती की जगह तो नही ले सकता म्हणतो तेव्हा सगळं थेटर हसत होतं पण त्याच्या भावना बघून गलबललं.
मी सहसा सगळ्या दुःखी सीन पाहताना रडते पण शेवटचा जोहर चा सीन पाहताना अजिबात रडू आलं नाही. सतीची भलामण नको म्हणून बहुदा अर्धवट ठेवला तो सीन. बरं केलं कदाचित.

पिक्चर पाहिला. भव्यदिव्यता अर्थातच आवडण्यासारखी आहे. पण जरा विचार करून पाहिले तर अनेक गोष्टी काहीच्या काही वाटल्या.

१. गुप्त मार्गाने पळून जाता येत असताना तत्वासाठी खिल्जीला भेटून जाणारा रजपूत पटला नाही. त्याच्या त्या कृत्याला काही अर्थच नाही. त्याला सोडवण्यासाठी ती पद्मावती रजपुतांच्याच तत्वाविरुद्ध राजवाडा सोडून पार दिल्लीला जाते. त्यावरून तो शाहिद कपूरच तिला झापतो बघितल्या बघितल्या. वरताण म्हणजे स्वतःची राणी तिथे आलेली असताना आणि तिलाही कैद होईल ह्याची पूर्ण शक्यता असताना हा खिलजीला भेटायला जातो. शेवटी पळतो गुप्त मार्गानेच.

२. जी गोष्ट राजपुतांचा सन्मान / अस्मिता वगैरेच्या उदात्तीकरणासाठी दाखवलेली आहे (जौहर), ती मुळातच भयंकर आहे. ह्यातून काय मेसेज घ्यायचा हे अक्षरशः ज्याच्यात्याच्यावर सोडलेले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे तेव्हा शत्रूच्या स्त्रियांना बाटवायचे, गुलाम करायचे आणि त्यांची सतत बेअब्रू होईल असे वागवायचे. आज अत्याचार होतात आणि झाली तर त्यावर केस होते. आज मोगलाईतल्या स्त्रियांपेक्षा स्त्रिया जरा बर्‍या अवस्थेत आहेत असे नक्कीच म्हणता येईल कारण लोकशाही आहे. तर आजच्या स्त्रियांना हा आधार दिला जायला हवा आहे की एखादा बलात्कार म्हणजे आयुष्य संपले असे नसून ती चूक बलात्कार करणार्‍याची आहे, त्या स्त्रीची नाही. ह्या चित्रपटात मात्र निराळे सांगितले जाते. बरं, कथाच ती आहे म्हणून तसेच दाखवले हा युक्तिवाद असेल तर सगळे संपल्यावर तरी एखादी अर्ध्या मिनिटाची कमेंट्री हवी होती की बुवा तेव्हा स्त्रियांना असे उपाय करावे लागत, आता तसे नाही वगैरे. त्या उलट म्हंटले जाते की हा जौहर म्हणजे अल्लाउद्दिन खिलजीचा सर्वात मोठा पराभव होता.

३. तो बासरी वादक ब्रह्मचारी गुरू ह्या दोघांना चोरून न्याहाळत असतो हा रजपूत स्त्रीच्या बाबतीत इतका मोठा गुन्हा नाही का की त्यासाठी त्याला देहदंड व्हावा? वर त्याला 'देशनिकाला'केल्यावर आता जणू शाहिद कपूर काही करूच शकणार नाही अशा आवेशात तो गुरू त्यालाच दमदाटी करत आणि धमक्या देत निघून जातो.

४. त्या खिलजीला मधेच नाचवला का आहे कोण जाणे! केवळ रणवीर चांगला नाचू शकतो हे सांगायला? असे सुलतान नाचत सुटायचे का?

रझा मुराद जिवंत असेपर्यंतचा चित्रपट व त्यातील रणवीरचा अभिनय फार आवडला. गुलामाचे कामही मस्त! शाहिद कपूरपेक्षा एखादा तगडा अभिनेता राजपूत राजा म्हणून बघायला आवडला असता. शाहिद कपूर पिक्चरचे नांव सद्मावत असल्यासारखा वावरतो. सुरुवातीचे शहामृग छान आहे. रणवीर मात्र ह्या भूमिकेसाठी सध्या एकमेव योग्य मनुष्य वाटतो. नवाझुद्दिनला ही भूमिका दिली असती तर चित्रपटात खिलजी हारल्याचे दाखवावे लागले असते. (अर्थात, त्याचा अभिनय त्यातही उत्कृष्टच झाला असता).

रणवीरला एक विकृत, क्रूर सुलतान साकारायला आणखी वाव दिला जायला हवा होता असे वाटले. घुमरसकट एकही गाणे नसते तर चांगले झाले असते. सुरुवातीचे अफगाणिस्तानमधील वातावरण अफलातून घेतलेले आहे.

करणी सेना नामक कोणत्यातरी टुकार संघटनेने केलेला विरोध किती अनाठायी आणि बिनडोकपणाचा होता हे चित्रपट पाहून समजतेच. ज्या पद्मावतीच्या सौंदर्यासाठी हे सगळे घडते त्या पद्मावतीचा रोल साकारणारी दीपिका मुळात तितकी खास दिसतच नाही. म्हणजे इतके भव्य सेट्स, भारी मेक अप आणि कॉश्च्युम्स असल्यावर जेवढी किमान छान दिसायला हवी तेवढीच छान दिसते. तरी सध्याच्या नट्यांपैकी तीच एक न्याय देणारी आहे हेही लगेच पटते.

शेवटच्या युद्धात राजपुतांकडे बाण नव्हते का? सुरुवातीला गडावरून किती तरी सोडले होते की. त्यातच संपले की काय? राजाला बाण लागून राजा मेल्यावर यांनी आक्रमण केलं तर त्यांनाही खिलजी ला बाणाने मारता आलं असतं.

जर मेहरूंनीसाने गुप्त मार्ग दाखवला नसता तर ते बाहेर असलेले पालखीतले सैनिक राजाला कसे सोडवणार होते कोण जाणे!

म्हणजे भन्साळीच्या चित्रपटात लॉजिक शोधत नाहीय, असच आपलं.

म्हणजे रामायण सिरीयल मध्ये रावणाच्या काम करणार्‍या अरविंद त्रिवेदी यांनी रामाचे काम करणार्‍या अरुण गोविलला अभिनयाबाबत कोसो दूर नेऊन सोडले तसेच शाहिदचे झाले आहे वाटते. अख्खा सिनेमा रणवीरनेच खाल्लेला दिसतोय.

Pages