माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिने हेटायला पाहिजे ती खेटायलाच जाते>>>> नाहि हो हल्लिच एका एपि मध्ये पाहिले होते राधाक्का (घरातच) लगबगिने जात असते तिचा तोल जातो आणि गुरोबा तिला सावरतो हे सर्व गोब्रि शनाया पहाते. राधाक्का मनातलया मनात डायलाग मारते. ग्यानया बेडरूम मधे जातात . आणि राधाक्का अश्रु गाळत किचन मधे जाते व रागाने गुरोबा ने धरलेला हात धुत मनात एक सेन्टि डायलाग मारते. हुश.... किति कठिण हे सर्वे टायिप करणे.

राधाक्का (घरातच) लगबगिने जात असते तिचा तोल जातो आणि गुरोबा तिला सावरतो
>>> नक्कीच ग्राफिक्स वापरले असणार.

सस्मित लय भारी Lol

तेच पटत नाही म्हणून मी सिरीयलला खेटत नाही Wink .

ग्यानया Lol

अरे वा अपर्णा, सुधारली का राधिका. तरी सध्या मी बघणार नाही.

गोब्रि! तिला गोरी गोबरी म्हणायच असेल. नशीब गोड गोजिरी लाज लाजरी नाही म्हणाली. Biggrin

अरे वा अपर्णा सुधारली का राधिका,>>>>>> अंजू, अगं स्वल्पविराम कुठे टाकलास नक्की? हे म्हणजे तू राधिकाला, अपर्णा सुधारली का असे विचारते आहेस असे वाटतयं. Light 1 Proud

ते असे पाहीजे "" अरे वा! अपर्णा, सुधारली का ती राधिका?" किंवा अरे वा अपर्णा! राधिका सुधारली का गं?

तर दोन्ही युवतींनो दिवे घ्या, हलके घ्या, लाईटली घ्या. आजच्या महिला दिनाच्या शुभ मुहुर्तावर दीन राधिकेला न्याय मिळु दे आणी लेखक व निर्मातीला अक्कल येऊ दे या शुभेच्छा!Sipping

रश्मी Lol

थांब एडीट करते Wink

जिथे नुसत्या फायली इकडून तिकडे नेल्या, कॉफी पित नुसत्या गप्पा मारल्या की मोठ्ठ टारगेट अचिव्ह होतं तिकडे राजीनामा असाच देत असतील ना Lol

मेल केला की फक्त गॅरी अंकलच वाचेल ना आपल्याला दिसणार नाही. शिवाय राजीनामे मेल केले तर एवढा ड्रामा कसा दाखवणार. नो फील यु क्नो.

सगळ्यांनीच...आनंद, पानवलकर, जेनी, समिधा .... राधाक्का ला परवडणार का इतक्यांना नोकरी देणे?
काल सगळ्यात विनोदी प्रकार म्हणजे.....गुरु जेनी ला फोन करतो. ती रिसेप्शन वर नसते. विनोद (की कुणीतरी - प्यून) फोन उचलतो. मग गुरु त्याला आत बोलावतो. तेव्हा विचारतो की रघू..? तर तो म्हणतो की साहेब, रघ्याच्या बायको चा भाऊ मी. तो गावाला गेलाय न्हवं...!!!

म्हणजे इतके दिवस गुरवाला माहितीच नाही की रघ्या नाहीए ते...आणि दुसरं म्हणजे जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...? हाईट आहे! अभिजीत गुरु ने बहुतेक फॅमिली बिझीनेस च पाहीले असावेत...दुकान वगैरे...!!

सगळ्यांनीच...आनंद, पानवलकर, जेनी, समिधा .... राधाक्का ला परवडणार का इतक्यांना नोकरी देणे? >>> हो का Uhoh आता राधिका सगळ्यांना नोकरीदेणाअर???? तिला स्वतःलाच काही काम नाही आता ह्यांना काय काम देणाअर ती

जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...? Proud

म्हणजे इतके दिवस गुरवाला माहितीच नाही की रघ्या नाहीए ते...आणि दुसरं म्हणजे जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...? हाईट आहे! अभिजीत गुरु ने बहुतेक फॅमिली बिझीनेस च पाहीले असावेत...दुकान वगैरे...!! >>>>>>>>>>>> हे मिसलं होतं मी, फुटले हसून हापिसात Proud

अजून एक म्हणजे जुन्या कोणत्या तरी एका एपिसोड मध्ये जेनी आनंद आणि श्रेयस बोलताना दाखवलेत की समिधाला यायला उशिर होतोय आणि जेनी म्हणते की तिला आजकाल जेवण जात नाही म्हणून मी रघुला तिला आल्यावर कॉफी बिस्किटे द्यायला सांगितले आहे.
आणि २-३ एपिसोड मागे जेव्हा गुरू सगळ्यांना डबल पगार होणार अशी बातमी देतो तेव्हा समिधा माझ्या बाळाचं फ्युचर सिक्युअर होईल असं म्हणते तेव्हा सगळे "गुड न्यूज" आहे? असं विचारतात.
नक्की काय घोळ आहे? Uhoh

नक्की काय घोळ आहे? Uhoh>>>

तू १०-१५ एपिसोड मागे आहेस! घोळ सगळे जागेवर गोल गोल फिरतायेत! अजुन ७-८ महिने आहेत सगळे घोळ मिटायला! Wink

ह्या धाग्याचे अजून एखादा नुतनीकरण होईल.. दुसरी बायको तिसर्‍यांदा! Wink

जिथे नुसत्या फायली इकडून तिकडे नेल्या, कॉफी पित नुसत्या गप्पा मारल्या की मोठ्ठ टारगेट अचिव्ह होतं तिकडे राजीनामा असाच देत असतील ना >>> नाही ..... जिथे स्वाईप कार्ड च्या एइवजी अजून मस्टर वापरतात , जिथे रिसेप्शनीस्ट्ला सगळ्यांच्या पीसी चे कॉम्प्लेक्स पासवर्ड पाठ असतात , तिथे अस होतं असेल.

तिथे अस होतं असेल.>>>

अहो इथे मॅनेजमेण्ट डायरेक्टर वैगेरे मंडळी ऑफिस स्टाफला रिसेप्शनिस्ट समोर मोकळ्या जागेत गोल उभे करून सरसकट इन्क्रीमेण्ट जाहिर करतात.. आणि कंपनीच्या डायरेक्टर्स समोर कर्मचारी त्यांच्या बॉससोबत हमरीतुमरी पण करतात हे मख्ख उभे तोवर! नंतर सगळ्यांचे राजिनामे पण असेच स्टॅण्डींग कमिटी मिटिंग मध्ये! सगळी मज्जा मज्जा!
आणि कसल्या प्रोजेक्टवर काम केले म्हणे ते काही कळले नाही! एकदम डबल पगारवाढ त्याबद्दल?? आणि कंपनीचा फायदाही झाला... मग एखादी मिटींगरूम का नाही बांधली त्यातील थोडे पैसे खर्चून.. म्हणजे अश्या स्टॅण्डींग कमिटी मिटींग तरी नसत्या घ्याव्या लागल्या!

प्लॅश बॅक मधे दाखवलं की गुरु सगळ्यांना म्हणतोय , "जर हे टार्गेट तुम्ही वेळेत पूर्ण केलंत तर ....पे हाईक, इंक्रिमेंट आणि डबल सॅलरी.....सगळ्यांना!"....... Uhoh
याचा काय अर्थ? हे म्हणजे, जर तुम्ही अभ्यास केलात तर .... पिकनिक, आउटींग आणि ट्रीप...सगळ्यांना! असं मुलांना म्हटल्या सारखं आहे!!!
अभिजीत गुरु ला कुणी निवडलं!!!!!! धन्य आहे तो!

>>> धारकका?? >>>> lol
अहो च्रप्स तुम्ही नक्की काय बघता ???

काल सगळ्यात विनोदी प्रकार म्हणजे.....गुरु जेनी ला फोन करतो. ती रिसेप्शन वर नसते. विनोद (की कुणीतरी - प्यून) फोन उचलतो. मग गुरु त्याला आत बोलावतो. तेव्हा विचारतो की रघू..? तर तो म्हणतो की साहेब, रघ्याच्या बायको चा भाऊ मी. तो गावाला गेलाय न्हवं...!!!

म्हणजे इतके दिवस गुरवाला माहितीच नाही की रघ्या नाहीए ते...आणि दुसरं म्हणजे जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...? हाईट आहे! अभिजीत गुरु ने बहुतेक फॅमिली बिझीनेस च पाहीले असावेत...दुकान वगैरे...!!

Submitted by आंबट गोड on 9 March, 2018 - 15:59
>>> Rofl

आहेच्च की गुड न्यझ.. प्रेग्नंट आहे ती
>>> धारकका??>>>>>>आत्ता! ओ ! ओ! ओ च्रप्स? कुठुन कुठे चाल्लात गं बाई!इथे नाते संपायची वेळ आली आणी हे अथर्वला भाऊ किंवा बहीण आणु बघतायत. काय हे! अहो ती समिधा मां बननेवाली हय.

आंबटगोड अगदी अगदी हा पण एक घोळ आहेच. बरं लिहिणारा वाट्टेल ते लिहितोय, संवाद म्हणणारे भांग पितात का? Uhoh हे सगळे समानार्थी शब्द आहेत हे पुन्हा बोललो तर हसं होइल असं म्हणत नाहीत का डायरेक्टर ला?

बाकी मी वर जी पोस्ट टाकलिये त्यात --> जेनी म्हणते की तिला आजकाल जेवण जात नाही म्हणून मी रघुला तिला आल्यावर कॉफी बिस्किटे द्यायला सांगितले आहे. या वरून क्लियर कळते की तिला माहित आहे समिधा प्रेग्नंट आहे. तरि पण २-३ एपिसोड मागे पुन्हा समिधा प्रेग्नंट असल्याचे सांगितल्यावर जेनी आश्चर्यचकित होते.
लेखक साहेब विसरले का? की आपण जेनीसाठी असा संवाद लिहिला होता वगैरे.

जाऊदे आता मला लिह्वय्चा कन्तलाअ आल. बक्वास सिर्हिल

मी बंद केली बघायची शिरेल trp कमी करायला, इथेच अपडेट्स घेतो.
इंफॅक्ट झी च बंद केले...शितली आज्या नुसते फोन वर,ब्रेकअप मध्ये काहीपण चाललंय, जीव रंगला मध्ये
राणा तालमीत जाटो, अंजली शाळेत जाते अशे एपिसोडेस चाललेयत.. पर डे साठी काहीपण लांबवतायत.

Pages