माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा भाग तर लोल अगदी.... Biggrin
अशा अप्रेजल मिटींग्ज इतक्या ओपनली असतात का? आणि सगळ्यांनाच सारखी पगार वाढ काय म्हणून? आणि गुरवाने १००% कमिट केलेले म्हणून सगळे एकदम अवाक वगैरे झाले! का ही ही !
अगदीच का ही ही !!!!

आणि गुरवाने १००% कमिट केलेले म्हणून सगळे एकदम अवाक वगैरे झाले >> तेच तर . त्याने लाख सांगितलं तरी १००% जरा फारच होतं , लोकांनी लगेच विश्वासही ठेवला . आमच्या बॉसने २०% सांगितलं तरी आम्ही लाख वेळा विचार केला असता .
कबूल आहे की गुरुनी त्यांची फसवणूक केली तरी सगळे अगोदर पासूनच असे वागत होते की अगदी तुटपुन्ज्या पगारावर काम करतात .

हो ना.....आता पानवलकरां सारख्यांना १००% पगार वाढ म्हणजे जरा जास्तीच नाही का...ऑलरेडी त्यांचा पगार जास्ती असेल ना! ?
नवीन चॅलेंजींग प्रोजेक्ट जरी असला तरी त्यावर काम करणे हे तर त्यांचे काम आहेच ना...? थोडे इंसेंटिव्ह्ज देणे ठीक आहे!

अ‍ॅन्युअली १५% म्हणजे चांगलीच बढती आहे .. याना तर एका प्रोजेक्ट साठी मिळाली
१००% कोणं देतं का कधी?
एक प्रोजेक्ट चांगला पार पडला म्हणुन १००% ? मग नंतर काय?

मेरेकू ऐसा लग रहेला हय के गुरुकी इस बेवफाईसे कंटाला आकर जेनी, पानवलकर, आनंद, श्रेयस और समिधा अब राधाक्काको मदद करके सिरीयल खतम करनेका बिडा उठायेंगे. लगे रहो आनंद भाई.

पण परत झिरो पोझिशन वर स्टोरी ला आणण्याची ताकद लेखकात आहे.. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>> +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९

बहुतेक कलाकार मंडळी कंटाळली की बंद करतील हि मालिका.

गेल्या काही दिवसात मी ही सिरियल पाहिलि नाहिये. फक्त प्रोमो मध्ये राधिका नवर्‍याला विश्वासघाताविषयी काहितरी सुनावताना दिसत्ये आणि आनन्द सर्वांची राजिनामापत्रं एकदम गुरूच्या हातात ठेवतो आहे.

येस....परत परत झिरो ला आणताहेत. रिसेट बटन दाबल्या सारखं! Happy
रश्मी.....कार्टून मस्त! तो लहान नाचणारा मुलगा आनंद सारखाच दिसतोय!
आणि मोठं कार्टून राधक्का सारखं!
आता हे सर्वजण रिझाईन करुन 'राधिका मसाले' त जॉईन करणार..... व तिथे त्या गुरुच्या आधीच्या ट्रेनी बरोबर (नाव काय तिचं?) काम करणार....व राधाकक्काची कंपनी भरभराटीला आणणार!

ओह्ह म्हणून हा सगळा घाट घातला होता की आनंद आणि कंपनी ह्यांना हाताशी धरून राधिका गुरूला टेबल पुसायला लावणार.

टेबल नाही उखळ पुसायला असेल. >>>> Biggrin

आता हे सर्वजण रिझाईन करुन 'राधिका मसाले' त जॉईन करणार..... व तिथे त्या गुरुच्या आधीच्या ट्रेनी बरोबर (नाव काय तिचं?) काम करणार....व राधाकक्काची कंपनी भरभराटीला आणणार! >> ह्म्म वाटलेलचं . मग परत राधाक्का , माणसं जोडण्याबाबत .. नाती टिकवण्याबाबत चार शब्द ऐकवणार .

ही मालिका कथानका प्रमाणे चालली तर वर्षोनवर्ष चालु राहिल.
जसं की राधाक्का बदलणार. गुरुला टेबल खुर्च्या पुसायला लावुन धडा शिकवणार. उद्योजिका होणार.
मग शन्या गुरुवाला सोडुन जाणार. गुरुवाला उपरती होणार.
राधाक्काची महती पटणार. मग गुरव राधाक्का कडे येणार.
मग हॅप्पी एन्डींग.
पण ज्या गतीने मालिका चालु आहे. पुन्हा पुन्हा रीसेट होते आहे ते पहाता हे सगळं काही होणार नाही. टीआरपी गेला की अचानक भयानक्च शेवट होणार ह्या सिरेलीचा.

एक प्रोजेक्ट चांगला पार पडला म्हणुन १००% ? >>>> झी मराठीने त्यांच्या लेखकांना २-४ महिने कॉर्पोरेट मधे काम करायला पाठवायला हवं. त्यानी परत एकदा सिद्ध केलं कि लेखकाने ऑफिसचं काम कधी अनुभवलंच नाही.
मी मालिका सुरवातीचे २-३ आठवडे पाहुन सोडुन देते, मात्र इथले अपडेट्स रिलिजसली वाचते. प्रत्येक मालिकेच्या 'मायबोली PMR' मधे ऑफिस कारभाराच्या अज्ञानाबद्द्ल टिका असतेच. हे लेखक ऑफिस प्रसंग इतके 'ढ' प्रकारे लिहितात. अभिजित गुरु तर कोणताही काहीही अभ्यास न करता कोणत्या तरी वशिल्याच्या जोरावर ही मालिका लिहित असणार. ना ही त्याला भावभावनांची जाण आहे, ना ही त्याला कॉर्पोरेट बद्द्ल माहित आहे, ना ही त्याने पॉश लोकॅलिटीमधे रहाणार्‍या लोकांना कधी अनुवलं असणार आहे. त्याचे टॉवर्स मधे पॉश सोसायटीत रहाणारे लोक आणि ऑफिसमधले लोक किती भोचक दाखवले आहेत. बेसिक डिसेंसी, मॅनर्स राहु दे, पण पर्सनल स्पेस, प्रायव्हसी या गोष्टी अ.गु. ने ऐकल्या सुद्धा नसाव्यात. लेखक होण्यासाठी मराठी लिपी लिहिता येणं यापलिकडे काही क्वालिफिकेशन नसतं का?

मस्त कमेंट्स सर्वच Lol

सब मिलीभगत, एखाद्या मालिकेचे कथानक पुढे रेटण्याला channelसह सर्व जबाबदार असतात आणि असं कथानक बघून trp वाढवणारे प्रेक्षकही. जर trp कमी करायचा असेल आणि असं चाललेलं मान्य नसेल पण मालिका तर बघायची आहे कारण काही असो तर आठ वाजता बघू नका, रिपीट बघा. कारण पहिल्या शो चा trp धरतात.

रश्मी स्मायली भन्नाट.

मूर्ख आहे लेखक खरेच..पण
जोपर्यंत फुगलेल्या चण्याला सहानुभूती आहे प्रेक्षकांची..कथा चालू आहे, prime टाईम मध्ये येतेय, त्यांना पर डे मिळतोय, हेच चालू राहणार. ओव्हर करते धारकका.
Repeatch बघा अंजु म्हणतात तसे.

मनिमाऊ
++++++++१०००००
अभिजीत गुरू बद्दल हेच म्हणायच होतं. त्याला कसलाही अनुभव नाही.
बरं मॅनेजर लेव्हलच्या माणसाला ह्या असल्या माणासाचा सल्ला का घ्यावा लागतो? आणि असे अनेक प्रश्ण आहेत.
संवाद तर इतके पुचाट होत चाललेत.
गेल्या आठवड्यात प्रत्येकजण टार्गेट अचिव्ह करायचं म्हणत होता. बर तो खुप काम करतानाचा प्रसंग. फाईल्स इकडून तिकडे करण. किती बेसिक होत.
बरं ही मसाल्यांची कंपनी असावी असा अंदाज मग प्रेशर प्रॉडक्शन युनिटवर आलं पाहीजे अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ् वर नाही.
दगड आहेत. अक्षरशः

मस्त कमेंट गुगु.

अभिजित गुरु लिहितो त्या मालिकेत काम करायची पण हौस दांडगी त्याची. सगळीकडे तेच करतो, लिहितो आणि काम करतो.

गेल्या आठवड्यात प्रत्येकजण टार्गेट अचिव्ह करायचं म्हणत होता. बर तो खुप काम करतानाचा प्रसंग. फाईल्स इकडून तिकडे करण. किती बेसिक होत. >>>> अगदी अगदी अगदी.
ही ४-५ माणसचं काय काम करतात कंपनीत कळत नाही .
बर , प्रेशर वगैरे आहे असं काही वाटलं नाही . कॉफी पित , राधिकाच्या गप्पा तर करत होते .

सगळीकडे दोन बायका आणि त्यांची फजिती ऐका असे झाले आहे.
गुरुच्या मागे राधाक्का अन शनाया
समीरच्या मागे मीरा अन मेनका
श्लोकच्या मागे कुहू अन गौरी
सैनिकाच्या मागे जयडी अन शितली
अंजलीच्या मागे दोन डॉक्टर(ईथे जरा बदल Happy )

Pages