माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या भागात राधाक्काने प्रेझेंटेशन बरे दिले, एपिसोड बरा होता चक्क. चपटी आणी लांबनाकीच्या चांगली हाणली राधाक्काने. पण उद्याच्या भागा ची झलक पाहुन मला गुरोबाच्या दाढीत ऊवा, पिसवा, गोचिडे सोडाविशी वाटतायत.

Lol रश्मी.

तू सोडूनच दे आता, नुसती बोलत राहू नकोस, तुमच्या पुण्यात ढेकुण मिळतील नक्की ते सोड.

रश्मी.. Happy ग्रेट माईंड्स थिंक अलाइक!
उद्या काय दाखवलं..? मी मिसलं बहुतेक!
ओह.....ते गुरव त्या कोण जेबी की फेबी ला सांगतो की या लोकांनी एफल मधे फ्रॉड केला होता...ते का?
कैच्या कैच!

पण मी म्हणते....साखरपुडाच का? बारसं, मंगळागौर इ का नाही? Biggrin
पण खरंच....ती तशीच दिसत होती. काय ती हेअर स्टाईल...... आता आपण शनाया च्या साईड च्या नाही आहोत म्हणून.. पण शनाया म्हणत होती ते काही खोटं नव्हतं!

शनाया च्या साईड च्या नाही आहोत>>>>>>>>>> शन्याच्या साईडचं असणं किंवा शन्याच्या विरोधात असणं ह्यामुळे राधाक्का हे कॅरेक्टर कमी भैताड ठरत नाही. Happy इथे शन्याच्या बाजुने कुणी नसेलच बहुतेक. पण सगळेच राधाक्काच्या बाजुने आहेत हे ही नाही.
राधाक्काचं कॅरेक्टर नीट प्रॅक्टीकल, तडफदार, स्वाभिमानी आणि नॉरमल हाडामासाच्या Happy नॉरमल भावभावनांच्या बाईचं दाखवलं असतं काही औरच असतं. मी ही तिच्या बाजुने असते मग.

आजच्या भागात राधाक्काने प्रेझेंटेशन बरे दिले, एपिसोड बरा होता चक्क. चपटी आणी लांबनाकीच्या चांगली हाणली राधाक्काने. पण उद्याच्या भागा ची झलक पाहुन मला गुरोबाच्या दाढीत ऊवा, पिसवा, गोचिडे सोडाविशी वाटतायत.>>>>>>>>>>>> Rofl Rofl

राधाक्काचं कॅरेक्टर नीट प्रॅक्टीकल, तडफदार, स्वाभिमानी आणि नॉरमल हाडामासाच्या Happy नॉरमल भावभावनांच्या बाईचं दाखवलं असतं काही औरच असतं. मी ही तिच्या बाजुने असते मग. +++++++++1000000

हाईट म्हणजे ते जेबी का कोण...ते पानवलकर - आनंद इ. बरोबर मराठीत बोलत होते... हिच्याशीही आधी मराठीतच म्हणाले..की करा सुरु.....आणि ही मात्र..... मायसेल्फ राधिका सुभेदार...... आय टेक केअर ऑफ माय स्टाफ...असं काहीतरी म्हणत होती... प्रॉडक्ट्स वगैरे बद्दल सांगायच्या आधी स्टाफ काय....!! काहीही.....!!
अभिजीत गुरु ने कधी जन्मात प्रेझेंटेशन दिले नसणार...तो काय लिहीणार डायलॉग्ज! तो प्रत्यक्षातही नक्कीच त्या केडी सारखाच असणारे!

पण मी म्हणते....साखरपुडाच का? बारसं, मंगळागौर इ का नाही? >>> अगं तेच ते गं!
रविवारी एक सापु अटेन्ड करून आले म्हणून तेच डोक्यात होतं Biggrin

आणि असं दाखवलं की विश्वास वगैरे मी प्रेसेन्टेशन पाहिल्यावर ठेविन? Uhoh
प्रेझेन्तेन्श इतके महत्वाचे अस्ते? प्रोद्क्त बेकार असले तरी चलेल का?
फोर्मल मितिन्ग ला सादी >/ अम्बदा? हल्का मेक्प? Uhoh

बिचारे पानवलकर एकटेच सारखं "आता कामाचं बघू" असं म्हणत असतात, बाकी श्रेयस्,जेनी,आनंद ह्यांना काही काळजी म्हणून नाही. राधिकाने खायला काय करायचं हेच ठरवत असतात.

दक्षू..... च्रप्स चा वारसा अगदी चालवते आहेस. अ‍ॅक्च्युअली ते तर आता सुधारले लिहीण्यात !

Biggrin
@अंजू - मैत्रिणींच्या या स्नेह भावात शिरेली पेक्षा जास्त आनंद आहे!

राधाक्काचं कॅरेक्टर नीट प्रॅक्टीकल, तडफदार, स्वाभिमानी आणि नॉरमल हाडामासाच्या Happy नॉरमल भावभावनांच्या बाईचं दाखवलं असतं काही औरच असतं. मी ही तिच्या बाजुने असते मग.>>>>>+ १२३४

पण तसं नाही ना गं सस्मित. राधाक्का, आणी इतर लोक सुधारायचे नावच घेत नाहीत. वर प्राजक्ता ने म्हणल्याप्रमाणे एकटे पानवलकरच काम करतात असे वाटतेय. बाकी लोक खाना-पिना-शन्यासे पंगा लेना यातच मश्गुल आहेत. आणी राधाक्का आणी शन्या लहान मुलीं सारख्या भांडतात.

सगळ्यात धमाल म्हणजे हा केड्या नावाचा किडा त्या ग्रहण सिरीयलचा डॉयलॉग रायटर आहे असे काल रात्री नामावळीत बघीतले.Big surprise धन्य हो!

पांडुने जशी राखेचाची वाट लावली तशी हा किडा केड्या ग्रहणाला ग्रहण लावणार हे १०० टक्के खरे.

गूगल कीबोर्ड टाकला सेल वर, आता जमतंय लिहायला.
पण लॅटपॉट वरून अजूनही तसच लिहिलं जातं.. मी बंद केलंय माबो वापरणे लॅटपॉट वरून.

बादवे, रश्मी तुम्ही खूप गुंतल्या आहेत या शिरेल मध्ये. तुम्हाला खरच धारकका बद्धल सहानुभूती आणि गुरू चा खूप राग दिसून येतो प्रत्येक पोस्ट मध्ये ☺️

रश्मे मी हसून मेले तुझ्या स्माय्ल्या बह्गून Proud
मी या धाग्यावर आस्च लिहिनार आता कन्ताला येतो इतके कश्त घ्यायचा पिस काधायल कशाला इत्के कश्त घ्या?

च्रप्स चा वारसा अगदी चालवते आहेस. अ‍ॅक्च्युअली ते तर आता सुधारले लिहीण्यात !>>> हो लिहिण्यात सुधारलेत, पण विचारात सुधारणा करायला हवी.

तुम्हाला खरच धारकका बद्धल सहानुभूती आणि गुरू चा खूप राग दिसून येतो प्रत्येक पोस्ट मध्ये ☺️ >>> च्रप्स, आणि तुम्ही शनामध्ये गुन्तले आहात. Happy

काय मूर्खपणा आहे, मीटिंग मध्ये बाकी वेळ मराठी मध्ये ,आणि फक्त प्रेसेंटशन इंग्लिश मध्ये. बर ते संपल्यावर तरी continuation मध्ये 1 2 वाक्य तरी इंग्लिश हवी.तर ते साहेब पण, छान दिलात प्रेसेंटेशन. अरे काय , हे काय कोणती वक्तृत्व स्पर्धा वगैरे होती का .बकवास. बाकी stastics ,numbers वर काहीच बोलणं नाही ,फक्त मी, माझं काम प्रामाणिकपणा ,स्टाफ एवढंच घोळून घोळून परत परत .मंद लोक्स

राधक्काला एक चांगली कॉटन ची साडी द्यावी प्रेसेंटेशन साठी तर ते पण नाही, शनाया काय घरून कपडे आणते का काय माहित ,गेला बाजार त्या मावशीला आणि लांब नाक वालीला पण बरे कपडे दिलेत.

हो शन्याला आता तरी चांगले कपडे द्यायला हवेत, रादर तिने ते मागायला हवेत त्या किड्याला. नेहेमीच काय चड्डी घालुन वावरायचे!

आंगो, मला नेत्यांचा ( राजकारणी ) सुद्धा राग येतो, मग मी मनातल्या मनात त्यांना अंतराळात भिरकावुन देते. Biggrin बसा लटकत आणी बोंबलत त्रिशंकुसारखे.

च्रप्स, राधिकाची मला सहानूभूती वाटते, कारण तिचे खेडवळ वागणे सोडले आणी अतीरेकी चांगुलपणा सोडला तर तिचा कुठलाच दोष नाही. चांगली गृहिणी आहे, एका मुलाची आई आहे, संसारी आहे, चार माणसांना जोडणारी आहे. पण एवढेच की कुठलाच खंबीरपणा ती नीट दाखवत नाही, तिची ठाम मते नाहीत, नवर्‍याकडे अजूनही ओढा आहे यात सगळा घोळ आहे.

या उलट शन्या, कमालीची स्वार्थी, माणुसकीहीन, उद्धट, माजोरडी, कृतघ्न आहे. ( म्हणजे तसा रोल आहे ) आठवा, मागे एका कंपनीच्या डायरेक्टरने तिची जाम किंमत केलेली असते, पण तिच्या बरोबर असलेली जेनी तिची बाजू घेऊन तिला वाचवते. पण ही हलकट कृतघ्न बया, त्याच जेनीला चोर ठरवायला निघते. अजून काय अपेक्षा आहेत तुमच्या शन्याकडुन? तुम्हाला आवडते तर तुम्ही पण प्रत्येक पोस्ट मध्ये तिचे कौतुक करा.

मग मी नावे शन्याला नावे ठेवेन. Biggrin

शनायचे कौतुक मी काय करू.. आजकल बोर करते ती.. कॉमेडी डायलॉगस नसतात. मी बंद केले बघणे शिरेल.
पण जनता इतकी गुंतली आहे हेच शिरेल चे यश म्हणावे लागेल.☺️

त्याच जेनीला चोर ठरवायला निघते. अजून काय अपेक्षा आहेत तुमच्या शन्याकडुन? >>>>>>>>>>>>>>>>> ह्या सीनमधे मला आठवतयं त्याप्रमाणे सुरूवातीला शनाया तयार नसते, ती वहिनी आणि इशा तिला भरीस पाडतात, अर्थात मी काही शनयाची भलावन नाही करते, पण ती अ‍ॅज सच वाईट नाही दाखवल्ये, पैशासाठी तिला गॅरी हवाय.

ह्या सीनमधे मला आठवतयं त्याप्रमाणे सुरूवातीला शनाया तयार नसते,>>>>> हो मलाही आठवतय की शन्या तयार नसते, पण तरी मला वाटत की मागच्या उपकाराची परत फेड शनायाने अशी करायला नको होती. तशी वहिनी एकदा राधिकावर पण शन्याच्या कुरीअर चोरीचा आळ घेते, पण शनाया ते नाकारते. कारण राधिका तिला नको असली तरी असे काही ( चोरी वगैरे ) करणार नाही हे तिला माहीत असते.

पण गॅरोबाला मिळवण्यासाठी शन्या काय पण करायला तयार होते/ असते. त्यातुन ती लांबनाकी इशी तिला भडकावते कारण तिला पण गॅरोबाचे पैसे फुकटात मौजेसाठी हवे असतात.

Pages