माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या फुगलेल्या चण्याच्या धारेनेच एक दिवस गुरु शनायाचा नाश होणार बघा Wink , अर्थात trp आहे म्हणून वर्ष लागेल कदाचित.

बाकी तुम्ही कितीही नावं ठेवा च्रप्स , ती राधिका काम चांगलं करते तिला नेमून दिलेलं. शनायापण चांगलं करते तिला नेमून दिलेलं. दोघीही दिसतात छान. फक्त ती मालिका संपणार असं जाहीर झालं की मी बघेन.

कारण त्यांच्या भूमिका योजून देणारे पकाऊ आहेत, trp असल्याने मालिका दळण दळत राहणार.

सिरीयल सुरु झाली तेव्हाच मी झी फेसबुकवर लिहून आलेले असल्या नवऱ्याला सोडून दे, तक्रार कर फसवणूकीची , आत टाक.

सिरीयल मे सिरीयल "माझ्या नवर्‍याच्या बायकोच्या भावाची बायको >>>> Lol

अंजू धन्यवाद.
राधिका चांगुलपणाचा अतीरेक करते. पण हे सगळे लेखक आणी निर्मात्याच्या तालावर नाचतायत झालं!

मला त्या शन्या गुरुचा, समिधा, इरी वैनीचा जेवढा राग येत नाही तेवढा राधाक्काचा येतो. Happy
खरंतर मला बर्‍याच सिरेलीतल्या विलन लोकांचा येत नाही तेव्हा राग सग्ळ्याच बाबतीत अति अति लेव्हलवर असलेल्या हिरो हिरोयणींचा येतो.

खरे आहे सस्मित. कारण किती सहन करावे यालाही काही मर्यादा असते.

साबु साबा पहात असलेल्या घाटगे आणी सून मधले एक दृष्य काल पाहीले. त्यात ती अमृता ( सून) तिला दिलेले फोटो तिच्या सासु आणी आजेसासुला दाखवतच नाही. आणी मग खरे कळल्यावर मग रडका भयाण चेहेरा करुन हावभाव दाखवते. वास्तवीक या दोन्ही सासवा तिच्या बाजूने असतात, तरी ही चांगुलतेची पुतळी प्रत्येक वेळेस खोटे बोलते आणी सर्व लपवते.

पैसा, करीअर आणी प्रसिद्धी करता हे कलाकार कसली पण तडजोड स्वीकारुन असल्या पाणचट, शेंडा बुडखा नसलेल्या भूमिका करतात. आणी अपणही काही पर्याय नसल्यागत ते स्वीकारतो. धन्य हो!

च्रप्स सर मला तुम्हीच एकटे राधिकाचा तिरस्कार करताना दिसता Lol

म्हणजे हल्लीहल्लीच्या कमेंटस बद्दल मी म्हणतेय, आधीच्या नाही म्हणजे जुन्या कमेंटसमध्ये बरेच जण राधिकाविरुद्ध होते. >>> अंजू, अजुनही माझ्यासारखे बरेच जण तिच्या विरुद्धा आहेत पण आता मालिकाच बघत नसल्याने इथे काही लिहित नाहीत इतकेच

पैसा, करीअर आणी प्रसिद्धी करता हे कलाकार कसली पण तडजोड स्वीकारुन असल्या पाणचट, शेंडा बुडखा नसलेल्या भूमिका करतात. >> हो असेल्ही कारण मोस्टली मेन कलाकार एकदा सिरियल सपली की परत नविन मालिकेत दिसत नाहितच , त्यामानाने सहकलाकार कुठेतरी भुमिका मिळवतात...

मला वाटतंय की शेरेल वाल्यानं वाटतंय की राधिका जे करते ते सगळ्यांना आवडतंय.. किंवा असे चमचे लोक फिडबेक देत असतील आणि हे अजून जास्त करत चालले आहेत.
त्यांना कल्पनाच नाहीय की इतके जास्त करतायत की लोकांना धारिका हेच कॅरॅक्टर अवडेंनासे झालेय.
याउलट शनाया. जेवढा वेळ स्क्रीन वर असते, फुल कॉमेडी असते. डायलॉगस कसले जबरी असतात..आणि या शिरेल चा जॉनर विनोदी आहे ओरिजिनल.
काम सगळेच भारी करतात except तो लेखक आणि मावशी..धारिका चे रडगाणे बघूनच लोकांनी शिरेल बघणे सोडून दिले आहे.. बराबर ना?
धारिका ने वजन थोडे कमी केले पाहिजे.. गुरू पेक्षा खूप मोठी दिसते.

राग येणं, वागण्याला विरोध असणे वेगळे आणि तिरस्कार करणे वेगळे. राधिकाच्या कितीतरी गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी त्या झी फेसबुकवर लिहून सिरीयल बघणे बंदच केलं. पण मी तिरस्कार नाही करत तिचा. फार फार पूर्वीच तिने कायद्याचा बडगा नवऱ्याला दाखवून divorce घ्यायला हवा होता असंच मला वाटतं पण त्या सिरीयलवाल्यांना नाही वाटतना.

आता त्या गुरु चं charactor फार खालच्या दर्जाला नेलंय आणि माणुसकीशून्य केलंय त्यामुळे मला तो रस्त्यावर यायला हवा असंच वाटतंय आणि शनायाला फार कर्तृत्वशून्य दाखवलं आहे.

सस्मित, च्रप्स आणि नताशा, तुमच्या बरोबर मी सुद्धा राधिका न आवडणार्‍यांच्या गटात आहे.

मी पुर्वी पहात होते तेव्हा तिचं कॅरेक्टर मला इतकं इरिटेटिंग वाटायचं. तिच्या अति चांगुलपणाची लोकांना चीड यायची, पण ते लेखकाचं फेल्युअर आहे. सुरुवातीपासुन त्यांना ते कॅरेक्टर लिहायला झेपलंच नाहीए. राधिकाच्या गुणांपेक्षा तिच्या दोषांची यादी एवढी लांब वाटते, हे दिग्दर्शक आणि लेखकांच कर्तुत्व. अर्थात दोघा लेखकांना नंतर टिव्हीवर पाह्यल्यावर त्या दोघांची कुवत कळलीच.

राधिकाबद्द्ल सहानुभुती वाटण्याऐवजी तिचा वैताग येणं यातच ती मालिका किती गंडली आहे आणि कथानक किती फ्लॉप आहे ते कळतं.

मला फक्त राधिकाच नव्हे तर ही शिरेलच आवडत नाहि

शन्या तशी बर्री दिसायची आधी, पण हल्ली जरा सुटल्यासारखी वाटतेय. अन तिचे डायलोग पण आधी इनोसेन्ट वाटायचे आता वेडगळ पणे बोल्ल्यासार्खे म्हणजेच पक्की मंदबुद्धी असल्यासार्खे वाटतात.

पण माझे एक निरीक्षण आहे, ही अशी जी शन्या सार्खी माणसे असतात न खर्या आयुष्यात ती खरच खुप घातक असतात म्हणजे असे पाहता वाटते की मुर्ख आहे काही कळत नाही अन खरोखर बर्याच गोष्टी कळतही नसतात पण दुसर्याचे काही वाईट करायची संधी मिळाली तर मात्र सोडत नाहीत. अन ह्यांच्या असल्या स्वभावामुळे बरेचदा समोरच्याला काही कळतच नाही

तसे पाहता ह्या शिरेलीतील सर्वच कलाकार त्यांना नेमुन दिलेली कामे छान करतायेत.

पण जिथे स्टोरीच धड नाही तर ते तरी काय करणार असे वाटते

आता वेडगळ पणे बोल्ल्यासार्खे म्हणजेच पक्की मंदबुद्धी असल्यासार्खे वाटतात. >>> लेखकानेच/दिग्दर्शकानेच बनवली आहे तिला तशी . मागे एकदा तिला साधी केरसुणीने कचरा काढता येत नव्हता आणि सुपलीत गोळा करता येत नव्हता . कधी केलंच नाही काम त्यामुळे फार्फारतर नीट काढता येणार नाहे कचरा . पण केरसुणी आणि सुपली कशी वापरायची हे ही न कळण्याएतकी ती नक्कीच मूर्ख नाही.

तसे पाहता ह्या शिरेलीतील सर्वच कलाकार त्यांना नेमुन दिलेली कामे छान करतायेत.

पण जिथे स्टोरीच धड नाही तर ते तरी काय करणार असे वाटते>>>>>> +१

चला, आता मुख्य पात्राकडे वळुया, जे इथे बर्‍याच जणांना आवडत नाहीये कारण त्यांच्या पण काही अपेक्षा आहेत, त्यात मी पण आहे. तरी मला राधिका आवडते, मी तिच्या बाजूने आहे. वास्तवीक पहाता राधिकेचे पात्र आधी सुरवंट मग त्याचे होत जाणारे फुलपाखरु असे काहीसे लेखक व निर्माता/ निर्माती दोघांना वाटले असेल. पण लेखक अभिजीत गुरु व निर्माती निनावे बाई दोघांना बहुतेक प्रसिद्धीचा आणी सेल्फी काढण्याचा बराच मोह पडलेला दिसतोय. त्यामुळे मूळ कथा बाजूला ठेऊन ही दोन भैताड स्वतःच्याच इमेजला फुटेज देतायत.

आधी खेडवळासारखी दिसणारी/ बोलणारी/ वागणारी राधिका , संसार वाचवण्यासाठी निदान रेवती आणी समिधाला पाहुन तरी सुधारेल असे वाटत होते. पण बाई बर्‍याच कर्मठ आहेत. लेडी कर्ण आहेत, सूपर वुमनीया झालेल्या आहेत, संत परंपरा चालवु बघत आहेत, मधून मधून त्या वैनी आणी भावाच्या बाबतीत गांधारी आहेत, आदर्श सून बघु पहात आहेत, लेडी टायकून बनायची स्वप्ने आहेत. पण हाय रे दैवा!!

अजूनही तीच भाषा आणी तोच अ‍ॅटिट्युड आहे. गुरु आणी राधिका तसेच शन्या हे तिघे जेव्हा पहावे तेव्हा तोंडाची वाफ फुकट दवडत असतात. यंव करु न त्यवं करु यातच यांचे एपि भरकटत चाललेत. ज्याला खरोखरच काही बनायचे असते तो करुन दाखवतो, बोलत नाही. पण यांची नुसतीच बोलाची कढी...

फुकणीचे पुढे जायचे नावच घेत नाहीत. तू मला मारल्यासारखे कर मी रडतो/ रडते. हा लेखकाचा वादा. अज्जुन लिहायचे आहे उद्या लिहीन.

रश्मी मी पण राधाक्काच्या बाजुने होते. पण गुरुला धडा न शिकवता काहीतरी बालिशपणा करत बसते.
एवढं करुनही माह्या नवरा चांगला हा अ‍ॅटिट्युड डोक्यात गेला खरंतर राधाक्काचा.
आपला नवरा ही तितकाच खरंतर जास्तच दोषी असताना शन्याला धडा शिकवायची भाषा करत असते.
आणि त्यासाठी बिनबुडाच्या आयड्या करते. ते टॉवेलला काजळ लावण एवैगेरे कहर होता.
नवरा दुसर्‍या बाईला घरी ठेवुन आपल्याला आणि मुलाला घराबाहेर काढतोय ह्याचं गांभीर्ञ काय असत. हे दुर्दैवानं लेखक
दिग्द. आणि कलाकार ह्यातलं कुणालाही कल्पना ही करता येत नाहीये ह्याचं आश्च्र्य तर कमीच चीड च जास्त येते.
अजुन लिहिन उद्या

अर्थात दोघा लेखकांना नंतर टिव्हीवर पाह्यल्यावर त्या दोघांची कुवत कळलीच. >>> अभिजीत गुरु च माहीत नाही पण, रोहिणी निनावे हयान्नी दामिनी, अवन्तिका, श्रावणसरी सारख्या दर्जेदार मालिका लिहिल्या आहेत. निदान त्यान्च्याकडून तरी हि अपेक्षा नव्हती.

आधी खेडवळासारखी दिसणारी/ बोलणारी/ वागणारी राधिका , संसार वाचवण्यासाठी निदान रेवती आणी समिधाला पाहुन तरी सुधारेल असे वाटत होते. पण बाई बर्‍याच कर्मठ आहेत. >>> अगदी अगदी. ते मेकओवर (?) करणे, पन्जाबी ड्रेस घालणे, इन्ग्रजी बोलणे हे फक्त दोन दिवसान्चच नाटक होत. पुन्हा राधिकाच ये रे माझ्या मागल्या.

अजूनही तीच भाषा आणी तोच अ‍ॅटिट्युड आहे. >>> राधिकाला म्हणाव, बाई ग तुझी ती सन्सकृती, भाषा घरीच ठेव. तुला जर साडी नेसूनच बिझनेस करायचा असेल त्यालाही आमची काही हरकत नाही. पण निदान घराबाहेर तरी प्रमाण मराठी भाषेत बोल.

टॉवेलला काजळ लावण एवैगेरे कहर होता. >>> तो रेवतीचा बालिशपणा होता.

ते मेकओवर (?) करणे, पन्जाबी ड्रेस घालणे, इन्ग्रजी बोलणे हे फक्त दोन दिवसान्चच नाटक होत >>> + १०००० .
एवढे ड्रेसेस घेतले होते ते तसेच पडले आहेत . मध्यंतरी नानी-महजनी काकून्साठी पण काहितरी फॅशनेबल घेउन आली होती ना ?

रच्याकने , अथर्वची पिकनीक कुठेशी जाणार आहे ? २००० रुपये फी होती .
भक्ती मिस् फोन करून कळवतात राधिकाला , आणि ती शाळेच्या बाहेर त्याना भेटून फी देते .
भक्ती मिस् अथर्वची क्लास टीचर आहेत का? की त्याना पैसे भरायला सांगितले .
नेहा जाणार आहे का पिक्निक ला ? नेहा वरून आठवलं , गुप्ते भाउ दिसले नाहि हल्ली कुठे , लग्न झाल्यापसून गायबच आहेत .

समिधा मधला बदल सुखावह आहे . नाना-नानी खूप लाड करतायेत तिचे.

गुरू अगदीच स्वार्थी होत चाललाय Sad .
double increment आणि प्रमोशन सांगून कामं करवून घेतआणि, आता फक्त १५% पगारवाढ देणार .
आनंदची नक्की पोस्ट काय आहे कंपनीत ? आणि जेनीची पण . प्रत्येक महत्वाच्या कामात , मिटिन्ग मध्ये तिची हजेरी असते .

Pages