माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी.. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो काय, मैत्री केली की निभावते अशी दाखवली आहे म्हणजे. >>> सिरियलच्या सुरुवातीच्या एपिसोडसमध्ये तिला थोड चान्गल दाखवल होत. तिच ते मैत्री निभावण खोट वाटत नव्हत. पण नन्तर मात्र तिच्या character ची वाट लावून टाकली.

शिरिष कणेकरान्चा लेख छान आहे. आवडला. त्यान्चा खुकखु वरचा लेख वाचून मात्र डोक उठल होत माझ. वरचा लेख नक्की कणेकरान्चाच आहे ना Uhoh अस राहून राहून वाटतय. Lol

आता तर ती गुरूचा बदला घ्यायच्या ऐवजी राधिकाला बरबाद करायला येणार असं प्रोमोवरून वाटतंय. आधी राधिका सर्व दोष तिलाच द्यायची तसं आता ही पण करणार. गुरु मोकळा मधल्या मध्ये. दोघींनी मिळून स्वार्थी, खोटारड्या गुरूला बरबाद करायला हवं खरं म्हणजे.

एनीवे नवीन शनाया येतेय आणि ती राधिकाला बरबाद करायला म्हणजे दोन वर्षतरी मालिका संपत नाही आणि माबो धाग्यांचा पण रेकॉर्ड होणार बहुतेक.

बाय द वे ओरिजनल स्मिता आणि chara शनाया ह्यातला महत्वाचा फरक म्हणजे स्मिता सेल्फमेड पर्सन, helping nature, सतत कामात.

शनाया कामचुकार आणि ऐदी.> >>>>सिरियल मधले कॅरेक्टर आणि खर्‍या जीवनातील माणसाचं कंपॅरीझन ?? कमाल आहे.
रसिका फोरेनला पुढच्या व्यावसायिक शिक्षणासाठी चालली आहे.

बानुबया शोभत नाही. रसिकाची सर नाही ह्या शन्याला. Happy
आता काय तर शन्या म्हण्तेय राधाक्काला की मी तुला बरबाद करेन. म्हणजे हे दळण काय संपत नाही.
दोघीही दळा रे दळा रे करतील. गुरु मुठमुठ धान्य घालेल जात्यात. Happy
राधाक्का आणि गुरोबाच्या पॅचप होणार का?
ग्रेट राधाक्का. ह्याच्साठी केला होता का अट्टहास?
राधाकासारख्या बायकांना, ज्या एवढं सहन करुनही एवढं कर्तुत्व करुनही दुसर्‍या मुलीला दोष देतात आणि स्वतःच्या नवर्‍यला उदार बिदार होत माफ करतात, असेच नवरे योग्य आहेत.
#भयताडराधाक्का#

इशा केसकरचे नशीब बघा. आधी खंडोबात म्हाळसाची सवत आणि आता राधाक्काची सवत माझ्या नवर्याची बायकोत.

भरत जी धन्यवाद.
सई ताईंची माफी मागून प्रतिसाद सुधारतो आहे.

रसिका फोरेनला पुढच्या व्यावसायिक शिक्षणासाठी चालली आहे. >>> मी रसिकाला नाही नावं ठेवली, शनाया charactorला ठेवली आहेत. रसिकाचं कौतुकचं केलंय. तिच्यातल्या गुणांचं कौतुक आहे मला. ती एक डोंबिवलीकर आहे आणि माझी भाची ज्या शाळेत शिकते त्याच शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून जास्त कौतुक आहे. ती tallented आहे खूप म्हणून मी कितीदा लिहिलंय.

मी स्पष्ट लिहिलंय की रियल स्मिता आणि chara शनाया असं कम्पेअर आहे ते.

राधाकासारख्या बायकांना, ज्या एवढं सहन करुनही एवढं कर्तुत्व करुनही दुसर्‍या मुलीला दोष देतात आणि स्वतःच्या नवर्‍यला उदार बिदार होत माफ करतात, असेच नवरे योग्य आहेत.
>>> +1

बाय द वे...गुरुमायच्या गळ्यात तो चपलांचा हार नव्हता तर नव्या शनायाचा हात आहे तो....जॅकेट घातलेला..पहा नीट...
Biggrin

Pages