माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्र्र! असं आहे होय?
पान्वल्कर ते जेनी सग्ले राधाका कदे आले?
पगार म्हनून काय देनार? मिर्च्यन्च्चि देठ? का मसाले? काहीही
आता ती खूप मोथी होनार आनि गुरू तलागालात जानार अस दाखवनार. मग गुरूचं नाक थेचल्म म्हनून सगल्यन अनन्द होनार. अनि रजवादे पन रधिकाला पर्त्नर्शिप देनार. गुरूकदून काधून घेउन.
एक दिवस मग गुरू आनि शन्या पन येनार नोक्री मागाय्ला
तेव्हा राधाका म्हननार आधी माझे तेबल पुसा मग नोक्री देते>>>>> Rofl अगं दक्षु असे का एवढे घाई घाईत लिहीतेस?

याने काय मिळणार आहे. नवऱ्याशी प्रेमाने राहिली असती चणा >>>> अग्गो बाई! याला म्हणतात की रामाची सीता कोण होती! तिने लाख प्रेम उधळले या दाढीधारीवर, पण त्याला त्या चपटी मध्ये रस होता ना.

अरे काय चाल्लय शिरेलीत, हसुन हसुन वेड लागेल. मी पहत नाही सिरिअल गेले वर्षभर पण इथे वाचुन चांगलीच करमणुक झाली.

आणि तो टेबल पुसायचा सीन आला रे आला की मी बघणार Wink , किती 6 महीने का वर्ष झालं मी वाट बघतेय. अजून 6 महिन्यांनी असेल, लिहा बरं का झाला की Lol .

किती 6 महीने का वर्ष झालं मी वाट बघतेय. अजून 6 महिन्यांनी असेल, लिहा बरं का झाला की
>>> 6 वर्षे वाट बघा ☺️
गुरू आणि निनावी ला माहीत आहे की हा सिन आला की संपले सगळे.

च्रप्स Lol

चालतंय की, सहा वर्षांनी झाला तरी लिहा कोणीतरी तेव्हा बघेन. पण तो सीन बघणार म्हणजे बघणार Wink .

काल पाहिली, पाचेक मिनिट, ती बकुळा, कसली ओव्हरअ‍ॅक्टींग करते.. बापरे... काय ते हावभाव.

अन ती मठ्ठ राधीका, अजुनही का सहन करतीये त्या वहिनीला. काल तर आयता चान्स होता, हात धरुन बाहेर काढायचा , सांगायचे न सरळ की निट राहशिल तर ठिक नाही तर फक्त दादासाठी अजुन नाही करणार सहन. दोघे बहिण भाऊ मिळुन तुलाच हाकलुन देवु जर नाही सुधारलिस तर

कैच्या कैच! राधाक्का ला चांगुलपणाचा झटका आलेला आहे. आणि दादा वहिनी च्या आधी गुरु शन्याला का नाही घालवत पोलीसांना बोलावून?

अय्यो! या चौघांना हाकलले की सिरीयल संपेल ना! हे तिन्ही ( एक दाढीदारी आणी दुसर्‍या दोघी ) जण राधाक्काचा अती छळ करुन थकतील व या तिघांची १०० पापे ( पापेच म्हणलयं मी ) पूर्ण होतील ना तेव्हा या सगळ्याचा सोक्षी मोक्षी सोनाक्षी होईल.

काल खरच चान्स होता चांगला पण राधाक्का बोलते जास्त आणी करते कमी. म्हणलं ना गुरु आणी राधा दोघे बोलबच्चनच आहेत नुसते.

काल पाहिली, पाचेक मिनिट, ती बकुळा, कसली ओव्हरअ‍ॅक्टींग करते.. बापरे... काय ते हावभाव.>>>अगदी अगदी असंच वाटलं काल....

आधी शना साठी बघायचो, आता तिला पण फालतू डायलॉगस दिलेत, बोर झालीय शिरेल,
चणा, वहिनी वगैरे आले की मी चॅनेल चेंज करतो.
त्यांनी चणा च्या लाईफ मध्ये एक प्रियकर आणावा, तिने पण अफेर केले पाहिजे मग मजा येईल.
तो आनंद सही match आहे तिच्यासाठी. मानलेला भाऊ रिलेशन नव्हता पाहिजे त्यांच्यात.

त्या सिरीयलपेक्षा इथली चर्चा जास्त मनोरंजक आहे.खर तर तुम्हा सर्वांना वेळ असेल तर zee ने सिरीयलचे डायलाॅग लिहायला घेतल पहिजे .सिरीयल दुप्पट टीआरपीने चालेल.खूप मजा येते इथले प्रतिसाद वाचून.स्पेशली प्रत्येक कॅरेक्टरला दिलेल्या उपमा वाचून तर हसायला येत.

"ती बकुळा, कसली ओव्हरअ‍ॅक्टींग करते.. बापरे... काय ते हावभाव" + सहमत
खरतर बकुळा उर्फ स्वाती बोवलेकर चांगली अभिनेत्री आहे. या सिरीयलच मुळ असलेला चित्रपट सवत माझी लाड्की पहा. त्यात महीला मंडळ येत सांत्वन करायला . त्यात जी विचारते ना " तुम्ही डॉक्टरांना रेड हँड पकडलत म्हणजे कसं कुठे......" कसले भोचक हावभाव आणि फाजिल उत्सुकता दाखवली तिने. अर्थात तिथे दिग्दर्शक स्मिता तळवलकर होती.
इथे सगळाच आनंद.

माझी हिम्मत नाही झी वरची कुठलीच सिरीयल पहायची.
मी सकाळी उठतो तेव्हा नेमकी हीची रीपिट टेलिकास्ट असते. चहा बरोबर झक मारत पहावी लागते.

परवा हाईट म्हणजे...रघ्या व त्याचा तो रिप्लेसमेंट मेव्हणा - विलास - का कोण...ह्यांच्या संवादातच दहा मिंटं घालविली!
आणि जेनी म्हणजे तर ," आयेम जेनी फ्रॉम राधिका मसाले अँड फूड प्रॉडक्ट्स.." असं म्हणत कुकर वगैरे बंद करुन येते. धाराक्का सगळ्यांचा चहा गाळते.... असं चाललंय. गुरु तरी कसं काय मॅनेज करतोय देव जाणे..... तसं पाहिला गेलं तर त्याला तरी कोणतं सुख ए ? सदैव आपले लोकांच्या नजरा झेलत रहा अथवा ऐकून घ्या, स्टाफ सोडून गेला, खाणं पिणं नीट मिळत नाही, जिच्या साठी एव्हढं केलं...ती बिनडोक व वैतागलेली...!! Biggrin

हो खरच, मेन लिड कधिच शान्त चहा पित गप्पा मारत रोमान्स करित आहेत असे इथे कधिच दाखवत नाहित त्यामानाने गुप्ते-नेहा, अज्या-शितलि, राणा-अन्जलि नशिबवान.

सिरियल मध्ये कसला पांचटपणा सुरू आहे? Lol
राधिकाचे हे सगळे चेले (पानवल्कर पासून ते जेनी पर्यंत) तिथेच बसून सगळं डिस्कस करतायत त्या मुर्ख शनाया समोर. आणि ती वहिनी कसली कृतघ्न आहे, सतत शनाया समोर लाळघोटेपणा करते आणि राधिकाला ते कसं काय चालतं? Uhoh (ह्याका(रधिकाका) खाको व्हाका (शनाया का) गाना गा र्ह्ये, नै बोले तो सुनते नै) Proud

ते गुरोबाच्या ओफिसातिल नविन भरति केड्या करतोय, HR नाहि आहे का ALF madhe.>>>>तिथे काहीच नाहीये. फकस्त जेनी होती ते रिसेप्शन काऊंटर, गुरुवाचे केबिन, अजून दोन केबिन, गुरवाचा लॅपटॉप, गुरवाचे टेबल, खुर्ची, एक सोफा, चहा साठी एक छोटे टेबल, ४ खुर्च्या. बाsssssssस और क्या चाहीये इतनी बडी कंपनीके ऑफिसमें, जहां गुरु जैसा काबिल- ए तारीफ आदमी बैठा हो.

कालच्या भागात त्या किड्याने चपटीला, तू ऑफिसमध्ये येणार्‍या लोकांच्या मुलाखाती घे असे सुचवले, चपटी खुलली.

HR वगैरे सारी बाते सरासर झुट है, बकवास है गुरु के लिए. उसकी पर्सनल और ऑफिशीयल लाईफ में बस चपटी का ही एक अलग मकाम हय.

सतत शनाया समोर लाळघोटेपणा करते आणि राधिकाला ते कसं काय चालतं? >> नाही चालतं तिला . एक तो कर्ण होता त्याच्या अंगावर जन्मतंच कवच होते आणि एक ही राधाक्का जिच्या अंगात जन्मतः चांगूलपणा भरलेला आहे. त्यामुळे ती फक्त आपल्या हितचिंतकांसमोर "मला कळतं नाही ही वैनी का म्हणून या शन्याची साथ देते . आपलीच माणसं जेन्व्हा त्रास देतात ना तेन्व्हा ..." वगैरे वगैरे अस काहीतरी जुजबी बोलते . आणि मग "मी माह्यादादांसाठी काहीही सोसायला तयार आहे" वगैरे बोलुन गप्प बसते .
ते गुरोबाच्या ओफिसातिल नविन भरति केड्या करतोय, HR नाहि आहे का ALF madhe. >>> नाही नक्कीच नाही आहे . गुरुने शन्याची नेमणूक केली होती ती पण आपल्या अधिकारावरच .
फिरुन फिरुन झी ची मालिका प्रेझेन्टेशनवर आलीच परत. अरे, ते रेवतीच घर रिकामी आहे ना , ती गेली ना गुप्त्यांच्या घरी रहायला .
मग तिकडे शिफ्ट करा ना ऑफिस . ती तसही मार्केटिन्गच काम बघतेय , ऑफिसचा रेन्ट ही घेणार नाही आणि शन्या आणि वैनीला चोरून ऐकायला चान्स ही नाही.

जर दादाला आवडणार नसते तर वेगलि गोश्ट पण तो सुद्धा तिला भैताड वैगरे म्हनतोच, मग हिने सुद्धा वहिनिला एकदातरि खड्सावुन बोलायचे ना............

shanaya tila servant saarkhi vaaprun ghetey tasa ti gurvakade suddha ullekh karte.>> हो तसेच आहे ते. शनाया तिला कामाचे पैसे पण देते. तिलाही ते पटते.

फिरुन फिरुन झी ची मालिका प्रेझेन्टेशनवर आलीच परत. अरे, ते रेवतीच घर रिकामी आहे ना , ती गेली ना गुप्त्यांच्या घरी रहायला .
मग तिकडे शिफ्ट करा ना ऑफिस . ती तसही मार्केटिन्गच काम बघतेय , ऑफिसचा रेन्ट ही घेणार नाही आणि शन्या आणि वैनीला चोरून ऐकायला चान्स ही नाही. >>>>>>>>>>>> रेवतिच्या फ्लट्चे रेन्ट भरायला जमत नसेल producer la म्हनुन तिचे लग्न लावुन दिले गुप्ते बरोबर, कदाचित budget कमि झाले म्हनुन राधाक्का चे दुकान सुद्धा विकायला लावले.

ते गुरोबाच्या ओफिसातिल नविन भरति केड्या करतोय, HR नाहि आहे का ALF madhe. >>>> मी एकदा प्रोमोज मधे पाहिलं होतं कि गुरुच्या अक्ख्या ऑफिसने एकत्रच रिझाइन केलं असं काही दाखवत होते. तर सगळा स्टाफ खरंच गेला का? आणि मग 'नोटिस पिरियड' वगैरे काही नसणारच, कारण अभिजित गुरु कधी ऑफिसला गेला नाहीए त्यामुळे या गोष्टी कथेत येणं अशक्यच. कथानकाच्या गरजेप्रमाणे झीच्या लेखकांना थोडा थोडा अनुभव आणि थोडा थोडा अभ्यास याचं compulsion करायला हवं. नाही तर नुसतं उचललं पेन आणि लिहिली कथा असंच चालु आहे.

Pages