माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेवतिच्या फ्लट्चे रेन्ट भरायला जमत नसेल producer la म्हनुन तिचे लग्न लावुन दिले गुप्ते बरोबर, >>> अच्छा ? झालं का एकदाचं लग्न?

रधाक्का आणि चांडाळ चौकडी तिच्या घरी कागदी घोडे नाचवणार, ह्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मिळवणार. त्यांचा सगळा माल चाळीतल्या बायकांच्या घरी, एक उखळ आणि चार सूपवर त्या बायका ऑर्डर्स पूर्ण करणार Uhoh
त्यातून राधाक्काला गुरुचे कार्यालय असलेल्या इमारतीत कार्यालय घ्यायची हौस!!! बहुतेच त्याच कार्यालयात कांडप मशिन(घेतले तर नाहीतर उखळ आहेच) ठेवणार वाटते.

मला तिच मज्जा वाटते की आनन्द वगैरे सगळे च्या सगळे झाडून राधिकाच्या कंपनीत जॉइन झालेत, किती दिवस फुकट काम करतील? Uhoh वास्तवात असे घडते का? काहीही दाखवतात.
या सिरियल मधली मला एकच गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे राधिकाचं घर. सुरेख आहे.
हॉल मध्ये २-२ एसी आहेत. एक दरवाज्यातून आत आल्या आल्या सोफे ठेवलेत तिथे, आणि एक डायनिंग टेबलच्या भिंतीवर. आणि बाल्कनी पण मस्त आहे.
पण अजून घराला टोटल बेडरूमा किती आहेत ते कळत नाही. २ आहेत की ३? Uhoh
एकात गुरू आणि शन्या, एकात दादा वहिनी मग ही आणि हिचं पोट्टं राहतं कुठे? Uhoh

आणि येता जाता बिचारी चहा मांडते सगळ्यांंसाठी. >>>> गुरुचं नशीब बघा. एक जण त्याला शॉपिंग करकरुन कंगाल करते आहे आणि आधीची होती ती अक्ख्या बिल्डिंगसाठी चहा, नाश्ता आणि आक्ख्या ऑफिससाठी जेवणाचे भरभरुन डबे देवुन त्याचे खिसे हलके करत होती.
(लोकांना मदत करणं किंवा कोणाला खाऊ घालणं हे सद्गुणांच्या यादीत बसत असल्यामुळे माझा प्रतिसाद mean वाटेल पण राधिकाचं भरभरुन करण म्हणजे स्वतःच्या मोठेपणासाठी नवर्‍याच्या खिशाला फटका होता. बरं स्वत: कमावुन केलं तर ठीक पण हिची दिलदारी नवर्‍याच्या जीवावर. राधिका हे कॅरेक्टर नाहीच पटत आहे सुरुवातीपासुन )

मने ते दिसत नाही गं लोकांना गोगोड् बोललं की झालं. Sad
बाकी मला एक गंमत वाटते की गुरूची कंपनी सोडून हे सगळे लोक त्याच्याच घरात त्यालाच धडा शिकवायचा प्लॅन करतायत. जरा विचित्र नाही वाटत? Uhoh

बाकी मला एक गंमत वाटते की गुरूची कंपनी सोडून हे सगळे लोक त्याच्याच घरात त्यालाच धडा शिकवायचा प्लॅन करतायत. जरा विचित्र नाही वाटत? >>>> दक्ष, अगं शत्रुचा शत्रु तो आपला मित्र, या नात्याने सगळ्यांची युनिटी असणार आहे. बहुतेक दोन वेळचं नागपुरी जेवण याच पगारावर जनता नोकरी करणार असेल. अत्यंत उथळ आणि फालतु कथानक आहे.

या सिरियल मधली मला एकच गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे राधिकाचं घर. सुरेख आहे. >>> येस्स्स्स्स .
मलापण . खूप नेटक आहे . त्यामानाने किचन जरा जुनं वाटतं .
पण बर्याचदा सगळे घराचा दरवाजा उघडा टाकूनच वावरत असतातं .

पण बर्याचदा सगळे घराचा दरवाजा उघडा टाकूनच वावरत असतातं>>> लोकांची ये-जा असेल तर दरवाजा उघडाच ठेवला जातो. आमच्या घरचे दार दुपार तीन नंतर रात्री नऊ पर्यंत उघडेच असायचे Happy

राधाक्काकडे चहा पीत राधाक्काची शिकवणी चालू असते. राधाक्कालाच प्रेझेंटेशन द्यायचे असते ना.
केडी इंटरव्हू मधे काय उत्तरे द्यायची ते लोकांना समजावतो आणि कमीशनची मागणी करतो. तिथे गुरुला पैसे मागायला शना येते. तो तिला इंटर्व्हू घ्यायला सांगतो आणि त्यासाठी आलेल्या लोकांना तिची जास्त तारिफ करायला सांगतो. एकावेळी २ जण जाऊन तारिफ करणार. मग ती खूश होते. मग बच्चा गुरुकडे त्याच्याबरोबर इंटरव्हू घेण्यासाठी हट्ट करतो, तो हो बोलतो.
केडी अक्कडबक्कड करुन कोणाल पाठवायचे ते ठरवणार तेव्हढ्यात कदम यादीप्रमाणे पाठवुया म्हणतो. पहिला उमेदवार बच्चा नाकरतो कारण तिला त्याचे कपडे आवडत नाही. त्यातून तिची तारिफ त्याने केलेली नसते. बच्चा मुलाखत घेताना बसल्या बसल्या कार्टून पण काढतो.
तिकडे टपरीवर चहा पिताना राधाक्का स्टाफची काळजी का घ्यायची यावर भाष्य करते.

केडीचे अक्कड बक्कड भारी होते, जाम हसले मी. कारण अनपेक्षीतरीत्या झाले ते. बच्चा के बारे में क्या कहेना. दिल लगा गधीसे तो परी क्या चीज है!

कळस होता हं कालचा एपिसोड....केडी एका आवाजात सगळ्या उमेदवारांना good afternoon म्हणायला लावतो तेव्हा हसू नाही तर राग आला...अगदी शाळेची आठवण आली..मी सहसा नाही बघत ही सिरीयल..पण असला बिनडोकपणा सहन न होऊन T.V.च बंद केला...

कालचा एपिसोड मुर्ख नामा शिरोमणी होता. त्या केडी नावाच्या पात्राच्या ढुं**** वर लाथा घालून त्याला शिरेल च्या बाहेर काढले पाहिजे. हायला हापिसे की चेष्टा? Uhoh आणि गुरूनाथ पण इतका माठ? एकतर एव्हढा स्टाफ एकदम सोडून गेला आहे त्याचं याला काही सोयर नाही आणि सुतक नाही. त्यात नविन रिक्रुटमेंट साठी केडी? Uhoh दुनियेत दुसर्‍या कंपन्या नाहियेत? Uhoh त्यातून सर्व कँडिडेटस ना कॉन्ट्रॅक्टर असा स्वतः घेऊन जातो दुसर्‍या कंपनीत? Uhoh आणि त्या कंपनीत भर रिसेप्शन मध्ये उभं राहून कमिशनच्या गोष्टी पण करतो? Sad कठिणच्चे.
ते आलेले उमेदवार पण एकसे एक माठ. शनायाचं कौतुक करायला लाईन बाय लाईन जातात आणि पाठ केलेले डायलॉग बोलून बाहेर? अरे केजी ची मुलं पण बरा अभिनय करतात. पाणि घालायचं म्हणजे तरी किती? त्यापेक्षा नाना नानी चा एखादा सिन गेला बाजार गुप्ते आणि रेवती ची झक्काझक्की सुद्धा चालली असती.

गुप्ते आणि रेवतिच्या स्टोरित आता राम नाहि राहिला. समिधाला प्रेग्नेन्ट करुन तिलाहि सुधारायला लावल. आता फक्त गुरोबाच काय तो सुधरायचा ठेवलाय.......

काल रेवती किती जाड दिसत होती...त्या शॉर्ट फ्रॉक मधे. आणि टाईट होत होता तिला. पण अर्थातच अबोली रंगात गोड दिसत होती! गुप्ते बराच रसिक दिसतो! आधी वाटलं की एकदम सिधा आहे!
मला वाटलं की गुप्ते- रेवतीला गुरु- शनाया भेटतात की काय डिस्को मधे!
त्या केडी ला आधी हाकललं पाहीजे. फार फूटेज खातो आहे ! गुरवाच्या तोंडावरच त्याला लोक अंकल म्हणू लागले आहेत. आय मीन अभिजीत गुरु लाच मज्जा येतीये या गुरवाला अंकल म्हणण्याचे डायलॉग्ज लिहीण्यात!

कालचा भाग पण कसला बेक्कार होता Uhoh काही कंटेन्ट नामक चिज नाही. फाल्तू अभिनय, राधाक्का कडे खाणिपिणी, क्लबिन्ग.. बास.
इंटरव्ह्यू ला आलेल्या मुलिला शन्या विचारते पर्स मस्तय कुथून घेतली Uhoh
अस असत्य होय/

केडी आणि शनायाला एवढी मोठी जबाबदारी दिली असेल गुरुने तर कंपनी बंद पाडायला राधिका आणि टीमची गरज नाही, आपोआप होणार ते आरामात.

काल रेवती किती जाड दिसत होती...त्या शॉर्ट फ्रॉक मधे. आणि टाईट होत होता तिला. पण अर्थातच अबोली रंगात गोड दिसत होती! गुप्ते बराच रसिक दिसतो! आधी वाटलं की एकदम सिधा आहे!
मला वाटलं की गुप्ते- रेवतीला गुरु- शनाया भेटतात की काय डिस्को मधे!
त्या केडी ला आधी हाकललं पाहीजे. फार फूटेज खातो आहे ! गुरवाच्या तोंडावरच त्याला लोक अंकल म्हणू लागले आहेत. आय मीन अभिजीत गुरु लाच मज्जा येतीये या गुरवाला अंकल म्हणण्याचे डायलॉग्ज लिहीण्यात! >>>>>> आंगोने सगळे माझ्या मनातले लिहीले, त्यामुळे माझ्याही लिखाणात आता राम राहीला नाही. Proud

प्राजक्ता, मला नाही दिसले गुप्ते आणी रेवती त्या क्लब मध्ये, पण मला तसे वाटले होते की यांची भेट होईल. राधिका आजच्या एपि मध्ये मेक ओव्हर करुन चांगली दिसतीय.

मेकोव्हर म्हणजे नक्की काय करणारेत तिचं? Uhoh मी कालचा भाग आज सकाळी झी५ वर बघते त्यामुळे त्यात पुढिल भागात काय होणार ते दिसत नाही.

सस्मित Rofl

नाही, राधाक्का तशी बरी दिसली जरा. म्हणजे आज दिसेल . खरे तर जेनीला म्हणायचे असते की राधक्काने भाषेचा टोन बदलावा, गेट अप नीटनेटका अगदीच मॉडर्न नाही पण जरा मार्केट इंडस्ट्रीला शोभेल असा करावा.

राधक्काने भाषेचा टोन बदलावा, गेट अप नीटनेटका अगदीच मॉडर्न नाही पण जरा मार्केट इंडस्ट्रीला शोभेल असा करावा >>>>> पण राधाक्का presentation ला कमी आणि साखरपुड्याला जाणारी जास्त वाटते

Pages