Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेव्हढाच त्यांना जरा मोकळेपणा
तेव्हढाच त्यांना जरा मोकळेपणा...... !>>
आणि त्या इरी वैनी ला ६६६ हा कोड लागलाय ना कोल्ड्रिंक्स च्या बाटलीवर... तो तिला केव्हातरी द्यावाच लागेल ना पैसे मिळवायला ..काहीतरी व्हॅलिडिटी असेलच ना त्याला ???मी सगळे भाग सलग पहिले नाहीयेत अधलेमधले ff करून पाहिलेत
मला पण कालचा एपिसोड पाहताना
मला पण कालचा एपिसोड पाहताना तोच प्रश्न पडला होता
कि वहिनिने ते पैसे अजून कसे काय कलेक्ट केले नाहित? आणि केले की शन्या ला कळणार
मग अजून एक तमाशा.
अगं माझं नशीब फुटकं ह्या
अगं माझं नशीब फुटकं ह्या तिच्या पालुपदाला सिद्ध करण्यासाठी अथर्व ने ते त्याच दिवशी फाडून टाकले आहे!
हात्तिच्या मारी !!!
हात्तिच्या मारी !!!
काय फाडलं अथर्व ने?
काय फाडलं अथर्व ने?


ते लेबल? बाटलीवरचं?
आणि वहिनी गप्प बसली? तिने त्याला कच्चा खाल्ला नाही?
काल खूप दिवसांनी बघितली तर
काल खूप दिवसांनी बघितली तर नेमकं गुलाबजामचं प्रमोशन. रेवती खूप सुंदर दिसत होती. लग्नाचा एपि बघितला का कुणी. मी थोपुवर काही फोटो बघितले, दोघंही छान दिसत होते. रेवतीने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. आता बघेन ओझीवर. बाकी सगळं नेहेमीचंच. अर्थहीन.
नशीब हे प्रमोशनवाले ऐतिहासिक
नशीब हे प्रमोशनवाले ऐतिहासिक मालिकांमध्ये घुसत नाहीत, नाहीतर स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये जाऊन म्हणाले असते, महाराज , या खेळ बघायला!.
आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे म्हणे. कुणीतरी गुरुमुर्ती, गुरुनाथ च्या कंपनीत येऊन हंगामा करणार आहे, आणी शन्या त्या मुर्तीवर फिदा होणार आहे असे काल-परवाच लोकमत की कुठेतरी वाचले.
संपवायची असेल तर आत्ता गुरूने
संपवायची असेल तर आत्ता गुरूने गाजर दाखवलं ते गुरुवर उलटणार. नाहीतर आनंदीआनंद.
रेवती , लग्न ठरल्यापासूनच खूप
रेवती , लग्न ठरल्यापासूनच खूप छान दिसत होती .
लग्नाची तयारी चालू असते तेन्व्हा नानी वगैरे सगळे गप्पा मारत असतात तेन्व्हा . किती गोड लाजत असते .
लग्नात समीधा पण मस्त दिसत होती .
जेनी , रेवतीची करवली आणि आनंद भाउ होता .
काहीतरी सेन्सिबल दाखवा आतातरी
काहीतरी सेन्सिबल दाखवा आतातरी. बघायचं डेरिंग नाही पण गुरूला अद्दल घडायलाच हवीय. अतिशय स्वार्थी आत्मकेंद्री आहे. या नवीन प्रोजेक्टमध्ये तोंडघशी पडायला हवा. एक महिना तरी लागेल किमान असं घडायला. असं घडलं तर लिहा. आनंदाने बघेन मी तो एपिसोड. अति झालं सिरीयल संपवा आता.
लग्न शॉट बघितला, सगळेच छान दिसत होते. राधिका पण. सर्वात जास्त वर वधु आणि समिधा. समिधा कालही छान दिसत होती, गुरु ऑफीसमध्ये बोलावतो तेव्हा. आज काही बघितलं नाही. बोअर होतं. काही happening झालं की बघेन.
अंजु +1
अंजु +1
लवकरात लवकर शनाया आणि गुरू चे लग्न होऊन त्या फुगलेल्या चण्याला अद्दल घडली पाहिजे.
मग संपेल मालिका.
सर मला आवडते राधिका. तिने
सर मला आवडते राधिका. तिने स्वकर्तृत्वावर पुढे जायला हवं आणि नवऱ्याला धडा शिकवून सोडून द्यायला हवं. असंच सहज सोडून देण्याची त्याची लायकी नाही असं माझं मत. बाकी शनायाला स्वकर्तृत्व वगैरे काही माहीती नाहीये. अभिनय सर्वानीच चांगला केलाय, शनायाने पण.
मी कधीतरी महिन्यातून एकदा बघते, इथे वाचून. बाकी हल्लीच दोन एपिसोड सलग बघितले. आता बास परत, gap घेणार.
अपडेट टाका कोणीतरी.
अपडेट टाका कोणीतरी.
राधीकाचा फ्रिज बंद पडलाय.
राधीकाचा फ्रिज बंद पडलाय.
राधीकाचा फ्रिज बंद पडलाय.---
राधीकाचा फ्रिज बंद पडलाय.--- हा हा, काय अपडेट आहे! लोल.
(No subject)
ती नाशवंत वस्तूंचा बिझनेस पण
ती नाशवंत वस्तूंचा बिझनेस पण करते का तर तिच्यासाठी फ्रीज महत्वाचा, दोन चार एपिसोड्स खर्ची घालतील आता फ्रीजवर. तेवढं पोटेन्शियल शोधून काढतील.
फ्रिज मध्ये मसाले ठेवते का☺️
फ्रिज मध्ये मसाले ठेवते का☺️
राधिकाचा भाऊ बायकोला सतत
राधिकाचा भाऊ बायकोला सतत humiliate करतो..
तुला काय अक्कल/गपे भैताड असेच डायलॉग्ज दिलेत त्याला..
राधिकाचा भाऊ बायकोला सतत
राधिकाचा भाऊ बायकोला सतत humiliate करतो..>>>>> ती त्याच लायकीची आहे. कारण तिला स्वतःचे सोडुन दुसर्याचे चांगले बघवत नाही. तिच्या जागी दुसरी एखादी चांगली बाई असती तर पदर / ओढणी खोचुन राधिका च्या बरोबरीने कामाला लागली असती, कारण तिच्याही नवर्याची नोकरी नीट नाहीये. एकतर दुसर्याच्या घरात राहुन माज करुन वर राधिकाच्या सवतीला मदत करते.
रश्मी - असहमत.. त्याच्या
रश्मी - असहमत.. त्याच्या बायकोचा स्वभाव असेल तर पण तो स्वतः काय करतो. राधिकाला कामात मदत ? बायको चहा बनवून देत नाही मग ह्याने बनवून द्यावा धारिका ला. स्वतः बसून खातो.. तू जा ना मदत करायला किचन मध्ये.
तू जा ना मदत करायला किचन
तू जा ना मदत करायला किचन मध्ये.>>>>>
अरे काय विनोद आहे? अहो च्रप्स तुम्ही नक्की काय बघता आणी काय अपेक्षा ठेवता? जर राधिकाचा भाऊ घरी बसला असता आणी त्याची बायको नोकरी करत असती तर हे ठीक होते की त्याने म्हणजे राधिकाच्या भावाने पण त्यांना मदत करावी. पण ती भैताड काहीही म्हणजे काही काम करत नाही, उलट राधिकाच्या सगळ्या बातम्या त्या दुसर्या चपट्या भैताड शन्याला देते.
ती शन्या पण एक मोठे ध्यान आहे. येत तर काही नाही पण नुसते गॅर्या तू आला का, तू चाल्लाका?, तू बसला का नी तू उठला का असले लहान पोरासारखे प्रश्न विचारते. ही पण काम काही करत नाही पण अपेक्षा खूप ठेवते. एक वेळ एखाद्या अशिक्षीत झोपडपट्टीतल्या बाईला पण लाज वाटेल, पण हिला काहीच वाटत नाही. ती संजना ऑफिसचे काम तरी करत होती पण ही भैताड ते पण करत नव्हती.
अभिजित गुरू आणि त्याच्या
अभिजित गुरू आणि त्याच्या निनावे मावशीला निरोप द्या
अभिनेते म्हणून तुम्ही भिक्कारडे आहातच पण लेखक म्हणूनही नालायक आहात.
ओह ते आहेत का लेखक.. तरीच
ओह ते आहेत का लेखक.. तरीच स्वताचे रोल असले घुसडलेयत.
लोकांना त्यांच्या
लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळतं.
प्रेक्षकांना ......
बनवून देत नाही मग ह्याने
बनवून देत नाही मग ह्याने बनवून द्यावा धारिका ला.>>>तो तयार असतो तिला मदत करायला. पण राधाक्काला सूपरवूमनीया झालाय. सगळे तिलाच करायचे असते.
४-५ बायका मिळून एका उखळात किती लाखोंच्या ऑर्डर्स मिळवणार आणि त्या पूर्ण करणार??
मालिकेमधे कांडप मशिनचा शोध लागला नाही का अजून?
रश्मी छान पोस्टस.
रश्मी छान पोस्टस.
राधाक्काला सूपरवूमनीया झालाय.
राधाक्काला सूपरवूमनीया झालाय. सगळे तिलाच करायचे असते.
>>>असली चीड येते हिची.. पण सगळे प्रेक्षक धारिकाचा तिरस्कार करतात यातच मालिकेचे यश आले.
चर्प्स सर मला तुम्हीच एकटे
च्रप्स सर मला तुम्हीच एकटे राधिकाचा तिरस्कार करताना दिसता
म्हणजे हल्लीहल्लीच्या कमेंटस बद्दल मी म्हणतेय, आधीच्या नाही म्हणजे जुन्या कमेंटसमध्ये बरेच जण राधिकाविरुद्ध होते. तुम्हाला शनाया आवडते, आवडू शकते ना. ती अभिनय छान करते पण कर्तृत्वशुन्य आहे तिचे charactor.
>>> अहो च्रप्स तुम्ही नक्की
>>> अहो च्रप्स तुम्ही नक्की काय बघता
सिरीयल मे सिरीयल "माझ्या नवर्याच्या बायकोच्या भावाची बायको "
Pages