माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा.. अरे चिडू नका मित्रानो.
मी अधून मधून बघतो. मला शनाया चे डायलॉगस मस्त आवडतात.. बोर करू नकोस, ए काय बोलतोय हा, ए जा ना मला कोफि करून आन..
राजकारण धाग्यावर मी जात नाही कधी ( sabscribe च) केला नाहीय ☺️
मला राधिका नाही आवडत. गुरू आणि शनाया मध्ये खलनायक वाटते.
राधिका खूप इररितेटिंग वाटते. कदाचित लेखकाला तसेच दाखवायचे आहे.
मी लेखक असतो तर राधिका ने गुरू ला सोडावे, शनाया mature होतेय आणि गुरू बरोबर लग्न.
माझ्या मित्राला जानेवारी मध्ये मुलगी झाली, नाव शनाया ठेवलय.. म्हणजे शनाया फॅन्स नक्कीच आहेत ☺️

च्रप्सनी तिकडे रेखाच्या खूबसूरतमध्ये संजय दत्तनी छान काम केलं असं लिहिलंय.
अख्खा लेख न वाचताच?
त्यापुढे हे काहीच नाही >>> Lol

बोर करू नकोस, ए काय बोलतोय हा, ए जा ना मला कोफि करून आन..>>>> Happy

त्यादिवशी गुरु म्हणतो,''पोट दुखतंय ना तुझं, मग लंघन कर" त्यावर ती हसत म्हणते,''ते काय असतं? मी नाही करणार." Lol

तो खुबसुरत संजयदत्त- उर्मिला मातोंडकरचा होता, स्वप्नाने जुन्या खुबसुरत बद्दल लिहीलेय.
>>> हो रश्मी जी ते लवकर नाही समजले.. नंतर कळले☺️-मग मी दुसरी कंमेंट टाकली रेखा वाल्या खूबसुरत बद्धल .

आणखी एक,
मराठी भाषा दिनाच्या उपक्रमांच्या उद्घोषणेच्या धाग्यावर

कधी आहे मराठी भाषा दिन?
Submitted by च्रप्स on 18 February, 2018 - 19:09

च्रप्स, मला तुमच्या फॅन क्लबात घ्या प्लीज.

त्यादिवशी गुरु म्हणतो,''पोट दुखतंय ना तुझं, मग लंघन कर" त्यावर ती हसत म्हणते,''ते काय असतं? मी नाही करणार." Lol

Submitted by sonalisl on
>>> हा हा हा.. बेस्ट आहे शनाया.. रूनमेश ने फॅन क्लब कसा नाही सुरू केला अजून काय माहीत.☺️

तुम्हीच सुरु करा तो क्लब च्रप्स. तुमचा शन्यावर फार क्रश दिसतोय कारण गुरुच्या लग्नाच्याच बायकोला तुम्ही व्हिलन ठरवुन काहीही लिहीलत.

मराठी माणसाला मराठी भाषा दिन माहीत नसावा यासारखी अभिमानाची गोष्ट दुसरी नाही.>>>>>>> मलापण नाही माहित मभादि कधी आहे ते.
आणि त्याबद्दल अभिमान किंवा लाज काही वाटत नाहीये.
बादवे काय तारीख मभादिची च्रपस?

लग्नाची बायको वगैरे मला पटत नाहिये..
गुरु व्हिलनस दाखवला आहे म्हणुन कथेचा अर्थ बदलत आहे..
पण जरी तो व्हिलनस असला तरी त्याला शनाया आवडते.. नवी मुलगी आणली होती ऑफिस मधे तरी त्याने विषेश इंटरेस्ट दाखवला नाही..
ती वेडीबांगडी आहे त्याल्ला माहिती आहे पण त्याला तिच हवी आहे..
अशा वेळी धडे बिडे शिकवत बसत.. लग्नाची बायको मिरवण्यापेक्शा घटस्फोट हाच मार्ग आहे..
शनायाने त्याला भुरळ वगैरे घालुन फसवल असं तर आज्जिबात नाहिये..
त्याला तिच्या स्वभावची पुर्ण खात्रीव/ जणिव .. आधिच्या लफड्यांची पुर्ण माहिती पण आहे आता..
राधिकाने शंभर वेळा शनाया कशी खराब प्रुव्ह करुन पण झाले.. आणि ते गुरुला कळले पण..
पण तरीही त्याला शनायाच हवी आहे..
मग रोज घर तुझ की माझ.. पैसे तु भरणार की मी.. असं बाळबोध इम्प्रॅक्टिकल बडबडत दिवस घालवण्यापेक्शा..
एक निर्णय घेउन हे तुझ ते माझ ठरवुन एंड करा..
आत्ता चाललेल्या फुकट काहाणी ला काहिच अर्थ नाहिये..
आधी राधिका गुरुला परत आणेन तरी ,म्हणायची आता ते पण नाही म्हणत..
मग काय्को टाईमपास कर रहे..
जर फाल्तु ना धड विनोदी ना धड गंभीर मोड वर ही सिरियल नसती , नॉर्मली रिअ‍ॅलिस्टिक असती तर..कधीच
घटस्फोट झाला असता..
बर्यापैकी पैसे कमवायची कुवत तिच्यात आली आहे आता तरत्या बिल्डिंग मधेच तळ ठोकण्याचाची काय गरज..
दोघेही काहीही करुन त्याच बिल्डिंग मधे त्याच फ्लोर ला रहायला धड्पडत आहेत..
एकदा काय ते फ्लॅट ची मालकी ठरवा आणि हे सगळ बंद करा..
असा नवरा राजरोस दुसर्या बाई बरोबर आपल्याच घरात राहतोय आणि राधिकाला भलतिच जगरहाटीच पडल आहे..
नवरा बायकोच नाजुक नात .. दुसरी बाई नवर्याच्या येवढ्या जवळ.. त्याने होणारा मानसिक त्रास काहिच नाही..
शाळेतली भांडणं वाटावी असं फुटकळ मुद्दे घेउन भांडतात.. केर कोण काढणार.. पोळी भाजी कोण करणार यावर कल्पना शक्ती गेलिच नाही यांची

आंनदी सगळी पोष्ट पटली। हे असे त्रास देण्यापेक्षा सरळ सरळ केस करायची गुरूवर

अन ज्या प्रकारे गुरु शनाया सोबत एकाच घरात बेडरूम शेअर करतोय हे राधिका साठी मानसंतापी आहेच पण अथर्व साठी खूप वाईट

मग काय अर्थ आहे यासागळ्याचा
या पेक्षा सरळ प्रतारणा साठी केस ठोकून द्यावी वृथा अभिमान वगैरे बाळगण्यापेक्षा

। हे असे त्रास देण्यापेक्षा सरळ सरळ केस करायची गुरूवर>>>

अहो मग सिरिअल संपेल की लगेच!

पुर्वी दुरदर्शनवर छान असायचे मर्यादित भागांच्या (१३-१६) मालिका!!

कविता लाड आणि तुषार दळवी यांची मालिका झीवरच लागायची, फार छान होती. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शक होत्या. झीची अधोगती बघून वाईट वाटते.

कविता लाड आणि तुषार दळवी यांची मालिका झीवरच लागायची, फार छान होती. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शक होत्या. झीची अधोगती बघून वाईट वाटते. >>> हो उत्तम होती ती मालिका त्यात त्याचं अफेअर नसतं पण तो corrupt असतो म्हणून बायको सुखसोयी सोडून, त्याचे हे करणे पटत नसल्याने वेगळी होते. स्वतः च्या पायावर उभी रहाते. तो बदलल्यावर परत एकत्र येतात.

काल चुकुन रिपिट बघितला, मिन्स रेवती लग्नाला तयार झाली म्हणून बघितला. रेवती, समिधा, गुप्ते तिघं फार छान दिसत होते.

रेवती सुबोध चा सिन खूपच छान होता आणि त्यातल्या त्यात सुबोध ची अ‍ॅक्टिंग तर मस्तच. प्रेमात हारलेल्या माणसाची भुमिका जमलीच त्याला, एक क्षण माझ्याही डोळ्यात पाणी आलं. नन्तर तो बॅग भरत असतो तो क्षण ही चटका लावून गेला, एक्स्प्रेशन्स अप्रतिम.
मग कचरा सुरू झाला. राधिकाने सर्वांना गोळा केले, बाकिचेही कामं धामं सोडून रेवतीला समजवून सांगायला धावत आले. पन्कज ची बायको तर सर्वात चलाख, पेढे आधीच मागवून ठेवते.
आता गुल्मोहर ला नविन टास्क रेवती आणि सुबोध चं लग्न Proud
ते दोघे आहेत गोड आणि अभिनय पण छान करतात, पण लेखक दिग्दर्शक कधी यांचे माकड करतील काही सांगता यायचे नाही.

हारलेल्या माणसाची भुमिका जमलीच त्याला, एक क्षण माझ्याही डोळ्यात पाणी आलं. नन्तर तो बॅग भरत असतो तो क्षण ही चटका लावून गेला, एक्स्प्रेशन्स अप्रतिम. >>> ओहह हा सीन नाही बघितला मी. गुप्तेंना रेवती थांबवायला जाते त्याच्या जस्ट दोन मिनिटं आधीपासून बघितलं. मला रेवती, गुप्ते आवडतात.

आता गुल्मोहर ला नविन टास्क रेवती आणि सुबोध चं लग्न ->>> अच्छा ठरलं का हे finally .. म्हणजे आता मालिका १ महिना अजून लांबली
आणि ते गुरवाच्या हापिसात नवीन पात्र आणलेलं संजना तिला काढून राधिका ने आपल्यात घेतल आता तिचं काय मग पुढे ?

ते गुरवाच्या हापिसात नवीन पात्र आणलेलं संजना तिला काढून राधिका ने आपल्यात घेतल आता तिचं काय मग पुढे ? >>>
ती बिफोर जॉईनिन्ग रजा घेउन घरी गेलीय वाटतय , एवढा राधिकाला अपघात झालाय , ती आजारी आहे , कपाळावर दोन भल्या मोठ्या पट्ट्या बान्धल्यात , थकत बोलते/चालते आणि संजना तीला बघायलाही आली नाही . काय हे !!!

बर ते जाउदे , मी काय म्हणते .. आता रेवती लग्न करून गुप्तेंच्या घरी जाणार ना , नेहाला घेउन . मग तिचा फ्लॅट रीकामाच असणार ना .
निदान दादा-वैनीच्या राहण्याचा प्रश्न तरी सोडवा . किती दिवस एका घरात सगळे गर्दी करून राहणार ??
किती खोल्या आहेत त्या राधिकाच्या घराला ? ३ बेडरूम का? कोण कुठे राहत?

स्वस्ति..... किती ती काळजी दादा वहिनी च्या राहण्याची ! त्यापेक्षा शनाया- गुरवालाचा शिफ्ट करुया ना रेवतीच्या घरात....तेव्हढाच त्यांना जरा मोकळेपणा...... !

डायरेक्टर संजनाला विसरलाय, जिथे त्याने साठे बाईंच्या भावाला स्वर्गवासी करुन टाकले तिथे संजनाचा काय पाड?

आंगो, आपण रेवतीच्या फ्लॅट मध्ये गुरुच्या आई बाबांना शिफ्ट करुया, म्हणजे रोज जुगलबंदी पहायला मिळेल. आणी गुरुची चटणी होईल, आईबाबा, राधिका आणी शन्याच्या वादात.Cheerful Dancing Baby

Pages