दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनोहर पर्रीकरांना विनम्र श्रद्धांजली !! एक साधी रहाणी उच्च विचारसरणी वाले विनम्र व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड गेले. Sad

मनोहर पर्रीकर यांना आदरपूर्वक श्रद्धांजली... अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर आज यांच्यासाठी डोळे पाणावले... निःशब्द Sad

अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर आज यांच्यासाठी डोळे पाणावले >> Sad खरंय

पर्रीकरांना विनम्र श्रध्दांजली __/\__

श्रीलंकेत आठ साखळी बाँबस्फोटात २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आणि ४५० पेक्षा जास्त लोक जखमी. Sad

अत्यंत घृणास्पद कृत्य.

मिसळपाव.कॉम या मराठी सोशल वेबसाईटचे आद्य प्रणेते व संस्थापक आणि हरहुन्नरी लेखक चंद्रशेखर उपाख्य तात्या अभ्यंकर यांचे काल निधन झाले .
भावपूर्ण श्रद्धांजली

धक्कादायक! जालावकाशात एकेक मराठी संकेतस्थळे चमकायला लागली त्या काळात तात्याविंचू/विसोबा खेचर नावानी त्यांचे लिखाण सातत्याने झळकायचे. मनात आहे ते तसे बेधडक आणि सेंसॉरशीप वगैरे न लावता लिखाण करणारा बंडखोर लेखक म्हणून ते अल्पावधीत प्रसिद्ध झाले. त्या काळात मिपा वर त्यांचा जोमदार वावर होता.

>> पण अचानक कशाने गेले, आजारी होते का?

मिपावरील धाग्यातील 'अविनाशकुलकर्णी' या आयडीच्या प्रतिक्रियेतून मिळालेली माहिती:

ते अचानक वारले वय ५० जेमतेम नचिकेत परांजपे शी बोललो. तो तिथेच आहे. त्याने सांगितले की सकाळी ७/७.३० वाजता गेला. त्याची आई घरात होती. तिला हलता येत नाही त्यामुळे तिने आरडाओरडा केला आणि पोलिसांनी येऊन दार फोडले. आता त्याला सिव्हिल ला नेले आहे तिकडे PM करणार आहेत. डॉक्टर म्हणाले की जोरदार हार्ट अटॅक आला होता
-अविनाशकुलकर्णी

श्रद्धांजली!

दिल्लीत मोतीनगरमधे मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या वडिलांची क्रूरपणे थेट हत्याच करण्यात आली. भयानक आहे Sad
https://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-daughter-harassed-m...

सुरतमध्ये अग्नीतांडवात निष्पाप २१ विद्यार्थ्यांना अतिशय भयानक पद्धतीने मृत्यूला सामोरे जावे लागले. अत्यंत दुःखद आणि वेदनादायी. Sad

Pages