दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली. नालासोपाऱ्यात गर्दी जमवून रेल्वे अडवून नक्की कोण काय साध्य करत होते? त्यांना गजाआड करा. लाठीचार्ज योग्य आहे.

मुंबई येथे पादचारी पूल कोसळून ५ ठार, ३२ जखमी. मृतांना श्रध्दांजली जखमींसाठी प्रार्थना...
ब्लेम गेम्स सुरु झाले आहेतच.

अतिशय दुःखद घटना. मृत पावलेल्यांपैकी दोन जणी माझ्या मौत्रिणीच्या परिचयाच्या होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो ही प्रार्थना.

श्रद्धांजली. अतिशय प्रामाणिक,ज्ञानी, नम्र नेते.ओळखीतल्या एका लग्नसमारंभात आले तेव्हा संरक्षणमंत्री होते. त्यांचा ट्रेडमार्क बुशकोट घालून वधु वराला भेटायला रांगेत उभे राहिले होते. सिक्युरिटी वगैरे लवाजमा बाहेर होता. आत मात्र लहानथोर सर्वांशी आत्मियतेने बोलत होते.

So sad Sad

Pages