दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किशोर प्रधान यांना विनम्र श्रद्धांजली __/\__

जॉर्ज फर्नांडीस ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली __/\__

जॉर्ज फर्नांडिस यांना विनम्र श्रद्धांजली. "बोले तैसा चाले" या उक्तीला जगणार्‍यांपैकि शेवटचा समाजवादि नेता, नाहितर सोयीनुसार समाजवादाची कास पकडणारे भरपुर आहेत...

जॉर्ज फर्नांडिस Sad विनम्र श्रद्धांजली. शेवटली काही वर्षे आजारात खितपत पडून गेली या फायरब्रँड नेत्याची.
माझ्या आठवणीतील पहिली पहिली लोकसभेतील भाषणे जॉर्ज यांची आहेत. ८९साली वी पी सिंग सरकार दरम्यानची.

म्यानमारच्या जुलमी राजवटीविरोधात लढणार्‍या व तिथून हद्दपार झालेल्यांना, तिथल्या विद्यार्थ्यांना हा माणूस बरीच मदत करत असे. त्यांचा हा पैलू फारसा प्रसिद्ध नाहिये.

जॉर्ज फर्नांडिस यांना विनम्र श्रद्धांजली. केवळ राजकीय नेते आणि बंदसम्राट यापेक्षा ते खूप अधिक काही होते. दहाहून अधिक भाषा त्यांना अवगत होत्या. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. संपादक म्हणून सुद्धा काम पाहिले.

रमेश भाटकर Sad विनम्र श्रद्धांजली ! फारच रुबाबदार व्यक्तीमत्वाचा अभिनेता. आवाज पण व्यक्तीमत्वाला साजेसा. काल टिव्हीवर प्रोग्राम होता ना स्नेहल भाटकरां विषयी नक्षत्राचे देणे मध्ये? एक झलक पाहिली त्यात रमेश भाटकर फारच खंगल्यासारखे दिसले. धक्काच बसला ! Sad

रमेश भाटकर ! Sad श्रद्धांजली !

नक्षत्राचे देणे मध्ये? एक झलक पाहिली त्यात रमेश भाटकर फारच खंगल्यासारखे दिसले. धक्काच बसला !>>>>>>>> हो मी पण पाहिलं. काय झालं होतं?

सस्मित , मी कार्यक्रम नाही पाहीला. कारण रविवार वाईट गडबडीत जातो. पण रमेश भाटकर जेव्हा पहिल्या रांगेत बसले होते तेव्हा ते खूप थकलेले आणी तब्येतीने अतीशय किरकोळ वाटत होते.

हा जुना व्हिडीओ बघ .https://www.youtube.com/watch?v=XFGmmf9hzwM २ मिनीटे झाल्यावर ते दिसतात.

आणी काल झलक बघुन फार वाईट वाटले. असो , डिस्कस करण्याची ही जागा नाही, पण नुकतेच सर्व पाहील्याने धक्का बसला.

त्यांना कॅन्सर होता
श्रद्धांजली!! त्यांची हॅलो इन्स्पेक्टर ही सिरियल मी आवडीने पहायची. फार रूबाबदार व्यक्तिमत्व.
__/\__

Hello, hello, hello, hello... inspector, inspector...

Ajun ti tune athwte itki warshe zali tari. Can't believe he was 70 He always looked so young. RIP Sad

त्यांना कॅन्सर होता>>>ओह! असंच आलं होतं मनात.
रश्मी, मी पण कार्यक्रम नाही पाहिला. कार्यक्रमाचे प्रोमोज येत होते त्यात एक झलक पाहिलेली रमेश भाटकरांची.

आज काश्मीरमधे मेलेल्या CPRF च्या जवानाना भावपूर्ण श्रद्धान्जली. पाकिस्तान्च्या जैशे महम्मद गताने केलेया या हल्ल्याचा योग्य तो जबाब दिला पहिजे.

Pages