खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू

Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:05

खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वस्तूचे रोजचे काम करायला आज अन्य वस्तू आहेत, अगदी संचही.
एका मोठ्या शुभकार्यात केल्या जाणार्‍या एका विधीसाठी ही वस्तू लागते
२ किंवा ३ अक्षरी

मापट / माप ?

नाही.
रोजच्या वापरातली वस्तू. लहानशी. आता तिचं काम करायला आपण तसल्याच दुसर्‍या रोजच्या वापरातल्या वस्तू वापरतो. कोणतं काम?

द्या पुढचं..

माझे उत्तर बरोबर असेल अर पुढचे कोडे कोणीही द्या. (मी आधिचे काही वाचले नाही त्यामुळे झालेल्या वस्तु पुन्हा येऊ नये म्हणून)

ई ना चॉलबे, १७१२ पासून एकपण पोस्ट नाही? हे घ्या पुढला शब्द -
मी छोटी वस्तू आहे. अगदी कुठेही बरोबर असते मी तुमच्यासोबत. शक्यतो तुम्ही मला न घेता घराबाहेर जात नाही. काही लोकांकडे माझी बरीच भावंडही असतात. अडीअडचणीला मीच कामात येते. खूप कायकाय करता येऊ शकतं मी असेल तर; अगदी घरबसल्या.
देवनागरी शब्द (मूळ शब्द इंग्रजी) - XXX XX किंवा XXX XX किंवा XXX XX

Pages