खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू

Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:05

खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन अक्षरी शब्द …
ही वस्तू पूर्वी तर लागत असे पूजा कराया,
पहिली दोन अक्षरे म्हणजे एक आकडा,
दुसरं न तिसरं अक्षर म्हणजे एक हिंसक क्रिया
ओळखा काय?

ओह भरत नाहीत खेळात आता.
अजून एक शब्द देते….
दोन अक्षरी शब्द..
हे मऊ असावे लागते तरच लोकांना आवडते
कोकणातल्या एका गावचे हे प्रसिद्ध .

पाच अक्षरी शब्द
पहिली तीन अक्षरे म्हणजे त्या शब्दाशी संबंधितच एक वस्तू
ही वस्तू शक्यतो दिवसाची वेगळी आणि रात्रीची वेगळी असते

वैल

पुढचा शब्द...
भांड्यांचा एक चार अक्षरी प्रकार. वस्तू/ खाद्यपदार्थ काढून ठेवणे, मिश्रण करणे यासाठी याचा वापर

Pages