खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू

Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:05

खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु, रागावू नका

घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

हेडरमधला मजकूर.
तेव्हा वस्तू ओळखण्यातल्या गंमतीबरोबरच शब्दसंपत्ती वाढावी, तीवरची धूळ झटकावी हा हेतू असावा संयोजकांचा.

नाही,
क्लू देतो कारण मला लौकर लॉग ऑफ करायचंय

हिच्या वापर केल्यानंतर झोप चांगली लागते
लाकडाची 1 फूट लांबीची ही वस्तू आहे

ही एक लाकडाची पट्टी सदृश्य वस्तू असते,
त्या नळी वर छोटी छोटी खूप भोके असतात,
अंथरुणात ढेकूण झाले म्हणजे ही ढेकणी अंथरुणात ठेवतात,
ढेकूण सांदि कोपऱ्यात जायच्या सवयीने यात होऊन बसतात, सकाळी ही ढेकणी घेऊन घराबाहेर झटकायची , आणि ढेकूण बाहेर टाकायचे
Happy

मी एक वस्तू. मला कापडापासून बनवतात. माझ्यामुळे घराला शोभा येते. आजकालच्या नवीन घरांमध्ये मी सगळ्यांत आधी येते.
XXX

तोरण / पडदा

हंडा लहान भावंडं कळशी
गडवा लहान भावंडं गडू
चूल लहान भावंडं वैल

Shinkale

Ho .

Tatale

चार अक्षरी शब्द..... एक हत्यार..... ठोकलेल्या किंवा रुतलेल्या गोष्टी उचकटण्यासाठी वापरतात

उपसणी

Pages