निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ब्रावो देवकी..
खुप छान केलस..
इतके जातभाई आले त्याच्या मदतीला बघून आश्चर्य वाटलं..
कावळ्यांच्या स्वभावाविषयी कुणीतरी सलग माहिती द्या ना इथे..

शनिवार २५ नोव्हेंबर रोजी ग्रीन अंब्रेलातर्फे प्रसिद्ध वनस्पतीतज्ञ श्रीकांत इंगळहळदिकर यांनी पुणे येथे तयार केलेले दुर्मिळ जंगली वृक्षांचे बोटानीकल उध्यान पाहणी व अभ्यास दौरा आयोजित केला आहे. श्रीकांत इंगळहळदिकर यांनी २० वर्षे जगभरतील विविध बोटानीकल उध्यानांचा अभ्यास केला आहे. गेली १३ वर्ष भारताच्या विविध जंगलांमधे फिरून अनेक दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती त्यांनी गोळा केला आहेत.
त्यांच्या उद्यानात २०० प्रकराचे वृक्ष पहायला मिळतात त्यातील १४० दुर्मिळ आहेत. श्रीकांत इंगळहळदिकर झाडांच्या वैशिष्ट्यांसह माहिती सांगणार आहेत.
त्यानंतर चींचवड येथील श्रीयुत ठाकुर यांचे बांबू कलेक्शन बघणार आहोत.बांबूच्या ४० हून अधिक जाती संपूर्ण भारत फिरून त्यांनी जमवलेल्या आहेत.वेगवेगळया प्रकारच्या बांबुंची रंजक माहिती ते सांगणार आहेत.
त्यानंतर वेळ मिळाल्यास नारगोळकर दांपत्याने तयार केलेले सिपना बाग,२१ एकर परिसरातील मानवनिर्मित जंगल बघणार आहोत.
ज्यांना या अभ्यास दौर्‌यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे व १०००/- शुल्क रविवार १९ तारखेपर्यंत जमा करावे.
वैदेही गानु(ठाणे)
9869421931,8879346676
विक्रम यंदे (मुंबई)
9833988166
प्रशांत जडे (नवी मुंबई )
9869361348,9405684252

ईस रंग बदलती दुनिया मे....

पिवळ डीकेमालीचें फुलं... पहिल्या दिवशी पांढरे, संध्याकाळी क्रीम कलर, दुसर्‍या दिवशी पिवळे धम्म, आणि तिसर्‍या दिवशी चक्क केशरी होते....:)


जापनिज हनीसकल (नाव शांकली कडुन सभार--)
हे देखिल पहिल्या दिवशी पांढरे आणि दुसर्‍या दिवशी सोनेरी... आणि सुगंध अवर्णनिय....

ह्या कळ्या!!!


फुल जरा काटे कोरांटी सारखे दिसते ना!!!

ईथे शांतताकाअ?

एका मैत्रीणी च्या गच्चीतुन सभार....:)

सायु एकसे एक गोड फोटो. अप्रतिम बाग. ग्रीन फिंगर्स का काय म्हणतात ते तुझ्याकडे आहे. त्या दुसऱ्या कुंडीत शेंगा कसल्या.

_20171126_182740.JPG

हया फुलाचे नाव काय आहे?
८--१० फुटाचे zaad असून पाने पोपटी रंगाची आहेत.असेच एक zaad पिमपरीला जाताना पाहिले .पण त्या ज़ादाची पाने हिरवीगार होती.फुले झुपक्याने असून छोट्या तुतारीसारखी आहेत.IMG_20171126_174246864.jpgIMG_20171126_174246864.jpg

देवकी, जागू मस्त फोटो.

देवकी आईच्या बागेतली फळे आणि भाज्या लवली, कशी ताजी ताजी, सकस वाटतायेत.

Tyabubia evadha lahan asto ka?
Mala maahit nahi.pink tabubia pahila to javal javal char paach majalyaparyant unch Hota.

आईच्या बागेतली एक वेगळी जास्वनंद.फुल्ली तरी अशीच दिसते-
IMG_20171127_133247.jpgIMG_20171127_123510516.jpg

देवकी
याला अबोल किन्वा मुकी जास्वन्द म्हणतात.

अमृता मस्त फोटो.
देवकी तो फोटो अजून क्लियर हवा होता पिवळ्या फुलांचा.

शिंपी
१)

२)

सगळ्यांना धन्स...
काल टेकडी गणपती मंदिरात गेले होते... तिथे ही खरीखुरी कमळं विकायला होती..
बाप्पाला वाहीलीत आणि ही घरच्या साठी घेतलीत...

आत परागाची डबी दिसतेय का?

Pages