सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
(No subject)
साधना ती शेंग कांचनची आहे का?
साधना ती शेंग कांचनची आहे का?
दुर्गा भागवत यांच्या दुपानी
दुर्गा भागवत यांच्या दुपानी या पुस्तकात गौर गांधारी म्हणून फुलझाडाचा उल्लेख आला आहे. चर्नी रोडच्या बालोद्यानात हे झाड होते. कोनाला माहीत आहे का हे झाड? पांढर्या फुलांनी झाड बहरायचे असे नमुद केले आहे.
साधना ती शेंग कांचनची आहे का?
साधना ती शेंग कांचनची आहे का?>>>>>>>>>.जागू नाही. संकेश्वरीची शेंग आहे ती.
संकेश्वरीच्या बिया रुजतात का? गेल्या आठवड्यात एका झाडावरच्या शेंगा काढायचा खूप प्रयत्न केला. त्यात सगळी टरफले (पक्षांनी मला फसवलं) आणि पानेच हातात आली. उड्या मारून मारून एक शेंग मिळाली. ती जपून ठेवलेय. (नंतर मनात आलं. कुणी बघीतल तर म्हणतील "स्वतःला अजून लहान समजतात की काय?")
संकेश्वरी की शंकेश्वरी?
संकेश्वरी की शंकेश्वरी?
शिकेकाई नाही त्यांच्या कडा
शिकेकाई नाही त्यांच्या कडा झालरीसारख्या वाकड्यातिकड्या असतात.
मला शंकासुरीची शेंग वाटतेय.
मॅगी, बरोबर!
मॅगी, बरोबर!
नंतर मनात आलं. कुणी बघीतल तर
नंतर मनात आलं. कुणी बघीतल तर म्हणतील "स्वतःला अजून लहान समजतात की काय?">>भाड मे जाए जनता, अपना काम बनता हे तत्व पाळायचं..
काल मला पिवळा शंकासुर दिसला डेक्कनला..
भाड मे जाए जनता, अपना काम
भाड मे जाए जनता, अपना काम बनता हे तत्व पाळायचं..>> +१
शोभा कशाला स्वतःला मोठी
शोभा कशाला स्वतःला मोठी समजतेस? लहान रहाण्यातला आनंद घे.
शंकेसूर चू शेंग आहे होय.
लहान रहाण्यातला आनंद घे. >>>>
लहान रहाण्यातला आनंद घे. >>>>>...खरं आहे जागू.
पौड फ़ाटा पोलिस चौकी समोर,
पौड फ़ाटा पोलिस चौकी समोर, कदंब मस्त फ़ुललाय. त्या रस्त्यावरून कोणी गेलात, तर नक्की पहा.
माहितीसाठी धन्यवाद शोभा१
माहितीसाठी धन्यवाद शोभा१
आज जरा बावलेत. फ़ुलं काल खूप
आज जरा बावलेत फ़ुलं. काल खूप छान दिसत होती. पण इथे लिहायचं विसरले.
खूप दिवसांनी आले इथे. छान
खूप दिवसांनी आले इथे. छान मनोगत शोभा.
दिसतायेत ते फोटो सर्व खूप सुंदर. काही क्रोमवर जाऊन बघायला लागतील.
मगरपट्टा सिटीत कदंबाची खूप
मगरपट्टा सिटीत कदंबाची खूप झाडे आहेत. तिथे अनेक वेगवेगळी झाडे आहेत सो निसर्गप्रेमी जनता तुमच्यासाठी जन्नत आहे. नक्की भेट द्या.
रुम शीफ्ट झाल्यापासुन जाणे
रुम शीफ्ट झाल्यापासुन जाणे होत नाही तिकडे.. पेठेजवळ नाही का कुठं कदंब?
कुणाला माहित असल्यास सांगा प्लीज.
कदंब मस्त फ़ुललाय. >>> फोटो
कदंब मस्त फ़ुललाय. >>> फोटो टाका ना प्लिज, मला पण बघायचाय..
कदंब मस्त फ़ुललाय. >>> फोटो
कदंब मस्त फ़ुललाय. >>> फोटो टाका ना प्लिज, मला पण बघायचाय.. >>> मला पण.
फोटो टाका ना प्लिज, मला पण
फोटो टाका ना प्लिज, मला पण बघायचाय.. >>> मला पण.>>>>>>..इथेच पान नंबर १ वर देवकीने दिलाय बघा फोटो.
Submitted by देवकी on 10 July, 2017 - 17:04
मला बसमधून काढता येत नाही.
मला फोटो दिसेना पण>>>>>>>
मला फोटो दिसेना पण>>>>>>>
मला फोटो दिसेना पण>>>>>>>>ज्यांना लेखातील फोटो दिसत नाहीत, त्यांच्यासाठी हे फोटो.


वॉव मस्त
वॉव मस्त
धन्यवाद व्ही.बी.
धन्यवाद व्ही.बी.
मस्तच गं शोभा
मस्तच गं शोभा
धन्यवाद स्निग्धा!
धन्यवाद स्निग्धा!
मला तू हिरव्या चाफ्याची फुलं कधी देणार आहेस?
बापरे शोभा किती मस्त.घरचा
बापरे शोभा किती मस्त.घरचा मोगरा का.
किती वेळ लागला असेल है करायला.
इथेच पान नंबर १ वर देवकीने
इथेच पान नंबर १ वर देवकीने दिलाय बघा फोटो. > चेंडू लटकल्यासारखे झाड आहे तेच का कदंबाचे ? सुरेख आहे.
घरचा मोगरा का.>>>>>>.
घरचा मोगरा का.>>>>>>..सोसायटीच्या बागेतला.
चेंडू लटकल्यासारखे झाड आहे तेच का कदंबाचे ? >>>>>>..हो. हो तेच.
पेठेजवळ नाही का कुठं कदंब?<<<
पेठेजवळ नाही का कुठं कदंब?<<< पुणे स्टेशन जवळ / अंबेडकर भवन च्या मागच्या बाजुच्या रस्त्यावर ओळीने ७-८ झाडे आहेत
नमस्कार लोक्स _/\_
कसं काय चाल्लय.
Pages