तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कऊ नक्की बघ! रिअल तेवर!
मेघा नो प्रॉब्लेम!
आणि स्वस्ति टीजरही भन्नाट आहे, मीही बघितला...
महेश बाबूचा ब्रमहोत्सवम बघितलाय कुणी?

अरूंधती काल रात्री उशिरा तासभर बघितला नंतर मात्र जाम झोप लागली म्हणून थांबलो..जमलं तर आज परत बघतो..
बर्याच हॉरर मुव्हीजमध्ये मांत्रिक दाखवताना विचीत्र पद्धतीचा दाखविलेला असतो.. अरूंधती मध्ये मात्र फकीरबाबा ला दाखवताना वास्तवातला दाखविला आहे... तशा व्यक्तीरेखा जवळून बघितलेल्या आहेत. पशुपती अघोरी बनल्यानंतर राजमहालात येऊन जो धिंगाणा घालतो.. हात फिरवून माणसं मारणं वैगरे हे अघोरीवाल्यांना शक्य असतं! त्यांची ती क्षमता असते.
(हा विषय वादाचाही होईल तसेच हस्यास्पद ठरविला जाईल. ज्यांना माझं वरचं वाक्य (क्षमते वालं) पटलं नसेल त्यानं दुर्लक्ष करावं.मी एक्सप्लेन करणार नाही. मला पुरेसं तांत्रिक आणि यौगिक ज्ञान नाहीये, एखाद्याला असलं तरी त्याला दुसर्यांना सांगण्यावर मर्यादा घातल्या गेलेल्या असतात.)...
आणि शेवटी,
चित्रपटात आपल्या देव्शेनेच्या नियोजित वराचं नाव ₹!हुल असल्यानं चित्रपट जास्तच जवळचा वाटला.. Wink

अरे खरंच!
सगळं ऑनलाइन मिळतं बघायला!

मी रविवारी महेश चा आज का सरफराज पाहिला...भुमिका बरोबर चा ..आवडला मला.. Happy
आरनमॅन मला तो तुमचा ntr cha मुव्ही पहायचा होता,पण हा सिनेमा लागलेला...नंतर पाहिन मग लिहिते...

एक थी चन्द्रिका कोणाचा आहे...लिंक असेल तर द्या बरं..

भूमिका बरोबरचा खूप जुना आहे पण तरीही महेश बाबू क्लास दिसतो.
मेघा तुला मी देतो एक थी चंद्रिकाची लिंक!

हो द्या तुम्ही लिंक Happy

बायदवे,यशचा मेरी जान पाहिला का??
छान आहे...हलका-फुलका...लवस्टोरी वर आधारित...सुरुवातीचा सीन तर जाम भारी आहे..हिरोईनचा.. Lol
यूटुब वर जी लिंक आहे ना ...त्यात बरेच सीन नाहियेत.. Sad
मला हा हिरोपण आवडतो...पण २च मुव्ही पाहिलेत याचे.. हा एक आणि Mr. and Mrs Ramachari ..

हो यश मलाही आवडतो! थोडासा रामचरणसारखाच दिसतो!
आणि मीही दोन्हीही बघितलेत पण युट्युबवरच

थँक्यू ... नंतर पाहीन Happy

यशचा गूगली पाहिला का?? छान आहे..मस्त...भारी...
https://www.youtube.com/watch?v=3BWjO_UX768

विक्रम चा तो शिवा का काय तो पाहिलाय का...त्यात तो सुपरमॅन टाईप भुमिका करतो तो वाला??
आणि अपरिचित ??? अपरिचित पाहिलाय पण एवढा आठवत नाही मला..

हो पाहिलाय कि ..कितीतरी वेळा झी टीवीवर लागलाय...गेल्यावर्षीच पाहिलाय.. अ‍ॅमी आहे त्यात..
खूपच आवडलेला तो सिनेमा... कसली भारी अ‍ॅक्टींग केलीये त्यात त्याने....

मी विक्रमचा तेरे नाम ज्या तामिळ सिनेमावरुन काढलाय तो बघितलाय. तेव्हा तो विक्रम होता हे माहीत नव्हत. Happy

कऊ कधीची फिरकत नाही धाग्यावर?>>>कऊ सध्या कॉलेज मध्ये बिझी

Zee Cinema वर उद्या रात्री 9 वाजता Shivlinga लागणार आहे..horror आहे वाटतं.।

आयचा डिरेक्टर शंकर होता. त्यानेच शिवाजी द बॉस आणि रोबो दिगदर्शीत केला होता. त्याचाच आता 2.0 येतोय आता...
आणि अपरिचितचा दिगदर्शक तोच!

Pages