चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

At what cost are you winning the war>>>>

मला हा प्रश्न पडला नाही/ चित्रपट बघताना असा विचार मनात आला नाही, कारण ती तिच्या भुमिकेवर ठाम आहे. तिचे आणि तिच्या वकिलाचे संवाद तिची बाजू तिचे विचार सगळे व्यवस्थित समजावून देतात.

सगळ्यांना कधीतरी चुकुन घडलेली गोष्ट माफ करण्यासारखी वाटते पण ती तिला वाटत नाही. ईथे प्रेक्शक म्हणून आपल्याला काय वाटते हे महत्वाचे नसून नायिकेला काय वाटते तिचे विचार काय आहेत, विचार प्रक्रिया काय आहे हे महत्वाचे.

आणि ते प्रभावीपणे मांडले आहे असे मलातरी वाटले.

Spoiler Alert

थप्पड सिनेमा पाहिला. तिनी त्याला तिथल्या तिथे थप्पड मारून बात खतम करायला पाहिजे होती असं वाटलं. ते जास्त revolutionary झालं असतं. उगीच drag केला. त्यानी तिला थप्पड मारणं काही विशेष नाही ( कोणाच्या मते ) पण भर पार्टीत तिनी उलट मारणं ( हे मात्र special असतं) ! मला तो पिक्चर बघायला जास्त मजा आली असती. बायकांना victim mode मधून बाहेर काढायला पाहिजे. No high horse, जैसे को तैसा.
सिनेमा नाहीतरी feminism preach करायला तयार केलाय, नीट preach करा.

Spoiler Alert

नवरा तिला न्यायला घरी येतो तेव्हा ती म्हणते की मलाही वाटले होते द्यावी एक ठेऊन आणि संपवावा विषय. पण माझ्या घरच्यांनी मला तसं नाही शिकवलं वगैरे.

राजसी
मलाही बरेच असेच काही वाटले होते जे नीट मांडता नाही आले.

एकट्यात नाही मारायची थप्पड, सगळ्यांसमोर मारायची. तिनी घरी यायच, परत पार्टी करायची आणि मग ठेवून द्यायची. तिथल्या तिथे सुचलं नसेल तर.

तान्हाजी -
स्फूर्तीप्रद , अजय देवगण अप्रतिम , अनेक मराठी कलाकारांचा अभिनय खूप छान
तान्हाजी आरसा घेताना बांधून द्या म्हणतात ते बरोबर वाटले नाही ,
शेवट काजोल च्या फ्रेम वर खटकला , एक वीरश्री युक्त शेवट करता आला असता जेम्व्हा महाराज तान्हाजी ना भेटतात तिथे , किंवा महाराज स्वतः लग्नाच्या इथे आहेत आणि तान्हाजी चे वाक्य कि एक वेळ मी लग्नाला नसलो तरी महाराज असणार हे आठवतंय वाक्य सर्वांना आठवतंय असा शेवट करता आला असता.
मला सिनेमा चा high पॉईंट वाटलं तो तान्हाजी काही लोकांना जे मोघलांच्या बाजूने झाले आहेत त्यांना समजावतात तो , खूपच छान संवाद आणि दिग्दर्शन आणि अजय देवगण मस्त !!

बाला -
अप्रतिम , esp सेकंड half मध्ये , सुंदर मेसेज देतो
फक्त यामी गौतमी जी मॉडेल दाखवली आहे ती आयुष्मान शी लग्न करते हे फारसे convincing वाटले नाही , त्यांच्या आर्थिक परिस्तिथिती खूपच फरक दाखवला आहे

हिंदी medium -
इरफान !! अप्रतिम , मला खूप आवडला , शेवट पण मस्त केला आहे !!

आता section ३७५ बघणार आहे

थप्पड बघितला. तापसीची बाजू कितीही खरी असली तरी तिने संवाद साधायला हवा होता नवऱ्याशी नीट असे वाटले. त्याने माफी मागितली नाही पण तिनेही काही न बोलता दोन तीन दिवस सुरळीत आपली सगळी कामे केली. ते रागाने चादर ओढणं वगैरे तो नसताना पण तो असताना तिला राग आलाय हे तिने कधी सांगितलेच नाही. तिच्या स्वतःच्या भावाला यात काही चूक वाटत नाही तर नवऱ्याला ते वाटत नाही याचं तिला एवढं आश्चर्य का वाटतं. जर पुरुषांची जडण घडण विशिष्ट पद्धतीने झालीये हे आपल्याला माहितीये तर हक्क मागून आणि जाणीव करून देऊन मिळवावे लागतील. तो काही मनाने वाईट नसतो. तिला नक्की काय हवंय हे तिलाच माहित नसतं. वडिलांच्या घरी ती नक्की का राहतेय आणि किती दिवस राहणार हे ती स्पष्ट बोलत नाही. त्याने नोटीस पाठवली तर ती त्याच्याशी बोलायला का जात नाही कारण घटस्फोट घ्यायचा हेही तिचं ठरलेलं नसतं.
चित्रपटात बघायला हे सगळं चांगलं वाटतं पण वास्तवात हे इतकं सोपं नसतं. तिच्या आर्थिक मिळकतीचा तर काहीच पत्ता नाही. ती ते मूल जन्माला घालायचं ठरवते आणि तेही जॉईन कस्टडी. त्या बाळाच्या दृष्टीने हे किती अन्यायकारक आहे की त्याच्या जन्माआधीच त्याचे आई वडील वेगळे झालेत.
सगळ्यात प्रॅक्टिकल गोष्ट तिच्या मोलकरणीची आहे जी मला सगळ्यात जास्त आवडली त्या मोलकर्णीसकट.
हे शेवटी तुम्हाला किती पाठबळ आहे त्यावर अवलंबून आहे. अमू लाडकी असते म्हणून ती हा निर्णय घेऊ शकते. त्या वकिलीण बाईची फी तिला कशी परवडते हेही दाखवलेलं नाही. ओळख आहे म्हणून कोणी फुकट काही करत नाही. आर्थिक दृष्टीने स्थिर पण एकट्या बायकांना समाज सुखाने जगू देत नाही. इथे तर अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवलेत. तिने घटस्फोट घेतला त्यात काही चूक नाही पण ती मला तशी खंबीर वाटली नाही. वकिलाने बोललेले शब्द ती जसेच्या तसे नवऱ्याला ऐकवते आणि मग गाडीत बसून तिला टाळी देते.

चंपा +१००
अजुन बरंच काही आलं डोक्यात.

शादी में जरूर आना ची नायिका आवडली. रावसाहेब तर नेहमीप्रमाणे झकास काम.. नायिकेचं दिसणं व अभिनय दोन्ही आवडले. एकंदरीत आवडता सिनेमा आहे.

नेफ्लिवर मिसेस सिरिअल किलर पाहिला. का पाहिला? तद्दन बकवास.. पूर्ण बघूच नाही शकले.
जॅकलीन फर्नांडीस आणि मनोज वाजपेयी आहेत. जॅकलिन कडून तर काही अपेक्षा नव्हतीच पण मनोज साठी बघाय्ला घेतला पण अर्ध्यातच बंद केला.
प्रेग्नंट बायांना मारून अर्भके बरणीत ठेवणारा सिरीअल किलर ची स्टोरी आहे.

इक्स
मला नाव वाचून सात खून माफ ची कॉपी असेल असं वाटलं.

नेफ्लिवर मिसेस सिरिअल किलर पाहिला. का पाहिला? तद्दन बकवास->+१११ . उगाच काढायचा म्हणुन काढला आहे.
बोनस मराठी चित्रपट गश्मीर च्या वडिलान्च्या आराम हराम आहे ची छोटि कौपी आहे. आराम हराम आहे मस्त आहे ...भिडतो. हा फारच आवरता घेतला आहे.

नेफ्लिवर नवीन 'लिफ्टबॉय' सिनेमा आला आहे. कथा किंचित अतार्किक असली तरी आवडली. सगळे लहान मोठ्या भूमिकेतील कलाकार छान आहेत. कामं फार छान केली आहेत, especially मुख्य कलाकार मोईन खान (बहुतेक पहिलाच सिनेमा असावा) अगदी सहज अभिनय करतो. संपूर्ण सिनेमात कुठेच टिपिकल फिल्मी अभिनय किंवा कथा वाटत नाही. सगळं कसं grounded, सहज आणि नैसर्गिक वाटतं. नायला मसूदचा अभिनय, हसणं आणि तिची स्टाईल आवडली. टिपिकल सोबो श्रीमंत म्हातारी वाटली आहे. एकदा बघण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे.

परवा रात्री यु ट्यूबवर इरफानचा मदारी पाहिला. त्याआधी दोन दिवसात मकबूल व डि-डे बघितला. मकबूल ठीक वाटला, डि डे तर काहीच्या काही वाटलेला.

मदारीने मात्र खोलवर परिणाम केला. अपरिमित दुःख घेऊन जगणारा माणूस त्याने इतक्या परिणामकारक रित्या वठवलाय की आश्चर्य वाटते हे कसे जमवले याचे. त्याचे दुःख आपल्यालाही जाणवते आणि अस्वस्थ व्हायला होते. लहान मुलानेही अतिशय उत्तम काम केलंय. सुरवातीचा मग्रूर, मी कोण आहे तुला माहीत नाही म्हणणारा मुलगा ते मला 15 वर्षे नाही लागली, आताच समजले काय समजायचे ते म्हणणारा विचारी मुलगा हा प्रवास त्याने छान दाखवलाय.

मी लिहिलं आहे ना, नेटफ्लिक्सवर 'लिफ्टबॉय' पाहिला. पण तुमचं बरोबर आहे, बरेच जण चित्रपटा ची इतर माहिती लिहितात पण मुख्य मुद्दा कुठे पाहिला तेच लिहीत नाहीत. मी पण वर हे सुचवलं होतं.

माझ्याने इरफानचे चित्रपट आता कधी पाहावतील माहित नाही पण नाही होत. मी स्टे होमच्या सुरूवातीलाच पिकु रिपिट केला होता हे माझंच नशीब.
“मंटो” पाहिला मला वाटतं नेफिवर आहे. मंटोची सत्यकहाणी आहे. या कलाकाराची कथा पाहून पोटात तूटतं. नवाजुद्दीन असल्यावर अशा भूमिका आणखी गहिर्या होतात. त्यात त्याची , मंटोची बायकोची भूमिका करणारी ॲक्ट्रेसही छान काम करते. १९४६-१९४८ चा काळ चांगला उभा केलाय. फक्त तेव्हाही मुंबईच्या लोकल मी पाहिलेल्या पिवळ्या-मरून/चाॅकलेटी रंगवाल्या होत्या का नक्की? असो. एखादा दिवस सिरियस मुवी चालणार असेल तर पहा.

मकबुलबद्दल खूप वाचले होते, पण प्रत्यक्षात तितकासा नाही आवडला... त्या ट्रिलॉजीमधले ओमकारा व हैदर मात्र आवडले.

माझ्याने इरफानचे चित्रपट आता कधी पाहावतील माहित नाही पण नाही होत. >>>

हो, मदारी पाहताना खूप वाईट वाटत होते. कुठल्यातरी धाग्यावर वाचले की ऋषीच्या जाण्याचे तितकेसे वाईट वाटले नाही, जितके इरफानच्या जाण्याचे वाटले. कारण बहुतेक ऋषीतल्या कलाकाराने जे द्यायचे ते देऊन झालेले होते. अर्थात त्याची 2nd इनिंगही तितकीच पॉवरफुल होत होती पण त्याने स्वतःचा म्हणून गाजवलेला काळ कधीच काळाच्या अधीन झाला. इरफानचे तसे नव्हते. एक कलाकार म्हणून तो दर चित्रपटागणिक एकेक उंची गाठत होता आणि अकस्मात सगळे संपले. त्यासोबत त्याच्यातल्या कलाकाराला वेगवेगळ्या रुपात पाहण्याच्या अनेक शक्यता संपल्या. त्याचे जास्त वाईट वाटले. मदारी चित्रपटात त्याचा एक संवाद आहे, माझे आता सगळे संपले, मला आता कशाचाच उपयोग नाही पण ...
खूप वाईट वाटले तो संवाद ऐकून.

कुमार, तुम्ही चित्रपट पाहिला असणार. चित्रपटातील मुलगा इतका स्मार्ट आहे की त्याला हा सिंड्रोम माहीत आहे आणि या सिंड्रोमची मी शिकार झालोय की काय असा संवादही त्याच्या तोंडी आहे ... Happy Happy

Pages