चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्यातरी धाग्यावर वाचले की ऋषीच्या जाण्याचे तितकेसे वाईट वाटले नाही, जितके इरफानच्या जाण्याचे वाटले. कारण बहुतेक ऋषीतल्या कलाकाराने जे द्यायचे ते देऊन झालेले होते. अर्थात त्याची 2nd इनिंगही तितकीच पॉवरफुल होत होती पण त्याने स्वतःचा म्हणून गाजवलेला काळ कधीच काळाच्या अधीन झाला. इरफानचे तसे नव्हते. एक कलाकार म्हणून तो दर चित्रपटागणिक एकेक उंची गाठत होता आणि अकस्मात सगळे संपले. त्यासोबत त्याच्यातल्या कलाकाराला वेगवेगळ्या रुपात पाहण्याच्या अनेक शक्यता संपल्या. त्याचे जास्त वाईट वाटले>> अगदी अगदी, असंच वाटत होतं तुम्ही अचूक शब्दबद्ध केलंय. तिथे उगीच तुलना वगैरे केल्याचं म्हटलंय. पण ते तितकं साधं नाही. इरफान आता नवीन रुपात कधी परत पडद्यावर दिसणार नाही याचं अमाप दुःख आहे. हा माणूस त्याच्या सगळ्या चाहत्यांना विचित्र मनस्थितीत सोडून गेला, ज्यातून सावरावं म्हटलं की अजूनच अडकायला होतं. जिथे जिथे माझ्या या लाडक्या कालाकाराबद्दल लिहिलेलं दिसतं तिथे काहीतरी लिहूनच यावं असं झालंय माझं.....

इरफानचे चित्रपट मी पण पहाणार नाही आता, पाहवणार नाहीत.

अंजली१२, ‘मिसेस सिरियल किलर’ मधे अभिनय येत नसलेली जॅकलीन ते ही मुख्य भुमिकेत आणि याचे दिग्दर्शन ‘तीस मार खान‘, ‘जोकर’ असे भयंकर वाईट चित्रपट दिग्दर्शीत केलेल्या फरहा खानच्या नवर्‍यानेच केले आहे हे कळताक्षणी पहायचा विचार रद्द केला. Happy

शादी मे जरूर आना हा zee-५ वर आहे , एकंदरीत ऍमेझॉन prime चा search फारच वाईट आहे
picture चे नाव दिले आणि picture असेल तरी बराच खाली लिस्ट होतो , नसेल तर पटकन सांगत पण नाही कि हा picture नाहीये

न्यूटन पहिला ऍमेझॉन prime वर , थोडा स्लो आहे पण ह्यात एक पॉसिटीव्हिटी आहे ज्या साठी पाहत राहावंसं वाटतो
राजकुमार राव मस्त , आर्मी कमांडर चे काम करणारा अभिनेता पण छान , अंजली पाटील ने पण खूपच छान काम केले आहे ती खूप पुढे येणार असे वाटत आहे

काल चोरीचा मामला हा चित्रपट पाहीला.. हमशकलला टफ देणारा एकमेव मराठी चित्रपट.. काहीही म्हणजे अगदी काहीही दाखवलयं.. एक स्वतंत्र रिव्यू लिहायला लागेल ह्या चित्रपटावर

जिथे जिथे माझ्या या लाडक्या कालाकाराबद्दल लिहिलेलं दिसतं तिथे काहीतरी लिहूनच यावं असं झालंय माझं...........................................>>>>>>>>>>>>>>>>> खुप खुप सहमत.....

याचे दिग्दर्शन ‘तीस मार खान‘, ‘जोकर’ असे भयंकर वाईट चित्रपट दिग्दर्शीत केलेल्या फरहा खानच्या नवर्‍यानेच केले आहे हे कळताक्षणी पहायचा विचार रद्द केला. >>>>>>>>>>>>>> अय्यो ये मैने क्यूं नही देखा Lol

अजय - चोरीच मामला संपूर्ण बघितल्याबद्धल सत्कार ...
मी पहिल्या 15 मिन मध्ये बंद केला... काहीपण चालू hote..

शादी मै जरुर आना
मस्त आहे, आवडला
थोडी अतिशयोक्ती आहे
इतकं कोणी करत नसेल, पण सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून ठीक आहे.
राजकुमार राव एक जबरदस्त कलाकार आहे कुठल्याही रोलमध्ये
सूट होतो. बरेली की बर्फी मधला साडीवाला असो वा वासेपुर मधला उलट्या काळजाचा धंदेवाला, न्यूटन मधला अधिकारी किंवा या चित्रपटात. एकदम वसूल आहे तो.

हिरवीन जरा अतीच तोंड पसरून हसते, कधी कधी अती वाटतं ते

न्यूटन मधला पंकज त्रिपाठी जबरी आहे. "देखो कैसे भूखे शेर की तरह वोट देने के लिए खडे हो गये"! Happy

आणि अजून एक काहीतरी आहे - नक्षल एरियातली कोंबडी दोन तास इण्टरोगेशन केल्याशिवाय अंडे देत नाही असा डॉयलॉग.

खूप अपेक्षेने "शादी मे जरूर आना " पहिला पण थोडी निराशाच झाली , राजकुमार राव आणि क्रिती खरबंदा चा अभिनय खूप छान मात्र कथा अगदीच साऊथ मसाला मूवी सारखी वाटली (TV वर झी सिनेमा वर पहिला )

किती संथ चित्रपट आहे तो शादी मी जरूर पिना . निराशा झाली मग उपाय म्हणून शाहरुख चा चैनई एक्सप्रेस बघावा लागला .

सुनिधी, तुमचा प्रतिसाद वाचून liftboy पहिला. खूप आवडला. सहज आणि नैसर्गिक वाटला. सगळ्यांची acting पण मस्त. इतका सुंदर चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद.

नेटफ्लिक्स वरचा 'लिफ्ट बॉय मलाही पहावा वाटत होता पण नाही पाहिला. माझी मुलं tv हा family room मध्ये असल्याने (बघत नाहीत पण) सतत तिथेच hang out करतात . घरच पि जी रेटेड झाले आहे. मलाही वेगळा वेळ टिव्ही साठी देता येत नाही. प्लीज असे काही सुचवा जे सगळ्याना एन्जॉय करता येईल. नेटफ्लिक्स व युट्यूब आहे.
सतत travel shows बघतो , कारण एक टीन आणि एक प्रिटीन आहे , आणि आवडी वेगवेगळ्या !! रेटींगचा अनुभव विचित्र आहे, विश्वास नाही आता तिथे असलेल्या रेटींग वर. मुलगी खूप प्रश्न विचारते आणि मला खोटी / थातुरमातुर उत्तरे देने पटत नाही .
धन्यवाद Happy

ऑडबॉल सिनेमा मिळाला तर बघा
फार सुंदर आहे, लहान मुलं आणि मोठ्यांनाही आवडेल असा
एका लहान मुली आणि कुत्र्यावर आहे

The imitation game (prime) फारच छान !
Alan Turing यांचा चरित्रपट.

आदीश्री liftboy तुम्ही मुलांसोबत पाहू शकता. उलट आवडेल त्यांना पण.
बादवे मी पिकू खूप शोधते आहे कुठे पाहायला मिळेल ? कुणी सांगाल का?

पिकू प्राईम वर आहे
काल सर्वाना जबरदस्ती बसवून स्त्री बघायला लावला.
सर्व कलाकार गोड आहेत, आणि प्रामाणिक अभिनय आहे.पण मूळ कथा फूफू आहे.
स्पॉयलर
.
.
.
.
.
.
.
भूत गोंधळलेलं वाटतं.शिवाय ते आज्ञा ऐकतां तर सरळ 'ओ स्त्री कभी मत आना' सांगायचं ना.त्या राजकुमार कडून हिला काय पाहिजे कळत नाही.डोळ्यात प्रेम वगैरे म्हणावं तर त्याच्यावर पण सेम इतर पुरुष लोकांसारखाच हल्ला करते. शिवाय हनिमून पण नको असतं. हे भूत अत्यंत मंद मठ्ठ आणि भांजाळलेलं वाटतं.

ओहो हो का,वाचते
पण मूळ सार असे की कळला तरी विशेष आवडला असं म्हणता येणार नाही.

मी काल पुन्हा कोको बघितला, हा असा ऍनिमेटेड चित्रपट आहे, जो मी पुन्हा पुन्हा बघू शकतो.
नितांत सुंदर, मानवी नात्यांची हळुवार वीण उलगडत जाणारा, पूर्वजांशी कृतज्ञता व्यक्त करणारा.
रिमेम्बर मी... खूपच सुंदर. हळवं करणारं, आणि पोको लोको ताल धरून नाचायला लावणारं.
Happy

Pages