चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलर्स मराठीवर भाई चित्रपटाचा उत्तरार्ध बघितला काल, मला आवडला. पूर्वार्ध थिएटरमध्ये बघितलेला पण उत्तरार्ध नव्हता बघितला.

परत एकदा सागर देशमुख खूप आवडला भाई म्हणून. गिरीश कुलकर्णीने मस्त काम केलंय.

माणिक वर्मा आणि रामुभैया दाते यांच्या भूमिका कोणी केल्या ते माहिती नाही, पहिल्यांदा बघितले हे दोन्ही कलाकार.

माधव यांची पोस्ट वाचून चॉपस्टिक्स सिनेमा विशलिस्ट मध्ये टाकून ठेवला होता, अखेर काल रात्री पहिला. मस्त हलका फुलका चित्रपट, जरूर पहावा असा.. मिथिला पालकर आणि अभय देओल दोघांचेही काम एकदम चोख, मस्तच..!
वय वाढत जातंय तसा तसा अभय देओल जास्तच देखणा दिसायला लागलाय की राव !! Happy

चॉपस्टिक मी सुद्धा आवर्जून पहिला.. छान आहे.अभय देओल आधीपासूनच आवडतो.
पण हिरोईन मध्ये ( मिथिला) आत्मविश्वास कमी असतो असं काही वाjटलं नाही.मुंबईच्या ट्राफिक मध्ये छान कार चालवताना दाखवली आहे कि ती ... फार फार तर थोडी वेंधळी वाटली...
गर्दीत कार चालवायला सुद्धा तेवढा सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. ( हे मा वै म)

नाइव्ज आउट - अ‍ॅगथा ख्रिस्ती स्टाइल सस्पेंस अशी जाहिरात वाचुन पाहिला. मस्त आहे, अजिबात निराशा झाली नाहि. खुप दिवसांनी एक चांगला रहस्यपट बघितला. ('१७च्या मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस पेक्षा सरस आहे...)

झी५ वर ड्रीमगर्ल पाहिला. उत्तम चित्रपट, क्लायमॅक्स मात्र बोअर केला.
अन्नु कपूर, आयुष्यमान जब्बरदस्त! अन्नु कपूरने धमाल केलीय. संवाद मस्त आहेत.

पती, पत्नी, वो खुप आवडला. भुमी व कार्तिक आर्यन मस्त. आयुश्मान खुरानाचा भाऊ तर भन्नाट. चंकीच्या मुलीने पण बराच चांगला प्रयत्न केलाय किंवा तिला अभिनयात झेपेल असा रोल लिहिलाय असे म्हणायला हरकत नाही म्हणुन बाहुली वाटत नाही सिनेमात. संवाद खुसखुशीत, चटपटे, प्रसंगाला चपखल, कुठलाही व्हल्गरपणा नाही संवादांत वा दृष्यात.

सेक्शन ३७५ प्राइमवर आला आहे. मी सुरूवात केली तेव्हा नको तोच विषय म्हणून थोडा पाहून थांबले. नंतर पुन्हा थोडासाच पाहिला आणि ब्रेक घेतला. मग निव्वळ जीमटाइममुळे चाळीसेक मिनिटे सलग आणि मग उरलेला भाग. तरी एकदा पाहायला वाईट नाही. शेवट वेगळा आहे. (माझ्यासाठी तरी. मी काहीच न वाचता चित्रपट पाहिला) इथेही स्पाॅयलर देत नाही.

पती, पत्नी, वो खुप आवडला. भुमी व कार्तिक आर्यन मस्त. आयुश्मान खुरानाचा भाऊ तर भन्नाट. चंकीच्या मुलीने पण बराच चांगला प्रयत्न केलाय किंवा तिला अभिनयात झेपेल असा रोल लिहिलाय असे म्हणायला हरकत नाही म्हणुन बाहुली वाटत नाही सिनेमात. संवाद खुसखुशीत, चटपटे, प्रसंगाला चपखल, कुठलाही व्हल्गरपणा नाही संवादांत वा दृष्यात.>>>>>>>>> हा सन्जीव कुमारच्या ' पती, पत्नी और वो' चा रिमेक आहे. मला ही एक्सट्रा मॅरिटलची थीमच आवडत नाही. त्या चित्रपटाचा शेवट आवडला नाही. विद्या सिन्हा शेवटी सेक्रेटरी बनून त्याच्या ऑफिसात येते असा शेवट असायला हवा होता. होप की रिमेकमध्ये वेगळा शेवट असेल.

लागोपाठ दोन मल्याळम सिनेमे पाहिले, दोन्ही उत्तम.
कुंबलांगी नाईटस - हृषिकेश मुखर्जी स्टाईलचे छान, नर्मविनोदी कथानक, साधे लोक, थोडेसे प्रश्न आणि या सर्वांना दिलेली फहाद फासिल नावाची झणझणीत फोडणी!
वायरस - एकतर पार्वती! दुसरे म्हणजे भारतात असले शास्त्रीयदृष्ट्या अचूक सिनेमे बघायची सवय नाही. आणि म्हणून कुठेही त्याची डॉक्युमेंट्री होत नाही, जबरदस्त थ्रिलर कायम राहतो. बघाच.

Virus कुठे पाहिला? नेटफ्लिक्स किंवा प्राईमवर आहे का? माझा ऑफिसच्या मल्लु ग्रुपमध्ये या मुव्हीबद्दल बरीच चर्चा झाली, त्या सगळ्यांनी बघाच म्हणून सांगतील आहे शिवाय पार्वती मला आवडते.

आभारी आहे. शनिवार दुपार चांगली जाईल.

नुकत्याच पाहिलेल्या Let it Snow, The Holidays आणि The Holiday in Wild हे तिन्ही टिपिकल M & B टाईप मुव्हीज बघून गोडमिट्ट खाल्ल्यासारखं झालं होतं. Virus बघून तो इफेक्ट घालवायचा आहे.

'I love Love stories' म्हणणाऱ्या प्रेमळ जीवांनी हे 3 मुव्हीज पाहून घ्या. Wink

Thanks I shall watch virus after walking the dog. There is a good Telugu movie also on Netflix. Called Dorsani

Nah, walking the dog is certainly a priority. Holding the pee n poo for long is not a good thing. It affects the kidney of the poor fur baby Lol

Are we were watching lovely ma Anand seela take on Oregon State and dozed off. Now I have had coffee and she is polishing off chimken leg. My activities on weekend are scheduled pre and post the walk. Simbly.!!!

मल्लूमूवी साठी सबटायटल नसतात पण प्राईमवर. कसे बघता तुम्ही सगळे. >>> असतात तर. सगळ्या भाषांना सबटायटल्स असतात. मी आजच दुपारी मुव्ही पाहिला / वाचला म्हणा हवं तर Proud सगळ्या अर्थाने उत्कृष्ट आहे.

मी बंगाली आणि मल्याळम मुव्हीज आवर्जून बघते. अर्थात सबटायटल्स असल्यानेच हे शक्य आहे.

असुरन पाहिला. नेटफ्लिक्स वर की प्राईमवर हे आत्ता लक्षात नाही. मला तमिळ समजत नाही. मात्र सिनेमा अप्रतिम बनला आहे. सबटाईटल्सची नंतर गरज पडत नाही. संवाद समजले नाहीत तरी फारसा फरक पडत नाही. धनुष काय ताकदीचा अभिनेता आहे हे समजले. दिग्दर्शकाने ४० दिवसात शूटींग पूर्ण केले. निर्मात्यांच्या दबावामुळे २२ दिवसांचे शूटींग बाकी राहीले. तरीही सिनेमा ताकदीचा झाला आहे.

पहा नक्की.

Pages