चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन तान्हाजीचे रिव्ह्युज नाही आले चक्क ?
सिनेमा अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एकदम टाळ्या शिट्ट्या , जयजयकारचे नारे घेणारा, गुस बंप्स देणार्या कॅटॅगरी मधे नक्कीच आहे , तरी सुरवातीच्या डिस्क्लेमर प्रमाणे इतिहासातली अ‍ॅक्युरसी किती एक्पेक्ट करायची हे प्रेक्षकांनी आपलं आपलं ठरवायचं Happy
लढाया , व्हीएफेक्सफ मस्तं आहेत , अ.आणि आ नक्कीच वाटु शकतात पण तानाजी मालुसुरे दस्तुरखुद्द अजय देवगण साकरतोय तर सगळे अ‍ॅक्शन सिन्स टोटली बिलिव्हेबल वाटतात ( तशी मधेच शंका येते म्हणा कि तानाजी “आता माझी सटकली“ म्हणेल Wink ) , मधेच कधीतरी गेम ऑफ थ्रोन्स च्या बॅटल ऑफ बास्टर्ड्सची तर कधीतरी ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक‘ चीही आठवण येते Happy
सिनेमातलं बरचसं कास्टिंग भारी जमलय , अजय देवगण आहेच परफेक्ट पण शरद केळकर, देवदत्त नागे(जय मल्हार फेम), शेलारमामा झालेला अ‍ॅक्टर, अजिंक्य देव , औरंगजेब झालेला सेक्रेड गेम मधला माल्कम हे मस्तं वाटतात !
सैफने खरं तर चांगलं काम केलय पण त्याचं कॅरॅक्टर अल्लाउद्दिन खिल्जी वरून प्रचंड इन्स्पारयर्ड झालय, रणविर सिंगने असे काही बेंचमार्क्स सेट केलेत कि तशा रोल मधे दुसरं कोणी आवडणं कठिण झालय !
औरंगजेबानी उदयभानला बाटवलं होत का अशी शंका येत रहाते कारण सैफ पूर्णपणे मुघल दिसतो, रजपूत अजिबात नाही Uhoh
सिनेमात सर्वात खटकते ती काजोल, अजिबात शोभत नाही ती पिरियड फिल्म मधे, त्यात तो तिचा आवाज !
मुळात तो सावित्री मलुसरेचा रोलच सिनेमात इतक महत्त्व देणारा असायची गरज नव्हती !
गाणी खास नाहीत, गाणी नसती तरी चाललं असत पण बॅक्ग्राउंड स्कोअर मस्तं आहे.
तानाजी एकदा नक्की बघा, गृपने बघा, दंगा करत, झालच तर क्रिटिसाइझ करत पहा Wink
आम्ही पाहिला त्या सिमिव्हॅली थिएटरला पारच मुर्दाड /थंड खुर्चीत गप पडलेलं पब्लिक होतं , आम्हीच काय तो थोडा दंगा करत होतो !

आज बाप-लेक सकाळी 10 चा शो बघायला गेले होते.
Interval मध्ये फोन करून -- मस्त आहे , मजा येतेय (थोडक्यात u should know u r missing something) आवर्जून कळवलं.

आत्ता प्राइमवर एक निर्णय स्वतः चा स्वतः साठी हा महाकंटाळवाणं, रटाळ सिनेमा बघितला.
मधुरा वेलणकर चं पात्र किती चुकीचं आहे.
मला तिचं कॅरॅक्टरच अजिबात आवडलं, पटलं नाही.
मध्येच मूल नको, मध्येच हवंय अरे काय चाल्लंय??
तिला मूल post divorce हवं होतं तर तिनी ऍडॉप्ट करणे, surrogacy थ्रू गर्भधारणा करणे हे ऑपशन्स तिच्याकडे होते. उगाच त्या सुभाच्या मागे लागली.
सगळे सुरवातीपासून शेवटपर्यंत लांब चेहरे घेऊन वावरलेत.
नुसता संथ, रटाळ सिनेमा. जाऊ दे मी फार लिहीत नाही.
मी हा सिनेमा न बघण्याचा निर्णय स्वतः चा स्वतः साठी घ्यायला हवा होता....

सीमा देशमुखचं पात्र आवडलं पण मला. एकदम रोकठोक, प्रॅक्टिकल, वेशभूषा मस्त. ती नेहमीच्या ताई, माई, अक्का भूमिकेत नाही हे विशेष. घरच्या निर्मितीत तिने चांगला कायापालट करायची संधी घेतली Wink

लेकाला तानाजी फार आवडला.
फक्त अजय देवगण तानाजी वाटत नाही अशी तक्रार आहे.
कोणी तरी मराठी actor हवा होता. आणि movie मराठीत हवा होता.
तानाजी पण हिंदी बोलतो आणि उदयभान पण Uhoh
मी म्हटलं , शिवाजी महाराज बोलतात ना मराठीत.
हां, पण जास्त नाही.
Interval च्या अगोदर 5 वाक्य आणि interval नंतर 5 वाक्य.
पूर्ण movie मध्ये एवढंच मराठी बोलतात.

उदयभान चे काही dialogues बोलून झाले. कोंढाण्यावरची चढाई ऐकवली आणि दिवसभर शंकरा शंकरा गुणगुणतोय.

मला तानाजी आवडलाय. मुलाला सुट्टीत सिंहगडावर नेलं होतं तेव्हा त्याला काही relate झालं नव्हतं पण काल त्याला एकदम relate झालंय. खूप छान सिनेमा आहे, अजिबात चुकवायला नको.

मला पण तानाजी खूप छान आहे . बघायलाच पाहिजे . अजिबात चुकवू नयेच असे तानाजीचे रिव्ह्यू मिळालेत त्यामुळे उद्याची तिकीट काढली आहेत. त्यातून दिग्दर्शक ओम राऊत च खूप कौतुक होतंय . एक तर तो मराठी आहे म्हणून मराठी लोकांकडून जास्त उत्साहाने कौतुक . परत हा त्याचा दिग्दर्शनाचा चवथाच सिनेमा आहे म्हणून आणि संजय भन्साळीला चांगली टक्कर दिली आहे म्हणे. ऐतिहासिक सिनेमा उत्तम बनवणे हा संजय भन्साळीने जो बेंचमार्क्स सेट केलाय तो याने पुसून काढला आहे/ मस्त टक्कर दिली आहे म्हणे . काहींच्या काही लोक कौतुक करत आहेत. त्यामुळे उद्या बघणार Happy

छान आहे तानाजी. एकदा बघण्या जोगा. लढाई बघताना गेम ओफ थ्रोन्स च्या लढायांची आठवण होते. सैफ चे काम छान केले आहे. सीजी ओके टाइप्स. शिवाजी महाराजांना बघून काय होते ते शब्दात व्यक्त करता येत नाही. अजय देवगण चा ड्रेस फार छान आहे. करेक्ट अ‍ॅक्युरेट आहे कि नाही माहीत नाही. सैफ ची तलवार, अजयचे कडे काजोलच्या साड्या दागिने आवडले. शेवटचा विधवेचा लुक चुकला आहे. पण तोपरेन्त आपण बाहेर निघायला रेडी असतो.

शंकरा गाण्याची कोरिओग्राफी मस्त आहे. माय भवानी गाण्याऐवजी एक दण दणित दुर्गे दुर्घट टाइप खणख णीत मराठी आरती हवी होती.
ती एक संधी घालवली आहे. जसे वेडिंगचा सिनेमा सिनेमात एक मस्त पैकी गोंध ळ व देवीचे गाणे आहे. चित्रपट साधाच आहे पण गाणॅ व कोरिओग्राफी मस्त जमली आहे. आरती चा इंपॅक्ट मस्त झाला असता.

तानाजी ची हवा आहे खरी. बघायला हवा.
काल झीम वर मोगरा फुलला पाहिला. येता जाता.
चांगला वाटला. स्वप्नील चांगला वाटला. नीना कुळकर्णीपण .हिरोईन कोण आहे तिचा अभिनय जरा नाटकीपणाकडे जातो. डोळे वैगेरे.

सई देवधर आहे नायिका, श्रावणी देवधर आणि देबु देवधर यांची मुलगी. ती हिंदी सिरीयलमधे चांगला अभिनय करते, उडानमधे छान केलेला. मोगरा फुलला मी अगदी थोडा शेवटी बघितला, युवावर मागे लागलेला तेव्हा.

तान्हाजी अप्रतिम रित्या दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे,
कुठेही पाल्हाळ न लावता कट टू कट स्टोरी सांगितली आहे त्यामुळे
चित्रपट कुठेही आपला थरार सोडत नाही. गाणी नसती तरी
चालले असते. त्याऐवजी अजून थोडे डिटेल्स दाखवता आले असते
पार्श्वसंगीत मात्र भारी आहे . कास्टिंग, कलादिग्दर्शन आणि व्हिज्युअल इफेकट्स
उत्तम आहे... थोडक्यात तान्हाजी ३डी मध्ये एखादा अनुभव घ्यावा असाच झाला आहे..

शंकरा गाण्याची कोरिओग्राफी मस्त आहे. >>>>>>> चित्रपट नाही पाहिला मात्र ट्रेलर बघितलाय. त्या गाण्याची सिच्युएशन चुकलीये. तानाजी उदयभानसमोर आयटम सॉन्ग सादर करतोय अस वाटत. हे गाण नुसत बॅकग्राऊण्डला थीम सॉन्ग म्हणून चालल असत. नाहीतर अमा म्हणतात त्याप्रमाणे ती खणखणीत आरती म्हणूनही चालली असती.

पार्श्वसंगीत मात्र भारी आहे . >>>>>>>>>> +++++++++११११११११११ बघणार आहे हा चित्रपट.

चांगला वाटला. स्वप्नील चांगला वाटला. नीना कुळकर्णीपण .>>>>>>>> मलाही. स्वप्नील ' नकळत सारे घडले' सिरियलचा निर्माता होता. सो, बरेचसे कलाकार त्या सिरियलमधले घेतले. ती लहान मुलगी सुद्दा.

छपाक कसा आहे?>> छपाक पाहीला, आवडला. काही ठिकाणी जरासा भरकटल्यासारखा वाटला खरा, पण ओव्हरऑल एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे. खासकरुन 'छपाक से' हे गाणं तर अप्रतीम जमून आलंय. त्याच्या लिरीक्स साठी गुलजार साहेबांना सल्यूट!

"स्त्री" साठी वेगळा धागा आहे का? आज बघितला. ऑलमोस्ट अंधार.. शेवट गंडलेला.. कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपून गेला.

१. बहुतेक सिनेमे मी मोबाईलवर बघते. ब्राईटनेस कितीही वाढवला तरी मुळातच फार अंधारात चित्रित केलेले सिनेमे बघताना प्रचंड वैताग येतो.
२. शेवटी श्रद्धा कपूर च ती स्त्री असते का? ती ती वेणी स्वतःच्या केसांना का चिकटवते?
३. शेवटी सगळे घराच्या बाहेर 'ओ स्त्री रक्षा करना' असे लिहायला सुरुवात करतात कि काहीही न लिहिताच तिचे येणे बंद होते?
४. श्रद्धाच ती स्त्री असते का? तसं असेल तर ती स्वतःच स्वतःच्या अगेन्स्ट जादुटोणा पावडर का फेकते?
५. ती स्त्री निघून गेल्यावर आत्तापर्यंत हरवलेले सगळेच्या सगळे (एकुणेक) पुरुष परत येतात का? कि फक्त शेवटी हरवलेले विसेक पुरुष?
६. स्त्री शेवटी कुठे निघून जाते?

अजूनही अनेक प्रश्न आहेत पण ते फार कीस पाडल्यासारखं होईल.

श्रद्धा कपुर ही जादूगरिन (मराठीत 'विच') दाखवली आहे गं. स्त्री भुतच असते. तिच्या पासुन सुटका करण्यासाठी ही येते. शेवटी तिला संपवण्याऐवजी तिची वेणी कापुन शक्ती कमी करतात तिची. तिच वेणी श्रद्धा स्वतःच्या वेणीला लावते, शक्ती वाढवण्या साठी (असा काहीतरी डायलॉग आहे). स्त्री गावातच राहते फक्त आता लोकांना त्रास देण्याऐवजी त्यांची रक्षा करते. कारण गावातले आता तिला मान देत असतात.

प्राईमवर Godfather - I , II आणि III आले आहेत. मी बिंज वॉच केले. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा पहायला आवडले.

'बाला' बघितला. शेवटी लतिका बालाला नकार देते या एका कारणामुळे मला प्रचंड आवडला.

सुरुवात आणि मध्य मेलोड्रामाटिक वाटला तरी शेवट छान, प्रामाणिक आणि खराखुरा केला आहे. उगाच परी बालाकडे परत येते किंवा लतिका त्याला हो म्हणते असलं काहीतरी फिल्मी (आणि खोटं) दाखवतात का काय अशी भीती वाटत होती मला.

'बाला' बघितला. शेवटी लतिका बालाला नकार देते या एका कारणामुळे मला प्रचंड आवडला.

सुरुवात आणि मध्य मेलोड्रामाटिक वाटला तरी शेवट छान, प्रामाणिक आणि खराखुरा केला आहे. उगाच परी बालाकडे परत येते किंवा लतिका त्याला हो म्हणते असलं काहीतरी फिल्मी (आणि खोटं) दाखवतात का काय अशी भीती वाटत होती मला>>>>>>> >अगदी +१

परी पण आवडली. सगळे आपापल्या जागी योग्य आहेत. कोणी चुक -बरोबर नाही. सगळंखरंखुरं वाटतं.
बरेली की बर्फी, दमलगाकेहैशा, ड्रीम्गर्ल, बाला वै वै
आयुषमानचे सिनेमे आवडण्याचं सिनेमचा विषय आणि वास्तव जीवनातली वाटावी अशी ट्रीटमेंट हे दुसरं कारण.
पहिलं कारण अर्थात आयुषमान Happy

खरंच.त्यांचे जुळलेले दाखवले नाही हे खूपच चांगले.यामी चे पात्र सुपरफिशियल दाखवले असले तरी ती स्वतःच्या विचारांशी, तत्वांशी किमान प्रामाणिक आहे.
बाला चे पात्र शेवटच्या 15 मिनिटा आधीपर्यंत हिपोक्रीट आहे.

Pages