चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठीत डोक्याला शॉट नावाचा एक सिनेमा आलाय जो मूळच्या २०१२ साली आलेल्या विजय सेथुपथीच्या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे किंवा उचल्लाही असेल कदाचित. मूळ सिनेमाची सर याला येणार नाही हि माझी पूर्ण खात्री असल्याने खाली तामिळ सिनेमाच्या लिंक्स टाकत आहे
https://www.imdb.com/title/tt2564144/
https://en.wikipedia.org/wiki/Naduvula_Konjam_Pakkatha_Kaanom

युट्युब वर हा सिनेमा सबटायटल सकट उपलब्ध आहे
https://www.youtube.com/watch?v=GuAnQlPy-0U

जास्त अपेक्षा न ठेवता लुकाछुपी बघा.
बर्याच दिवसांनी काहीतरी हलकफुलकं बघायला मिळालं.
काही काही प्रसंग भन्नाट जमून आले आहेत.
काही ठिकाणी तर ,You blinked and missed it इतक्या इवल्याशा विनोदी जागा आहेत.
कार्तिक आर्यन नविन heartthrob आहे सध्या. त्या ची smile फार killer आहे.
किर्ती सनोन एकदम refreshing.
तू लोंग मैं इलायची , सध्या रिपीट मोड मध्ये आहे.

लुक्का छूप्पी ओके आहें. काहिच नाहीं म्हनून बघायला ठीक आहें...काही सींन्स खूपच छान.कार्तिक आर्यन अक्षय कुमार ला कॉपी करतोय काही फ़्रेम्ज़ मध्ये.

काल बदला बघितला. मर्डर मिस्टरी आहे, नक्की बघा. पण भारतीय प्रेक्षकांची आवड बघता थेटरात कितपत चालेल याबद्दल शंका आहे.

आता बदला शो

चेंबूर घाटकोपर सगळे फुल्लल्लल आहे

जेमतेम एक तिकीट मिळाले

ट्रेलर पाहिला , तर अशा गोष्टी साऊथ चे यु ट्यूब वर सिनेमे असतात , त्यापैकी वाटला

साउथवाले बहुतेकदा बॉलिवूडच्या आधी ढापुन मोकळे होतात

बदला बघितला. Predictable आहे. शेवट अ आणि अ आहे.
पण कोलांट्या मारणारी कथा आवडली.
AB च हवा हा हट्ट चित्रपट चालावा म्हणून.
संवाद काय खास वाटले नाहीत.पहिली 15 min. कंटाळा आला. पण उत्तरार्ध पकड घेतो.

हो.

माझ्या मते , बच्चन हा तिच्या लव्हरचा बाप असतो, असे असेल , असे वाटत होते,

कारण 'त्याचे' दोन्ही पेरेंट दाखवले , 'ह्याचे' कुणीच नातेवाईक दाखवले नव्हते,

पण शेवट तसाच निघाला , अपघात , त्यातला कुणाचा तरी कुणीतरी---- साऊथवाले भरपूर सिनेमे आहेत.

तो ओरिजिनल परदेशी मूवी यु ट्यूबवर आहे का ?

>>तो ओरिजिनल परदेशी मूवी यु ट्यूबवर आहे का ?<<

नेट्फ्लिक्सवर आहे - कांत्रेतियँपो (दि इन्विजिबल गेस्ट), मूळ स्पॅनिश भाषेत. मस्त आहे (नांवातंच गुपित आहे). बदला मध्ये बच्चन साहेबांनी वकिलाचं काम केलंय का?

अमिताभ आणि तापसी दोघांची कामे आणि संवाद जबरी आहेत. अमिताभला अनेक दिवसांनंतर चांगले संवाद मिळाले आहेत. बाकी पिक्चर बघणेबल आहे. शेवटचा ट्विस्ट इतका ड्रामॅटिक नसता तरी चालले असते.

बदला : नाही आवडला ,फारच प्रेडीक्टेबल !
स्पॉयलरः
इतके थ्रिलर्स बघितल्यावर प्रेक्षक आता इतकेही डंब नाहीयेत , कमॉन बच्चनच्या एंट्रीलाच म्हणजे ५ मिनिटात तो कोण नाही ते समजतं , कशाला आलाय समजतं , अगदीच एकता कपुर स्टाइल सस्पेन्स आणि तेच तेच दळण दळणं एकाच गुन्ह्या बद्दल Uhoh
ओरिजनल सिनेमा पहायला हवा कशी ट्रिटमेन्ट् दिली आहे सेम स्टोरीला !
अ‍ॅक्टींग मात्रं सगळ्यांनी चांगलं केलय, बच्चन करतोच चांगल काम पण अमृता सिंगनी मस्तं काम केलय ! भट्टी नाही जमून आली यावेळी, त्यामुळे मजा गेली सगळ्या चांगले अ‍ॅक्टर्स असून !

बदला पाहिला काल रात्री. आवडला. तापसी मला तितकी आवडत नाही पण ताकदीने अभिनय करते.
अर्जुन चे काम केलेला कोण आहे? हिंदी इतके खास नाही त्याचे. बाकी तो रस्ता कसला आहे एकदम सामसुम... नुसतं जंगल.

गली बॉय पाहिला.आवडला.कुठेही अतिशयोक्ती नाही.मुद्दाम कथेत ट्विस्ट आणायला अडचणी नाहीत.मित्र मदत करतात.कोणीही उगीच रिव्हेन्ज स्पिरिट ने वागत नाही.रणवीर धारावीचा गली बॉयच दिसलाय.अभिनय करणारा स्टार नाही.त्याचे सर्व मित्रही आवडले.mc शेर ला मोठी भूमिका आहे तो तर खास आहेच, पण आपल्या अमृता आणि ज्योती सुभाष, बऱ्याच पिक्चर मध्ये असणारा रणवीर चा बाप, गाड्या चोरणारा मित्र, आलिया चे स्थळ असलेला मित्र, नोकरी लागलेला मित्र, तुमहारी सुलू मधला भडक कवी,tvf व्हिडीओ चॅनल मधली मुलगी इथे अलविना दादरकर यांच्या छोट्या भूमिका पण सर्वांनी छान केल्यात.
हा बघून झाल्यावर डिव्हाईन रॅपर ची गाणी पाहिली.जबरा टॅलेंट वाला माणूस आहे.
पिक्चर मध्ये किसणीने किस भरपूर आहेत.त्यामुळे पॅरेंटल गायडन्स असला तरी शक्यतो लहान मुलांना नेऊ नका.

अरे हो विसरली.आलिया कल्की दोघींचे काम नेहमीच मस्त असते.इथे पण.कल्की सगळीकडे znmd सारखीच त्याच रोल मध्ये असते.इथेही तिने तो छान केलाय.स्पेशली जे प्रसंग येतात त्यात तिची घेतलेली भूमिका मला फार समजूतदार आणि उदार वाटली.आलिया एकदम कॉन्फिडन्स मध्ये.तिला आपल्याला काय हवं आणि ते कसं मिळवायचं आणि आपण काय आहोत हे चांगलं माहीत आहे.

Pages