चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गली बॉय छान आहे असा रिपोर्ट आहे. लेकीचे शूट चालू होते पण पब्लिक पहिले फिल्म बघून मग नंतरच्या शिफ्ट ला शूटिंगला गेले. मी सव ड होईल तसे बघेन.

काल पाहिला गल्ली बॉय.
बोहोत हार्ड! बोहोत हार्ड!
रणवीर भुमिका जगलाय अक्षरशः आलिया पण बेस्ट.
एम सी शेर भारी आहे.
हरेक सीन, हरेक फ्रेम, प्रत्येक पात्र परफेक्ट.

गल्ली बॉय पाहिला .
छान आहे , आवडला . पण ओवररेटेड वाटला .
रणवीर भुमिका जगलाय अक्षरशः आलिया पण बेस्ट.>>> + १००००
सिम्बा नंतर हा रणवीर फार फार फार वेगळा आहे.
आलिया एक्दम तोड्फोड वाटते पण एवध्या हाय पीच मध्ये का बोलते ?

गल्ली बॉय खरंच खूप सुंदर सिनेमा आहे. नक्की बघण्यासारखा.
रणवीर चं काम नेहेमीप्रमाणेच अप्रतीम पण बाकी सगळ्यांची कामंही छान. कथा आणि सादरीकरण च इतकं सुंदर आहे की बास!

आलीया ला त्यामानाने काम नाही फारसं. एम्सी शेर चं काम केलेला सिध्दांत चतुर्वेदी ला मात्र स्पेशल मेन्शन. कॅरॅक्टर ला परफेक्ट फिट आणि सुपर्ब पर्फॉर्मन्स.

तो एम सी शेर "Inside Edge" मध्ये होता.... मुंबई मॅवरिक्सचा फास्ट बॉलर.... प्रशांत कनोजिया!

गल्लीबॉय आवडलेल्या सगळ्या पोस्ट्सना +११११
खिल्जी-सिंबा सारख्या झकपक लार्जर दॅन लाइफ कॅरॅक्टर्सनंतर रणवीर एकदमच वेगळ्या भूमिकेत आहे आणि पुन्हा एकदा.. सो इंप्रेस्ड विथ हिज एन्टायर ट्रन्स्फॉरमेशन !
धारावीतल्या छोकर्याचे कपडे,बॉडी लँग्वेज, मुंबैय्या अ‍ॅक्सेन्ट , डार्क कॉम्प्लेक्शन, सुरवातीचा लो कॉन्फिडन्स, इन्फिरियॉरीटी कॉम्प्लेक्स मधून जाणारा पोरगा ते रॅपर सगळं भारी जमलय !
रॅप कल्चर्/रॅप स्टार हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय नाही म्हणून आधी जरा शंका होती पण झोया अख्तरचं स्टोरी टेलिंग जबरदस्तं आहे, हळुहळु ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनाही रॅप बॅटलमधे इंटरेस्ट यायला लागतो :).
आलिया छोट्याशा रोलमधेही भाव खाऊन जाते पण तिच्या इतकाच एम्सी शेर भाव खातो, त्याला रोलही मोठा मिळाला आहे !
सपोर्टींग रोल्समधे अमृता सुभाष, विजयराज, ज्योति सुभाष , विजय मौर्य सगळ्यांचं अ‍ॅक्टींग छान झालय !
रणवीर फॅन्स , झोया अख्तर फॅन्स नक्की बघा !

>> रॅप कल्चर्/रॅप स्टार हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय नाही म्हणून आधी जरा शंका होती पण झोया अख्तरचं स्टोरी टेलिंग जबरदस्तं आहे, हळुहळु ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनाही रॅप बॅटलमधे इंटरेस्ट यायला लागतो :).
+१

डीजे लाही +१ Lol
(हा पिक्चर किती चांगला असेल ह्याचा अंदाज येईल. चक्क डीजे आणि माझं एकमत झालंय! Happy )

होना, सशल- डिजे एकमेकींना अनुमोदन देणे ही ऐतिहासिक घटना घडते तो सिनेमा नक्कीच मस्ट वॉच Proud

डिव्हाइन आणि नेझी चं ओरिजनल ‘मेरी गलीमे’
https://youtu.be/1bK5dzwhu-I
एरवी नसतं पाहिलं , गल्ली बॉयमुळे पाहिलं! कसली सॉलिड कॅची आहे स्टाइल आणि पिक्चरायझेशन !
रॅप म्हणजे योयोहनीसिंग बादशाह करतात तशी फालतु बकवास नाही, शब्दांना किती मह्त्त्व आहे हे गलीबॉयमुळे कळलं Happy
हे रणवीरचं व्हर्जन , अर्थात रणवीरबरोबर डिव्हाइन आणि नेझीने सुध्दा दिलय प्लेबॅक, आवडलय हे रॅप !
https://youtu.be/pGmbUdf6lEM

रॅप कल्चर्/रॅप स्टार हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय नाही>>
तसा हा प्रकार फारच अननोन आहे आपल्याकडे. रॅपचा विषय आला आहे म्हणून ही लिंक पहा, जे काही आहे ते थोर आहे.
https://m.youtube.com/watch?v=sYADNgIkelY

मी ऐकलेले पहिले रॅप म्हणजे अशोककुमारांचे ...रेलगाडी Happy त्यांच्या शब्दांनुसार आमची मान पण डावीकडे- उजवीकडे हलायची Lol

गली बॉय पहायलाच हवा Happy

मी ऐकलेले पहिले रॅप म्हणजे अशोककुमारांचे ...रेलगाडी Happy त्यांच्या शब्दांनुसार आमची मान पण डावीकडे- उजवीकडे हलायची

>>>>> Rofl

गलीबॉय बद्दल अजुन सेपरेट धागा नाही ??
छान आहे ही मुलाखत विजय मौर्य, विजयराज आणि अमृता सुभाष , पुन्हा पहावासा वाटतोय सिनेमा Happy
https://youtu.be/tJp1F2PGxwU
Btw विजय वर्मा, विजयराज आणि विजय मौर्य, इतके सारे विजय एकाच सिनेमात समजल्यावर बच्चनचा नमकहलाल मधला विजय मर्चंट विजय हजारे डॉयलॉग सारखा आठवतो Biggrin

>> माधुरी मिळेल ते सिनेमे करत सुटलीये.
असं काय करता! संसाराचा गाडा ओढायचा आहे तिला?
मी म्हणेन, की ट्रेलर बघून तरी नॉन-सेन्स करमणूक असेल असं वाटत आहे. गोलमाल (सर्व नवीन), नो एण्ट्री, सगळ्या प्रकारच्या मस्त्या वगैरे कॅटेगरी मधला मुव्ही.

टोटल धमाल पाक मधे रिलीज करणार नाही असे अजय देवगण म्हंटल्यावर लोक उलट रिलीज करा म्हंटले. यावरून अंदाज येइल Happy

<<<<टोटल धमाल पाक मधे रिलीज करणार नाही असे अजय देवगण म्हंटल्यावर लोक उलट रिलीज करा म्हंटले. यावरून अंदाज येइल Happy>>>
Rofl

टोटल धमाल पाक मधे रिलीज करणार नाही असे अजय देवगण म्हंटल्यावर लोक उलट रिलीज करा म्हंटले. यावरून अंदाज येइल Happy>>> Lol

विजय वर्मा, विजय राज, विजय मौर्य ह्या तिनही विजयची कामं फक्कड आहेत ग बॉ मधे.

मी म्हणेन, की ट्रेलर बघून तरी नॉन-सेन्स करमणूक असेल असं वाटत आहे. गोलमाल (सर्व नवीन), नो एण्ट्री, सगळ्या प्रकारच्या मस्त्या वगैरे कॅटेगरी मधला मुव्ही. >>>>>>>> धमालचा पहिला भाग चान्गला होता. दुसरा भाग मात्र फालतू होता.

जोया अख्तरचे सगळेच चित्रपट "हटके" असतात; विषय , हाताळणी, संगीत या बाबतीत.
रणवीर चे वेगळेपण आणि कुवत " दिल धडकने दो" मधेच जाणवली होती. 'लंबे रेस का घोडा" आहे तो!

गली बॉय आवडला. रणवीर एकदम धारावी मधला मुरादच वाटत राहतो पिक्चरभर. परफेक्ट बॉडी लँग्वेज उचलली आहे. पहिल्या रॅप बॅटलला बुजलेला, स्वतःचेच रॅप नीट न म्हणू शकलेला, ड्रायवरचे काम नाखुषीने पण ईमानदारीने करणारा, अलियाकडुन मला थोडावेळ पाहिजे म्हणत प्रॅक्टीकल डिसीजन घेणारा आणि शेवटी स्वतःच्या पॅशन ला प्राधान्य देणारा गली बॉय खूप मस्त केलाय.
एम सी शेर पण अफलातून झालेला आहे. मुरादला सपोर्ट करणारा मित्र खूप छान उभा केलाय. मुरादचा गॅरेजवाला मित्र पण एक्दम मस्त.. rap battles ase kharech hotat ka?

गली गली मे डोक्यातून जातच नाहीये.

तसा हा प्रकार फारच अननोन आहे आपल्याकडे. रॅपचा विषय आला आहे म्हणून ही लिंक पहा, जे काही आहे ते थोर आहे.
https://m.youtube.com/watch?v=sYADNgIkelY

>>>>>>>>

डोळ्या देखत उजेड चोरीता, त्याग आम्हा काय मागता ?

फिल्मी बेस्ट आहे हे!

Pages