चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा Stadium Nuts बघितला. मुलांना खुप आवडला. आता पारायण करणे चालु आहे. Happy

भाई पाहिला का कोणी? कसा आहे?>>>>छान आहे नक्की पहा... आताच आलो बघून.. परत जात आहे ८ च्या शो ला.. शेवटचे गाणे बघायला

घरातल्या Senior citizens नी आज रात्रीची tickets काढली आहेत. >>> ज्येना ना भाई आवडला . छान आहे म्हणालेत . "घाणेकरांसारखा तुटक नाही , सलग आहे " - त्यांचे मत . (मी दोन्ही पाहिले नाहीत )

सध्या जीओ सिनेमाच्या कृपेने भारंभार सिनेमे बघणं होतयं . काही पहिल्यांदा , काही पारयणं

मनमर्जिया : विकी कौशल आणि तापसी आवडले . मसान -> राजी -> मनमर्जिया . विकी कौशलच transformation कमाल आहे.
तापसी आता बिन्धास्त मुलीच्या रोलमध्ये टाईपकास्ट होतेय , असं वाटतयं . जसं मध्यंतरी कंगना सायको रोल मध्ये होत होती .
ज्यु.बच्चन "रामजी"च्या रोलमध्ये ठीक वाटतात . चित्रपटाचा शेवट अपेक्शितच झाला , पण त्या शेवटाकडे जाणारा मार्ग वेगळा असता तर आवडला असता. शेवटचा १० मिन चा सीन बळेच वाटला . तापसी फार चालु वाटायला लागली एकदम.
पण तापसीचे ड्रेसेस , त्यांची घरं एकंदर वातावरण आवडलं . एकच गाणं लक्शात राहतं आणि तेच आवडलं . बाकी ती जुळं लोक मध्ये मध्ये नाचतात आणि गाणी पंजाबी-ईन्ग्लिश-हिन्दी सगळी मिक्स आहेत .

हॅप्पी फिर भाग जायेगी : पहिल्याची सर दूसर्याला नाही पण सोनाक्षी बरीच सुसह्य वाटली . तो सरदारजी आणि दमन सिन्ग बग्गा मज्जा आणतात . काही काही डायलॉग्ज खुसखुशीत आहेत पण एकंदर अ आणि अ टाईपचा चित्रपट आहे . सगळ्यात जास्त मला तो चायनिज चँग आवडला . त्याचे एक्स्प्रेशन्स मस्त. पहिल्यातली गाणी खूप सुरेल होती , यात एकही लक्शात रहात नाही. दमन सिन्ग बग्गा आपली "यारा ओ यारा"ची हौस भागवून घेतो त्यात.

वन नाईट स्टँड - सनी लिओनीचा हा चित्रपट मी का बघितला याचं उत्तर नाही . पण सगळ्यात आवडला तो हिरो तनुज विरवानी . रती अग्निहोत्रीचा मुलगा . दिसायला हँडसम आहे (थोडासा गश्मीर महाजनी), अभिनयही बरा करतो , चेहरर्यावर एक्स्प्रेशन्स देतो , वावरण्यात खूप सहजता आहे त्याच्या. परत कधी कुठे दिसला नाही .

वेब सिरिज चा कुठला धागा आहे का? सध्या "स्मोक" चालू आहे.

वेब सिरिज चा कुठला धागा आहे का? >>> हवा होता. आल्ट बालाजी वर पण ब-याच वेबसीरीज चालू आहेत (त्या नंतर जिओसिनेमा वर येतात). अपहरण चांगली आहे. जिओ वर पण आली आहे.

द टेस्ट केस, बोस या उत्तम मालिका होत्या. स्मोक नेटफ्लिक्सवरच्या एका रशियन माफिया प्रमाणे आहे.

मनमर्जियां बघायला सुरू केला पण अतिशय बोर झाला. अर्धापण नाही बघितला. तापसी खूप इरिटेटींग वाटली. सतत तोच चिडकेपणाचा सूर आणि पेटलेली.. तापसी आता बिन्धास्त मुलीच्या रोलमध्ये टाईपकास्ट होतेय , असं वाटतयं . जसं मध्यंतरी कंगना सायको रोल मध्ये होत होती .>>>>>>>>>>>> +१११११११ तेच तेच किती बघणार?

गंध पाहिला.अमेझॉन प्राईम वर आहे.मनावर अय्या चे भयाण संस्कार झालेले असल्याने 3 गोष्टी आहेत माहीत नव्हतं.
स्पोईलर
मला वाटलं की अमृता सुभाष चा आईबाबांनी ठरवलेला नवरा म्हणून मिसो येईल की काय.नंतर कळलं की तो वेगळ्या गोष्टीत आहे.गिकु काम नेहमी प्रमाणे छान.अमृताच्या पात्राची ची ओव्हर ऍक्टिनग मुद्दाम केली असावी.अय्या पेक्षा केव्हाही झेपेल
मिसो कथा मला कळली नसावी.त्याचा वास सेन्स जाण्यात सोकु ने इतकं चिडण्या सारखं काय आहे?मला आधी वाटलं की इन्फेक्शन ने त्याच्या अंगाला वास येतो आणि त्यावर नाक मुरडत असते ती. शिवाय शपथा घेताना इतकं सुंदर अमर वाटलेलं नातं पॉझिटिव्ह निघाल्यावर सोडता येतं?ती मुळात डिव्होर्स साठी समजवायला आलेली असते आणि नंतर पॅच अप करू निर्णय घेते आणि नंतर मेलेला उंदीर मिळाल्यावर परत निर्णय बदलून निघून जाते का?त्याने कारण न सांगितल्याबद्दलचा राग कंसिस्टंट का नाही?उंदीर मेल्यावरच परत का जागा होतो?शेवटी तो गॅस उघडा ठेवून वास घेत आत्महत्या करतो का?दुसऱ्या दिवशी कामवाल्या मावशी आल्यावर त्यांना पण रिस्क ही.एकंदर पिक्चर मध्ये पार्टीत
3 मिनिटं गाणं गाणारा तरुण सुंदर मिसो इतकाच स्मरणीय पॉईंट आहे.गाणं ऐकायला खूप कंटाळवाणं वाटलं.
सकू च्या नायिका जरा क्रिपी स्टॉकर असतात असं वाटलं, मग हेच नायकाने केलं असतं तर तो क्युट वाटला असता अश्या विचाराने सकू ला काय सांगायचं असेल हे कळलं.
मोरल ऑफ स्टोरी:
मला सकू चित्रपट कळावे ही माझी लायकी नाही.

आज गुलाबजाम बघितला. छान, सुरेख चित्रपट होता. हा, शेवटी जरा कन्टाळा आलेला. शेवट छान केलेला, उगाच ओढून ताणून नायक- नायिकेला एकत्र आणल नाही ते चान्गल केल. डिशेसची फोटोग्राफी, ओव्हरऑल चित्रपटाची फोटोग्राफी सुन्दर होती.

उंदीर आणि त्याचा वास हे त्यांच्यातलं नातं 'सडत' जाण्याचं प्रतीक आहे. म्हणून मोलकरणीला तो वास येत नाही.
('टु स्मेल अ रॅट' या वाक्प्रचाराचा अर्थ पहा. Happy )

मिसो फक्त आजारी पडला नाही, त्याने तिची फसवणूक केली - पॉझिटिव्ह निघाल्यामुळे ती उघडकीस आली, नाहीतर आलीसुद्धा नसती. सोकुची चीड ती आहे. (सिनेमा बघून बराच काळ लोटला, तपशिलांत माझा घोटाळा झालेला असू शकतो, पण तथ्य मला जे जाणवलं ते हे.)

एक सांगू का?
या शिंच्या कुंडलकराक काही चांगला सहनच होत नाय!!!

मनापासून वाट पाहत होतो तो "मणिकर्णिका" काल पाहिला. खूप आवडला. आवर्जुन पहावा असा आहे. इकडे सिनेमा ला रेटिंग १२+ असल्याने (रक्तपाताचे प्रसंग असल्याने कदाचित) मुलाला दाखवता आला नाही, या गोंधळात पहिली साधारण २० मिनिटं चुकली, पण कथा बर्‍यापैकी माहित असल्याने फारसा फरक पडला नाही. शक्य असल्यास मुलांना नक्की दाखवावा असा सिनेमा आहे. कंगना , आणि डॅनी चं काम आवडलं. दोन्ही इंग्लिश अधिकार्‍यांचं काम पण साजेसं होतं. अनेक प्रसंगांना, संवादांना उस्फूर्त पणे दाद दिली गेली. ऑव्हरऑल मस्त पॅकेज!

स्पॉयलर अलर्ट:-
मध्यांतराच्या आधीच्या भागात फारच गोष्टी खटकल्या . मनु करारी, ठाम न वाटता अनेक ठिकाणी उद्धट वाटली. कपडेपट, सतत मोकळे सोडलेले केस, पदर न घेणे वगैरे गोष्टी मनु च्या स्वभावतली बंडखोरी न वाटता उद्दाम पणा कडे झुकल्या सारख्या वाटल्या. अंकिता लोखंडे बाईंचं गाणं का घ्यावंसं वाटलं हा प्रश्न पडला. मुळात सिनेमॅटीक लिबर्टी च्या नावाखाली असलं दाखवून वाद निर्माण होणारच अशी परिस्थिती का निर्माण करतात समजत नाही. ऐतिहासिक सिनेमा तयार करताना या बाबतीत सूट घ्यावीशी का वाटते ! मध्यांतरा नंतर सिनेमा एकदम वेग घेतो आणि आधीच्या ह्या गोष्टी, नंतर सादरीकरण, संवाद, कंगनाचा स्क्रिन प्रेझेन्स यामुळे विसर पाडायला भाग पाडतो !

उरी पाहिला. हिंदी युद्धपटांच्या तुलनेत बराच उजवा आहे. थोडे अ.अ. प्रसंग आहेत पण त्याशिवाय मसाला सिनेमा कसा होणार. पण प्रत्यक्ष ऑपरेशनमद्ये सैनिकांची हालचाल, शस्त्रे वापरणे खरेखुरे वाटते. आता ते खरेच तसे असते का नसते हे एखादा सैन्याधिकारीच सांगेल. सैद अता हस्नैन म्हण्तात की सैनिकांच्या हालचाली वगैरे खर्‍याखुर्‍या सैनिकाप्प्रमाणेच वाटतात.
The SF commandos all look physically fit and probably trained genuinely with the uniform, weapons and equipment of the SF; quite evident from the brisk and tactical movements, quite unlike most Bollywood films.

https://www.thequint.com/voices/opinion/uri-review-perspective-of-former...

उरी पाहिला. चांगला आहे. मी काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून / वाचून ज....रा माझा अपेक्षेचा स्तर उंचावून गेलो होतो बहुदा, वयाचा परिणाम असावा किंवा चित्रपट माध्यमाची समज कमी असावी पण बॉर्डर, एल ओ सी कारगिल वगैरे युद्धपट पहाताना किंवा अजूनही 'ए वतन, ए वतन, हमको तेरी कसम' वगैरे ऐकताना जे 'वाटतं', ते नाही'वाटलं'. इतकी अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असताना, मुळातच उरीसारख्या घटना घडायला नको होत्या असंही एकदा वाटून गेलं. पण ओव्हरऑल, चांगला सिनेमा आहे. निदान भाई पाहून जो वैताग आला होता, तसं काही झालं नाही.

गली बॉय बघितला.. फारच भारी. बोहत बेस्ट, या वर्षातला, आत्तापर्यंतचा चांगला हिंदी चित्रपट, सगळ्यांनी बघायला हवा.

भविष्यवाणी :
थोड्याच वेळात इथे माबोवर, गली बॉयवर धागा येईल, मग तो धागा उसवेल, या सिनेमावर बरीच चर्चा होईल.

गल्ली बॉय अफाट चित्रपट आहे. रणवीरचा अद्यापपर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय.
एमसी शेर झालेला अभिनेता एकदम फाडू अभिनय करतो.
आजिबात सोडू नका.

रणवीर आणि आलिया दोघेही अजीबातच आवडत नाहीत Sad पण चैतन्य, चिनूक्स आणि पुंबा कौतुक करायलेत तर बघावा काय?? तसेही १० एप्रिलपर्यंत वापरावे लागणार असे एक बुक-माय-शोचे व्हाउचर आहे त्यामुळे खिशातून पैसे जाणार नाहीत.

गली बॉय छान आहे असा रिपोर्ट आहे. लेकीचे शूट चालू होते पण पब्लिक पहिले फिल्म बघून मग नंतरच्या शिफ्ट ला शूटिंगला गेले. मी सव ड होईल तसे बघेन.

Pages