यावेळेस भारतातून येताना, गंध चित्रपटाची सिडी घेऊन आलो. गंध या कल्पनेशी निगडीत ३ वेगवेगळ्या कथा आहेत. एकंदर मला आवडला.
पहिला भाग आहेत तो, वयात आलेली मुलगी. यात ज्योति सुभाष, चंद्रकांत काळे, अमृता
सुभाष आणि गिरिश कुलकर्णी आहेत. कथेची गरज म्हणून थोडी ओव्हर अॅक्टिंग हवीच
होती आणि ती अमृताने भागवली. यातला काळ बहुतेक १९९३ नंतरचा असावा, कारण
दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, मधले गाणे वापरलेय. पण त्या काळात, टाईपरायटर
वापरात होते का याबद्दल मला खात्री नाही. ज्योति सुभाष आणि चंद्रकांत काळे, सहज
वावरलेत.
दुसर्या भागात (औषध घेणारा माणूस ) मिलिंद सोमण, सोनाली कुलकर्णी आणि लिना
भागवत आहे. काहि मिनिटापुरती असणारी, लिना भागवत अगदी सहज वावरते. सोनाली
नेहमीप्रमाणेच सहज. कौतूक आहे ते मिलिंद सोमणचे. सहसा मॉडेल्स, चांगला अभिनय करु
शकत नाहीत, असा अनुभव आहे. पण त्याने अवघड भुमिका चांगली निभावलीय. मराठी
अगदी सहज बोललाय. खरे तर त्याने आधीच चित्रपटात यायला हवे होते, म्हणजे आपल्याला
तेच ते, रेकीव आवाज ऐकावे लागले नसते.
याबाबत पण काही ढोबळ चुका झाल्यात. ज्या ग्लासात लिना औषधाच्या गोळ्या भरते,
त्यावरचे तासांचे आकडे, प्रे़क्षकांच्या बाजूला आहेत. तसेच ती ज्या पिशवीतून गोळ्या
काढून भरते, ती हाताळणी एच आय व्ही पॉझिटीव्ह असणार्या माणसाच्या औषधासाठी
योग्य वाटत नाही.
ती घरातील मोलकरीण म्हणजे लादी पुसत असणारच. तिला मेलेला उंदीर दिसत नाही
वा त्याचा वास येत नाही हे पटत नाही. एच आय व्ही पॉझिटीव्ह असणार्या माणसाला
कसलाच वास येत नाही का ? (माझ्या एका शिक्षिकेला, अपघात होऊन, डोक्याला मार
बसल्याने, असे झाले होते.)
तिसरा भाग आहे, बाजूला बसलेली बाई. यात नीना कुलकर्णी, प्रेमा साखरदांडे, यतीन
कार्येकर आहेत. नीनाचा सहजसुंदर अभिनय आहे यात. प्रेमा साखरदांडे, थेट कोकणातल्या
आज्जी दिसतात. (पण कथेत हव्या तितक्या खडूस वाटत नाहीत.) सूईणबाई पण अस्सल.
यात काहि चुका, म्हणजे बाजूला बसलेल्या बाईच्या, अंथरुणावर मूलांना बसायची परवानगी
नसे. तसेच दिवसभर ते अंथरुण पसरुन ठेवलेले नसे. ज्या काळात कंदील वापरात होते
(तसे ते अजून आहेत) त्या काळात, साड्यांमधे हिरव्या रंगाची पॅरट ग्रीन हि छटा अजिबात
नसे, असे मला वाटते. लाइट गेल्यावर देव्हार्यात भगभगीत पांढरा उजेड दिसतो. कोकणात
भर तेलात पापड तळायची प्रथा नव्हती, ते तव्यात तळले जात. एवढे तेल वापरण्याइतकी
सुबत्ता, त्या घरात दिसत नाही. पितळेच्या ताटवाट्या, कंदील, साड्यांचे रंग, खेळण्यातला
बॉल एका काळातले वाटत नाहीत.
पण हे सगळे मला उगीचच जाणवलेले. एकंदर चित्रपट आणि त्यातल्या तांत्रिक बाजू
उत्तम आहेत.
'गंध'ची डिव्हीडी बाजारात आली
'गंध'ची डिव्हीडी बाजारात आली आहे.
>>'गंध'ची डिव्हीडी बाजारात
>>'गंध'ची डिव्हीडी बाजारात आली आहे.<< अरे वा, उत्तम. आत्ता घ्यावयास हवी.
'गंध'ची डिव्हीडी बाजारात आली
'गंध'ची डिव्हीडी बाजारात आली आहे.
चिनुक्स माहितीबद्दल धन्यवाद....
झकास...आता मायबोलीच्या खरेदी विभागात आली तर बरे होईल. पट्ट्कन घेता येईल.
गंध internet वर बघितला, कोकण
गंध internet वर बघितला, कोकण / जुन्या पुण्याचे चित्रिकरण खास आहे. पहिली कथा उत्तम. overall good 3 out of 5
काल गन्ध पाहिला. चान्गअला
काल गन्ध पाहिला. चान्गअला वातला. Its a collection of 3 stories, similar to Hindi movie "Das Kahaniya".
आपली मराठीवर गंध पाहीली.
आपली मराठीवर गंध पाहीली. मस्त. पहीली कथा गुडी-गुडी टाईप्स. अमॄता सुभाष शोभते अगदी.
दुसरी फारच, तिसरी थोडी सिरीयस. दुसरी थोडी जास्त. पण नीना कुलकर्णींचा अभिनय, देहबोली मस्तच. तिसर्या कथेत पुर्णवेळ सोबतीला कोकणातला पाउस.. खूपच छान.
श्या, त्या दिवशी फक्त नाव न
श्या, त्या दिवशी फक्त नाव न कळल्याने हा चित्रपट पाहीला नाही.
दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या दोन स्टोरीज पाहील्या.
दिनेश १९९३ ला टाईपरायटर्स
दिनेश १९९३ ला टाईपरायटर्स चांगले फॉर्मात होते.कोर्टाच्या व्हरांड्यात तर अजूनही आहेत
इथे वाचून गंध बघितला. मला
इथे वाचून गंध बघितला. मला त्यातली पहिली लघुकथा सगळ्यात जास्त आवडली.
रॉबीन, तू बघितला का गंध ?
रॉबीन, तू बघितला का गंध ? काहितरी खटकतं. त्यात ते टाईपरायटर एका आर्टस्कूलमधे दाखवलेत.
मी नाही पाहिला गंध. १९९३
मी नाही पाहिला गंध. १९९३ दरम्यान टाईपरायटर असावेत का अशी जनरल शंका तू उपस्थित केली होती म्हणून सांगितले. कदाचित कॉर्पोरेटमध्येच आले असावेत संगणकीय प्रिन्टर तेव्हा...
रॉबीन, अवश्य बघ गंध, वेगळा
रॉबीन, अवश्य बघ गंध, वेगळा आहे. चित्रपट या माध्यमात, गंधाची अनुभूति देण्याचे सामर्थ्य नाही, याचे वाईट वाटले. यातच सगळे आले बघ.
मी ही गंध पाहिला आज. तिन्ही
मी ही गंध पाहिला आज. तिन्ही गोष्टी ठिकठिक वाटल्या.
'गंध' हा माझा अत्यंत आवडता,
'गंध' हा माझा अत्यंत आवडता, आणि खूप जवळचा बनून बसलेला असा सिनेमा. 'विहीर' सिनेम्यासारखाच फक्त 'अनुभवायची' अशी एखादी गोष्ट होऊन बसलेला.
२००९ च्या दिवाळी अंकात 'फॉर ऑल दोज, हू लेफ्ट देअर स्मेल बिहाइंड!' हे मी लिहिलेले ललित 'गंध' भोवतीच गुंफलेले होते. ते सार्यांनीच वाचलं असणारच आहे. इथे नव्याने काहीतरी लिहिण्यापेक्षा त्यातले काही परिच्छेद इथे पुन्हा पेस्ट करावेसे वाटले.. इथे तो विषय चालू आहे म्हणून.
***
... लग्नाची मुलगी.. वीणा. रीतसर दाखविण्याचे, कांदेपोह्यांचे सोपस्कार पार पडतात. पण कुठेतरी माशी शिंकते अन् लग्न ठरत नाही ते नाहीच. अशातच मिलिंद भेटतो. त्याचा साधेपणा, कमी बोलणं तिला आवडतं. तितकंच अगम्यही वाटतं. पण यापलीकडे एक गोष्ट आहे, ज्यामुळे ती अक्षरशः खेचली जाते त्याच्याकडे. तो सोबत घेऊन येणारा अन् सारखा सोबतच घेऊन फिरणारा एक विशिष्ट गंध! तो वास ओळखीचाही आहे; अन् नाहीही. ती अस्वस्थ होते, घुसमटते. ही घुसमट तिला एक दिवस त्याचा पाठलाग करायला लावते आणि ती पोहोचते अडगळीत थाटलेल्या एका उदबत्तीच्या कारखान्यात! पझल गेममधला शेवटचा तुकडा जोडून झाल्यावर आनंद व्हावा, पण तयार झालेलं चित्र अतिशय दु:ख देणारं असावं, अशी तिची अवस्था होते. आपले लग्न ठरावे म्हणून देवासमोर ज्या उदबत्त्यांची जुडीच आई लावते, ती हीच उदबत्ती की! त्याचबरोबर दिवसभर तो झोपाळलेल्या डोळ्यांनी का वावरतो हेही उत्तर तिला मिळते.
हे सारे त्रयस्थपणे पाहत असलेला मिलिंद तिला अचानक लग्नाचं विचारतो अन् ढगांची गर्दी सरसरसर करीत पांगावी आणि निरभ्र आकाशात सुंदर इंद्रधनुष्य पडावं, असं काहीसं तिला वाटतं. घरी येऊन देवासमोर मनोभावे उदबत्त्या लावत तिच्या लग्नासाठी साकडे घालणार्या आईला ती थुईथुई नाचणार्या शब्दांत सांगते, "आई, काय सांगू तुला! एका अतिशय 'धार्मिक' स्थळाकडून मला होकार आलाय!"
कथा अगदी साधी. कुणाला खरी वाटेल, तर कुणाला काल्पनिक. पण मला मात्र वाटून गेलं, या कथेतले तुकडे तुकडे आपल्याच आजूबाजूला कधीतरी, कुठेतरी आपण अनुभवले. त्या उदबत्तीचा वास प्रत्यक्ष न घेताही अनंत लहानमोठ्या प्रसंगांनी मनात गर्दी केली.
वाटलं, अरे, आपण बोथट झालो आहोत असं आपल्याला वाटत होतं. अन् आज, इथं तर प्रत्यक्ष कसला गंध वगैरे न येताच आपण अस्वस्थ झालो!
***
मरणाची ओळख झाली, ती अनेक गंधांमधून. आजपर्यंत दुष्ट, भयावह, निराकार, गूढ असं वाटणारं मरण जेव्हा अशा निरनिराळ्या गंधांमधून विशिष्ट व्यक्तिमत्त्व धारण करून सामोरं आलं, तेव्हा ते थोडंसं ओळखीचं, आपलं वाटू लागलं. मग त्याबद्दल वाटणारी भीती थोडीशी कमीही झाली..!
... पण मृत्यूला नेहमी वास असेलच, असे नाही. नाही का?
'गंध'मधला औषधांवर जगणारा, एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेला सारंग. प्रचंड औषधे घेतल्याने वास घेण्याची क्षमता संपलेला. काही वर्षांनी भेटायला आलेल्या त्याच्या बायकोला, रावीला, घरात अनेक भयानक वास येत राहतात. हे सारे आपल्याला येत नाहीत; अनेक दिवस घातलेल्या सॉक्सचा, मेलेल्या उंदराचा, अन्नाचा, पर्फ्यूमचा, गॅसचा.. कसला कसलाही वास येत नाही हे समजते तेव्हा सारंग कोसळतो. आजाराने मृत्यू येण्याआधीच सारंग स्वतःच त्याला सामोरा जातो. शांतपणे समीप आलेल्या त्या मरणाला त्या वेळी कुठलाही वास नसतो. खरेतर कुठलाही गंध नसलेला, हीच त्यावेळी त्या मृत्यूची आपल्यासाठी ओळख बनून राहते.
***
... जन्मावरून पुन्हा 'गंध'मधली जानकी आठवली. अजून 'पोटपाणी न पिकलेली'; आणि आता 'चार दिवस बाजूला बसलेली' जानकी. म्हणजे चार दिवस कशाला हातच नाही लावायचा, वेगळ्या खोलीत राहायचे. अन् त्याच वेळी घरात नणंद बाळंत होते. पावसाच्या आणि हिरव्याकंच गंधभरल्या वातावरणात हे बाळ जन्म घेते तशी जानकीची ऊठबस वाढते. घरात येणार्या निरनिराळ्या वासांतून हा नवा जन्म जणू अनुभवण्याचा ती प्रयत्न करते. खाटेखाली ठेवण्यासाठी सुईण निखारे घेऊन जाते, तेव्हा त्या कोळशाच्या धुराचा मोठा श्वास जानकी छाती भरून घेते.
हो. हा असा, खास या कारणासाठी तयार केलेल्या निखार्याचा धूर, त्याचा तो गंध.. घरात पुन्हा येतो, नाही येत; कुणी सांगावे?
***
येत्या रविवारी (दिनांक २०
येत्या रविवारी (दिनांक २० फेब्रुवारी, २०११) रोजी "स्टार प्रवाह" चॅनेलवर सायंकाळी ठिक ७ वाजता "गंध" हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच
काही दिवसांपूर्वीच पाहिला....

पहिली कथा चांगली असून सुद्धा अमृता सुभाष मुळे फार डोक्यात गेली.......'ती फुलराणी' च्या वेळी सुरु झालेली ओव्हर अॅक्टींग अजूनही जोरात सुरु ठेवली आहे.
दुसरी कथा छान. सोनाली कुलकर्णी अगदी सहज पेलून नेते आणि मिलिंद सोमण देखील छान.
मला सर्वात अधिक तिसरी कथा आवडली. नीना कुलकर्णीच बराचसा वेळ स्क्रीन वर असते. सतत पडणार्या पावसाचा अखंड नाद. त्या बाळाला जवळ घेऊन त्याचा गंध घेतानाचा तिचा अभिनय केवळ अप्रतिम. ही कथा कुठेतरी मनाला भिडली.
निशदे अॅक्टींगच्या बाबतीत
निशदे
अॅक्टींगच्या बाबतीत अमृता सुभाष आईवर गेली नाही असच म्हणायला हवे. तिची आई ज्योती सुभाष किती छान काम करते पण अमृताने त्यातुन काहीही धडा घेतलेला दिसत नाहीये.
दिनेशदा, दिग्दर्शक सचिन
दिनेशदा, दिग्दर्शक सचिन कुंडलकरचे नाव घ्यायला हवे. कथा पटकथा पण त्याच्याच आहेत का?
मिलिंद सोमण मराठीत प्रथमच आला असला तरी हिंदीत काही चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्यात त्याने. आणि भारतातल्या पहिल्या इंग्रजी दूरदर्शन मालिकेत -अ माउथफुल ऑफ स्काय मध्ये- मुख्य भूमिकेत होता तो.
रविवारी आठवणीने बघायला हवा. (क्रिकेट वर्ल्डकप चालू असताना)
दिनेशदा, मला पण हा पिक्चर
दिनेशदा,
मला पण हा पिक्चर खूपच आवडला. हो, अमृता सुभाषची ओव्हर अॅक्टिंग आहे खरी. पण गोष्ट थोडी विनोदी ढंगाची असल्याने खपून गेलंय बहुतेक. तिच्या ऑफिसमधली ती 'दंताळी टायपिश्ट' भारी आहे ना?
एकूणच, थोडा वेळ असलेली लोकंही भाव खाऊन गेली आहेत. ते सनईचे म्युझिक डोक्यात घर करून राहिलेय.
'बाजूला बसलेली बाई' मध्ये त्या आजीबाई ठसकेबाज वाटतात. 'होच का?' यातनं सगळा त्रागा दिसलाय त्यांचा. तो अर्ध्या बाह्यांचा स्वेटर, बशीतून चहा पिणे फारच आवडलं. खरं म्हणजे आणि दुसरे बाळंतपण हे सासरी होत असते ना? मग ती नणंद दुसर्यांदाही माहेरीच आलेली दाखवलीय. असो.
काही काही त्रुटी आहेत चित्रपटात. पण एक वेगळा अनुभव आहे नक्कीच.
हा पिक्चर यू ट्युबवर पण
हा पिक्चर यू ट्युबवर पण उपलब्ध आहे अता.
अंजली, त्या आज्जी म्हणजे
अंजली, त्या आज्जी म्हणजे सुलभा देशपांडेच्या सहकलाकार, प्रेमा साखरदांडे. सावल्या नाटकातल्या आज्जी.
अमृता माझ्या पण डोक्यात गेली होती. पण तिचा "त्या रात्री पाऊस होता" हा चित्रपट बघाच. संवादफेक अशी केलीय, की आईचे नाव राखलेय. तिला त्या चित्रपटासाठी, उत्कृष्ट अभिनेत्रीचे मानांकन मिळाले होते.
भरत, मिलिंदने ऐन उमेदित मॉडेलिंगला सर्व वेळ दिला. (एका फ्रेंच मॅगेझिनमधे तर मी त्याला ऑव्हऑल चे मॉडेल म्हणून पण बघितलाय ) आधी टफ शूज, मग किंगफिशर.. त्याने खरेच अभिनय सिरियसली घ्यायला पाहिजे आता.
रूनी, फार दिवसांपूर्वी एक
रूनी,
फार दिवसांपूर्वी एक मालिका येत असे ज्यात अमृता ने काम केले होते. मला वाटते वैद्यकीय क्षेत्राशी निगडित मालिका होती. तिच्या करियरच्या अगदी सुरुवातीला. त्यात ती खूप चांगली अभिनेत्री होऊ शकेल असे वाटत होते. मग माशी कुठे शिंकली माहित नाही.
'ती फुलराणी' मधे तिने जे काही केले त्याला अभिनय म्हणणे मला तरी अवघड वाटते. त्यानंतर ते चक्रच सुरु झाले. 'वळू' मध्ये देखील तेच. 'गंध' मधेही तेच. ती खरंच खूप चांगला अभिनय करू शकते असे अजूनही वाटते. असेल आपल्या नशिबात तर मिळेल बघायला......:)
निशदे मी अमृताला ती
निशदे
मी अमृताला ती पुरुषोत्तम/फिरोदिया साठी नाटकात काम करायची तेव्हापासून बघीतले आहे. साठेंचं काय करायचं, ती फुलराणी इ. नाटकात पण बघीतले. मी बघीतलेल्या पैकी त्यातल्या त्यात श्वास मध्ये चांगली वाटली ती मला. टीव्हीवर तिला बघीतले नाहीये मी. त्या रात्री पाऊस होता पण बघीतला नाही मी.
ती ज्योती सुभाषची मुलगी असल्याने कदाचित माझ्या जास्त अपेक्षा असतील तिच्याकडून.
मला पण आवडला गंध. पहिली
मला पण आवडला गंध. पहिली लघुकथा जास्त आवडली. दुसरी ठीक आहे, अशा टाईपच्या बर्याच पाहिल्या/वाचल्या असल्याने नाविन्य नाही वाटलं दुसर्या लघुकथेत. तिसरीमधला नीना कुलकर्णीचा अभिनय खूपच छान!
प्रेमा साखरदांडे या सुलभा
प्रेमा साखरदांडे या सुलभा देशपांडेंच्या ज्येष्ठ भगिनी. तशाच ज्योत्स्ना कार्येकर सुद्धा.
अवांतर : सुधा करमरकर आणि ललिता केंकरे याही बहिणी.
मिलिंदच्या काही मुलाखती वाचल्यात /पाहिल्यात. त्यात तो कोणतीच गोष्ट ठरवून आणि मन लावून करत नाही असे तो सांगतो.(नावच मिलिंद त्यामुळे प्रत्येक बाबतीत नव्या चवीचा मध आणि नव्या वासाचं फूल लागतं त्याला). सलग अनेक वर्षे भारताचा चँपियन जलतरणपटू मग अपघाताने/योगायोगाने(नुसते कपडे बदलण्यासाठी एवढे पैसे मिळतात तर का नको?) मॉडेलिंग, मग अभिनय . आता स्वतःचे प्रॉडक्शन हाउस. पण हिंदीत तरी त्याचा अभिनय एक्सेप्शनल वाटला नाही. चित्रपट आणि भूमिकांत मात्र वैविध्य छान ठेवलेय.
आज स्टार प्रवाहवर आहे गंध!
आज स्टार प्रवाहवर आहे गंध! संध्याकाळी ७ वाजता.
आत्ताच यूट्यूबवर पाहिला
आत्ताच यूट्यूबवर पाहिला पिक्चर : http://www.youtube.com/watch?v=cWC2hQ-rrVg&feature=related
आवडला! तिसरा नीना कुलकर्णीचा भाग जास्त आवडला. पहिल्या भागात अमृता सुभाषचा अभिनय काही ठिकाणी अती वाटला. मिसो चे उच्चार अजूनही असे आंग्लाळलेले का असतात?
पण पिक्चर म्हणून आवडला 'गंध'.
फार दिवसांपूर्वी एक मालिका
फार दिवसांपूर्वी एक मालिका येत असे ज्यात अमृता ने काम केले होते.>>>>>>अमृताने "झोका" या मालिकेतही कामे केले होते ना??? सुनिल बर्वे, प्रतिमा कुळकर्णी, श्रीरंग गोडबोले यांच्या भूमिका होत्या.
पहिल्या भागात अमृता सुभाष
पहिल्या भागात अमृता सुभाष नेहमीसारखी डोक्यात जाते. स्टेज ची सवय गेली नसावी अजून. तिला कोणीतरी सांगा रे कॅमेरापुढे एवढ्या मोठ्या आवाजात किंचाळायची गरज नसते. ती फुलराणी साठी जेव्हा भक्ती बर्वे- इनामदार च्या जागी अमृताला प्रोजेक्ट करत होते तेव्हा फार अपेक्षा वाढल्या होत्या. तिने त्या भूमिकेची पार माती करून टाकली.
दुसरा ठीक होता.
तिसरा भाग आवडला, नीना कुलकर्णी नेहमीसारखीच सहज आणि छान..
दुसर्या भागातला 'गंध' बाबतचा
दुसर्या भागातला 'गंध' बाबतचा धक्का जबर होता.
Pages