चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Inglorious Bastards बघितला आहे. तो पण खूप आवडला होता. Very cleverly written film !!

Django Unchained, Hateful Eight - हे अजून पहायचेत.

बॉयहूड(२०१४)
हर (२०१३)
द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल (२०१४)
मुनराईज किंग्डम (२०१२)

कायमस्वरूपी छाप पाडणारे सिनेमे

इतक्या वर्षांनी Interstellar पाहिला. मला खरे म्हणजे शब्दच नाहीत. धक्का बसल्यासारखी अवस्था आहे. यातल्या टर्म्स माहीत नव्हत्या असे नाही. किंवा साय फाय मूव्ही पहिल्यांदाच पाहिलाय असेही नाही. पण या सर्व संज्ञा अशा पद्धतीने गुंफत एक अशक्य विज्ञान काल्पनिका ज्या पद्धतीने जन्माला घातलेली आहे, ज्या पद्धतीचे स्टोरी टेलिंग आहे ते खूपच प्रभावी आहे. ब्ल्यू रे मुळे मजा आली आणि इंग्रजी सबटायटल्स मुळे एकूण एक संवाद समजायला सोपे गेले.

पण ब्लॅक होल चा प्रसंग डोक्यावरून गेला. ब्लॅक होलच्या जवळ जाऊन कसा काय तो बाजूला होतो हे समजले नाही अद्याप.

त्याच्या पुढच्या वर्षी आलेला मॅट डेमोंन चा द मार्शियन पण बघा मग>>>>>

आम्ही दोन्ही थेटरात पाहिले, त्यात इंटरस्तेलर तर दोनदा जाऊन पाहिला. इंटेरस्तेलार इतका अफाट आहे की त्यापुढे मार्शन खूप फिका वाटला. जर इंटरस्तेलर पाहिला नसता तर मात्र मार्शन चांगला वाटला असता.

मार्शियन आणि ग्रॅव्हिटी हे सिनेमे राहून गेलेत माझे. दोन्हीच्या ब्ल्यू रे सीडी सुद्धा आणून ठेवल्यात. पण मुहूर्त लागला नाही अद्याप. मार्शियन नेफ्लि वर आहे त्यामुळे पटकन बघून होईल.

@साधना हो सर्वजण इंटरस्टेलर डोक्यात घेऊन मार्शियन पाहायला गेले आणि सर्वांचं हेच झालं .. पण मार्शियन पण भारी आहे तास पण इंटरस्टेलर हा ख्रिस्तोफर नोलान च सिनेमा असल्याने तो थोड्या वेगळ्याच लीगचा आहे
@किरनुद्दीन ग्रॅव्हिटी बाकी दोघांच्या तुलनेत एवढा नाही आवडला

@ कामदेव ५५ इंचापेक्षा मोठ्या टीव्ही/पडद्यावर ब्लुरे शिवाय मजा नाही येत.. ब्लुरे डिस्क मध्ये रॉ फाईल असते जिचा ऑडिओ/विडिओ बिटरेट मोठा असल्याने सर्व दृश्य पाहायची मजा वेगळी असते .. आजकाल प्राईम / नेटफ्लिक्स वर जी क्वालिटी मिळते ती चांगली असली तरी ती ब्लुरे ला तोड नाही देऊ शकत .. हे असे एकदम डिटेल पाहायला आवडणाऱ्या लोकांना विडिओफाइल म्हणतात .. तसेच उच्च क्षमतेच्या फ्लॅक फाइल्स वापरून आणि उच्च दर्जाचा हेडफोन वापरून गाणी/संगीत ऐकायला आवडणाऱ्या लोकांना ऑडिओफाईल म्हणतात ..
तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर हॉबिट चित्रपटाची ब्लुरे मोठ्या पडद्यावर जवळून पहा मग मी काय म्हणतोय ते लक्षात येईल

ब्ल्यू रे तन्त्र आहे अजून? मी तर ती फेल्ड failed तेक्नॉलॉजी समजत होतो... >>> ज्ञान कमी आहे आमच्याकडे. जुने आणि फेल तंत्रज्ञान वापरतो.

@बाबा ब्लुरे नाममात्र भाड्याने मिळतात मोठ्या शहरात ... जस्ट डायल वर डीव्हीडी लायब्ररी अस टाका बरेच दुकानं मिळतील त्याची ..
ब्लुरे प्लेअर ३-४ हजारात चांगला मिळतो आजकाल .. फ्लिपकार्ट /अमेझॉन वर सेल असतो त्यावेळी फार स्वस्तात मिळेल हा प्लेअर आणि ब्लुरे डिस्क पण..
ओळखीतील कोणाकडे तरी असेलच प्लेयर आणि काही डिस्क... त्यांच्याकडून आणून वापरून पहा मग चांगलं वाटलं तर घेऊन टाका

बरं, बाकीच्या मंडळींनी ताण घेऊ नका. इग्नोर करू शकता.
काही मूव्हीज ब्ल्यू रे वर पाहणे हा अनुभव ठरतो.
अवतार हा एक आहे. इंटरस्तेलर हा पण.

आवो आमच्या कडचे टीव्ही त्या रीझोल्युशानाला कॉप्म्प्याटीबल नाहीत. काय काय बदलायचं? एल सी डी काढून एल इ डी घेतला तं सालं ओ एल इडी आलं आता पुन्हा हे ब्ल्यू रे चं लफडं . बरे तेव्हा ब्ल्यू रे घ्यावा तर एल सी डीवर उपेग नाही म्हनलं जौ द्या आपल्याला अध्यात्मिक विडिओ बघायचे त्या काय एस डी काय अन एच डी काय, ४ के काय सारकंच मरू द्या...
सगळी कडे तीच बोंब बायको निवडण्यापासून तर टीव्ही पर्यन्त एकच सल्ला...
थोडे और दिन रुक जाते तो और अच्छा मॉडेल मिल जाता..
आता अपग्रेडेड फॅब्रिकच्या चड्ड्या येनार हैत म्हणून तोवर 'तसंच' बसून र्‍हावा का क्वॉय ?

बा.का. - टीव्ही "एचडी" असेल तर ब्लू रे चांगले दिसेल त्यावर. मी टीव्हीच कंपॅटिबल नाही असे कधी ऐकले नाही ब्लू रे च्या बाबतीत. हाय डेफिनिशन टीव्ही असेल तर दिसायला हवे. ब्लू रे हा डिस्क फॉर्मॅट आहे. टीव्हीशी थेट संबंध नाही.

Blue ray disks play on PlayStation 2 three and 4. i have read about it being a failed format. Sony bundles somw blue ray disks with ps3 or 2 .

ब्ल्यू रे प्रोजेक्टर्स साठी बेस्ट आहेत. स्क्रीन असेल तर अजून छान इफेक्ट येतो. पण रूम अंधारी असायला पाहीजे.

ब्लॅक होलच्या जवळ जाऊन कसा काय तो बाजूला होतो हे समजले नाही अद्याप.>>>

@किरणुद्दीन, ज्या तत्वाने धूमकेतू सूर्याच्या गुरुत्वाकर्षणापासून आपला वेग मिळवतो तेच तत्व आहे. मोठ्या गुरुत्वाकर्षण असलेल्या बॉडीला आकर्षीत व्हायचे पण दिशा मात्र अशी ठेवायची की त्या बॉडीवर आदळणार नाही निव्वळ त्याच्या कडेने निसटून जाऊ.

माधव धन्यवाद उत्तरासाठी
सिनेमात असेच संवाद आहेत. माझी शंका अशी होती कि ब्लॅक होल कडे खेचले जात असताना प्रचंड गती प्राप्त होते. तसेच चुंबकीय बलामुळे कुठलीही गोष्ट खेचली जात असते. काठावर म्हणजे ब्लॅक होलच्या चुंबकीय क्षेत्रापासून खूपच दूर असायला हवे. इथे ब्लॅक होल आपल्याला दिसत राहते. त्याकडे खेचले जात असताना तो वेगळी दिशा पकडतो.
खरे तर अशा पद्धतीने खेचले जात असताना हातात काहीच राहत नाही. जर बाहेर पडायचे तर त्यापेक्षा जास्त बल लावावे लागेल, त्यासाठी जास्त इंधन लागेल ज्याची कमतरता आहे असे तेच म्हणत असतात.
हे समजले नाही.

काल अनुष्का शर्माचा परी बघायला घेतला. किती किळसवाणा चित्रपट आहे. ती कुत्र्याच्या नरडीचा घोट घेते त्यानंतर पुढे बघायची हिम्मत नाही झाली.
एकतर लवकर पुढे सरकताच नाही , अतिशय संथ. आणि त्यात असे सीन्स ... अ बिग नो नो

गेल्या आठवड्यात टीव्हीवर कॅथरिन बिगेलोचा ‘डेट्रॉइट’ सिनेमा बघितला. मला खूप आवडला. ५० वर्षांपूर्वीच्या डेट्रॉइट दंग्यांवर आधारित आहे. त्यातही तेव्हा तिथल्या अल्जिअर्स हॉटेलमध्ये घडलेल्या प्रसंगावर मुख्य फोकस आहे.
सिनेमा खूप हॉन्टिंग आहे. कारण मुळात तो प्रसंग खूप हॉन्टिंग होता.
विकीवर सगळी सविस्तर माहिती आहे. ती नंतर वाचून काढली. प्रत्यक्षात जे घडलं त्याच्याशी सिनेमा प्रामाणिक राहतो असं वाटलं.
`तलवार' सिनेमा पाहून झाल्यावर जे फीलिंग आलं होतं, तसंच फीलिंग आलं.
चुकवू नका हा सिनेमा...

काल कान्कण सिनेमा बघितला सोनी मराठीवर. छान, हदयस्पर्शी होता. जितेन्द्र जोशी, उर्मिला कानेटकर, गोपी झालेला मुलगा हयान्ची कामे मस्त झाली.

'बकेट लिस्ट' मुळीच आवडला नाही.

आज दोन चित्रपट पाहिले ....

स्पीलबर्गचा २००५ सालचा म्युनिच - कॉलेज नंतर बऱ्याच वर्षांनी तिसऱ्या वेळेस पहिला पण तीच उत्कंठा आजही जाणवली पाहताना .... मोसाद वरचे अजून काही चित्रपट आहेत तेही पाहिलं आता वेळ काढून ..

२०११ सालचा द इनटचेबल्स हा फ्रेंच सिनेमा दुसऱ्यांदा पाहिला ... माझ्या पाहण्यातील हा बहुतेक सर्वोत्कृष्ट फ्रेंच चित्रपट असेल ..

काल नचिकेत सामंत दिग्दर्शित गच्ची हा सिनेमा पाहिला ...खूप छान वाटला. अभय महाजनने नवीन असून छान काम केलंय. प्रिया बापट तर छानच.. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा आहे एकदा पहावं पहावाच असा..

Pages