चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Helicopter ela कसा आहे?
>> फार बोरींग आहे. काजोल ची पन्खा असल्या ने बघायला गेले पण खूप निराशा झाली.

पराग, 'रेकलेस' हे भूमिकेबद्दल आहे. पोटेंशियल हाच मुद्दा आहे. दृश्यममध्ये 'बघवली' नाही म्हणजे तिचं सौंदर्य बघवलं नाही असं नाही, तर तिची भूमिकाच बघवली नाही. त्यातही खूप पोटेंशियल होतं, पण दिग्दर्शकाने ते वापरून घेतलं नाही. माझ्या मते इतक्या शेड्ज असलेली भूमिका तब्बूला आजवर मिळालेली नाही. गंभीर, एकसुरी भूमिकाच तिच्या वाट्याला आल्या आहेत. अंधाधुनमधल्या सिमीमध्ये खूप कंगोरे आहेत जे आजवर दिसले नव्हते. मला. म्हणून श्रीराम राघवनचं कौतुक.

आता तू पोस्ट लिहिलीस म्हणजे ते 'तुझच' मत असणार ना..योग्य ते क्रेडीट न देता तू माझं किंवा तुमच्या शेजार्‍यांचं मत इथे येऊन लिहिणार नाहीस ह्याची खात्री आहे. Wink>> या खातरीबद्दल धन्यवाद. मला, माझं असं लिहायचा उद्देश की
१) तुझं मत वेगळं असू शकतं, जे आहेच, हे उघड आहे. आणि हेही उघड आहे की आपल्यात मतभेद आहेत, पण माझं मत ब्रह्मवाक्य आहे असा माझा दावा नाही. ईट्स अ‍ॅन ओपिनियन.
२) दुसरं असं, की माझं मत मी लिहिलेलं आहे, ते पुरेसं एस्टॅबलिश करायचा प्रयत्न केला आहे. ते पटलं असेल तर ठीक, नाही तर सोडून दे, पुढे जा.

तुला माझ्याकडून अपेक्षित काय आहे हेच कळलं नाही. मुळात माझी पोस्ट इतकी अचाट किंवा अतार्किक होती का की त्यातलं एकेक वाक्य शोधून त्यावर अर्काईव्ह होणा-या बाफवर इतकी चर्चा व्हावी? Uhoh असो.

आज शिवाजी पार्क पिच्चर पाहून आली..
अतिशय भंगार सिनेमा वाटला मला.. चांगल्या कलाकारांना घेऊन वाया घालवलय वाईटरित्या असं काहीस..

स्पॉयलर :
इतक्या ठिकाणी निराशा होते कि काय बोलावं.
१. मित्र मित्र म्हणवणार्‍या व्यक्तीची नात प्रसिद्ध मॉडेल आहे याची काहीच खबरबात नसणं. बर त्या मित्राचे त्याच्या पोरांशी झगडे झाले असेल हे समजू पण त्याला अतिप्रिय असलेल्या नातीबद्दल तो त्याच्या मित्रांना चकार शब्दानेही काही सांगू नये याच आश्चर्य वाटतं. अश्या मित्रांना जे याच्या दु:खामूळे पिऊन पिऊन स्वतःच्या घरच्यांशी भांडायला लागतात अन तिच्या खुन्याला मारायचं ठरवतात..

२. महत्वाचे प्लॅनिंग, एखाद्याला संपवायचे कुठे हे कुठे करायचे तर यातल्या दोन म्हातार्‍यांना पूर्ण्पणे सपोर्ट करणार्‍या दोन कुंटूंबाच्या प्रशस्त बंगल्यांना सोडून एखाद्या पार्कबाहेरच्या कॅफेटेरियामधे. वर फोन करताना तिथेच स्पिकरवर टाकून बोलणार..

३. तो निर्दोष असेल तर हि सर्वात महत्वाची बाब त्याला मारायला निघाल्यावर वाटेत लक्षात यावी म्हणजे काय?

४. प्रत्येकवेळी यांना हथकडी, ऑर्डर ऑर्डर करायला जजचा हथोडा, हथोडा मारायला बेस, लॅपटॉप वगैर घेऊन जायला कसकाय जमत. आणि एवढं सगळं करुन यातला मास्टरमाइंड आणि हुस्शार (हे त्यातल्या एकदम कर्तव्यदक्ष एसीपी असलेल्या पोलिसाचं म्हणनं आहे बर का) म्हणजे सस्पेंडेड इन्स्पेक्टर सावंत अर्फ अशोक सराफला खुन केल्याच्या जागी निदान खुनाच हत्यार म्हणजे ते सायनाईडचं इन्जेक्शन पोलीसांना ठळक उठुन दिसेल अशा जागी ठेवू नये, वा फिंगर प्रिंट्सची काळजी घ्यावी हे पण समजत नाही?

५. सुरु झालेल्या गोष्टीतला गुन्हेगार मेला तर आता त्यात सबप्लॉट काढणार. मग त्यात त्या त्यागराज खाडीलकर करतो तशी भंकस आणि बेसलेल्स रचना करुन रॅप टाकणार, त्यावर सारी ट्रेन यांच्यामागे नाचणार (एका दिलीप प्रभावळकरची प्रतिक्रिया तेवढी खरी होती) हे कशाला? बर हे काय कमी की आणखी एक लावणीसदृश्य बकवास गाणं टाकणार. अशक्य पिळवणूक चालते.

६. एका सुपरकॉपला परत मधे घुसवून यात आणखी गडवाभर पाणी ओतलय. वेळोवेळी टोमणे हाकणारी बायको जी नेहमी कॉपच्या विरोधात बोलणार? तो सुपरकॉपपन मग ते लोक खुप हुशारे पण मी दिडशाहाणा आहे असल्या अर्थाचे संवाद बोलणार. गुन्हेगारांना प़कडल्यावर प्रेस कॉन्फरंस मधे लॅपटॉप घेऊन त्यावर हरेक गुन्हेगाराचा फोटो आणि त्याखाली कॅप्स मधे असलेलं त्याच नाव या सार्‍यांचा स्लाईडशो तयार करुन मग एक एक नाव वाचुन दाखवणार. अटक केल्यावर लोकांच्या अन बायकोच्या प्रेशरपायी यांच्याच पद्धतीने एका गुन्हेगाराला मारुन 'अरे हे तर वेगळच काहीतरी होत' म्हणत परत सोडून देणार (हे सगळ फिंगरप्रीट्स मॅच झाल्यावर मग अटक करुन तुम्ही ते न्व्हते असं बोलुन बर) म्हणजे खतरनाकच..

तरी बरेच दिमाग खराब करणारे मुद्दे होते .. अटक झाली म्हणुन खुश होणारे घरचे सारे लोकं. नातू अभ्यास करत असताना, त्याच्यासमोर पिऊन घाण घाण शिव्या देणारा अन तरीही सहानुभूतीची अपेक्षा ठेवणारा म्हातारा, उगाच घुसाडलेली मिडीया पर्सन, जेवढी लोकं तेवढ्या हथकड्या, प्रत्येकवेळी विक्रम गोखलेने जजचा पोशाख करुन बसणं..अन बाकीचे फालतू वाद प्रतिवाद, गम्मत गम्मत असल्यासारखं एखाद्या पोलिस ऑफिसरचा मुडदा पाडणं, ३०शीतल्या वेगळाच चेहरा असलेल्या अशोक सराफच्या पात्राला ७०च्या अशोक सराफचा आवाज.. सतत हलणारा कॅमेरा, आऊट ऑफ फोकस असणारी मेन पात्रे, मिळेल त्या जागी खुनाची चर्चा करणारे म्हातारे, त्या सो कॉल्ड सुपरकॉपने बाइज्जत बरी केल्यावर कॅमेरासमोर उभं राहून आम्हीच खुन केला म्हणत कॉमन मॅन वगैरे शब्द टाकून बोद्धिक घेणारे लीड आणि असे अगणित..

या सर्व गदारोळात गांधीवादी असणारा दिलीप प्रभावळकर जेव्हा सुशांत शेलारला (हाताची एवढीशीही थरथर होऊ न देता) पाठीमागुन गोळी घालुन मारतो (अगदी चुकीचं वागत आहे म्हणुन मित्रांविरुद्ध पुरावे गोळा करणारा म्हातारा) तेवढं बघायला छान वाटत. हसु येतं पण सुशांत शेलार मेला म्हणुन आपलं छान वाटत.. (हे सर्व घडतं तेव्हा बाकी पात्र विलनचा मार खात असतात अन आपल्या चौकटच्या राजाची बंदूक शोधायची धडपड लय कॉमेडी दाखवली आहे.

असो.. या बघुन कुणाला बघायचा असल्यास..

रुद्रम्मादेवी नेटफ्लिक्स वर आहे. बाहुबलीच्या परंपरेतला. दोन प्रकारची करमणूक आहे. एक चांदोबा लव्हर्ससाठी.
आणि दुसरे सिनेमे वेगळ्या अर्थाने एंजॉय करणा-यांसाठी. दुस-या प्रकारातल्यांना चिरफाडीसाठी ब्येस्ट मटेरिअल आहे.
बाकी अनुष्का शेट्टी ला बघत राहण्याला पर्याय नाही !

धन्यवाद टीना. मी शिवाजी पार्क बघावा की बघू नये हे ठरत नव्हतं. मटामधला रिव्ह्यू अशा खुबीनं लिहिला आहे की तो वाचून सिनेमा पाहू का पाहू नको हे कळत नव्हतं, लोकसत्तामध्ये सरळ बंडल आहे असं लिहिलंय. पाच पाच भारी सिनियर लोकांकरता बघावा असं वाटत होतं, पण आता नाही बघणार, येईल काही महिन्यांनी टीव्हीवर तेव्हा पाहू.

पूनम, तब्बू रोल्स बद्दलचा तुझा प्रतिसाद आज वाचला.

तुला माझ्याकडून अपेक्षित काय आहे हेच कळलं नाही. >>>> अपेक्षित काहीच नाही! चित्रपटाच्या कथेबद्दल तू लिहिलस त्याबद्दल जस माझं वेगळं मत पडलं तसच तब्बूच्या रोलबद्दल. तब्बूच्या रोलबद्दल फॅक्चुअल डेटा उपलब्ध होता. तो मी द्यायचा प्रयत्न केला. तू पुढे प्रतिसाद दिल्यानंतरही डेटा आणि तुझी पहिली पोस्ट ह्याची संगती मला लागत नाहीये. पण तरीही माझी काहीच हरकत किंवा अपेक्षा नाहीये. Happy

त्यातलं एकेक वाक्य शोधून त्यावर अर्काईव्ह होणा-या बाफवर इतकी चर्चा व्हावी? >>>>> आँ ??? एक कुछ ते नक्की करो रे बाबा !! 'एखाद्या बाफाबद्दल तिथेच का लिहित नाही?? इतरत्र कशाला??' हा संकेत रद्द झाला की काय !!? कुठल्या शा.र.मध्ये ? कोण कोण उपस्थित होतं ? MoM सांगा Happy #पुपुसंकेत #विआरडिफरंट! #जिधरकीचर्चाउधरचकरो! Light 1

ऑन ए सिरीयस नोट, माझ्या दोन्ही पोस्टी ह्या विषयासंबंधी होत्या. त्यातली प्रत्येक कमेंट ही केवळ तब्बू आणि तिचे चित्रपट ह्याबद्दलच होती. काहीही वैयक्तिक किंवा विषय सोडून नव्हतं. मतं दरवेळी पटलीच पाहिजेत असं अजिबात नाही. मी तुला पिंग करुन चर्चा करू शकलो असतो पण मला अंदाधुनबद्दल लिहायचच होतं म्हणून इथेच लिहीलं. उलट मलाच कळय नाहीये की नक्की काय झालं!! पण मी पुढच्यावेळी लक्षात ठेवीन आणि आपण ऑफलाईन चर्चा करू.
चिल माडी. तब्बू करो काय करायचं ते. मुव्हींग ऑन. Happy

"बधाई हो" पाहिला . ट्रेलर मध्ये आहे तेवधाच विनोदी भाग वाटला . बाकी बहुतेक चित्रपट "फमिली ड्रामा" मध्ये मोडतो .
पण काम मात्र सर्वाची झकास झाली आहेत .
त्यांच घर , दिल्लीच्या गल्ल्या , नकुल च ऑफिस , मेरठ मधलं लग्न .. एकदम छान वाटत.
आयुश्यमान खुरानाचा चेहराच फार बोलका वाटतो . सान्या मल्होत्रा , एलिट गर्ल वाटतेच.
वडिलांचे काम केलेला अभिनेता भन्नाट आहे . काही सीन्स मध्ये त्याचे एक्स्प्रेशन केवळ अप्रतिम .
नीना गुप्ता , सुरेखा सिक्री उत्तम.
फक्त भाषेची गडबड वाटते .. कधी दिल्लीची , कधी युपीची , कधी हरीयानवी , कधी कच्च्छी .. काय कळत नाही.
दिल्लीवाली हाय प्रोफाईल मुलगी बोलताना " तु ऐसे नही कर सकता" बोलते ते खटकते. ती नक्कीच तू च्या ऐवजी तुम म्हणेल असं वाटतं

सध्या कुठला चांगला सिनेमा आला नसल्याने वाईट / फ्लॉप सिनेमांमध्ये छापा काटा करून बाझारला गेलो.
काहीच अपेक्षा नव्हती पण ठीक वाटला. कथा वेगवान. उगीच लव्हस्टोरी मोठी करून मेन गोष्ट बाजूला टाकली नाहीये.
शेवटची 10 मिनिटे टिपिकल बॉलीवूड सिन आहेतच. पण ते तर 'दिल धडकने दो' मध्ये पण होते. हा सिनेमा अगदी फ्लॉप व्हायला नको होता. नवीन हिरो - रोहन मेहराने काम चांगलं केलं आहे. राधिका आपटे मला जरा उग्र वाटते. बाकी सैफच्या एन्ट्रीला थेटरात टाळ्या आणि शिट्ट्या बघून आश्चर्य वाटले. त्याचे लुक्स भारी. एकदम एम्प्रेसीव वाटतो.
पैसे वाया घालवले असे फिलिंग आले नाही.

स्पॉयलर -
लूपहोल्स बरेच आहेत. पण मुळात एका हुशार माणसाला दुश्मनी नसताना शकुन का अडकवतो? त्याच्याशी मैत्री ठेवून त्याच्या बुद्धिमत्तेचा, लॉजीकचा फायदा करून घेता आला असता ना? अगदी अडकवायचंच होतं तर दुसऱ्या मूर्ख माणसाला फसवता आलं असतं.

बाकी सैफच्या एन्ट्रीला थेटरात टाळ्या आणि शिट्ट्या बघून आश्चर्य वाटले. >>>> 'रेस' मध्ये सुद्दा तो असाच भारी दिसला होता.

नवीन हिरो - रोहन मेहराने काम चांगलं केलं आहे. >>>>> विनोद मेहराचा मुलगा आहे तो.

तुंबाड पाहिला एकदाचा. प्रचंड आवडला.
बरेच दिवसांनी एखादा चित्रपट संपल्यावरही मनात दबा धरून बसला होता.
कोणीतरी लिहीलय अगोदर तेच गानूआजीची अंगाई आठवली.

तुंबाड पाहिला एकदाचा. प्रचंड आवडला.
बरेच दिवसांनी एखादा चित्रपट संपल्यावरही मनात दबा धरून बसला होता. + ११११११

बरेच दिवसांनी रात्री डोळे मिटायची भिती वाटली Lol
पटकन डोळे उघडून भिंती पाहिल्या. मग पांघरुण घेवून कटाक्षाने तुंबाडचा विचार न करण्याचा प्रयत्न करत झोपले. Happy

खूप छान सिनेमा, परत बघणार

नाळ बद्दल मित्रांनी कौतुक केले आहे. पहायचाय.
दिग्दर्शक सुधाकर रेड्डी आहे. मात्र सिनेमा प्रमोट करताना नागराज मंजुळेला पुढे केले जात आहे. त्यामुळे सिनेमाची नाळ नागराजशी जुळेल असा हिशेब या पाठीमागे असेल का ? त्यामुळे नव्या दिग्दर्शकावर अन्याय होणार नाही का ? कारण पाहणारा सैराट च्या अपेक्षा ठेवून जाईल.

Pages