माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरला दलाल ते संजीव कपूर.. सगळे सांगत असले तरी कूकर मधे कधीही बेक करू नका. कूकरची बॉडी त्या
तपमानासाठी बनवलेली नसते. तसे करून कूकर बिघडल्यास तो दुरुस्त होणार नाही.

जून्या पद्धतीप्रमाणे रेती, दोन तवे वगैरे वापरून बघा हवे तर.

अवनशिवाय गॅसवर करण्यासाठी पण मधून पोकळ नळी असणारी भांडी मिळतात.

आम्ही कुकर केक मिक्स चा बनवतो तो ढोकळा करतात तसं कुकर मध्ये पाणी ठेवून वाफ यायला लागल्यावर त्यात केक चं बॅटर ठेवतो आणि झाकण शिटी न लावता लावून १० मिन शिजवतो.चांगला होतो केक.
कधी कोरड्या पाणी नसलेल्या कुकर मध्ये करुन नाही पाहिला.

कुकरमध्ये केक बेक करायचा असेल तर रिंगही कढावी लागेल.
मायक्रोवेव्ह प्रिहिट करायला त्यात कन्व्हेक्शनचा फंक्शन हवं.

बेबे कुकर प्रिहिट करताना शिट्टी काढली होती त्यामुळे झाकण झटकन निघालं. यु ट्युब वर तसंच सांगितलं होतं.

माझ्याकडे कन्व्हेक्शन मोड असलेला ओव्हनच आहे. मि नेक्स्ट टाईम त्यातच करून पाहीन.
माझा कुकर पण फ्युचुराचा आहे. मी पहिल्यांदाच केकसाठी वापरला. आता नाही वापरणार. नेक्स्ट प्रयोग ओव्हन मध्ये.

हो ते सांगायचे राहिलेच, कन्व्हेन्शन मोड नसेल, तर मायक्रोवेव्ह कधीही रिकामा चालू करु नका. तो टेस्ट करतानाही त्यात कपभर पाणी ठेवूनच तो चालू करुन पहा.

मावेमध्ये कन्व्हेक्शन सेटिंगचं बटण दाबलं की लगेचच टेम्परेचर सेट करायचं असतं. ते १८० वर प्रीसेट असतं. + किंवा - दाबून ते कमी जास्त केलं की आपोआप मावे प्रीहीट व्हायला लागतो. आपल्याला काहीच करावं लागत नाही. २०-२२ मिनिटं नाही लागत. टेम्पनुसार ५-७ मिनिटं लागतात. याची व्यवस्थित माहिती मावे बरोबर आलेल्या पुस्तकात असते. ती नीट वाचावी. त्यात अनेकदा फोटोही असतात. त्यामुळे चुकायचा चान्स नसतो.

कुकरमधे रिंग, शिट्टी काढून खाली मिठाचा जाड थर देऊन ३-४ वेळा केला होता. छान झाला. हल्ली निरलेप कढईत खाली तवा ठेवून मंदाग्नीवर करते. तेच ते रव्याचे मिशर्ण. तोही चान्गला फुलतो.
दक्षे, बेपा विसरलेलीस का?

मंजू वेळ मिळाला की यु ट्युबची लिंक शोधून देईन तुला इथे किंवा विपुत

दिनेश - कन्व्हेक्षन असेल तर नुसता का नाही सुरू करायचा? Uhoh
प्रिहिट करताना तर नुसताच ऑन ठेवावा लागणार ना?

दक्षे, कन्वेक्शन मोडवर मावे रिकामा ठेवून प्रिहिट करता येतो, पण मायक्रो मोडवर मावे रिकामा ठेवून चालू करायचा नाही असं म्हणत आहेत दिनेशदा.

मायक्रो वेव्ह कूकिंग मधे पदार्थाचे रेणू एकमेकावर घासल्याने उष्णता निर्माण होते. आत मधे पाण्याचा अंश नसलेला पदार्थच नसेल तर त्या लहरी काम करणार नाहीत ( नुसत्या आपटत राहतील ) कन्वेशन अवन मधे हवा ( आणि बाजूच्या भिंती ) गरम होतात. त्यामूळे तसेच अवन रिकामे गरम करता येतात.

दक्षिणा जुन्या माबोवर लिहीले आहेव बघ कुकर केक बद्दल.

Karadkar
Thursday, October 21, 2004 - 3:02 pm: Edit Post Delete Post Print Post Link to this message

केक चे मिश्रण तेल लावलेल्या कुकरच्या भंड्यात घालावे.
कुकर जर बाहेरच्या झाकणाचा असेल तर रिन्ग काढुन झाकण लावले तरी चालते पण जर आतल्या झाकणाचा असेल तर कुकरचे झाकण वपरु नये त्याचा valve उडतो. ( अनुभवाचे बोल ) तसल्या कुकरला साधे ताट झाकावे.
केक चे मिश्रण बनवत असताना कुकरमधे साध्या brown paper चे २ layer घालुन मंद गॅसवर तापत ठेवावा. नंतर भांड्याला तेल तुप लावुन त्यात मिश्रण ओतुन वरुन थोडा दुधाचा हात फ़िरवावा -- साधारण १ ते २ छोटे चमचे दुध लागते. भान्डे गरम कुकर मधे ठेवुन लगेच झाकण ठेवावे. गॅस मोथा करावा. साधार्ण १०-१२ मि. मधे मिश्रण वर येवु लागते. तेव्हा गॅस बारिक ते मिडियम करावा. पुढे जरा लक्ष ठेवुन कदेने तांबुस झाल्यावर गॅस बंद करावा. सधारण ३० ते ३५ मि. लागतात केक पुर्ण होण्यासथी.

hope this helps

Punyanagarikar
Wednesday, October 05, 2005 - 4:06 pm: Edit Post Delete Post Print Post Link to this message

बरेच जणं कुकर केक करायला वापरतात, कारण पुश्कळ वेळा दुसरं जाड बूडाचं aluminium च भांड नसतं. कुकर च्या जाडी मुळे heat evenly पसरते, आणि temperature maintain होतं.
ओव्हन शिवाय केक करायचा तर double acting baking soda वापरावा. single acting नको. केक ला वरून आणि खालून दोन्ही कडुन heat लागते, नाहितर वर प्राजक्ता ने म्हटल्या प्रमाणे केक खालुन लागतो आणि वरून कच्चा रहातो. त्या साठी लोखंडी तवा लाल होई पर्यंत गरम करावा. रेती aluminium च्या भांड्यात गरम झाली की मग त्यात केक च भांड ठेवावं केक चं भांड पण aluminium चच असावं. वरून गरम लोखंडी तवा ठेवावा. केक च भांड संपूर्णं पणे बंद झालं पाहिजे, वाफ़ अजिबात निसटता कामा नये. निखारे करता आले ( grill मध्ये करता येतात) तर अतीउत्तम, ते लोखंडी तव्यावर १५ मिनिटांनी टाकावे.
निदान तास भर तरी केक उघडुन बघायचा मोहं टाळावा Happy
ह्या पद्धतीने २ वाटी पिठाचा केक व्हायला जवळ जवळ २ तास लागतात.

लिंक देणार होते, पण काही वेळेस ते जुने फाँट मधले लिखाण अजीबात कळत नाही म्हणून दिली नाही.

माझ पूरणपोळी करताना काहीतरी चुकत. पूरण मऊ होत. पोळ्याही लाट्ताना फूटत नाहीत. पण खाताना मात्र पोळी वेगळी आणि पुरण वेगळ होत.
असा का होत? कणीक गव्हाची/गहू+मैन्दाची घेउन बघितली. पण Sad

मी मायबोलीवरच्या एका धाग्यावर दिलेल्या प्रमाणात आंबोळीचे पीठ दळून आणले. आंबोळ्या करताना त्या नानस्टिक तव्यावर चिकटून बसतात..खरडून काढावं लागतं.. माझं काय चुकलं असेल? प्रतिसादाची अपेक्षा आहे....

तव्याला पहिल्या आंबोळीच्या आधी थोडेसे तेल लावून नीट पसरुन घ्यावे. ( आजी तेलाचा वास पुसून घ्यावा म्हणत असे) घालताना तवा नीट तापलेला असावा. पीठ नीट पसरून झाल्यावर कडे कडेने थोडे तेल घालावे. आजी म्हणत असे की एवढे झाल्यावर दारापुढल्या तुळशीला नमस्कार करुन यावे. साधारण तेवढा वेळ वाट पहावी हा उद्देश. आच इतकी प्रखर नसावी की २०-२५ सेकंदात आंबोळ्या करपतील.

काही ठिकाणी झाकण पण ठेवतात तव्यावर. पण मला ते आवडत नाही.

मेधा ... प्रतिसाद दिला त्यासाठी आभार... हे मी पुन्हाएकदा​ करून पाहिन... कारण मी असंच करते...मला अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे मी चकली साठी वापरतात तसा जाड तांदूळ वापरला होता.. त्यामुळे काही फरक पडत असेल का?

मी चकली साठी वापरतात तसा जाड तांदूळ वापरला होता.. त्यामुळे काही फरक पडत असेल का?>>>>>>>> नाही पडत.मेधांनी सांगित्लेले करुन पहा.दुसरे म्हणजे पीठ रवाळ आहे का?त्याने कदाचित होत असावे.अशावेळी तवा चांगला तापलेला हवा आणि आच मध्यम हवी.

पहिले धिरडे तव्याला मेधाने साम्गितल्याप्रमाने तव्याला तेल लावून (हे कांद्याने अर्ध्या कापलेया करता येइल) छोटेच टाकावे. धिरडे टाकल्यावर बाजून तेल सोडून आच कमी करावी तापलेल्या तव्याची. झाकण ठेवावे अन चुर्र आवाज यायला लागला की झाकण काढून अलगद सोडवावे. एकदा तवा सेट झाला की चांगली होतील धिरडी.

आंबोळी चिटकण्याचे कारण - १ पीठ बारीक दळलेल आहे का बघा
२ आच बारीक करून झाकून ठेवणे त्यामुळे कोणतीही धिरडी / त्यासारखे पदार्थ खालून सुटण्याचे chances वाढतात
२. पीठ भिजवून ठेवण्याचा वेळ adjust करा

माझ्या मते कळीचा मुद्दा तवा आहे . तवा जर चांगला सिझन झालेला असेल तर त्यावर काही हि कसं ही घातलं तरी चिकटत नाही आणि जाळी हि सुंदर पडते .
माझ्याकडे बिडाचा तवा आहे जो मी फक्त घावन, डोसे, उत्तप्पे, आंबोळ्या असं करायलाच वापरते . काम झालं की साबणाचा हात लावून स्वतः धुवून टाकते , जास्त घासत नाही .

मनीमोहोर आणि इतर जे डोसे, अंबोळी उत्तप्पे करू शकतात अशांना माझा सादर प्रणाम आहे __/\__
कारण मला काही केल्या जमत नाहीत.

दक्षुतै, आपले तवे चुकत असावेत बहुदा गं.... मी जेंव्हा जेंव्हा साऊथ इंडियन वाल्यांसोबत डोसे बनवलेत ते ऑसम झालेत, त्यांच्या शिवाय बनलेला प्रत्येक डोसा फेकुन द्यायच्या योग्यतेचा होता Uhoh

आंबोळी करताना रवाळ पीठ इतपतच पातळ हवे की तव्यावर मधोमध घातले की आपोआप गोलाकार पसरेल. दोन पळ्या पीठ तवाभर गोलाकार पसरते, वाटीने पसरवावे लागत नाही. तवा छान तापलेला तवा हवा. पीठ टाकल्याबरोबर चुर्र असा आवाज आला पाहीजे. खालून लगेच जाळी पडायला सुरवात होतेच. झाकण देखील ठेवावे लागत नाही. बीडाचा तवा छान सिझन केलेला हवा. आई बीडाच्या तव्याला नारळाच्या शेंडीने तेल लावायची. इथे नारळ बिन शेंडीचे आणि कांदा देखील फार महाग त्यामुळे मी पेपर नॅपकिन वापरते. नॉन स्टीक/ हार्ड अ‍ॅनोडाईझ्ड तवा वापरला तरी सुरवातीला थोडे तेल घालून पेपर नॅपकिनने तव्याला सगळीकडे पुसून घ्यावे.

Pages