चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनमर्जिया ट्रेलर बघितला. विकी कौशल आवडतो, पण सिनेमा बघेन की नाही माहिती नाही.
विकी कौशलने भारंभार सिनेमे करू नयेत असं समहाऊ ट्रेलर बघताना वाटलं.

सुई-धागा ट्रेलर आवडला. सिनेमा चांगला असावा अशी आशा करायला हरकत नाही. वरूण धवनला चांगल्या भूमिका मिळायला हव्यात.

मन्टो या सिनेमाचा ट्रेलर पाहून उत्सुकता वाटू लागली आहे. नंदिनी दास निर्माती दिग्दर्शक आहे. पिरीयड फिल्म साठी आवश्यक वातावरणनिर्मिती उत्तम असल्याचे जाणवले. नवाजुद्दीनचे जे काही दोन चार सीन्स आहेत त्यात त्याने संयमी भूमिका केल्याचे दिसते. दंगलीची पार्श्वभूमी वगैरे ट्रेलरमधे पण अंगावर येणारी.
एकंदरीतच मन्टोची ओळख करून घ्यायला हा सिनेमा न्याय देईल असे वाटले ट्रेलरवरून.

माफ करा. नंदिनी दास नव्हे नंदीता दास. ती निर्माती नाही. फक्त दिग्दर्शक आहे. निर्माते बक्कळ आहेत.

स्त्री - कॉमेडी हॉरर पिक्चर आवडतात। राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर कॉम्बि छान दिसते।
एक राधा एक मीरा - गश्मीर, मृन्मयी आणि सुरभी गोखले। तिघेही फ्रेश दिसलेत। स्टोरी काय असेल कळत नाही प्रोमो वरून।

शुभलग्न सावधान - हा सिनेमा माझ्या काही शाळूसोबत्यांनी मिळून produce केला आहे.

'बोगदा' - मराठी सिनेमा. ट्रेलर फसलेला वाटला!

मन्टो या सिनेमाचा ट्रेलर पाहून उत्सुकता वाटू लागली आहे>>> नवाज कमाल करनार आहे ह्या चित्रपटात.

chitti is back. थलैवा रजनीकांतच्या २.० चित्रपटाचा टीजर आज रीलिज झाला. चिट्टीच्या करामती पुन्हा पहायला मिळणार.

Pages