चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रीचा टिझर येऊन भरपूर दिवस झाले कऊ..
मागेपन थोडी चर्चा झाली होती यावर.. बंगलोर मधल्या एका गावामधे घडणारी घटना होती ती..
पण टिझर मधे Based on a ridiculously true phenomenon अस का लिहिलय? कॉमेडी आहे वा मजाक उडवला आहे लोकांच्या दहशतीचा कि काय असं वाटतय.. मी भयपटाची चाहती तसेच राजकुमार रावची फॅन असल्यामुळे बघेल हा चित्रपट.. तरी ट्रेलरची वाट पाहतेय.. आवडला तर जाईल नक्की..

https://www.youtube.com/watch?v=jLo7cUEyjWY
टीने , घे तुझ्यासाठी आला ट्रेलर .

हॉरर कॉमेडी दिसतोय . रा.रा आणि पंकज त्रीपाठी .. कल्ल्ला करणार बहुतेक Happy

थँक्यु स्वस्ति..
चला डिस्क्रिप्शन वरुन आलेला अंदाज बरोबर निघाला तर..
पंकज त्रिपाठी म्हणजे डबल धमाका.. जोडीला दंगल मधला त्यांचा भाऊपन दिसतोय. मस्त आहे तोपन..
श्रद्धा कपूर अज्याबात आवडत नाही.. आणि ते गाणं कशाला घुसवल मधे काय माहित..

सविता दामोदर परांजपे चा ट्रेलर बघा, चांगला आहे
(मला हे सरोगसी विषयक विषयावर एका अविवाहीत बाईची फसवणूक असं वाटत होतं, मग यात हॉरर का आलं असं वाटलं, मग ते मी विचार करतेय ते नाटक कुसुम मनोहर लेले आहे असं आठवलं.)
ती तोरडमल ही मधुकर तोरडमल यांची मुलगी आहे का? दिसायला आणि अभिनयाला चांगली वाटते.

सविता दामोदर परांजपे >> नाटक होतं सत्यकथेवर. कुसुम मनोहर लेले पण नाटक होतं. सविता दामोदर परांजपे ही परांजपेंची सून असते. तिला रँग्लर जीन्सच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून घेतात मग तिला रँग्लर परांजपे म्हणून ओळखू लागतात अशी स्टोरी आहे.

https://www.youtube.com/watch?v=1MjC30zo1KA
Mulk - Official Trailer | Rishi Kapoor & Taapsee Pannu | Anubhav Sinha | 3rd Aug 2018

आज पाहिला ट्रेलर
ईंटरेस्टींग वाटतोय
रिशी कपूर तर दिवसेंदिवस भारी होतोय

सविता दामोदर परांजपे :

https://www.youtube.com/watch?v=T_ZZY8CAiiA

ती तोरडमल ही मधुकर तोरडमल यांची मुलगी आहे का? >>>> हो >>>>> तृप्ती तोरडमल. ट्रेलर बघताना हिला आधी कुठेतरी पाहिलय अस वाटत होत. पण कुठे ते आठवत नव्हत. मग टयूब पेटली की, अरे हि तर केकता कपूरच्या 'कलश' सिरियलमध्ये होती. तिच्या आत्ताच्या interviews मध्ये तिने हया सिरियलचा कुठेच उल्लेख केला नाही. Uhoh

हो कलश मध्ये मला आवडायची तृप्ती. केस फार छान होते तिचे. तिच्यासाठी काही भाग बघितलेले, बाकी काही आठवत नाही. फक्त ती आठवतेय.

मी शाळेत असताना सविता दामोदर परांजपे नाटक फार गाजलेलं. रीमा लागू होती. राजन ताम्हाणे, शेखर ताम्हाणे यांनी केलेलं. वेगळा विषय आहे, horror. बघितलं नव्हतं पण स्टोरी वाचलेली.

भूत असताना आपल्या कोमल स्त्री पर्सनॅलिटी ला विसंगत असा थोडा राठ आणि भयाकारी आवाज काढण्याची पद्धत गहराई सिनेमा पासून अस्तित्वात आहे.एखादा फॉर्म्युला सुपरहिट झाला की तो पुढे वापरला जातोच.
व्हाम्पायर ही अशीच अनेक वर्षांपासून राबवलेली कल्पना.

स्पॉयलर चालेल, कोणीतरी मला विपु किंवा व्यनि मध्ये ही स्टोरी भुभु पेक्षा वेगळी कुठे आहे हे सांगा ना. शेवट सांगितला तरी चालेल.
हा पिक्चर मी एकटी जाऊन बघणार आहे. नवरा नामक प्राणी 'ती फारच काकूबाई दिसते साड्यात' म्हणाला त्यामुळे तो कट. मुलगी आधीच कट.
अर्थात ती भुभु अगदी आवडीने बघते त्यामुळे हा सौम्य असेल तर दाखवता येईल.

सविता दामोदर परांजपे नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांनी लिहिलेला लेख. यात ज्या सत्यघटनेवरून नाटक लिहीलं ती दिली आहे
https://www.loksatta.com/ti-ani-me-news/shekhar-tamhane-article-on-savit...

अभिषेक बच्चन किती दिवसांनी Blush
पण तनु वेड्ज मनु सारखाच दिसतोय हा मनमर्झियां. सगळ्या कथा लग्न करू का नको आणि कोणाशी करू याच्याच आसपास फिरतात का आनंद रायच्या? Uhoh

'लवरात्री'चाही ट्रेलर पाहिला. आपल्या खिशात कधीकधी खूप पैसे असतात, त्यातले सुट्टे पैसे कधीतरी बाहेर पडतात, मग ते आपण घरातल्या लहान मुलाला- घे तुला बक्षिस- म्हणून देतो ना, तसा वाटला ट्रेलर. हा मूव्ही फार चालावा अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण नवरात्रीची दोन गाणी आणि नवीन स्टेप्स असतील त्या बेसिसवर तेवढ्यापुरता चालून जाईल. बहिणीच्या नवर्‍याला लॉन्च केलं म्हणून त्याला बक्षिस दिल्याचंही समाधान मिळेल सलमानला. खिशाला जास्त चाटही नाही बसणार, असा एकूण मामला!

नवीन जेम्स बॉण्ड

इतके दिवस जो रूमर होता तो खरा ठरण्याची चिन्ह आहेत कारण आज , इडरीस अल्बा ने " My name is Alba, Idris Alba" असे ट्विट केले आहे. मस्त बातमी .

" Vada Chennai " चा ट्रेलर आलाय .ह्या चित्रपटापासून फार अपेक्षा आहेत. वेंट्रीमारनं ह्या गुणी दिग्दर्शकाचा हा आगामी सिनेमा .

Pages