चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायोच्या भावनांशी आणि सस्मितच्या मताशी सहमत.

एखाद्यावर बायोपिक बनवताना, ते देखील फिल्म ईंडस्ट्रीमधीलच एका बड्या हस्तीवर बायोपिक बनवताना उदात्तीकरण न होण्याचे चान्सेस किती आहेत?
माझ्यामते शून्य !
तो माणूस चांगला होता, आहे. पण नादान वयात व्यसनाच्या आहारी जात केलेल्या एका छोट्या (!) चुकीमुळे दुर्दैवाने आयुष्यभरासाठी मोठा गुन्हेगार ठरला. असेच चित्र त्यात रंगवले जाणार. म्हणजे उदात्तीकरण नाही तरी त्याच्या गुन्ह्याचे स्वरुप सौम्य करत त्याच्या ईतर चांगल्या गुणांकडे लक्ष वेधले जाणार.
अर्थात, प्रत्यक्षात हेच सत्यही असू शकते. मी त्या माणसाला वैयक्तिकरीत्या ओळखत नसल्याने काय खरे काय खोटे कल्पना नाही. बायोपिक निघाल्यास त्यावर चर्चा होऊन खरे खोटे पैलू जगासमोर येतील. तो चर्चेचा धागा मीच काढेन याबाबत निर्धास्त राहा Happy

सस्मित, उदात्तीकरण करु नये हे पटलं. मी ते बायोपिक पोस्ट लिहिल्यावर मला लक्षात आलं की रामन राघव किंवा बर्‍याच गुन्हेगारी जगाशी रिलेटेड लोकांवर पिक्चर आले आहेत. त्यात चूक काहीच नाही. पण त्याला कुठेतरी संत महात्मा म्हणून दाखवायचे प्रयत्न होतीलच आणि त्याचं फॅमिली लाईफ दाखवून सिंपथी मिळवायचेही.

सायो आणि ऋ ने लिहीले आहे त्याला सहमती...

हा बाकी काही इमेज बिल्डिंगचा पीआर गिरीचा नमुना आहे..... मुन्नाभाईची इमेज पद्धतीशीर उभी करण्यात आली. गुंड असला तरी मनाने भाबडा वगैरे

सलमान खानचेही तेच - जसा सलमान खान प्रत्यक्षात कसाही असला तरी पडद्यावर मात्र तो कडवा देशभक्त, आता तर काय लहान मुलांचे दुख समजावून घेणारा
चुकूनही त्याच्या पडद्यावरच्या इमेजमध्ये ग्रे शेड दिसणार नाही

बरोबर आशुचँप. खरंतर ह्या लोकांच्या पिक्चरवर सामुहिक बहिष्कार टाकायला हवा पण ते काही शक्य दिसत नाही.

बरोबर आशुचँप. खरंतर ह्या लोकांच्या पिक्चरवर सामुहिक बहिष्कार टाकायला हवा पण ते काही शक्य दिसत नाही.
>>> मी टाकलाय माझ्यापुरता.

त्याला कुठेतरी संत महात्मा म्हणून दाखवायचे प्रयत्न होतीलच आणि त्याचं फॅमिली लाईफ दाखवून सिंपथी मिळवायचेही>>>> हो हे बरोबर आहे.

बाकी ओके पण
>>>>हा बाकी काही इमेज बिल्डिंगचा पीआर गिरीचा नमुना आहे..... मुन्नाभाईची इमेज पद्धतीशीर उभी करण्यात आली. गुंड असला तरी मनाने भाबडा वगैरे>>
हे मात्र ठरवुन नाही झालं असावं .. कारण हा सिनेमा आधी कोणाकोणाला ऑफर झाला होता.. शाहरुखला पण . त्याने नकारला होता हे त्याने कधितरी . कुठल्या शो वर सांगितले होते..
संजय दत्त वर काही प्रेम बिम नाही .. आपलं लक्शात आलं म्हणुन लिहिलं
बाकी उदत्तीकरण नकोच..
मी सलमान चे सिनेमे बघत नाही.. एकतर सिनेमा बंडल आणि माझा वैयक्तिक बहिश्कार..
ज्या वेळी आपण त्याला हम साथ साथ मधल्या इतक्या सोज्वळ .. लोकांच दु:ख बघुन रडणारा.. पैसे देउन बागड्या विकणर्या बाईची पुर्ण टोपली खरेदी करणारा अशा भुमिकेत बघत होतो तेव्हा तो तिकडे हरिणं मारत फिरत होता...
आता तर इकडे तिकडे अवॉर्ड इंटर्व्हिउ.. ला बोलताना दिसतो तर ठार वेडा वाटतो ..

कारण हा सिनेमा आधी कोणाकोणाला ऑफर झाला होता.. शाहरुखला पण . त्याने नकारला होता हे त्याने कधितरी . कुठल्या शो वर सांगितले होते..
>>>>>>>
हो हे खरे आहे.

बाकी सलमानबाबत त्याचे उदात्तीकरण ऑफस्क्रीनही चालते. दानशूर कर्णाची इमेज. मात्र जेव्हा तोंड उघडतो तेव्हा आणि इंटरव्यू शोजमध्ये दिसतो तेव्हा त्याची सो कॉल्ड डाऊन टू अर्थ इमेज उघडी पडते.
गंमत म्हणजे काही कट्टर संघटना ज्या शाहरूख आणि आमीरच्या मागे हात धुवून असतात, त्यांना आपल्या सोयीने प्रश्न विचारत त्या उत्तरातील शब्दांचा आपल्या सोयीने अर्थ काढत जे यांचे दुकान चालते तिथे सलमान हा गिर्हाईक कधीच नसतो. म्हणजे त्याने बॉम्बस्फोट आरोपी मेनन बंधूंबद्दल दाखवलेली सहानुभुती आणि इतरही कैक उधळलेली मुक्ताफळे कधीच इश्यू केली जात नाहीत. म्हणजे काही पेट्या ईथेही नियमित पोहोचत असाव्यात Happy

मला सलमानबाबत फार काही आकस नाहीये, अशी कित्येक माणसे आहेत या देशात, तसेच त्याचे चित्रपट तसेही आवडत नसल्याने त्याच्याबद्दल प्रेमही नाहीये. त्यामुळे त्याच्या चित्रपटांना बघावे एके बहिष्कार टाकावे हा प्रश्न तसाही बादच होतो. माझ्या जास्त डोक्यात जातात ते या सर्वाचा फायदा उचलत आपली पोळी भाजून घेणारे राजकीय, अराजकीय संघटना.. आणि मुर्खासारखे फसणारी लोकं

असो, फारच अवांतर व्हावे, तसेच विषयात नावीन्य नसल्याने लगेच वेगळ धागा काढण्यातही अर्थ नाही..

अरे किती विचार करतात लोक. Uhoh
पिच्चर आला तर बघावा किंवा बघु नये.
अमक्याचा बघावा किंवा तमक्यावर बहिष्कार टाकावा. अपणी मर्जी.
आवडला तर आवडला म्हणावं नैतर भिक्कार म्हणून शिव्या घालाव्यात.
सलमान चा सुलतान, बजरंगी किंवा ट्यूबलाईट असो नैतर शाखाचा चेनै एक्ष्प्रेस, हॅन्युई असो.
रण्वीरचा बाजीमस्तानी असो किंवा येणारा पद्मावती असो.
तेणु प्रसनली की फर्क पैण्दा?

अमक्याचा बघावा किंवा तमक्यावर बहिष्कार टाकावा. अपणी मर्जी.>>>>>>>>>
तेच अपणी मर्जी..
बहिष्कार म्हणजे अगदी बोर्ड लाउन नाही बसत.. बघतच नाही..
वैयक्तिक बहिष्कार म्हंट्लच आहे.. बाकी घरातल्यांची अपनी मर्जी
तसेही सगळे आले गेले मुव्ही आपण बघत नाही..
त्यात आवर्जुन काही बघण्या सारखे .. ओढ लावण्या सारखे काही नसल्याने सहज टाळता येण्यासारखं

सलमान कसा आहे ते माहीत नाही...

पण काही फॅन्स बघितले की किळस वाटते..

तेरे नाम स्टाईल करून, शर्टाची दोन बटणे कधी कधी अख्ख्या शर्टाची बटणे सोडून छातीच्या बरगड्या दाखवत गुटखा खाऊन "सलमान परदयावर पादला तरी"

"वा भाई क्या पादे हो.. ." अशी बोंबलत सलमानची लाल करणारे पाहीलं की, डोक फिरत...

परी चे ट्रेलर्स आणि टीझर्स बघितले का ?
नुसते फोटोच बघून घबरायला होतयं , म्हनून हिम्मत नाही केली Sad

ख्रिस्ती भूताचा दिसतोय..
अनुष्का हडळ असेल तर घाबरणे अवघड आहे..
बिच्चारा कोहली, घाबरला तरी पुर्ण बघावा लागणार..

https://www.youtube.com/watch?v=qrks9Zu0f1w
102 Not Out | Official Trailer | Amitabh Bachchan | Rishi Kapoor | Umesh Shukla | In Cinemas May 4th

अमिताभ १०२
त्याचा पोरगा रिशी पकूर ७५ ..
स्टोरी लाईन तरी ईंटरेस्टींग वाटत आहे.. रिशी कपूर सुद्धा सेकंड इनिंग मध्ये दमदार अभिनय करत असल्याने उत्सुकता आहे

न्यूडचा ट्रेलर फार म्हणजे फारच आवडला. चित्रपट भारीच असणार याची खात्री पटली. शेवटचा डायलॉग(आक्काचा) मस्त.
ट्रेलर कसा असावा याचं उदाहरण म्हणून सांगता यावं इतका छान.
बकेट लिस्त बकवास ट्रेलर. प्रिटेन्शियस वाटला प्रकार फार.

अमिताभ आजिबात म्हणजे आजिबात १०२ वर्षांचा दिसत नाही. १०० वर्षांच्या पुढील माणसाच्या हालचालीत मंदपणा आलेला असतो. कितीही उत्साहाने फसफसत असला तरीही इतक्या भराभरा हालचाली अन बोलणं शक्यच नसतं. अमिताभला हे बारकावे जमले नसतील तर त्याच्या अनुभवाचा काय फायदा म्हणे!

ब्लॅकमेलमध्ये त्या अनुजाचा(मराठी मालिकेत असायची) रोल भारी वाटतोय. मोठा चान्स आहे तिच्यासाठी.
सिनेमा नक्की बघणार. फन असेलसे वाटते.

बकेट लिस्ट.. बेकार ट्रेलर> +१
मी पण आताच पाहिला आणि इथे लिहायला आले.
आजिबात जमलेला नाही ट्रेलर. माधुरीची डायलॉग डिलीव्हरी वेगळीच वाटली. म्हणजे काय ते नक्की सांगता येत नाहीये. पण कानांना खटकतं.
म्हणजे सहजता नाहीये त्यात असं वाटलं. एकुण आता तिच्यातच सहजता राहिली नाहीये म्हणा Happy

तिचा आवाज खूप जड वाटतोय, खूप आजारी माणसासारखा. ट्रेलर उत्कंठा निर्माण करण्यात फारसा यशस्वी झालेला नाही.

Pages