चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहम्मद अझरुद्दीनवर चित्रपट आला. दुय्यम दर्जा असल्याने कोणी बघितला नाही ते वेगळे.
पण आता संजय दत्तवर चित्रपट येतोय..
पुढे सलमानचा कधी येतोय हे बघायला हवे.. त्यात त्यानेच अभिनय केला तर ५०० करोड कुठे जात नाहीत.. तसे त्याचीही लाईफ मस्त आहे, काळवीट मारलेय, माणसे चिरडलीत, ऐश्वर्या प्रकरण, विवेकशी लफडा, शाहरूखशी रुसवेफुगवे, अविवाहीत घोडा, उघडा बॉडीबिल्डर, बिईंग हुमायून इमेज..

मला ते संजय दत्तच ग्लोरिफिकेशन आवडलं नाही.>>>>>+१
पण हे होणारच होतं.
आणि रणबीरने केलंय ते ही अगदीच ठीकठाक वाटतंय .
रणबीर कधी मेहनत घेत असेल एखाद्या भुमिकेसाठी असं मला खरंच वाटत नाही.
(बॉडी लँग्वेज साठी मला सुशांत आवडला. पर्फेक्ट धोनी स्टाइल)
मेकप्ची कमाल आहेच. आणि संजय दत्तची बॉडी लँग्वेज तर मिमिक्री आर्टिस्टपण सह्ही दाखवतात.
दुनियेला बरेच काही शिकण्यासारखे आहे संजय दत्त कडून>>> हे मात्र बरोबर. ड्रुग्ज, अवैध हत्यार बाळगण वैगेरेने कशी वाट लागते ते शिकण्यासारखंच आहे.

बॉडी लँग्वेज साठी मला सुशांत आवडला. पर्फेक्ट धोनी स्टाइल>>> काहीही सुशांत सिंग मेंगळट वाटतो. त्यापेक्षा ओरिजनल धोनीच मस्त आहे. (सुशांत सिंगने काम चांगले केले आहे पण तो धोनी वाटत नाही)

त्यापेक्षा ओरिजनल धोनीच मस्त आहे.> ऑ?? ओरिजनल धोनी मस्त आहे म्हणजे?? त्याच्याबद्दल कुठे काय लिहिलंय मी?
मला फक्त सुशांत ने उचललेली धोनीची स्टाईल चांगली जमलीये असं म्हणायचंय. काही सीन्स मधे तर चपखल वाटली.

रणबिर कपूरच अर्ध काम तर मेकअपने केलाय करतोय आणि इतपत तर जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव वर्षानुवर्ष करतायत.
नवीन Submitted by गुगु on 25 April, 2018 - 13:37 >> makeup karun mimicry kelyagat vaatato.

ड्रग करूनसुद्धा बॉडी बनवली हे मला तरी ड्रग करण्याचं उदात्तीकरणच वाटतं.
अशा चित्रपटांचा प्रचंड परिणाम शाळा- कॉलेजात जाणार्‍या पोरांवर पडत असतो, ड्रग इतके वाईट नसतात असा संदेश त्यांच्यापर्यंत जाणे मला गैर वाटते.
रणबीर स्वत: ड्रग घेत असल्याने कदाचित ह्या संवादात त्याला काही गैर वाटले नसावे.

न्युड
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नासिरूद्दिन शाह नक्की काय म्हणतो? कुणाला कळलंय का?

इकडे डेडपूल चे कोणी फॅन आहेत का? DP२ चा ट्रेलर बघितला का?
https://www.youtube.com/watch?v=D86RtevtfrA

आणि विशेष म्हणजे DP२ चा "खास रे" ने केलेले डबिंग.

"उन्हा तान्हात राहतो कूल नाव माझे डेडपूल"
"महाराष्ट्रात असे गाव नाही, जिथे माझे नाव नाही"

https://www.youtube.com/watch?v=_RtGKceephc

ड्रग घ्यायला विकायला बंदी आहे का आपल्याकडे? की दारूचेच नियम आहेत?

बाकी चित्रपटात कदाचित ड्रगने वाट लागलेली दाखवले असेल आणि मग ड्रग सोडून सुधारून बॉडी बनवली असे दाखवले असेल? तसे दाखवले असल्यास उदात्तीकरण नाही म्हणता येणार.. आयुष्यात मी अमुकतमुक चुका केल्या आणि अमुकतमुक भोगले असे दाखवले असेल तर चांगलेय की..

राझी - ट्रेलर आवडला.
तो विकी कौशल पण प्रॉमिसिंग वाटतो. `मसान'मध्ये मला तो आवडला होता. त्याचा आणखी एक नवा सिनेमा येतोय, काल-परवाच त्याचा ट्रेलर पाहिला; आत्ता नाव आठवेना. जरा हलकाफुलका असावा असं वाटलं. विकी कौशलचा स्क्रीन-प्रेझेंस फारच छान आहे.

राझी ट्रेलर मस्त आहे. मस्ट वॉच.. सत्य घटनेवर आधारीत आहे. अश्या मुवीज बनवाव्यात.
नाहीतर कुठे तो संन्जू बाबा...

ड्रग करूनसुद्धा बॉडी बनवली हे मला तरी ड्रग करण्याचं उदात्तीकरणच वाटतं.>>>>>
ड्रग सोडतांच्या काळात त्याला ओक्युपाईड ठेवण्यासाठी त्याला घरी gym सेट अप करून दिला, त्याचीच त्याला नंतर गोडी लागली असे वाचले होते कधीतरी

नुकताच एक ट्रेलर पाहण्यात आला....
वीरे दि वेडींग.... आजकाल फ* आणि से* चु* असे शब्द उच्चारले की फार बोल्ड आहोत असं वाटायला लागतं ... तसल्याच कॅटेगिरीतला वाटतोय ट्रेलरवरून हा पिक्चर... बकवास! फालतू ..

Phamous (फेmous) चा ट्रेलर बघितला का?
https://www.youtube.com/watch?v=WaVJKdxwwNs

जिमि शेरगील, के के मेनन, पंकज त्रिपाठी, माही गिल, जॅकी श्रॉफ आणि इतर अशी तगडी स्टारकास्ट. चंबळ ची पार्श्वभूमी, ताकदीची रस्सीखेच. मस्त सूत जुळले आहे. ट्रेलर तरी छान आहे.

बकेट लिस्टच्या 'तु परी' गाण्याचा व्हिडीओ पाहिला. बर्याचश्या सीन्समध्ये 'रन्ग दे तु मोहे गेरुआ' गाण्याची हुबेहुब नक्कल केलेली दिसून आली.

https://www.youtube.com/watch?v=kELHQK-__Zw

संजु च्या प्रमोशन च्या व्हिडीओ ची एक क्लिप बघितली. त्यात परेश रावल म्हणतोय, मै तो ई तना ही कहता हू, मदर तेरेसा को तो देखा नही था पर दत्त साब को देख लिया. Uhoh

डीसी फॅन्स बाहर निकलो !

शझाम आणि ऍक्वा मॅन चे ट्रेलर आलेत !

डीसी ने मस्त टोन चेंज केलाय . जेम्स वाण ने तर काही काही शॉट्स जबराट घेतलेत

शझाम आणि ऍक्वा मॅन चे ट्रेलर आलेत !>> आता सर्व ब्राईट टोन्स वापरत आहे डिसी.. आधीचे तर सारे मुवी अंधारातच असायचे..
अ‍ॅक्वामॅनवर मार्वलची छाप दिसतेय मला..
शझाम मस्ताय..

Ghoul या Netflix च्या नव्या सिरीजचा प्रोमो पाहिला का?
राधिका आपटे आहे त्यात..

Ghoul बद्दल फारसे आकर्षण नाही . नेटफ्लिक्स च्या " Selection Day " ची वाट बघतोय . मला व्हाईट टायगर नंतर अरविंद अडिगाची सर्वात जास्त आवडलेली कादंबरी आहे ही .

Pages