Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=JsIW63SVkI4>>>>>>>
सही !!
:))
:))
हो.. आज पाटणकरीण येऊचा असा
हो.. आज पाटणकरीण येऊचा असा नाईकांच्या वाड्यात. छायाने तिचो नाव स्टीलच्या डब्यावर पाहिलं असा. तेवा बाकी कोण नाही तरी छाया पाटणकरीणला नक्की ओळखणार.
पाटणकरणीला ओळखायला छायाला तसाही जास्त त्रास पडणारच नाहिये म्हणा.. कारण आण्णाच्याच वाड्यात, आण्णाच्याच खोलीत, आण्णाच्याच पलंगावर, आण्णाच्याच शेजारी बसुन पाटणकरीण आण्णाच्याच खांद्यावर डोकं टेकवुन त्याच्या सोबत त्याच्याच वाड्यात रहायची इच्छा लाडीकपणे बोलुन दाखवत असतानाच आज छायाची तिथे एंट्री होऊक असा... तवा सर्वांनी आजचो एपिसोड चुकवायचो नसा.. काय कल्ला..??
>>कारण आण्णाच्याच वाड्यात,
>>कारण आण्णाच्याच वाड्यात, आण्णाच्याच खोलीत, आण्णाच्याच पलंगावर, आण्णाच्याच शेजारी बसुन पाटणकरीण आण्णाच्याच खांद्यावर डोकं टेकवुन
फक्त त्या मेलेल्यांका पाणी देत नाय म्हणून माई रागावल्यात.
अण्णांची अशी 'दिवसकार्य' चालूच हत...
छाया चतूर आहे, पाटणकरीण
छाया चतूर आहे, पाटणकरीण (शेवंता) आत शिरल्या शिरल्या तिने हेरलं की हे आण्णांचं नविन प्रकरण आहे ते.
शेवंता पेक्षा कुमुदिनी नाव किती छान आहे, शेवंता का म्हणवते ती स्वत:ला? आणि ती आण्णांपेक्षा चार पावलं जास्त धाडसी आहे.
शेवंता तीचं माहेरचं नाव गं
शेवंता तीचं माहेरचं नाव गं दक्षिणा.
झाली, शेवंताची एंट्री वाड्यात
झाली, शेवंताची एंट्री वाड्यात झाली. लगेच तिची नजर छायाच्या नेकलेस वर पडली. अण्णांच्या लक्षात आले की बाई आता ह्येच मागणार. पण अण्णा, बाहेर जाम उड्या मारतात, पण शेवंता खोलीत आल्यावर लगेच बाल्कनीत लपुन बसले , जेव्हा छाया चहा घेऊन वर येते तेव्हा.
कालचा हवा येऊ दे राखेचा वर असल्याने जाम धमाल आली.
छोटी छाया धमाल करत होती. जाम धाडसी आहे प्रत्यक्षात पण. माका ती सिरीयलच्या बाहेर लय आवडली. पोरगी नाव काढेल मोठेपणी. 
हो.. छोटी छाया मोठेपणी नक्की
हो.. छोटी छाया मोठेपणी नक्की नाव काढेल.. ती सध्या नालासोपार्यातील जि.प. शाळेत शिकते.
शेवंतानु आण्णा नाईकाच्या वाड्यात पाटणकरावांगडा ईलं असतंय तर गप रवायचं. पन उगा सगळा वाडा बघुक रवलान. आण्णावांगडा पलंगावर बसुक गुलुगुलु केलान. आन शेवटला माईच्या हातुन ओटी भरुक होया आसतंय तं माईचं मंगळ्सुत्र तोडुन ठेवलान गो बाय माजे..!
आता पाटणकराक भविष्य दिसुक होया.. माईच्या घोवाक धोका असान..!
शेवंता हावरट दाखवल्ये अगदी.
शेवंता हावरट दाखवल्ये अगदी. फारच गळेपडू
आता माईच्या घोवाक धोका नाही ,
आता माईच्या घोवाक धोका नाही , शेवंताच्या घोवाक धोका असंत.
डि जे तुम्हाला मालवणी चांगलच
डि जे तुम्हाला मालवणी चांगलच जमायला लागलयं की.
शेवंता हावरट दाखवल्ये अगदी. फारच गळेपडू>>>>>> हो ना, पण खरच शेवंता, शेवंता वाटतच नाही. शकुंतला नरेकर जश्या माई म्हणून शोभतात, तशी ही वाटत नाही.
@ रश्मी.. मी अगदी मन लाऊन
@ रश्मी.. मी अगदी मन लाऊन राखेचा पाहतो त्यामुळे थोडी थोडी मालवणी जमत असेल..
बाकी राखेचा मधे डँबीस सासु-सुना नाहीत.. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणारे खवचट पात्रे नाहीत.. सुड उगवणारे खलनायक नाहीत.. उगा मोठमोठे स्टारकास्ट घेऊन त्यांच्या कपड्यालत्त्याचे-दागदागिन्यांचे-मेकअपच्या पुटांचे दर्शन घडवणारे बोजड सीन्स नाहीत की बावळाट कॅरेक्टर्सचा भरणा नाही. राखेचा मधे जे काय आहे ते सरळसोट. काहीही आडपडदा न ठेवता सगळा प्लॉट प्रेक्षकांसमोर..! माईचा सरळ-साधा-मायाळु स्वभाव, तिची अगदी ५००-७०० च्या आसपासची साधीशीच साडी, अगदी १००-२०० च्या घरातली कोकणी चोळी, कुठलाही मेकप नाही. उगा दागिन्यांचं अवडंबर नाही. छायाचे कपडेही अगदी असेच ५००-७०० च्या आसपासचे. आण्णा तर एवढा श्रीमंत पण साध्या शर्ट-धोतराला कडक इस्त्री करुन देखील रुबाबदार. आण्णाची तीन्ही पोरं पण आई-बापाच्या ऐकण्यातली.. ती छायाच जरा आगाव. पांडु सुधा परिथितीने असा झालेला. पाटणकर देखील सरळमार्गी सरकारी नोकर शोभतो. पाटणकरीणही कमीत कमी किमतीतल्या साड्यांत जास्तीत जास्त उठावदार...!
एकंदरीत कुठलाही बडेजाव न मिरवता अगदी आपल्या आजुबाजुच्या घरात (अर्थात गावाकडल्या..!) घडणारी कथा-प्रसंग-पात्रे असल्यामुळे मला ही मालिका खुप आवडते.
मलाही मागच्या भागापेक्षा हा
मलाही मागच्या भागापेक्षा हा भाग आवडला.
मागच्या भागात अचाट अतर्क्य गोष्टींचं प्रमाण खुपच जास्त होतं.
शकुंतला नरेकर>> नरेकर नाही..
शकुंतला नरेकर>> नरेकर नाही.. नुसतंच नरे
हो, नरे. माझ्या लक्षात आलेच
हो, नरे. माझ्या लक्षात आलेच नाही.
पाटणकरीण म्हणजे शेवंता दिसायला सुंदर व मादक आहे. पण शेवंताचा ठसकेपणा तिला जमला नाही. मागचे सगळे लोक या दुसर्या भागात आहेत. पण दत्ताची बायको सरीता तीच असेल काय याबद्दल संशय आहे. कारण सरीता सध्या कलर्स वर काम करतेय.
या सिरीयल मध्ये हेच घोळ नसल्याने सगळ्यात लोकप्रीय झालीय. नाहीतर इतर सिरीयली मध्ये एवढे पाणी ओतलेय की त्यांचे टिआर्पी कमी झालेत.
वाघ अण्णा मात्र शेवंता माऊ
वाघ अण्णा मात्र शेवंता पुढे अगदीच ऊंदीर झाले की.. सगळीकडे 'युती'चे वारे वाहत आहेत...
बाकी छाया खरे तर ईतकी वस्ताद आहे की ती अण्णांनाच ब्लॅकमेल करून थोडा जमिन जुमला स्वताच्या नावावर करू घेऊ शकली असती. पण बहुदा तसं काही झालं नाही, पहिल्या भागात जे दाखवलं त्या नुसार!
आता अण्णांची बंदूक लवकरच पाटणकरांवर डागली जाणार बहुतेक. प्रत्त्येक प्रश्णावर अण्णांकडे हे असं सोपं ऊत्तर आहे..
आता अण्णांची बंदूक लवकरच
आता अण्णांची बंदूक लवकरच पाटणकरांवर डागली जाणार बहुतेक. प्रत्त्येक प्रश्णावर अण्णांकडे हे असं सोपं ऊत्तर आहे..>> हो ना.. आणि ती पाटणकरीण काल आण्णाच्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या बंदुकीकडे बघत माईला विचारत होती की या बंदुकीने आण्णांनी खुप शिकार केली असेल ना..? आणि कोणकोणत्या प्राण्यांची शिकार केली..??

तर तिच्या प्रश्नांनी कावरीबावरी होऊन माई कशीबशी उत्तर देते, '"पुरुशांका कामात मी बाईमाणुस कशाक लक्ष्य घालुक होया"
मला वाटते गब्बर नंतर अण्णाच..
मला वाटते गब्बर नंतर अण्णाच.. खांद्यावर बंदूक मिरवतः
ए चोंगट्या, कितने आदमी थे रे..?
हवा वाल्यांनी काहितरी स्पुफ करायला हवा... अण्णा अॅज गब्बर!
एकंदरीत कुठलाही बडेजाव न
एकंदरीत कुठलाही बडेजाव न मिरवता अगदी आपल्या आजुबाजुच्या घरात (अर्थात गावाकडल्या..!) घडणारी कथा-प्रसंग-पात्रे असल्यामुळे मला ही मालिका खुप आवडते.
DJ यांच्या सम्पूर्ण प्रतिसादाशी १००% सहमत . खरोखरच साधेपणा अन वास्तवाशी कमालीचे साधर्म्य हा या मालिकेचा USP आहे .
CHYD मधले कलाकार खूप चांगलं मालवणी बोलत होते . आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे पान्डुबा स्वतः मालवणी लेखक असूनही राखेचा मधील पात्रांच्या तोंडी असलेले काही मराठी शब्द ऐकल्यावर दाताखाली खडा आल्यासारखे वाटते . उदा . इकडे - तिकडे ऐवजी हयसर थयसर हवे . खूप ऐवजी म्वॉप अथवा लय हवे . असे अनेक शब्द आहेत. मच्चिन्द्र काम्बळी यांची मालवणी नाटके ज्यानी पाहिली असतील त्याना हा फरक चटकन अन प्रकर्षाने जाणवेल . Still there's room for improvement! Please note कुडतरकरानु.....
https://www.facebook.com
https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/233822297572078/
CHYD मध्ये राखेचा वाल्या पोरांचा धुडगूस
हयसर थयसर बोलताना ऐकले आहे की
हयसर थयसर बोलताना ऐकले आहे की माईच्या तोंडून अनेकदा.
काल काहीतरी विचित्र दाखवलं.
काल काहीतरी विचित्र दाखवलं. पटलं नाही.

माई रात्री उशिरा स्वयपाक घरात आण्णाची वाट पहात बसलेली असताना दत्ता तिथे येतो. त्यांचं बोलणं चालु असताना माईला आण्णा घरात आल्याची चाहुल लागते. आण्णा पण घरात येऊन माईच्या आणि पोरांच्या नावाने हाका मारत असल्याचे दाखवले आहे. पण दत्ताला मात्र तसे ऐकु येत नाही..
माईला पुन्हा आण्णाचा आवाज ऐकु येतो आणि प्रेक्षकांना तो आण्णा झोकांड्या खात घरात माई-पोरांच्या नावाने शिमगा करत असलेला दिसतो तरीही माईने दत्ताला घरात सगळी कडे बघायला लावलेलं असताना त्याला तो दिसत नाही.. मग घाबरुन माई दत्ताला आण्णाला शोधायला बाहेर पाठवते तर आण्णा दूर लांब कुठल्याश्या काळ्या कातळावर बसलेला दिसतो.. असे कसे..?
इकडे उद्याच्या भागात पांडु काहितरी बोललेला दाखवलाय.. कोणाचेतरी नाव घेऊन तो म्हणत असतो.. ती अशी सोडनार नाय..!! आता ती नेमकी कोण हे आजच्या भागात कळॅल.
शेवंताव्यतिरीक्त अजुन कोणी
शेवंताव्यतिरीक्त अजुन कोणी आहे की काय? भिवरी??
काय माहित.. भिवरीचं नाव
काय माहित.. भिवरीचं नाव नव्हतं घेतलं पांडुने हे नक्की..!
भिवरीचं नाव नव्हतं घेतलं
भिवरीचं नाव नव्हतं घेतलं पांडुने हे नक्की..!>>> तो इसरला असेल
नाय.. तेका इसारलं नाय.. माका
नाय.. पांडु इसारलं नाय.. म्या इसारलंय..
पांडुक कोनाचं तरी नाव घेऊक होया... माई पन तां नाव ऐकुक घाबरलेलं दाकवलं असान.. काल पांडुक कोनाचं नाव घेताला हेच म्या इसारलंय..!!
>>काल काहीतरी विचित्र दाखवलं.
>>काल काहीतरी विचित्र दाखवलं. पटलं नाही.
+१... वाटलं, शेवंंता कडून घरी येता येता वाटेतच अण्णांना गचकवलं का काय ! आज ऊलगडा होतोय का बघू.
बाकी काही म्हणा, लोकप्रियतेत सरंजामे आघाडीवर असले तरी अण्णांनी सर्वदूर परीसरात बाजी मारली आहे.
अण्णांवर खूप मेमे बनत आहेत.
अण्णांवर खूप मेमे बनत आहेत.
मला बघायची आहे सुरूवातीपासून ही मालिका. कधी सुरू झालीये. आपलीमराठीवर २१ जानेवारी पासून आहे.
नवीन Submitted by DJ. on 19
नवीन Submitted by DJ. on 19 February, 2019 - 16:05>>> या पोस्टशी पुर्णपणे सहमत.
ही एक मालिकेमुळे झी च app डाउनलोड करून पाहतेय . सध्यातरी आवडतीये
अरे पांडूने काल गीऱ्हा चा नाव
अरे पांडूने काल गीऱ्हा चा नाव घेतला होता, हे एक प्रकारचा भूत असा. ज्या माणसाचा खून झालेला असतो तो गीऱ्हा बनतो, जास्त करून खाडीवर आढळतो हा भूत प्रकार
Pages