रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका भागात सुसल्या दाखवली. ती आभिराम एवढीच ८-९ वर्षाची दाखवलीय. अण्णा आल्यावर पाटणकरीण तिला जबरदस्तीने झोपवतांना दाखवलीय.> हो बरोबर.
मग <<<अण्णांची सगळी मुलां मोठी झाली,ता सुसल्या मात्र मोटा जावूक न्हाय>>> ती अभिरामाबरोबर मोठी होणार ना.

एका भागात सुसल्या दाखवली. ती आभिराम एवढीच ८-९ वर्षाची दाखवलीय. अण्णा आल्यावर पाटणकरीण तिला जबरदस्तीने झोपवतांना दाखवलीय.> हो बरोबर.>>>>>> त्याखेपेक अभिरामाचो अवतार झालो न्हवतो.छाया,दत्ता,माधव इतकीच पोरां होती.पाटणकरणीचा सुसल्या,त्याखेपेक ८-९ वर्षांचा होता.आता सगळी मोठी झाली, मगे सुसल्या कसा रवला?

छाया,दत्ता,माधव ९-१० वर्षंचे दाखवले होते तेव्हा सुसल्या ८-९ वर्षांची दाखवली होती? मला नाही आठवत.
सुसल्या आणि अभिराम छा, द, मा, पां मोठे झाल्यावर दाखवलेत.

छाया,दत्ता,माधव ९-१० वर्षंचे दाखवले होते तेव्हा सुसल्या ८-९ वर्षांची दाखवली होती? मला नाही आठवत.>> अभिरामाक देविचं इंज्यक्षान द्याचं रवलो होतो म्हनुन त्या बारकाच रवलो. Proud

>>स्वप्ना किती मनोभावे बघते ग

अग ही सास-बहू सिरियल नाही म्हणून बघतेय. तरी कालचा आणि परवाचा एपिसोड नाही पाहिला. परवा WB वर The Exorcist होता ना. डोळ्यांवर हात धरून बोटांच्या फटीतून का होईना पण पाहिला Happy असो. तर हे सिरियलवाले एकतर नीट विचार न करता एपिसोडस काढतात ते पटत नाही. गोष्ट सांगताय ना तुम्ही लोकांना? मग नीट सांगा की. विचार केला थोडा तर हे टाळता येतं. पुढल्या एपिसोडसमध्ये झालं तर टाईम प्रेशर समजू शकतं. पण सुरुवातीच्या एपिसोडस मध्ये हा भोंगळपणा अक्षम्य आहे. किंवा ते प्रेक्षकांना बुध्दू समजतात. त्यचा राग येतो. आम्ही डोकं बाजूला काढून बघत नाही सिरियल. लॉजिकल दाखवा की काय दाखवायचं ते. :रागः

>>आत्महत्या करणे ह्यात हिंमतीचा भाग नाहिये. हे मिसलीडिंग आहे. हे कोणाला उद्देशून नाहिये.

१००% सहमत. जगायला पावलोपावली हिंमत लागते. मरताना फक्त एक वेळ....किंवा एक क्षण.

देवकी ......मालवणीत लिहिताय त्याबद्द्ल खूप धन्यवाद Happy मस्त वाटतं वाचायला. मी थोडं घोकूनसुध्दा बघते काही शब्द Happy

काल एपिसोडचा शेवट पाहिला थोडासा. त्या नेने वकिलावर पायापासून डोक्यापर्यंत कॅमेरा का फिरवला म्हणे??? मला तर वाटलं आता कुठूनशी वार्‍याची झुळूक येऊन केस पण भुरुभुरु उडतात का काय Happy शेवंताने जिम जॉइन करायला हवा. आमच्या जिममधे व्हॅलेंटाईन डे ची ऑफर आहे. आण्णा आणि शेवंताला बरी आहे. Happy

आजचा एपिसोड मात्र बघणार. पांडूचा बाप आणि दत्तची आई ह्यांचं दिवसकार्य केलं नाही म्हणुन त्यांचे आत्मे फिरताहेत असं काहीतरी माई म्हणतात आणि दत्ता चमकतो असं पाहिलं काल प्रोमोत. नानांचे आता बेरीनाना होतात काय?

एका मैत्रिणीने मेल मध्ये पाठवले. हे तिने शरद उपाध्येंच्या फेसबुकावरुन उचलुन मला पाठवले, म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करत आहे.

हे या आपल्या सिरीयल संबंधात नाहीये, पण मालवणी भाषेत आहे.

एका मालवणी शाळकरी पोराने लिहीलेला *हनुमान* निबंध. निर्मळ मनाने वाचा... चेहऱ्यावर हास्य फुलेल.
#हनुमाननिबंध
हनुमान येक मालवनी मानूस हुतो. तेका दोन हात दोन पाय दोन डोळे आनी येक शेपडी हुती . तेच्या हातात येक गदा हुती. कोन तेच्या वाकड्यात गेलो काय तो त्या गदेन तेचा टकला फोडी. म्हनान लोक तेका भियान हुते. तो येका येळाक टोपलीभर वडे आनी दोन मोटे टोप भरून उसळ खाय. तो पाच पावलात कणकवलेसून गोयाक जाय. नदीक पूर इलो काय तो तेची शेपडी पानयात सोडीत. त्या शेपडेक धरून लोक मग गळोभर पानयातसून पैलाडी जायत. खडखडे लाडू तेका खूप आवडत . तो कायम दोन खडखडे लाडू तेच्या तोंडात घालून ठेय. म्हनान तेच्ये गाल कायम फुगलेले दिसत . दरवर्सा धयकाल्याक मामा मोचेमाडकरांच्या दशावतारी नाटकात तो काम करी . दर शिमग्याक घरा घरानी शबय मागाक जाय . लोकांका तो लय आवडा . पन येक दिवस कोनतरी तेका तेच्या जातीवरसून कायतरी बोल्लो. तेवापासून तो गावातसून खय नायसो झालो तो आजून खय कोनाक दिसाक नाय . म्हनान लोकानी तेची देवळा बांधल्यानी . आता दर शनवाराक लोक तेचा फुड्यात नारळ फोडतत आनी खोबरा आपण खातत

Proud

पाटणकर याआधी छोट्यामोठ्या रोलमध्ये दिसलाय.
एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये धनाचा भाऊ होता. >>> अच्छा, दुसरी गोष्ट का ग. तिसरीत उमेश होता ना.

लक्षात येत नाहीये, थँक यु निधी तत्परतेने उत्तर दिल्याबद्दल.

अगं तिसरीतच. उमेशच्या घरात गावाकडून पळून जाऊन रहायला आलेली असतात ना धना आणि जयेश (संदेश कुलकर्णी) त्या धनाचा भाऊ दाखवलेला तो. गुंड असतो तो.

राखेचा चा एपिसोड zee5 च्या साईट वर मिळेल हो.नो वरिज.मला आजचा एपिसोड आवडला.फक्त माई स्वत:रडता रडता छायला भरल्या घरात रडू नको म्हणातात तेव्हा हसू आलं.दत्ता सगळं विसरलायवाटतं.कोणी डॉक्टर का बोलवत नाहिये काय माहित

आता पांडगो चुकून त्या वच्छीच्या घराक गेलो नाही म्हणजे मिळवला.तो कायतरी घोळ घालणार ह्या नक्की.बाकी पाटणकरीण रागावली हा असं म्हणताच आण्णानी कळी खुलल्याचो अभिनय फर्स्टक्लास केलो अगदी.तेंच्या कानाखाली जाळ काढूचा आसा माका.

अगं तिसरीतच. उमेशच्या घरात गावाकडून पळून जाऊन रहायला आलेली असतात ना धना आणि जयेश (संदेश कुलकर्णी) त्या धनाचा भाऊ दाखवलेला तो. गुंड असतो तो. >>> ओहह अच्छा, ती धना होय. मला घनाच आठवत होता Lol , दुसऱ्यातला.

हा ती धना गोड होती फार, रा खे च्या च्या दत्ताची खरी बायको. अच्छा तिचा गुंड भाऊ, आलं लक्षात. Thank u.

हा ती धना गोड होती फार, रा खे च्या च्या दत्ताची खरी बायको. > ती त्या वैभव मांगले च्या सीरियल मधे पण होती ना

आता पांडगो चुकून त्या वच्छीच्या घराक गेलो नाही म्हणजे मिळवला.तो कायतरी घोळ घालणार ह्या नक्की>>>>. Lol स्वप्ना, काल पहातांना हेच माझ्या मनात आले, कारण पांडु घोळ घालण्यात आणी इसरण्यात प्रसिद्ध आहे. Proud

हो, काल छायाला भरल्या घरात कित्यांक रडतसं, म्हणतांना माईच आधी ओक्साबोक्षी रडत होत्या. Proud

बाकी माधवने, अभिरामला भुताबद्दल सांगुन प्रेक्षकांना जाम हसवले.

ए हो तो माधव आणि अभिरमचा सीन मलाही जाम आवडला.माई म्हणजे कोकनी निरुपा रॉय आहेत अगदी.सारख्या रडतात.तो चोन्गटया का कोण आहे त्याला पाहिलं की मला तर विजय अमृतराज आठवतो....का कोणास ठाउक :-)त्याचा 'मातीखाल्ली'हा डायलॉग मस्त आहे मात्र.दत्ता सगळं विसरला होता.नाना आठवण करुन देणार.माई पण पोरांना सगळं सांगायला हवं का म्हणतात काय माहित.दत्ता दुरावेल ना त्याना अश्याने.त्याची जास्त माया आहे माईवर.

माई म्हणतात.. पोरांना कळूक होया नको.. (असं मी तरी ऐकलं.. म्हणजे मुलांना कळू नये).
पण अण्णा काही दिवसकार्य करेल असं वाटत नाही.. त्याची कार्ये दोनच आहेत.. बंदूकीच्या गोळ्या झाडणे आणि... ... ....

छाया,दत्ता,माधव ९-१० वर्षंचे दाखवले होते तेव्हा सुसल्या ८-९ वर्षांची दाखवली होती? मला नाही आठवत.
सुसल्या आणि अभिराम छा, द, मा, पां मोठे झाल्यावर दाखवलेत.
Submitted by सस्मित on 14 February, 201>>>>>>>>>>> होय ग होय! मेरीच गलती .एपिसोड १९ मधे सुसल्या,८-९(जे काय असेल ते) वर्षांची दाखवली होती.छा मा द हे मोठे दाखवले होते.मग बरोबर अभिराम आणि सुसल्या दोघे एकाच वयाचे आहेत.माझोच पांडू झालो,ता मी विसरलंय!

काल पांडूने चुकून पाटणकरणीला घरच्या पुजेचं आमंत्रण दिलं.मगे काय?आज नाईकांचया वाड्यात धुमशान होईल आसा माका दिसता.

Pages