शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही पाहीली ती फिल्म. - सादरीकरण आणि अभिनय उत्तमच पण गोष्ट कृत्रिम वाटली. हाहाहा मेंढ्यासारखी हेअरस्टायल त्याची, गिटार बहुतेक त्याची क्रिएटिव्हिटी दाखविण्याकरता.
आणि हो शेवटी तो अडकलेलाच आहे. 'बिच्चारा आलिया भोगासी, असावे सादर' असेच मलाही वाटले.

मी पण बघितली शंभरावं स्थळ. रघू आचार्य यांना परफेक्ट प्रतिसादाबद्दल शंभर मोदक. काय त्या उदगीरकरचा अवतार.
आणि शेवटी ती जबरस्ती करते की काय त्याच्यावर लग्नासाठी? आणि तो असाच तयार होतो मुकाट्याने? काहीपण.

मला नाही आवडली कथा. मुळात स्वतः इतकी स्थळं नाकारणारी पण एक नकार स्विकारता येत नाही अशी मुलगी, ती घरी येते , नकाराचे कारण विचारते हेच इतकं क्रिपी वाटले. आणि वर परत जबरदस्तीचा होकार मिळवते. यक्क!
पब्लीक ६ महिने डेट करुन ब्रेकअप करतं, मुव ऑन करतं, इथे एक साधा नकार झेपत नाही म्हणजे कठीणच आहे.

शंभरावं स्थळ - इथे वाचून बघितली.

कामं छान आहेत दोघांची.
तिचं व्यक्तिमत्व स्क्रिप्टमध्ये चांगलं लिहिलंय. मला कुणी नकार देऊ शकत नाही, मी नकार देणार - ही तिची मेन्टॅलिटी तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून दाखवलीय.

चि.उ. मला आवडतो, पण त्याचा यातला गेट-अप नाही आवडला.

स्टोरीत काही क्लिशे वाटले. तो म्हणतो, आईचा पगार बाबांपेक्षा जास्त आहे. आणि बाबा स्वयंपाककाम करताना दाखवलेत. म्हणजे ज्याचा पगार कमी त्याने स्वयंपाककाम करायचं असं सूचित केल्यासारखं वाटलं मला.

त्याच्या हातात तार तुटलेली गिटार असते - म्हणजे तो आहे त्या परिस्थितीत जुळवून घेणारा - असं सूचित केलंय.

Submitted by ललिता-प्रीति on 14 February, 2023 - 09:03

>>>>> पुर्ण पोस्ट आवडली आणि सहमत आहे पोस्टशी

Netflix वर नुकतीच ३ भागांची मालिका आली आहे जी MH-370 वर आधारित आहे. मी फक्त पहिला भाग बघितला काल.

काल युट्युब वर प्रि वेडींग बघितली.

https://www.youtube.com/watch?v=ei1BJ7PrOXA

ओके टाईप्स आहे. तो सक्षम कुलकर्णी अजून मी मोठ्या माणसाचा रोल मधे झेपवू शकत नाही. पक पक पकाक मधलाच लक्षात राहिलाय.

दोन शाळकरी मैत्रिणी घरी न सांगता स्कूटर घेउन जातात व नंतर सोसायटीत पार्किंग करताना कारला धडकतात व कारचे नुकसान होते. घरी काही सांगत नाहीत यावर एक मराठी लघुपट आहे मी पाहिला होता पण आता कुठे दिसत नाही. कुणाला माहित आहे का? लिंक द्या

लास्ट पासपोर्ट - एक म्हातारा माणूस पासपोर्ट ऑफिसमध्ये एका जागेवरती शांत बसलेला आहे. त्याचा नंबर यायला वेळ आहे. मधल्या कालावधीत सामाजातल्या विविध स्तरातील लोक त्याच्या जवळ येउन बसतात. त्यांच्या संवादातून त्या माणसाचेही आयुष्य उलगडत जाते तसेच त्याची फिलॉसॉफी कळत जाते.

लो बजेट पण एक चांगली कलाकृती.

अनुकूल
सत्यजित रे यांच्या कथेवर आधारित हिंदी लघुपट. एका माणसाने (सौरभ शुक्ला) एजन्सीमधून रोबो भाड्याने घरी आणला आहे. परंतु काही दिवसात त्या माणसाचीच नोकरी अन्य रोबोमुळे जाते.

… मग तो माणूस आणि घरगडी रोबो मिळून काय कारस्थान करतात ते बघाच !
U tube.

मला जर बरोबर आठवत असेल तर ही कथा आम्हाला शाळेत इंग्रजीत 'धडा' म्हणून होती. इयत्ता लक्षात नाही.
कोलकात्याच्या सॉल्ट लेक नावाच्या भागात घडते का ही कथा?

बरोबर आहे वावे. Fussy शब्द त्या कथेत मी पहिल्यांदा वाचलेला. आणि असिमोव्ह ची तीन तत्त्वं वगैरे सुद्धा वाचल्याचं आठवतंय.

कोणी झी फाईव्ह वरची नसरुद्दिन शहा आणि विक्रांत मेस्सी ची हाफ फुल्ल शॉर्ट फिल्म पाहिली का? कशी आहे?
बर्‍याच दिसतात झी फाईव्ह वर.. मी एक फक्त स्ट्रॉबेरी शेक का अशी कोणतीतरी पाहिली सुमित राघवन आणि हृता दुर्गुळेची. छान होती.

लघुपट
दोन तास
"दोन तास बाई हवी" असे म्हणून एक कामगार एका वेश्येला घरी नेतो आणि पुढे घडते..... ती एक हृदयस्पर्शी कलाटणी
उत्तम !
https://www.youtube.com/watch?v=2hSi0PJg9eE&t=18s

>>>>>लघुपट
दोन तास

उच्च लघुफिल्म आहे कुमार सर!! आपले खूप आभार, इथे दिल्याबद्दल.
सकाळी सकाळी मूड कै च्या कै मृदु होउन गेला. अभिनय किती सुरेख आहे सर्वांचाच.

>>लघुपट
दोन तास<<
कालच बघीतली ... मस्त आहे.

प्रघा,
छान आठवण काढलीत +१
धन्यवाद !

Pages