शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Fisher women and Tuk tuk!
https://youtu.be/WwQKLgUYEdY

अजूनही काही बघितलेल्या..
त्यातल्या त्यात शेण आणि झिंगर लक्षात राहिलेल्या..

https://youtu.be/V3Zg1U0teT8
एआयबीचा स्पूफ व्हिडिओ भारी आहे हा Happy बॉलिवूड प्रमोटेड हॅरॅसमेन्ट कल्चरबद्दल - विकी कौशल आणि रिचा चढ्ढा आहेत.

हो तो खूप डोळे उघडायला लावणारा व्हिडिओ आहे.
मध्ये मी काही गोष्टी पाहून आपल्याला(मला) 'छोटीसी बात' खूप आवडतो ते तरी बरोबर आहे का असे विचार करत होते.

कंगना चा तो चिट्टीया कलाईया च्या चालीवरचा ए आय बी व्हिडीओ पण चांगला आहे.ए आय बी मध्ये खूप चांगले कलाकार होते.ज्या गोष्टींच्या विरोधात व्हिडिओ बनवत होते त्याच गोष्टींचे आरोप होऊन संस्था विसर्जित व्हावी हे वाईट झालं.

>> बॉलिवूड प्रमोटेड हॅरॅसमेन्ट कल्चर
खरंच आहे हे. आणि पूर्वीपासून खटकतंय. यावरून एका मित्राशी तेंव्हा वादविवाद पण झाला होता. तो म्हणायचा जे वास्तव जगात करता येत नाही ते स्वप्नरंजन सिनेमात दाखवतात म्हणून तर लोक सिनेमा बघतात. नाहीतर कुणी बघितला नसता. ओळखसुद्धा नसलेल्या किंवा जुजबी ओळख झालेल्या मुलीला छेडत गाणं म्हणणाऱ्याला सिनेमात "हिरो" करत. भले काहींचे स्वप्नरंजन असेलही व त्यामुळे सिनेमा चालत असेलही, पण नकळतपणे विकृती प्रमोट केली जायची.

हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

भाडीपाच्या 2 horror short films बघितल्या.>>>>>>> शूज एक बघितली . दुसरी कोणती?

भाडिपाचे पहाते आता..Recent आलेली चिकटगुंडे सिरीज आवडली त्यांची. आईच्या हातचं.. आणि कास्टिंग काऊच पण छान आहे

भाडीपाच्या 2 horror short films बघितल्या. >>> मला आवडल्या. चांगला एफर्ट आहे. ललितने भीती व्यवस्थित दाखवली आहे.

बकवास विडिओ आहेत भाडीपाचे फार..
काही आनंद नाही मिळाला.. उगाच घाबरलो Sad आता स्वप्नात काय दिसेल हि वेगळीच भिती.. लोकांना असे घाबरवण्यात कसला आनंद मिळतो या लोकांना Sad

Bhadipa horror short film
यूट्यूबर असे टाकले की वरचे मिळून जाईल.

बाकी भाडीपा अजून शोधत जाल तसे खजाना गवसत जाईल Happy

त्या ललित प्रभाकरच्या तोंडावरची माशी उडत नाही.. त्याला कशाला घेतलाय हॉरर मध्ये...

achha arjun kapoor utkrushtha aahe tumchya mate...mag lalit sarkhe tar tumhala bor watnar tyat kay naval.. jau dya maaf kara bicharyala

त्या ललित प्रभाकरच्या तोंडावरची माशी उडत नाही.. त्याला कशाला घेतलाय हॉरर मध्ये...
>>>
हा हा, हो खरेय. त्याला दोनच एक्स्प्रेशन दिले आहेत. त्यातला एक तो नॉर्मल सीनमध्ये वापरतो, दुसरा घाबरलेल्या Happy

achha arjun kapoor utkrushtha aahe tumchya mate...mag lalit sarkhe tar tumhala bor watnar tyat kay naval.. jau dya maaf kara bicharyala

सात्विक संताप Lol Lol

भाडिपाची झुम वेबसिरीज ओके होती..
फक्त पहिला एपी बघण्यालायक आहे..
नंतर बिअरची जाहिरात केलीय नुसती..

हा हा, हो खरेय. त्याला दोनच एक्स्प्रेशन दिले आहेत. त्यातला एक तो नॉर्मल सीनमध्ये वापरतो, दुसरा घाबरलेल्या
> >> त्यापलीकडे जमणार नाही त्याला म्ह्णून असेल Wink

नुकतीच एक शॉर्ट फिल्म बघितली शंभरावं स्थळ मस्त आहे. चिन्मय उदगीकर आणि दीप्ती देवी दोघांचा अभिनय छान आहे. शेवटच्या प्रसंगातील बॅकग्राउंडचे गाणे तर अप्रतिम आहे.

हो मी पण बघितली ती फिल्म. इथे लिहायचं राहिलं होतं.
जेव्हा ती त्याच्याकडे जाते तेव्हाच कळलं होतं ही होकार देऊनच येईल Wink मस्त कन्सेप्ट!

हो ना खरंच फसला.

ती त्याच्याकडे जाते तेव्हाच कळलं होतं ही होकार देऊनच येईल >>>>
+111 फक्त जबरदस्तीचा होकार असेल असं वाटलं नव्हतं. तिला तो आवडला पण त्याला कुठे ती आवडली आहे. याचा पार्ट 2 यायला हवा.

आधी तो क्लिशे ब्रेकफास्ट सिन पाहून वैताग आला. मुलींचे ठीक आहे पण या वयातले कुठले आईवडील चहा सोडून ऑरेंज ज्यूस ब्रेकफास्टला घेतात? पण चिन्मयच्या घरातल्या तिच्या entry पासून आवडलं पुढे.

शंभरावं स्थळ बघितली, थँक्स चैत्रगंधा : )

डिसक्लेमर:

कथा जरा वेगळी. प्रेझेंटेशन छान.
कामं छान केलीत सगळ्यांनी. छोट्या छोट्या गोष्टीत कष्ट घेतलेत जाणवलं. पिक्चरायझेशनही छान. कथा बांधीव, आटोपशीर.
संगीत छान, उगा भसाभस नाही.

तसं सगळं गुडीगुडीच.
काही तरी वेगळं सांगायचय करत पारंपरिक गोष्टच वेगळ्या वेष्टनात गुंडाळून पुढे केल्यासारखं, शेवटच्या क्षणी अबाऊट टर्न करून फसवल्याचा फिल आला, जसा नायकालाही आलाय.

मग जरा फोडणी पुरतं तिचं करियरिस्ट असणं. जरा कोथिंबीर शिवरावी तशी धडाधडा नाकारलेली मुलं. मग जरा ट्विस्ट म्हणून तिला नकार.
बरं इतकी हुषार, जगात वावरणारी मुलगी. तिला एक नकार पचवता येऊ नये?
बरं एकवेळ तेही समजून घेऊत. की असतात अशी मुलंमुली. पण मग शेवटचा ट्विस्ट? तो कसा बरं समजून घ्यायचा?

मला तर बिच्चारा तो, अडकला. असंच फिलिंग आलं.
या लग्नात कोणीच सुखी होणार नाही वाटलं.
तीचा निर्णय क्षणिकच आहे तर तो निभावता येणे अवघड.
तो तर या निर्णयाविरुद्धच आहे . शिवाय त्याची फसवणूक आहे तर तोही नाही सुखी व्हायचा.
दोन ही कुटुंबांचीही फरपट होईल. त्याच्या बहिणीला स्विकारणे, ती मोठी जबाबदारी स्विकारणे तिच्या बसकी बातच नाही वाटते.
अन मूळात अतिशय विचारी असणारा मुलगा अशी फसवणूक करून घेऊन लग्न करेल का? तिचंही असं क्षणात बदलणं नाहीच पटलं. जिला आधी तो काय म्हणतोय ते चार वेगवेगळ्या पद्धतीने सांगून पुरेसं समजलं नव्हतं. अचानक कसं समजलं म्हणे?
अऩ अशी एका भेटीत वगैरे लग्न फायनल होणं मला तरी अशक्यच वाटतय.

सगळे असे असले तरीही एकदा बघायला आवडली. एक फ्रेशनेस आहे, एक क्लिननेस आहे, उगा फापटपसारा नाही.
नवीन टीम आहे तर आशा करुन पुढे अजून छान काही करतील.

मी ही पाहिलेली. त्यातला नायक कुठल्यातरी मालिकेत येऊन गेलेला. मालिका म्हणजे कधी कुणाकडे गेलं कि टीव्हीवर चालू असलेल्या मालिकेत आपल्यामुळं व्यत्यय आल्याचं फिल करून देणार्‍या असतात. त्याला मेंढ्यासारखी केशरचना वगैरे शोभत नव्हती. कात्री घेऊन कचाकचा केस कापून टाकावेत, ब्लेडने क्लीन शेव्ह करून याचा सफाचट लूक द्यावा असं वाटत होतं. त्याची नकाराची एक्स्प्लेनेशन्स कृत्रिम वाटत होती ऐकायला. एक मुलगा एक मुलगी प्रथमच भेटत असताना इतके वैचारीक गप्पा हाणत असतील तर त्यांनी लग्नाऐवजी अध्यात्मिक / मोटिव्हेशनल संस्था काढावी.

रघू आचार्य Biggrin
इतकी पण नाही हं पिसं काढायची Wink

Pages