शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्युस ही शॉर्ट फिल्म पाहिली. नितांतसुंदर.
शेफाली शाहने काय जबरदस्त अभिनय केलाय. लिहिली सुद्धा खुप सुंदर आहे.

आई मी आणि प्रायव्हसी मस्त आहे खरेच. मराठी शॉर्ट फिल्म्स जास्त पहायला मिळत नाहीत. खरे तर किती पोटेन्शियल आहे मराठीत शॉर्ट फिल्म्स साठी. उत्तमोत्तम कथा लोकांपर्यंत पोचवता येतील.
छूरी आणि अनुकुल पाहिल्या ठीकठाक आहेत.

इकडे कोणी कैसी ये यारीयां फॅन्स आहेत का?

असतील तर गुड news आहे सिझन 3 येतोय Voot वर,

अन मुख्य म्हणजे माणिक नंदिनी तेच आहेत, पार्थ अन निती

Tripling , pitchers ya tvf chya web series Khup mast ahet . Jarur paha

`पिस्तुल्या' शॉर्टफिल्मची जरा बरी प्रिंट नुकतीच सापडली. (तिथे एचडी म्हटलंय. खरंच एचडी आहे का शंका आहे; पण आधीच्या तुलनेत बर्‍यापैकी क्लिअर आहे.)

https://youtu.be/ovimYnrk07o

परवा मुम्बईची लाईफ का लाईफ ऑफ मुम्बई नावाची अत्यंत फालतू शॉर्ट फिल्म पाहिली. एक ऑलमोस्ट ६० च्या आसपासचा माणूस घाईने झोपेतून उठून बायकोला उठवून डबा वगैरे करायला लावतो, स्वतः तयार होतो, मोबाईल पुर्ण डिस्चार्ज झालेला असतो म्हणून चर्जिन्ग ला लावतो आणि चार्ज झाल्यावर सुरू न करता तसाच घेउन जातो. दरम्यान बायकोला सतत तुझ्यामुळे मला उशिर होतो रोज, आज मला लोकल चा पास रिन्यु करायचा आहे वगैरे पण ऐकवतो. घाईने घराबाहेर पडतो, इकडे बायकोच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती नवर्‍याला वेड्यासारखे फोन करायला लागते पण त्याचा तर फोन बंद असतो. मग कुठल्यातरी एका स्टेशन ला पोहोचल्यावर त्याच्या लक्षात येते पाहतो तर फोन बन्द मग सुरू करतो आणि लगेच बायकोचा फोन येतो.

बायको म्हणते अहो, तुम्ही एक गोष्टी विसरलात,
कालच तुम्ही रिटायर झालात.

Uhoh

हे एखाद्य व्हॉटसप पोस्ट च्या तोडीचे वाटतेय >> अगदी असह्य झाली मला.
बा य द वे इथे कुणि क्रिती आणि नयनतारा'ज नेकलेस ह्या दोन फिल्म्स पाहिल्या आहेत का?
मी दोन्ही फिल्म्स दोन वेळा पाहिल्या, पण मला कळल्या नाहित नीट Sad

क्रिती मध्ये मनोज बाजपेयी कल्पनेने आजूबाजूला व्यक्ती क्रिएट करत असतो का? असतो ना? मग जिचा खून होतो ती खरी आहे का? तो इन्सेक्टर पण खरा होता का? राधिका खरी की क्रिएशन? मनोज त्या आपल्या नव्या गर्लफ्रेंडला का मारतो? राधिका मनोज ला असं का सांगते की त्या इन्स्पेक्टर चं नाव बघ सृजन आणि सृजन म्हणजे क्रिएशन. इग्नोर हिम. Uhoh
मला अज्जिबात झेपली नाही. कृपया हुशार लोकांनी लाईट मारावा.

दुसरी म्हणजे नयनतारा'ज नेकलेस. जरा हलकी होती. पण तरिही म्हणावी तितकी नीट पोहोचली नाही.
ती जी मध्यमवर्गिय बाई दाखवली आहे ती कोंकणा ची मैत्रिण आहे का? आपल्या ऑनलाईन मित्राला भेटायला जाताना कोंकणा तिचे ग्रुमिंग करते. आणि बर्‍याच गोष्टी सांगते, किंवा बोलून जाते सेम त्याच गोष्टी ती मैत्रिण ऑनलाईन मित्राला भेटायला जाते तेव्हा बोलते. कोंकणा ने तिचे एक मोत्याचे गळ्यातले तिला घालायला दिलेले असते (भेटी करता) ते परत द्यायला ती येते तेव्हा त्या सोसायटित काहीतरी घडलेले असते (बहुधा कोंकणा आणि तिचा मुलगा मेलेले असतात) गोळी घातलेली असते किंवा आत्महत्या. बहुधा बँकेचे बरेच पैसे थकलेले असतात.
मला नीट कळली नाही. ह्यावर पण कृपया लाईट मारावा.

@ दक्षिणा >>> मनोज वाजपेयी एकटा फक्त रिअल आहे. बाकी सगळी लोकं त्याने इमॅजिन केलेली आहेत
(कारण तो सायको आहे). इट्स जस्ट like his ड्रीम (सपन), त्याची इमॅजिनरी मैत्रीण (कल्पना), त्याच्या creations (क्रिती, रचना). आणि सृजन म्हणजे क्रिएशन. भारी नावे घेतलीत एकदम.
भारी आहे हि शॉर्ट फिल्म आणि ते लास्ट वाल music जेव्हा त्याला कल्पना म्हणते काहीही सांगू नकोस सपन , झकास एकदम

भडिप च्या सगळ्याचा चांगल्या नसतात पण आई आणि मी छान आहे. एक गणपतीच्या दिवसातली आई,बाप्पा आणि मी पण मस्त होती २०१७ च्यागणपतीत . . बाकीच्या आपल्या बापाचं हॉटेल / आपल्या बापाची गच्ची आणि आपल्या बापाचं यावं आणि आपल्या बापाचा त्याव अगदीच बोअर होत्या Happy

दक्षिणा,नयनतारा’ज नेकलेस मला कळली ती अशी-
ती मध्यमवर्गीय बाई साधी असते आणि त्याच त्या बोअरींग लाईफला कंटाळलेली असते. त्यात तिला कोंकोणा भेटते, मैत्री होते. तिला कोंकोणाचं आयुष्य, वागणं बोलणं एकदम हॅपनिंग, ग्लॅमरस वाटायला लागतं. (तिच्या परदेशी ट्रिप्स, बाकी पुरुषांबरोबर दारू पिणं वगैरे). ती आपल्या कॉलेजच्या मित्राला भेटायला जाते तेव्हा कोंकोणाचं आयुष्य जगत असल्यासारखी बोलत असते. घरी परत आल्यावर तिला कों.च्या नवर्‍याने तिला आणि मुलाला मारल्याचं कळतं आणि तिला त्यातला फोलपणा लक्षात येतो.

दक्षुतै, क्रित्ती मधे इन्स्पेक्टर आणि त्याची प्रेयसी जिला तो मारतो ती , हे दोघे खरे असतात

आवडली मला ती

क्रिती मधे मला वाटतं कल्पना खरी नाहीए. पण सपन ची कल्पना त्याच्या कडुन सगळे खुन करुन घेते आहे. त्याच्या घरात असलेले त्या मॅनिकन्स पण बहुदा त्याच्या विक्टीम्स असाव्यात.
घरातल्या नोकराने कल्पना खरी नसल्याचे कन्फर्म केले आहे. आणि नोकर ईन्सपेक्ट् र शी बोलतो म्हणजे तो ही कन्फर्म होतो. (नोकर खरा आहे अस धरला तर).
मला आवडली ही शॉर्ट फिल्म.

सुजा भाडिपा साठी +१. फक्त आई-गणपती व आई व प्रायवसी आवडली.मराठी खादाडांची लक्षणेची पहिलं प्रवासाला निघालेल्या कपलचं आवडलं.पुढे बोअर झालं हि पण आणि बाकीच्या तुम्ही लिहिल्यात त्या.

सपन ची कल्पना त्याच्या कडुन सगळे खुन करुन घेते आहे. त्याच्या घरात असलेले त्या मॅनिकन्स पण बहुदा त्याच्या विक्टीम्स असाव्यात. >> हे माझ्या पण मनात चमकून गेलं होतं एकदा.
पण तो खूप करतोच का? Uhoh

काही काही शॉर्ट फिल्म्स मध्ये अगदी सुमार हिरोइनचे एव्हढे भयानक क्लोज up का घेतात हा प्रश्न मला नेहमी पडतो! अगदी त्या हिरोइनच्या चेहऱ्यावरचे लव किंवा त्वचेवरची छिद्र पण दिसतात!

डायलॉग डिलिव्हरी पण सुमार असते. म्हणजे शहरी भाषाच असावी असं नाही पण गावाकडची भाषा उगाच शहरीपणाचा आव आणून बोलू नये! एका शॉर्ट फिल्म मध्ये तर ती मुलगी पन, आनि, पानि असं बोलते आणि तिची आई मात्र या ग डी कोकणस्थ type बोलत असते..... नंतर उत्सुकटेंपोटी कलाकारांची नांव बघितली तर आईचे नाव सीमा पोंक्षे की अस काहीतरी होतं.

या फिल्म्स सेन्सॉरड नसल्याने 'ये मै क्या देख रही हूं!' असं होतं कधी कधी....

पण मला काही गोष्टी आवडतात, एक तर फास्ट ट्रॅक असतो, कलाकार अगदी सामान्य असतात, लोकेशन्स बरेचदा लहान शहरातील असतात. ती लोकेशन्स बघायला मजा येते!

अद्रक (ginger) - शॉर्ट आणि स्वीट आहे
'the coat ' पाहिली खूप हार्ट टचिंग आहे. त्या छोटया मुलाचे वाट बघणारे डोळे they made me cry

Pages