शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

teaspoon नाही समजली. कुणाला समजली असेल तर जरा सांगाल का अर्थ?>>>मलाही नाहीच समजली पण मी आता असा अर्थ लावला आहे की,ज्या टिक टिक ला वैतागून ती सून तिरमिरीने ती कृती करते ती टिक टिक तिच्या आयुष्यातुन सासर्यासोबत हद्दपार झालीच नाही

मला देवी शॉर्ट फिल्मचा पॉईंटच नाही कळला.
रेप ही भारतातील रिअ‍ॅलिटी आहे. मग परत तेच सगळं फिल्म बनवून दाखवण्यात काय मुद्दा आहे? ना काही सोल्यूशन सुचवलंय ना कोणत्या मूलभूत मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय?
असं पण नाही की या विषयावर लोक बोलत नाहीत. तसंही हल्ली लोकांना रेप झाला यापेक्षा रेपिस्ट व व्हिक्टिम यांची जात, धर्म यात इंटरेस्ट असतो. (हे करण्यात बायका आघाडीवर असतात.) पण एकूणच मुद्दा कळला नाही.
आणि स्पॉन्सर्ड बाय रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट? रियली? व्हिस्की? ड्रिंक मोअर व्हिस्की टू प्रिव्हेंट रेप्स???

आता 'देवी'च्या डिरेक्टरवर आरोप होतोय की एका स्टुडंटची फिल्म चोरुन तिने आपल्या नावावर खपवली आहे.
https://www.firstpost.com/entertainment/kajols-short-film-devi-written-a...

देवी कोणी स्पॉन्सर्ड केलीय ही ट्युब उशीरा पेटली, पण मला ती फिल्म समाजातील एक घटक म्हणून हतबल करुन गेली, नि:शब्द करुन गेली.

अजूनही या घटना घडतायेत, त्या थांबवायला हव्यात, त्यासाठी मी काय करु शकते, काही करु शकते का की फक्त हळहळ व्यक्त करणार, असं वाटून गेलं पण रात्रभर मी सुन्न होते. इथून तिथे असं कोणीच यापुढे जायला नको असं वाटलं. खूप मनात खोलवर वाटलं बरंच पण ते योग्य शब्दात मला लिहीता येत नाहीये.

फार मोठा impact करून गेली ती फिल्म हे नक्की. त्यातले काही डायलॉग्ज आणि सीन्स अप्रतिम आहेत. सविस्तर लिहू शकेन, पण आत्ता इच्छा नाहीये लिहायची. थोडा वेळ लागेल अजूनही त्यातून बाहेर यायला. लिंक देण्यासाठी youtube वर गेल्यावर ती परत बघितली आणि परत सुन्न झाले मी.

आत्ताच बघितली देवी , सनव यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

त्यांनतर सहज तेजश्री प्रधान दिसली म्हणून uncomfortable बघितली , मस्तेय, आवडली. मला खूप तिटकारा येतो अश्या माणसांचा.

https://youtu.be/ge6HYyZylO0

हल्ली लोकांना रेप झाला यापेक्षा रेपिस्ट व व्हिक्टिम यांची जात, धर्म यात इंटरेस्ट असतो. >>> एग्झ्याक्टली. रेप ही एक मानसिकता आहे, कपडे, वय, पत याचा त्याच्याशी सम्बन्ध नसतो. जे लोक तावा तावाने बोलायला जातात कपडे, लाईफ स्टाईल वर बोलतात त्यान्च्या साठी चपराक आहे ही. तुम्हाला फिल्म चा मुद्दा कळाला नाही.. दुर्दैव आहे.

रेप ही एक मानसिकता आहे, कपडे, वय, पत याचा त्याच्याशी सम्बन्ध नसतो >>> अगदी अगदी, शेवटी ती छोटी मुलगी येते तो सीन तर खोल रुतला आत.

देवी पाहिली.एकदा फिल्म म्हणून एकदा जॅबी कोए रिएक्शन्स मध्ये.
भिडली.यात बरेच स्टीरिओटाइप्स आहेत.आणि तरीही भिडली.
फोर सुद्धा पाहिली.शॉर्ट फिल्म बाबत रॉयल्टी असते का माहीत नाही, पण फिल्म च्या शेवटी प्रेरणा म्हणून फोर चा उल्लेख करायला हरकत नव्हती.(आणि फिल्म बनवण्या
पूर्वी रीतसर परवानगी/कॉपीराईट वापरायला पैसे देणे वगैरे)
फोर ने ज्या कल्पनेचं प्रत्यक्ष तारखा आणि उल्लेख करून बी रोवलं त्याचा देवी ने अप्रत्यक्ष उल्लेख, श्रीमंत स्पॉन्सर, प्रसिद्ध चेहरे,पार्श्वसंगीत आणि जास्त अंगावर येणारी कल्पना बनवून फळाचं झाड केलं.मी दोन्हीना श्रेय देईन.

स्पॉयलर अलर्ट

ज्या सिम्बॉलीक जागी त्या बाया आहेत आणि ज्या प्रकारे त्या अगदी नेहमीचं एखाद्या खोलीत आपापले उद्योग करून टाईमपास करत दिवस घालवतायत ते जास्त अंगावर येणारं आहे.

अनु फोरची लिंक दे ना. मी सनव यांची लिंक आत्ता बघितली, तिथे शॉर्ट फिल्म लिंक आहे का, ती ओपन होत नाहीये. युट्युबवर आहे का फोर.

त्यावरुन घेतली असेल तर श्रेय द्यायला हवं होतं.

फोरपण सुन्न करेल मला, तरी बघावीशी वाटतेय.

https://www.youtube.com/watch?v=jsF6VSBCq-o >>> फोर.

बघितली, सॉलिड आहे, पाच मिनिटांची आहे पण थेट अगदी नावांसहीत. ह्यावरुन देवी घेतल्यासारखी वाटते, क्रेडीट द्यायला हवं होतं.

मला दोन्ही सुन्न करुन गेल्या, भिडल्या. शेवट फोरचा माय गॉड, अंगावर आला. देवीमधे जास्त केसेस समाविष्ट केल्यात.

अनु तुझी दोन्ही फिल्मसबद्दलची पोस्ट चांगली आहे.

युट्युब आता मला ह्या विषयावरच्या अजून शॉर्टफिल्म सजेस्ट करतंय, दोन बघितल्या म्हणून. आता नाही डेरींग, खुप त्रास होतो मला. आपल्याला एवढा बघून त्रास होतो तर ज्या त्यातून गेल्यात त्यांच्या त्रासाची कल्पनाच करु शकत नाही, काटा येतोय अंगावर.

स्पॉयलर अलर्ट

देवी मधे कुठलीच स्त्री सुरक्षित नाही अस दाखवायचा प्रयत्न केलाय अस वाटल.
मुकी, वयस्क, करिअर ओरिएँटेड, गृहीणी, बुरखा घातलेला असो वा शॉर्ट्स घातलेली. कुणीच नाही. शेवटी लहानगी पोरसुद्धा. मरणानंतर वरती या पिडीतांसाठी वेगळी जागा आहे पण खाली रेप होण काही केल्या थांबत नाही.. ती जागा सर्वांना कमी पडतीये म्हणून "माझ्याएवढा त्रास तुला झाला नाही" हे दाखवुन पुन्हा त्या "सुरक्षित" वाटणाऱ्या खोलीबाहेरच्या जगापासुन स्वतःला वाचवण्याची केविलवाणी धडपड.

अनु, बदल केला.

फोर बघितली.. देवीपेक्षा मुवी म्हणुन चांगली आणि वास्तव म्हणुन भीषण..

सनव यांच्याशी सहमत.
देवी काय किंवा फोर काय नि:संशय चांगल्या शॉफि आहेत पण अशा कितीक अजूनही बनल्या तरी ही विचारसरणी बदलणे मला नाही वाटत शक्य आहे. एव्हर. यातून आपल्यासारख्यांना वेदना होतात फक्त, 'ती विचारसरणी' जैसे थेच असते.
रेप केल्याचा परिणाम म्हणजे आपले "ताबडतोब" "मरण" हे मनावर कोरलं गेलं तरच रेप थांबतील. बाकी स्त्रिया भोगवस्तू नाहीत, तिला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे आणि इतर रेप रिलेटेड सर्व मुद्दे वगैरे 'त्या विचारसरणीला' त्यांच्या आणि आपल्या हयातीत कळणे निव्वळ अशक्य आहे हे अ‍ॅक्सेप्ट करणं आणि त्यात जास्त वेळ, रिसोर्सेस न घालवता एखाद्या रेपिस्टचा पोस्ट-रेप/आफ्टर द रेप अटक ते फाशी हा मानसिक, शारिरिक सामाजिक प्रवास डिटेलमध्ये दाखवणार्‍या शॉर्ट फिल्म्स बनल्या पाहिजेत असं वाटतं. आतापर्यंत सोच बदला, दृष्टी बदला असं ठासून सांगणार्‍या सिनेमे/शॉफि वगैरे बनल्या आहेतच की, पण रेपच्या बातम्यांचा ओघ कमी झालाय असं वाटत नाही.

पटलं वर्षा
13 रिझन्स व्हाय मध्ये(योगायोगाने) कॉलेज च्या दोन बुलीज ना आणि रेपिस्ट ना शेवटी गंभीर परिणाम भोगावे लागलेले दाखवलं आहे.
आपल्या इथे रेप/व्हिकटीम ची वाईट अवस्था/समाज जागृती यावर भरपूर शॉर्ट फिल्म्स बनतायत.त्या पाहून मनावर परिमाण होणारा वर्ग आधीच सभ्य आणि स्त्रियांवर रेप न करणारा(बहुतांश) आहे.

वर्षा लिंक पुर्ण बघावीशीच वाटली नाही. जिथ रेपला "कल्चर" म्हटले आहे. यातच बुरसटलेली विचारसरणी दिसुन येते.

डोळ्यात पाणी आणणारी शॉर्टफिल्म.. देवी. शहारे उभे राहिले शेवटी. खूप परिणामकारक. २ दिवस सुन्न होतं "माणूस"

देवी बघितली, नि:शब्द.>>>> +१

मीही बघते jaby koay च्या reactions!

मला कायम एक प्रश्न पडतो..या rapists ला वकील वाचवायचा प्रयत्न का करतात???? कुठून येतात हे असले लोक?? सरळ फासावर का देत नाही rapists ला??

मला कायम एक प्रश्न पडतो..या rapists ला वकील वाचवायचा प्रयत्न का करतात???? कुठून येतात हे असले लोक??
ती लोकं प्रोफेशन म्हणून हे काम करतात. कदाचित बरेच जण मनापासून करत नसतील. पण काही वकिल जर गुन्हेगार बडी असामी असेल तर त्यांना यातून बरीच मोठी फी काढता येईल या आशेनेही काम करत असतील. जर गुन्हेगार दोषी म्हणून आत गेला किंवा फासावर लटकला तरी यांची बर्‍यापैकी कमाई होत असेल आणि जर निर्दोष सुटलाच तर या बड्या असामीच्या खास गोटात प्रवेश मिळतो. त्यामुळे दोन्ही कडून फायदा असतो.

तसेही आपल्या भारतीय कायद्यानुसार दोषी व्यक्तीलाही आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो. त्यामुळे कोणीना कोणी यांची वकिली करावीच लागते.

असे असले तरीही स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून अशा नीच कृत्याबद्दल त्या आरोपीला asap मृत्युदंड द्यायला हवा..at least त्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा देण्यास उशीर करू नये कोर्टाने.

Pages