शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक्सचेंज ऑफर ( हिंदी)
निवृत्त मुख्याध्यापक - जुना संगणक ते नवा संगणक - कसाबसा स्वीकारलेला बदल - इच्छा नसताना लादलेले फेसबुक सदस्यत्व - माजी विद्यार्थ्यांची अकस्मात भेट - आणि . . .
सुखद शेवट पण आनंदाश्रू आणणारा .

अप्रतिम - अप्रतिम - अप्रतिम !

एम के रैना : अविस्मरणीय भूमिकेत.
https://www.youtube.com/watch?v=EqCLjvxKPko

डॉक्ट्रर , ही फिल्म. मस्तच आहे. अ‍ॅक्टींग तर मस्त आहेच, पण विषयही छान आहे. रिलेट करू शकले. इथे लिहिल्याबद्दल आभार.

डॉक्टर, RE-TREAT (हिन्दी) पाहीली. हिपण आवडली. विषय तर छान आहेच पण अ‍ॅक्टींग सगळ्यांनी सहज केलं आहे. अ‍ॅक्टींग वाटतच नाही.

नुकताच तू नळीवर the bypass नावाची शॉर्ट फिल्म पाहिली. कलाकार आवडीचे आणि जुनी फिल्म आहे. नवाज आणि माझा अत्यंत आवडता अभिनेता इरफान खान (दुर्देवाने तो आता आपल्यात नाही...) एकही डायलॉग नसून सुद्धा खूप परिणाम करते फिल्म. ही मंडळी कित्येक वर्षांपासून छोटे मोठे रोल करत तावून सुलाखून इथपर्यंत पोचली आहेत असं एकदम मनात आलं. त्यांचं कुठलं काम गाजलं की मग आपण त्यांना ओळखायला लागतो पण त्याच्या कितीतरी आधीपासून या लोकांनी मेहनत घेतलेली आहे.

इथे आधी टाकलंय का माहीत नाही.
पण मायबोलीकर धुंद रवी ने लिहिलेली आणि मायबोलीकर सायलीने दिग्दर्शित केलेली शॉर्ट फिल्म वरवंटा:
https://youtu.be/pwipcZhwG40?feature=shared

सायलीला national women's right commission तर्फे उपराष्ट्रपतींच्या हस्ते बक्षीस मिळालेले.

सासूच्या भूमिकेत माझी आई आहे. Happy

हाँटिंग paahilee. कैच्याकैच वाटली. भुवनेश्वरला बहिण म्हणते तु रिलसाठी मला मारलेस (असे मला ऐकु आले). त्यामुळे त्या भुताने त्रास देणे समजु shakate. त्याने नंतर झाड सोडले बहुतेक Happy

नंतरची दोन भुते उगीचच… पोलिस कोठडीतील भुत तर अतीच. उगीचच माध्यम मिळाले म्हणुन मारायचे काय??

मौश आवडली, छान दिसते, कामही छान. पण संवाद निट ऐकु आले नाहीत. शेवटी चप्शन्स ऑन करुन काय बोलताहेत ते वाचायचा प्रयत्न केला.

Love by chance
छान आहे
मजा आली

Disconnect (हिंदी)

https://www.youtube.com/watch?v=s9KNJu98YaU

मोबाईलमुळे बदललेले कौटुंबिक जीवन. मांडणी सुंदर !
लघुपट संपताना मोबाईलपूर्व काळातली जी समाजदृश्ये दाखवली आहेत ती अप्रतिम.

गिरीश ओक आजोबांच्या समंजस भूमिकेत.

अपरिचित (हिंदी)
आपल्याला फक्त फेसबुकी मैत्री हवी आहे की प्रत्यक्ष माणसांना भेटण्यात रस आहे ?

शिशिर शर्मा चांगल्या भूमिकेत
https://www.youtube.com/watch?v=sbMkZSHA5UY

गजरा
खऱ्या सुगंधाचा अर्थ . . .
मोलकरणीच्या भूमिकेत मयुरी मोहिते यांचा सुंदर अभिनय !

https://www.youtube.com/watch?v=EdRa-3sqVqI&t=1s

Tungrus
A family, a cramped apartment, and a problematic pet rooster | Tungrus
https://www.youtube.com/watch?v=4BzwEo51-mw
अनेक फिल्म फेस्टिवल्स मध्ये नावाजलेला.

रीलबाज
‘रील’पाई वेडी झालेली तरुणाई.
विषय चांगला मांडला आहे.
आधुनिक मराठी ग्रामीण ठसका मस्तच.
चित्रीकरण नेत्रसुखद

‘रील’ नको आता रिअलच . . .
हा शेवटही सुंदर.

https://www.youtube.com/watch?v=zGsBOt-dfxA

JANGLE BELLS ( हिंदी
तो . . . ती . . . .
आणि
हिंदी चित्रपट गीतांद्वारा झालेला मुख्य संवाद आणि गोड शेवट !
मस्त हलकाफुलका . . .

https://www.youtube.com/watch?v=xqBykBIKdBA

कुमारसर , भरपूर खजिना दिलात की हो. सावकाश बघते.

निरु, छान होती. फक्त बघायला. अशी कोणी सहप्रवासी भेटली असती तर इतका coolness अजिबात दाखवला गेला नसता.
तिच्याबद्दलचा राग हळुहळू निवळत जातो ते त्याच्या coolness ने.

Pages