नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तानिया बुर्झ्वा असाकाहीतरी क्लिष्ट आयडी घेतला असता इथे तर बेफिकिर लोकांच्या उड्या पडल्या असत्या आयडी विपूत! Lol

>> बुर्झ्वा

बुर्ज्वा??? Happy

आता टण्या काय म्हणतो ह्याबद्दल उत्सुकता!

नातीचरामी बद्दल मात्र ट्युलिप, तान्या (बेडेकर) अशा मॉडर्न नावांच्या लोकांमधली त्या पुस्तकाची लोकप्रियता बघून आपणही मागे पडू नये म्हणून मी तडक जाऊन खरेदी केलं ते पुस्तक आणि त्याच स्पीडने वाचूनही काढलं.

टण्याची "मदर डाइड...." पोस्ट अजूनही लक्षात आहे.

टण्याची "मदर डाइड...." पोस्ट अजूनही लक्षात आहे.
>>>
हाहाहा.
तेव्हा दोन गैरसमज होते स्वतःबाबत. एक म्हणजे आपण बरेच वाचले आहे (बरेच वाचायचे आहे हा बरोबर समज पण होता).
आणि दुसरा म्हणजे पैसे मिळू लागले की खूप पुस्तके विकत घेऊन खूप वाचता येते.

त्यातले विकत घेता येतात हाच पार्ट फक्त बरोबर आहे हे उशिरा समजले.

शनिवारी लायब्रीत फारच भावूक झाल्याने The philosophy and literature of existentialism हे पुस्तक घेऊन आलो. आताशा एक पान वाचून व्हायच्या आता बायकोचा आवाज कानी आदळतो: "शंतनू, घोरू नकोस"

अत्याचार कसले हो बुवा. तुम्ही वाचलं का नातीचरामी? मला तर नक्कीच खूप काय काय नवीन कळलं ते पुस्तक वाचल्यामुळे. माझा मॉडर्नायजेशन चा उद्देश सफल झाला नक्कीच. Happy

>> आताशा एक पान वाचून व्हायच्या आत

आकाश बडा बूढा बाबा सबको कुछ बाँटके जाता है, जाता है

हे लेकीन मधलं गाणं आठवलं ही दास्तान वाचून.

टण्याच्या वरील काही पोस्टींवरनं तो आता कुठल्यातरी युटोपियात बाहेर पडून माणसात आल्याचे दिसते आहे. त्यात टणीचा सहभाग मोलाचा असावा Proud

युटोपियात बाहेर पडून माणसात >> त्याने (हे हंबलब्रॅग) मी सुचवलेला झोर्बा द ग्रीक मधला कोट(*) बदलून वपुंची करंजी आणली आहे प्रोफाइल मधे. त्यावरूनही हेच वाटले. त्याने ती उपहासाने लिहीली असेल पण त्याला "फार सुंदर विचार आहेत" म्हणून दोन तीन विपु नक्की येतील याची पूर्वसूचना देतो.

(*)
"and you? (are you married?)"
"no. I am single
"Ah! I guess too many books" Happy

लोल फा.

Tourists don't know where they've been, travelers don't know where they're going

>> हे "लॉस्ट" पाहून लिहिलेले दिसते.

Marriage has many woes, but celibacy has no joys

>> फारच सुंदर. हा अनुभव अन चहा पिणे म्हणजे ग्रेटच.

वपु काळेंची करंजी कथा:

नवरा बायकोचं नातं हे करंजीसारखं असावं. गोड आणि खुसखुशीत.
नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण!!
संसारात कितीही अडच्णी आल्या तरी ते बाहेरील आवरनानं झेलायचे.
मनस्तापाचं काटेरी चाक स्वतःच्या अंगावर फिरवून घ्यायचं.
तापल्या तुपात स्वतःला पोळून घ्यायचं, मात्र कुठेही आतल्या सारणाला धक्का लागता कामा नये,
सारण अबाधित राहिलं पाहिजे तरच गोड करंजी खायला मिळते.
अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात नवरा बायकोचं नातं एवढ्या ताकदीने उभ्म करणारे आणि संसार सुखी करण्याचे मंत्र देणारे वपु ग्रेटच

Lol

तो टुरिस्ट वाला कोट पॉल थेरोच्या पुस्ताकत वाचला होता

वपु कथा कर्टसी सिंद्ररेला. ती मला नेमाने वपुकथा पुरवते

टण्याच्या वरील काही पोस्टींवरनं तो आता कुठल्यातरी युटोपियात बाहेर पडून माणसात आल्याचे दिसते आहे. त्यात टणीचा सहभाग मोलाचा असावा
>>>
टणीचं कसलं श्रेय. कामाचा व्याप मागे लागला हे एक आणि फिक्शन वाचणे बंद केले हे दोन.

फा, तो झोर्बा कोट मी प्रिन्ट करून कराडला असताना फ्लॅटच्या दारावर लावला होता. तो फारच भारी आहे

शूम्पी, Lol

>> आज इथे नुसती टणाटण सुरू आहे तर.

भास्कराचार्य, एका वेगळ्या काँटेक्स्ट मध्ये असं एक सिमीलर डिस्कशन झालं होतं इथल्या एका वाहत्या बीबीवर. चर्चेत आलेल्या "टणाटण" सारख्या समानार्थी अनेक शब्दांमधला "टणत्कार" हा एक शब्द पक्का लक्षात आहे माझ्या. बाकीचे विसरायला झाले ( तुमचा व्यासंग काय सांगतो? ;))

ओके, आठवलं. बहुतेक "टण्याने संपादीत/प्रकाशीत केलेल्या दिवाळी अंकाला समर्पक नाव" अशी काहितरी चर्चा सुरू होती बहुतेक.

टण्याबद्दल 'नेमाडे ते वपु... एक साहित्यिक प्रवास' असा खेळ ठेवा. त्यात आत्तापर्यंतची टण्याची बहुमोल वचने, नतिचरामीवर त्यानं घातलेले वाद, टचेआले वर त्याची(च) परीक्षा वगैरे गोष्टी ठेवता येतील.

शूम्पी, टण्याची अवस्था त्रिशंकू आहे. मनातून युटोपिया सोडवत नाही, पण तनाने तो बाहेर आला आहे, ह्या लटकण्याचे ते द्योतक असावे.

वा वा! ह्यानिमीत्ताने शोध लागला की जुनी मायबोली क्रोमवरही व्यवस्थित दिसते!! Happy

पूर्णपणे नाही. बहुतेक एक टॅग दिसतो (शिवाजी की TS1 ह्याची उत्सुकता लागली). दुसरा जिबरीश.

Pages