नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार, "मायबोलीवर ट्रम्प" हे चित्र तू रंगव, रम्य किंवा तुला हवं तसं Wink (असामी मदत करेल नक्की? ;))

चित्राची खासियत अशी असेल की रंग भरताना ते लाईन्स च्या आत हवेतच असा अजिबात आग्रह नाही???

ही जी कोण आहे लाडीक तक्रारी करणारी (जी मागे लिबर्टी आयलंड मध्ये उभी होती) ती एन्जे तल्या सर्व बुवांची (पक्षी: बुवा, केदार तात्या) ह्यांची सखी दिसते!

आयला गटग नार्थिस्ट्चं अन नार्थवेस्टं वाले धुमाकूळ घालून राहिलेत. निस्ता बायपार्टीसन दंगा सुरु आहे! Lol
हे मला वाटतं शोनूनी पार फ्येडेक्सनी सोन्याच्या अक्षता कुडं कुडं धाडल्यात त्यामुळे झालेलं दिसतय. घेतल्या अक्षतांना जागायला पाहिजे म्हणून नाय फिजिकली जमत तर लोकं पौष्टिक रुपानी हजेरी लावून परतफेड करत आहेत! Lol

मेल्यांनो, माझ्या घरी गट्ग होतं तेव्हा सगळीकडं दवंडी दिली होती तरी ३०० च्या वर पोस्टी अन १५ च्यावर मान्सं पण नव्हती आली. तेव्हा कुडं गेली होतं तुमचं बायपार्टिसन स्पिरिट? बाय लॅटरली म्हण्जे उभं आडवं धोपाटलं पाहिजे तुम्हा सगळ्यांना!
Lol

बुवांच्यातला ह्युमन जागा झाला!!! Lol

बुवा, आम्ही दंगा घालायला रेडी असतो हां, उगीच बोलायचं काम न्हाई. दंग्यासाठी कधीपन कायपन!

आनि हो आम्ही कुटले पन भेदभाव करत नाही नविन चुकीचा किनारा, अचूक किनारा, नॉर्थीस्ट, नॉर्थ्वेस्ट, इस्ट, वेस्ट, आइल च्या अलिकडे/पलिकडे वगैरे वगैरे !!!

बुवा आता "बीइंग ह्युमन" झालेती. सलमान टाइप धोपटा बुवा, मी पाठी तुमचा शर्ट घेऊन उभा आहे (म्हणजे धोपटला जाणार नाही).

हो. जिथे बायपार्टिसान अन्याय दिसला तिथे धोपटणे चालू. मग आपली किंवा परकी पार्टी काही बघणार नाही. म्हणूनच मी मागे उभा सुरक्षित अंतरावर. Proud

बजरंगी बुवाजान .................. दर्शन घ्यायला पाहिजे तुमचे ................. Happy

बजरंगी बुवाजान Lol

टण्या Lol तुमच्यात कात्रज केला म्हणतात तसा माझा चांगलाच क्रुज केला माझ्याच भरवश्याच्या म्हैशी... आपलं मैत्र मैत्रिणींनी. Lol

अरे टाळकी नक्की करा बरं का! ह्या विकेंडच्या आसपास बस बूक करुन टाकेन.

सध्याचा काऊंट
मी, मै, सायो, बाई(३), सिंडरेला, अरुण, भाचा, भाई, देसाई, वृंदाताई, एबाबा, बाईमाणूस(३) ?

सध्या तरी १२-१५ लोकं फिक्सं दिसत आहेत. एन वेळेस टांग मारु नका, बळच मला ती येवढी मोठी बस हाकत घेऊन जावी लागेल अन आतल्या प्याशिंजरांचं उगाच पोक्कळ करंजीतलं खुळखुळं सारण होईल. Lol

अरुण, दर्शन मोफत आहे, फक्त यायचं नक्की करा. Happy आणि हो, तुमचे किती मेंबरं तेही सांगा.

मी अगदी तेच लिहायला आलो होतो. सशल अगदी ह्या गटग ची Emcee शोभेल इतका वावर आहे इथे सध्या. तूच काय तो बंदोबस्तं कर बॉ आता ह्या सगळ्या आयटमांचा. आयटम म्हणजे जिन्नस ह्या अर्थानी बाकी काही नाही.
Lol

बळच मला ती येवढी मोठी बस हाकत घेऊन जावी लागेल अन आतल्या प्याशिंजरांचं उगाच पोक्कळ करंजीतलं खुळखुळं सारण होईल. >> Lol

बुवा, कितीही ट्रॅफीक जॅम वगैरे लागला तरी फ्रस्टेशनचं काटेरी चाक स्वतःच्या अंगावरुन फिरवून संयमाने ड्राइव्ह करा, पण बशीतल्या सारणाला धक्का लागून देउ नका Proud

Pages