काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

BTW विकीविरुद्ध पोलीस कम्प्लेंट कोणीच केलेली नाही दिसत ना मोजो यांनी ना वेणुने.>>> शिवने केली आहे. तो कुठल्याश्या एपिसोडात वेणूला म्हणाला तस.

थंडाक्का Lol

का रे जळता त्या गवरीवर. शिवसोबत काम करते व त्याची हिरवीण आहे म्हणुन इथे वखारच पेटलीय की. Proud

का रे जळता त्या गवरीवर. शिवसोबत काम करते व त्याची हिरवीण आहे म्हणुन इथे वखारच पेटलीय की............+1111111111

का रे जळता त्या गवरीवर. शिवसोबत काम करते व त्याची हिरवीण आहे म्हणुन इथे वखारच पेटलीय की............+1111111111

विठ्ठल Lol कोणाला ही विमी आठवते का हमराज (जुना) मधली. हिला पण लोक पुतळीच म्हणायचे, कारण चेहेर्‍यावर भावच नसायचे.Vimi (1).jpeg

एक फ्लेक्स बनवलं पाहिजे..
शिव-दाजी, तुमच्यासाठी काय पन,
काल पन, आज पन आनि उद्या पन !

हिम्स Proud सुरूवातीलाच नव्हतं का म्हटलं, मालिका बघणार आणि 'तेरी कह के लूंगा' स्टाईल कमेंटस करणार Proud

पण मनातल्या मनात १०० आकडे मोजायला सुरूवात केली आहे ऑलरेडी Sad

सिरीयसली!
पोलिसात जावं असं कुणालाच वाटू नये?? अगदी गौरीच्या भावालाही? पैश्यांचं जाऊ द्या, विकीला पैसे दिल्याचं प्रूफ नसेल यांच्याकडे, पण आख्खी स्कूटर गेली चोरीला, तरी...?

२-३ एपिसोडसमधे विकीच्या लांड्यालबाड्या प्रेक्षकांसमोर धबधब्यासारख्या उघड केल्यायत...
सुरूवातीला मला वाटलं होतं, की शिव गौरीच्या भावाला विश्वासात घेऊन चतुरपणे विकीची बनवाबनवी उघडकीस आणताना दाखवतील. त्यामुळे भावालाही जरा फुटेज मिळालं असतं; शिवाय सावंतांची शिवबद्दलची 'संशय/विश्वास' अशी दोलायमान अवस्था दाखवताना लेखक-दिग्दर्शकाला भरपूर स्पेस मिळाली असती.

काल गौरी परत ऑफिसमधून अचानक निघाली Uhoh
शिव पण काम सोडून मिटिंगमधे हजर. सोसायटीची मीटिंग कामाच्या दिवशी घेतात का कधी? Uhoh बहुतेक ठिकाणी रविवारीच असते.

बर्याच मूव्हीज मधे पण असे पॉईंट्स सापडतात..

जाउ दे झाल ..
डोकं बाजुला ठेउन बघायच..
..
..
...

शिव् ला.:)

मी सध्या ही एकच सिरियल बघत आहे..
कारेदु, होणार सुन पेक्षा बरी वाटत आहे.. त्या बघवतही नव्हत्या ..

ललिता-प्रितीच लक्ष टवकापेक्षा मालिकेतील उडालेल्या टवक्यांकडे जास्त आहे.
पोलिस कंप्लेंट का करत नाहित हा मोठाच प्रश्न. स्कूट्र, बेअरर चेक्स, दागिने... च्यायला सावंतांकडे पैशाचं झाड आहे तर तसंही नाही. आणि ती गौरी प्रत्येकाशीच मराठी का झाडते हे अनाकलनीय.

इथे रविवारी ठेवली तरी मीटींगला लोक नाही येत आणि मधल्या वारी आड वेळी बरे लोक सावंतानी बोलावल्यावर आले ? गवरी अज्ज्बातचं भावना दाखवत नाही, आता प्रेमात पडत्ये तर जरा डोळ्यात भाव यावेत , अगदी मितु नाही पण थोडतरी प्रेम दिसावं. "शिव" आणि तिचं ऑफीस जवळ आहे का ?

ती गौरी प्रत्येकाशीच मराठी का झाडते हे अनाकलनीय>>>>>>>>>>>>
हो खरच.. ती आणि सगळे बाकीचे मराठी लोक सुद्धा..

आमच्या ऑफिसमधे एक नॉर्थ ईंडियन मुलगी आत्ताच जॉइन झाली.. तिला मराठी अगदीच काहिच समजत नाही..

मग आम्ही ग्रुप मधे बोलताना मराठी आपोआप येते पण मग ती आहे तर तिला समजाव म्हणुन हिंदी मधे बोलतो..

तिच्याशी एकटीशी बोलताना तर हिंदीच बोलाव लागत..

कधी एखाद्या वेळी मिटिंग ट्रेनिंग च्या वेळी.. लोक भर्पुर भर्भर
मराठी बोलु लागले तर तिला काहिच समजत नाही..

शिव ला बघितलेकी तिचिच आठवण येते

माय्बोलि वर टाय्पिंग चा खुप प्रॉब्लेम येत आहे

अरे मी इथे आधीच सांगितलं डायरेक्टर अजय मयेकर आहेत जास्त अपेक्षा ठेऊ नका तरी ठेवताय अपेक्षा. कलर्सवरची कमला उत्तम उदाहरण आहे, इथे यायच्या थोडे दिवस आधीपर्यंत ते डायरेक्टर होते तिथे. मी बघत नाही, सुरुवातीला १५ दिवस बघितली आणि डिसेंबर-जानेवारीत कधीतरी एकदा थोडा वेळ लावली तेव्हा हेच डायरेक्टर होते, बकवास सिरीयल. नवराच म्हणाला एका वर्षापूर्वी होती तिथेच आहे अजून सिरीयल आणि आम्ही टीव्ही बंद केला. अवांतर पण मयेकरांसाठी लिहिली हि पोस्ट.

प्रत्येकाशीच मराठी का झाडते हे अनाकलनीय>>>>>>>>>>>>
हो खरच.. ती आणि सगळे बाकीचे मराठी लोक सुद्धा..>>
हिंदीत बोलायला लागले तर मराठी सिरीयलमधे सारखे हिंदीच बोलतात म्हणुन अस्मिता भडकतील ना.

बाकी काय म्हणा, शिवचा एवढा धावा पार्वतीते\रावणाने पण केला नसेल. Proud

आमच्या ऑफिसमधे एक नॉर्थ ईंडियन मुलगी आत्ताच जॉइन झाली.. तिला मराठी अगदीच काहिच समजत नाही..

मग आम्ही ग्रुप मधे बोलताना मराठी आपोआप येते पण मग ती आहे तर तिला समजाव म्हणुन हिंदी मधे बोलतो..

तिच्याशी एकटीशी बोलताना तर हिंदीच बोलाव लागत..

कधी एखाद्या वेळी मिटिंग ट्रेनिंग च्या वेळी.. लोक भर्पुर भर्भर
मराठी बोलु लागले तर तिला काहिच समजत नाही..>>>

ती मुलगी नॉर्थमधून आताच आली आहे की महाराष्ट्रात आधीपासून राहिलेली आहे? तिच्याशी बोलताना तिला कळेल असं बोलणं योग्य पण केवळ तिच्यासाठी सगळ्या ग्रुपने आपली भाषा बदलली तर तेही जरा टू मच आहे.
अशाने ते लोक कधीच मराठी शिकणार नाहीत (जर त्यांच्या कानावरच पडलं नाही तर कसे शिकतील?)

Pages