काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Blush Blush ह्मार शिवजी !!

या मुली वाईट्ट आहेत तुला दाखवत नाहियेत ना त्या शिवचा फोटु डोळा मारा >>> हो ना आपण त्यांना बाया म्ह्णु Biggrin

आय्यो गुब्बे भारी ग, फोटूसाठी. वाईटसाईट म्हणण्यासाठी नाय.

क्लिओ, वा बाया नाय म्हणायचं ;).

झी मराठीला काय झालंय?
इकडे गवरी ऑर्डिनरी दिसते. तिकडे ते नांदा सौख्यभरे पहात होते त्यातही हिरो इंद्रनील एकदम देखणा आणि हिरॉईन कैच्याकै सामान्य दिसते. तिच्यापेक्षा तिची मोठी बहिण जरा नायिका वाटते तरी.

मी काय म्ह्णतेय मुलींनो... आपण हेडर मध्ये शिवचा गवरी सोबतचाच फोटु लावणे क्म्पलसरी आहे काय?
एक्ट्याचाच लावु ना? Proud

राहुदे ती. आपल्याला आवडत नसली तरी ती त्याची नायिका आहे, हे सिरीयल सत्य आहे. त्याला बघायचं तर तिला सहन करावं लागणार.

इथे शिवचे भक्तगण मोठ्या संख्येने दिसत आहेत.

शिवची उंची चांगली आहे पण फारच बारीक आहे.
त्याचे लूक्स व्हिलनीश नाही वाटत का कुणाला ? म्हणजे ह्या मालिकेत तो व्हिलन नाही वाटत कारण त्याचं काम तसं नाहीये पण व्हीलनचे रोल्स सुद्धा चांगले करेल असं वाटलं.
अभिनय मात्र नक्कीच खूप चांगला आहे आणि 'अ‍ॅंग्री यंग मॅन'ची भूमिका छान सूट होतेय त्याला.

मला angry young man वाटतो पण व्हिलनिश नाही वाटत.

थोडा अंगाने भरायला हवा असं वाटतं मात्र. उंचीच्या मानाने फार बारीक वाटतो.

मनाली छान केलयंस. Happy

शिव एका हिंदी सिरियलीत व्हिलनच होता आधी. मी एखाद दोनवेळा पाहिली होती.

आता सनव का लाजतेय?? बदामांच्या बोटीत चढली की काय गुपचुप?? Uhoh Wink

शिव एका हिंदी सिरियलीत व्हिलनच होता आधी. मी एखाद दोनवेळा पाहिली होती. >>> हो ना !
मी हे वरचं विधान कुठलाही गुगलसर्च न करता केलं होतं. पहिल्यांदा मालिकेच्या प्रोमोत पाहिल्यापासूनच तो व्हिलनचं काम चांगलं करेल असं वाटत आलंय Happy

मो.जो. नी एक सही मारला
शु. गो सांगते की त्यांच्या सुनेला चक्कर आलीय आणि नचिकेत तिचे हात पाय चोळतोय तर मोजो म्हणाले हे बाकी बरोबर जमतं त्याला Lol

ती मितू फार डोक्यात जाते.

ऑफिसमध्ये आल्यावर एक फाईल घेऊन आतमध्ये गेलं आणि लगेच बाहेर आले की दोन वाजतात लंच अवर होतो. मस्त आहे ऑफिस.

रिक्षेत मी शिवकडेच बघत होते, गौरीकडे लक्ष नाही दिले, तो रिक्षावाला हिंदीत भाषांतर करत होता पण हि काही हिंदीत बोलली नाही, भाजीवाल्यांशी बरी बोलत होती मागे हिंदीतून. मराठीत सर्वांशीच बोलत असती तर अस्मिता वगैरे मराठीची समजू शकतो. त्याच्यावर काव काव करते, मग सांग तरी त्याला काय बोलतेस ते. हा पण उगाच तिच्या पाठीमागे, कशाला भाव देतो तिला.

Pages