काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथेच कुणीतरी म्हणल्याप्रमाणे नायिका निवेदिता जोशी सारखी वाटली मला पण. बाकी झीच्या सिरीयलीचे नायक नायिकेपेक्षा छान असतात. श्री, आदित्य, नील. पण ह्या सिरीयलमधे नायिका नायकापेक्षा जास्त छान आहे.

शीर्षक हिंदी का आहे बरं?
का दिले परगावी चाललं असत ना? Happy

काय वाटत आतापर्यंतचा सर्वात टवका , सुंदर नायक नायिका कोण ( मराठी मालिकांमधे ) ? >>>> आदित्य देसाई.

इथेच कुणीतरी म्हणल्याप्रमाणे नायिका निवेदिता जोशी सारखी वाटली मला >>>> हो हो हसते तेव्हा तिच्यासारख दिसते ती.

मुग्धा +१००००००००००००००००००००००

मला तर बसस्टॉपवर जानुबै ची वाट बघणारा श्री आवडायचा.
नंतर तो वैतागल्यासारखा वाटायचा.
आदित्य पण मस्त. नील ठीक आहे.

हीरो कसा नसाव त्याचं उदाहरण म्हणजे - पआमु चा नायक वासु. त्यामानाने नायिका बरी आहे.

राया पण लय भारी होता............................................... वासु सारखा.:फिदी:

हीरो कसा नसाव त्याचं उदाहरण म्हणजे - पआमु चा नायक वासु. >>>> पर्फेक्ट ! थापाड्या,पळपुटा नि अभिनयाच्या नावाने शन्ख!!

मृणाल कुलकर्णी : स्वामी , अवंतिका
स्पृहा जोशी : एका लग्नाची..
नेहा पेंडसे : भाग्यलक्ष्मी
यांच्याबद्दल काही आक्षेप नसावा .
आक्षेपार्ह तरीही सुरूवातीची जानूबै

अग सस्मित सध्या नाहीये तो.. इमॅजिन कर किंवा स्वतः ट्राय करुन बघ. अख्ख वाक्य ज्यात आकार, उकार आहेत अस फक्त ओठ हलवुन म्हणायच.. समोरचे दात तेवढे दिसले पाहीजेत...

यांच्याबद्दल काही आक्षेप नसावा . >>>> चांगल्या असण्याबद्दल की वाईट असण्याबद्दल? मृणाल फक्त स्वामीमध्येच आवडली, स्पृहा जोशी नेहमीच आवडते, नेहा पेंडसे बिग नो, सुरुवतीची जानुबै चांगली होती.

सुरूवातीची जानूबै छान होती ओ. उगाच काय.
मृण्मयी - कुंकु
देवयानी- आलपा गट्टु- सुबोध, नायिका नाव माहित नाही. दोघेही मस्त

काय वाटत आतापर्यंतचा सर्वात टवका , सुंदर नायक कोण? (मराठी मालिकांमधे ) >> उमेश कामत. Happy

नायिकांमध्ये स्पृहा जोशी कायमच आवडते. वादळवाट मधली आदिती सारंगधर आवडायची.

राया पण लय भारी होता............................................... वासु सारखा. >> रश्मी, राया अॅक्टींग तरी चांगली करायचा गं. Happy

का दिले परगावी चाललं असत ना? >> Lol

या शिरेलीचा हिरो कुठल्यातरी हिंदी शिरेलीत व्हिलन होता आधी.

उमेश कामत >>> हाsssय. मी खल्लास. असंभव मधे आवडलेला. त्यातल्या दोन्ही नायिका त्याच्यापुढे किझाप.

उमेश कामत सर्वात आवडतो. नायक तसे बरेच आवडतात नवीन, कॅरॅक्टर नावं लिहीते. खाली लिहीलेल्यांव्यतिरीक्त अजुनही आहेत.

आदित्य देसाई.
श्री गोखले.
शेखर देसाई.
सुजय.
आशु.
नील (अग्निहोत्र (सिद्धार्थ चांदेकर) मधला जास्त आवडतो, NSB मधलापण आवडतो).

नायिका कमी आवडतात.

मुक्ता बर्वे सर्वात आवडते. बाकी कॅरॅक्टर नावं लिहीते.

तुझ्याविना आणि असंभव (शुभ्रा) - उर्मिला कानेटकर.
मामतुझा मधली शुभ्रा.
मीनल डी ३

मृण्मयी देशपांडे हिपण आवडते. प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर ह्यापण आवडतात (ह्या दोघी हिंदी सिरीयलमधे होत्या, मराठी नाही).

स्पृहा जोशी उत्तम कविता करते, तिच्या कविता आणि लिखाण फार अप्रतिम असतं त्यामुळे मला अभिनेत्री म्हणून नाही तर कवियत्री म्हणून ती आवडते.

मृणाल कुलकर्णीपेक्षा तिची बहिण मधुरा जास्त आवडायची मला. पण तिने अगदी लिमिटेड काम केलं. तिच्यात एका उत्तम अभिनेत्रीचं पोटेन्शियल होतं. दूरदर्शनवर ती एका मुलाखतीच्या प्रोग्रॅमची anchor होती, तिथेपण आवडली मला. ४०५ आनंदवनमध्ये छान काम केलं.

बाकी अतुल कुलकर्णी, सुनील बर्वे, सुबोध भावे, संदीप कुलकर्णी, वैभव तत्ववादी, मिलिंद गुणाजीपण आवडतात. तसे बरेच आवडतात पण थांबते इथे. Happy

Pages