काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मितू ऑफिसमध्ये गॉगल घालून रडत असते, तेव्हा तिची जीन्स निळ्या रंगाची असते, नंतर कँटीनमध्ये डार्क ग्रे/काळ्या रंगाची असते!
शिव डबा खात असतो तेव्हा मितूच्या चष्म्याची फ्रेम भडक लाल रंगाची असते; नंतर ती गौरीला ’शिव कुठे गेला?’ म्हणून फोन करते तेव्हा चष्म्याची फ्रेम ग्रे/निळी असते...
कंटिन्युटीच्या बैलाचा... !!!! Uhoh

आजच्या एपिसोडची झलक दाखवली, त्यात निशा सासर्‍यांना सुनावत असते... तेव्हाही गौरीचा चेहरा, नजर कोरीच Angry धक्का/राग/भीती/दु:ख काहीच वाटू नये ???

मला वाटत या शिरेलीत सगळ्यांनाच तस सांगितलय की चेहर्‍यावर काहीही भाव आणायचे नाहीत. सुन येवढी तडातडा बोलतेय पण त्यांच्या चेहर्‍यावर सुद्धा राग, धक्का यापैकी काहीच भाव नाहियेत, नुसत्याच नेहमीच्या आठ्या आहेत कपाळाला.

गौरीला पण शिव बरोबर ऑटो मधे असतानाच वहिनी दिसायची गरज होती का?
तो सिन नीट पुर्ण करायचा ना आधी...
शिव मात्र नीट आहे...जेव्हा गौरी म्हणते मी तुला कँटीन मधे बघितलच नाही आणि नंतर म्हणते की
मितू बरोबर जेवत होतास ना.. तेव्हा शिव तिला बरोबर पकडतो आणि मस्त म्हणतो पर आपने तो हमे देखा नही था..

पण संवाद नीट पुर्ण होउ न देता लगेच पुढचा सिन सुरु होतो..

तो बॉस मराठीतून झाडतो, ते शिवला बरोबर कळतं. बाकी मराठी कळत नाही. बहुतेक बॉसचा फोन त्यामुळे तिथेच बोलावलं असणार हे गृहित धरत असावा.

BTW विकीविरुद्ध पोलीस कम्प्लेंट कोणीच केलेली नाही दिसत ना मोजो यांनी ना वेणुने.

मध्ये कोणीतरी बोलले की शुटिंग गोरेगावला आहे.
पण कालच्या एपिमध्ये ठाणाच दिसत होता, उपवन आणि टिमटी होती बहु तेक शुटिंग ठाण्यतच होतेय

मला ही कोरी नजरवाली गोरी प्रेमात पडुन लाजरी गुलाबी गोरी होईल का असा संशयच आहे सध्याच्या तिच्या वावरावरुन.
नुसती वसकत असते. आणि मितु आणि शिवला एकत्र बघुन सरळ निघुन जाते काय? हा एवढा पाठी गॉरीजी गॉरीकी करत येतोय तर? एवढं काय?
तो शिव बरोबर बोलला की आप हैना आपके पिताजी जैसी हो. एकदम करेक्टे.

malaa mojo che character maha irritating waatate. Bagha na, shiv aani venu ne tyanchyaa gouri che aayusha waachawale vicky baddal sangun,pan ithe saadhe tyaana thanks suddha manat naahi ha maanus. Saadhi Shiv ne tyaana namaskaar kele tari tyaachyaa kade dhunkun hi baghat naahi, aani war tyaanchya kadun sute paise hi ghet naahi. mojo la tyaani kelelyaa upkaaraanchi jaanach naahi muli. Aani jehwa baghaawe tehwa lahaan sahaan goshti warun bhaashane jhodaayachi. Shiv barobar bollaa Mojo baddal Rickshaw madye.:राग:

ती गौरी खरच सुंदर आहे . तिच्या त्या अडसुळ्या दातांमुळे हसताना फार सुंदर दिसते . मौशमी चटर्जी पण काहीशा अशाच दातांमुळे सुंदर दिसायची ( कंप्यारीझन नाही ). _मनाली_नी पोस्ट केलेला सायली(गौरी)चा फोटो छान आहे .हेडरमधल्या फोटोतही ती दोघ छान दिसतात .

एल्पी, अजुन एक अ‍ॅडीशन कंटून्युटी बद्दल,
शुक्रवार च्या एपिसोड च्या सुरुवातीला ती वहिनी अग्रीमेंट आनी किल्ली बघत असते तेव्हा सगळे डबे दिसतात हे मो.जो. नी माळ्यावर टाकुन दिले होते त्याच सकाळी Proud

सुलु एकदम correct. पण मला वाटतं की ते character च मुळी तिरसट असाव +१०००००००००००००००००००

Pages