काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर लिहिलं की नाव शिवचं, ते पण नसतं शिरेलीत कधी कधी. पण दुसऱ्यासाठी लेटर लिहिताना लिहायला हवं. नाहीतर घिसापीटा घोळ नेहेमी मूवी, शिरेलीत बघितलेला. नवी आयडियाच नाही.

मग मो जो कधी शिवला बोलले तर तो पत्रच दाखवेल, तुमच्या मुलीने पाठवलं बघा. Lol

नाही .. गोंधळ कालच्या कालच मिटवला..
सांगितल गौरीने की लिहिल मी पण भावना मितुच्या आहेत म्हणुन

मितुने पण वेणु ला सांगितल की मी शिवला पत्र लिहिल तो मला आवडतो म्हणुन

हो अरे वा, आनंदी थांकू.

सिरीयलवाल्यांनी चक्क मिटवला घोळ. मला वाटलं लांबवणार एक आठवडा तरी.

एन ए एन ए ची टि ए एन जी त्या मितुची. नुसतीच फताडी नाही तर फदुकली पण आहे. एक तर बुटक बैंगण त्यातुन हॅरम्स घालते. आता त्या शिवसमोर अरेबीयन डान्स पण कर म्हणावे.:खोखो:

अरी बबुआ ई का हुई गवां? ई बाफ तो सरकते सरकते तिसरे पन्ने पें कैसे आ पहुचां? हमरी समज में तो कुछ नही आवत हय.:अओ: कल वो गवरी जी की भोजाईने बडा हो-हल्ला मचा रखा था. ससुरी अपने पतीकी भी नही सुनती तो बाबुजीकी क्या सुनेगी, लानत है ऐसी लोगोंपर. Shiv.jpg

हमारी अम्मी तो ऐसा कभी बर्दाश्त नही करेगी. मगर इक बात कहूं? आईये जरा कानमें कह देता हूं, वो मितु देखेगी तो बहुत हैरान करेगी हमे.Hello handsome

वेणुजी भी हमारे पिछे पडे है, वो हमे पुछ रहे है के हमारी पसंद क्या है!I don't know

अब आप लोग देखतेही नही तो हम क्या करे?Sad Eyes

सब लोग वो.... क्या नाम है? क्या नाम है? हां, सैराट नाम की फिल्मके पिछे पडे है, हमरी तरफ कोई देखताही नही है. Crybaby

रश्मी, भारीच.

काल बघितला, पण फार इंटरेस्ट वाटत नाही आता, रोज आपलं गौरी काहीना काही कारण काढून ऑफिसातून दुपारी बाहेर पडते. ट्युशन मुलांना बोलावून वाद घालत बसतात. तोच तोच पणा. भाऊ वहिनीकडे दागिने मागतोय पण तिने सांगितले नाही अजूनही, दागिने गेले विकीबरोबर ते. दोघांचे वाद त्यात शु गो ने समजावणं ते पण रिपीट.

गौरी आणि शिव एकमेकांच्या प्रेमात पडलेत हे मात्र जाणवतंय. त्या आजीला शीवच्या डोळ्यात प्रेम दिसतं पण गौरीच्या नाही.

ह्याचा अर्थ शिवचे डोळे खरंच बोलके आहेत, जे आपण म्हणतोय आणि गौरीचे भावशून्य Lol .

हो अन्जू, तसा रस वाटतच नाही, कारण स्टोरी पुढे सरकत नाही. पण आजी, मोजो यांच्या गमतीदार संवादासाठी मी पहाते. कारण त्या कमला- डुमलापेक्षा ही सिरीयल पुष्कळ बरी. विकी होता तोपर्यंत डोक्याला ताप होता, आता नाही. येऊन-जाऊन ती येडी मितु मध्ये मध्ये करते तेवढच.

मला आवडलं ते म्हणजे च ची भाषा, लहानपणी आम्ही तासनतास बोलायचो ह्या भाषेत त्याची आठवण झाली. हल्ली छोटी भाची शिकव सांगतेय मला ती भाषा कारण तिला काही कळू द्यायचं नसेल तर बहिणीशी हल्ली तिच्यासमोर त्या भाषेत बोलते मी.

पण सर्व chara. मध्ये सर्वात डोकं शांत ठेऊन, सेन्स आहे वागण्यात तो शु गो च्या.

हमारी अम्मी तो ऐसा कभी बर्दाश्त नही करेगी. >>> अम्मी मुसलमानान्मध्ये बोलतात. U.P. मध्ये नाही. शिव अम्मा बोलतो आपल्या आईला. रच्याकने, छान केलेय हे तु रश्मी. Happy Happy Happy

आज बनियान मध्ये शिव काय dashing दिसला.

गौरी नवरत्न टाल्क ठंडा ठंडा कुल कुल >>>> खरच तिने अशी जाहिरात केलीये कि तु तिला हे product सुचवतेयस? बाकि हे तेल मोजो ला पण सुचवायला हवे, जेव्हा बघावे तेव्हा सतत करवादलेला असतो.

शिव 'ये है महोब्बतें' मधे कधी होता??? >>>> मी सुदधा हाच विचार करतेय. Uhoh

आज निशा hungama करणार आहे. दागिन्यानचे कळले वाटते नचिकेतला.

हो सगळ्यांना कळले दागिन्यांचे... निशा भांडताना बोलून जाते एकदम!
कोणती सून सासर्याला असं बोलते ईतके तावतावाने .. Uhoh

कोणती सून सासर्याला असं बोलते ईतके तावतावाने .. >>> आणि ते बघुन कोणती सासु बघत बसते, आमच्या असत्या तर हाताला धरुन बाहेर काढल असत..

निशाच बोलण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. म्हणे तुम्ही विकीला जावई करुन घ्यायला निघालात म्हणुन मी त्याच्यावर विश्वास ठेवला. बये, नोकरी करतेस ना? मग येवढही कळल नाही का की फ्लॅट घेताना कुठला डीलर स्वत:च सुचवतो तुमच्याकडे दागिने असतील तर ते पण द्या म्हणुन.

गौरी नवरत्न टाल्क ठंडा ठंडा कुल कुल
>>>> खरच तिने अशी जाहिरात केलीये
कि तु तिला हे product सुचवतेयस?>>> तिच्या डोळ्यांमुळे तिला मिळेल ही जाहिरात ...अगदी थंड डोळे ...थंडाक्का

मोजो बोलले ना पण तिला

आज गौरी काही तरी फाड फाड बोलणार आहे शिवला त्याने
पण सांगाव की.. तुम्ही पत्र बित्र पाठवण्याचा गोंधळ केल्लात मग माझ काय चुकल म्हणुन..

अक्च्युली पहिल्या पासुन गौरी चिडली की शिव हेच म्हणत आलाय "मेरी गलती क्याहै वो तो बताओ/ मैने किया क्या है.? आप क्यु नाराज है?"

बिचाराच वाटतो

मोजो बोलले ना पण तिला >>> हो, पण तिने ज्याप्रकारे तमाशा केला त्यामानाने त्यांच्या बोलण्यात फारसा दम वाटला नाही. उलट नचिकेत मस्त बोलला. दागिने दागिने कुणी दिले तुला ते दागिने? मी च केले, वेळेला उपयोगाला येतील या नावाखाली करुन घेतलेस आणि आता वेळ आलीय तर हिचा हलकटपणा दाखवतेय. एकदम पर्फेक्ट.

पण नचिकेतने तरी ऑस्ट्रेलियाला जायच म्हणुन जॉब सोडलेला असताना जाण कॅन्सल का केल? आणि मग तिकडच्या जॉबच काय?

पूर्वीच्या काळी जसे एक मुलगी/मुलगा दाखवायचे आणि दुसर्‍याच मुलीशी/मुलाशी लग्न लाऊन द्यायचे तसे झी ने केले आहे का ? प्रोमोमध्ये ती गौराई चांगली वाटली होती पण मालिकेत मात्र अगदीच कंटाळवाणी वाटतेय. तणतण हा प्रकार सोडल्यास तिला कुठलाच अभिनय करता येत नाही.

मालिका पण अगदीच रटाळवाणी होत चालली आहे. मोजो, शुगो अशा बीनीच्या कलाकारांचा अभिनय पण रंगत नाहिये. बाकीच्यांबद्दल तर बोलायलाच नको. इतर मालिकांना अतर्क्य का होईना पण कथा असते. या मालिकेत तर त्याचाही अभावच आहे. उगाच आपले बस स्टॉप आणि घरातली भांडणं दाखवत बसले आहेत, कथा अशी काही नाहीच.

गौरीला हसायचे डायलॉगच देत नाहियेत....चिड्चिड करायचेच सगळे डायलॉग आहेत..

काही सिन मधे जिथे तीला थोडे हसते खेळते डायलॉग होते तिथे बरी/ नॉर्मल वाटत होती..

डायरेक्टर तिला फारच चिडायला लावत आहे..

सुलु धन्यवाद.:स्मित: शिव अम्माच म्हणतो, पण मी ते अम्मी करुन ठेवले.:फिदी: काल मोजोने मस्त झाडले निशाला. ऐसाच करना मंगता.

गौरी सध्या उन्हाळ्या मुळे मरगळली असेल, तिला हे द्यायला पाहीजे.Champagne popping

नाहीतर हे पण.Soda Cup म्हणजे उत्साहाने फसफसेल.:फिदी:

मोजो दागिने, पैसे मी भरून देईन म्हणतात ते नाही पटलं. ती निशा विकिला भाऊ भाऊ करत असतेना मग तिची स्वतःची जबाबदारी ते सर्व त्याला देते ती.

आधीचा डायलॉग बरोबर होता मोजोंचा तिला झाडण्याचा पण भरून द्यायचा काय संबंध.

मोजो family ने पोलीस कम्प्लेंट केलीच नाहीये विकीविरुद्ध. काल नचिकेतचा अभिनय पण छान होता.

मोजो दागिने, पैसे मी भरून देईन म्हणतात ते नाही पटलं. >>>+१

गौरीला हसवा जरा. प्रेमात पडतेय तरी चिडतेय.

पूर्वीच्या काळी जसे एक मुलगी/मुलगा दाखवायचे आणि दुसर्‍याच मुलीशी/मुलाशी लग्न लाऊन द्यायचे तसे झी ने केले आहे का ? >>>> हो बर्याचदा. फक्त झीनेच नाहि तर सगळ्या channels वर अजूनही हाच trend आहे. केकता कपुर च्या सिरियल्स पासून हा trend सुरु झालाय तो आजतगाजत चालूच आहे. ट्शन-ए-इश्क माहीतिय ना? मराठितहि हाच trend आलाय.

सुलु धन्यवाद.स्मित शिव अम्माच म्हणतो, पण मी ते अम्मी करुन ठेवले>>>> तुझे स्वागत आहे रश्मि. Happy Happy Happy पण मी ते अम्मी करुन ठेवले>>>> पण का?

मुळात स्वतःच्या चुकांचे खापर दुसर्‍यावर फोडणे हा मनुष्यस्वभाव आहे त्यामुळे नीशाचे वागणे तसेच असणार.>>>> नैतर काय!:राग:

गौरीला हसायचे डायलॉगच देत नाहियेत....चिड्चिड करायचेच सगळे डायलॉग आहेत..>>>> वडिलान्वर गेली आहे हि, जसा बाप, तशी मुलगी. Lol Lol Lol

Pages