काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ती मितु आजकाल उठली की येऊन शिवच्या फ्लॅटची बेल बडवते, जर मोजोने तिला तसे पाहीले तर मग त्या फताडीची काही खैर नाही.

आजि पण काहीही बोलता.. त्या शिवची बाॅडी म्हणे..अर्नाॅल्ड आत्महत्या करेल तिकडे>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>परत वाचल्यावर अर्थ कळाला......
बरिये की बॉडी त्याची
Wink

आज गौरी तर माझ्या डोक्यातच गेली. Angry कसला माज आलाय तिला देव जाणे! कशी बोलत होती ती शिवला? ऐकून घेतोय म्हणजे काहिहि बोलायचे का तिने? म्हणे माझ्याशी कुठलेही नाते जुळवण्याचा प्रयत्न करु नको. अग, शिव तुझ्याशी कुठलेही नाते जोडत नाहीये. उलट हिच त्याच्याशी नाते जोडु पाहत आहे. वरुन नाक वर करून म्हणते, नही बात करुगी मै हिन्दि मे,मुझे नही आती हिन्दी. एवढी नोकरी करणारी हि मुलगी, साधी हिन्दी येत नाही तिला? येत असेल तिला, पण माज करतेय.

गौरी डोक्यात जातेच पण कालच्या प्रसंगात शिवपण डोक्यात गेला. एकतर तो गौरीला "आप हमसे नाराज क्यों हैं ? या एकाच प्रश्नावर सारखा छेडतोय. त्या मितूच्या एकंदर बॉडी लँग्वेजवरुन कुणालाही संशय येईल की शी इज हीटींग ऑन हिम. शिवाय वेणूनी पण त्याला सांगितलंयकी मितूला तू आवडतोस. मग जे स्पष्ट उत्तर त्याला गौरीकडुन हवं आहे तीच स्पष्टता तो मितूच्या बाबतीत का नाही दाखवत ? कमीत कमी वेणूला तरी बरं वाटेल. आणि त्याच्या मागची रोजची पीडा जाईल.

नुसते घोळात घोळ घालतायेत, असं दिसतंय एकंदरीत. कालचा नाही बघितला पूर्ण, अगदी शेवटी मीतू काहीतरी तल्लीन होऊन ऐकतेय शिव सांगतोय ते मग तीपण काहीतरी सांगतेय असं आणि वेणू बिचारा दोघांकडे बघतो आणि जातो शेजारी हे बघितलं.

अगं अन्जू ती गवरी शिवला सांगते की मी तुला पाहुन अस्वस्थ होते, मला घुसमटते. हे सगळे शिव ऐकतो, पण त्याला नुसते शब्दच कळतात, अर्थ नाही. पण तो येडा त्या मितुला सांगतो की मी अस्वस्थ झालोय वगैरे ( वास्तवीक त्याला याचा अर्थ जाणुन घ्यायचा असतो) हे ऐकुन मितुबै धकधक करने लगा हे गाऊन डान्स करायच्याच बाकी रहातात.

गौरी डोक्यात जातेच पण कालच्या प्रसंगात शिवपण डोक्यात गेला. एकतर तो गौरीला "आप हमसे नाराज क्यों हैं ? या एकाच प्रश्नावर सारखा छेडतोय. त्या मितूच्या एकंदर बॉडी लँग्वेजवरुन कुणालाही संशय येईल की शी इज हीटींग ऑन हिम. शिवाय वेणूनी पण त्याला सांगितलंयकी मितूला तू आवडतोस. मग जे स्पष्ट उत्तर त्याला गौरीकडुन हवं आहे तीच स्पष्टता तो मितूच्या बाबतीत का नाही दाखवत ? कमीत कमी वेणूला तरी बरं वाटेल. आणि त्याच्या मागची रोजची पीडा जाईल.>>>>+१

काल पण बिचारा शिव गौरीच्या मागे पळत होता..

घडाघडा बोलायला काय जात काय प्रॉब्लेम आहे ते ...इतरांना शिकवतात कस वागायच आणि स्वतः कस वागतात...

आता हिंदी शिकायला मोजो आणि गौरी शिव कडे येतिल आणि आपण त्याला काय वगणुक दिली हे विसरुन जातिल..

शिव ने त्याना शिकवुच नये..

सावंत फार खडुस आहेत

हो ना....आणि गौरी...किती निर्विकार पणे, भावना शून्य चेहेर्‍याने बोलत होती शिव शी...इतका मोठा डायलॉग मिळाला तर थोडे भाव दाखवायला काय झालं...थंड डोळे, निर्वीकार.......पाठांतर केल्या सारखी......
शुभांगी गोखले अगदीच मस्त काम करतात मग!
आजी पण ..........हिच्या पेक्षा इव्हन मितू ठीक आहे अभिनयाच्या बाबतीत..डोक्यात जाते तरीही!!!

हिच्या पेक्षा इव्हन मितू ठीक आहे अभिनयाच्या बाबतीत..डोक्यात जाते तरीही!!! +११

इतक्या वेळा त्या शिव ने सांगितलं कि त्याला मराठी येत नाही. तरी सगळे त्याच्याशी मराठीतच का बोलतात?

हे गौरी आणि तिच्या बाबांचं पण मी एकवेळ फाल्तु माज म्हणून सोडून देईन. पण ऑफिसमधला बॉस सुद्धा? Uhoh

तवा घासून घेत नाहीत का कामाला येणा-या ताईकडून. सारखा दाखवू तरी नका. कामाला येणारी ताई अभिनय चांगला करते. काम कमी असते तिला पण सहज करते.

आता हिंदी शिकायला मोजो आणि गौरी शिव कडे येतिल आणि आपण त्याला काय वगणुक दिली हे विसरुन जातिल.. >>>> शेवटी त्या दोघान्ना हिंदी शिकावीच लागली ना, केवढे माज करत होते ते. हिंदी न येणे हा घरात टिव्ही नसल्याचा परिणाम. अरे, टिव्ही मुळे देशोदेशीच्या भाषा कळतात, General Knowledge कळ्ते. पण नाही, ह्यान्चे फक्त एकच, टिव्ही मुळे माणसे बिघडतात. उगाच नाही ती निशा नचिकेतला आपण वेगळे राहूया म्हणून बोलते. साधे, त्यान्च्या खोलीत हि टिव्ही नाही! Uhoh हल्ली टिव्ही स्वस्तात मिळतात. त्या गौरिचे ठिक आहे, ती आपल्या वडीलान्न्च्या शब्दाबाहेर नाही, पण एखादि normal मुलगी असती ना, ती एव्हाना कधीच घर सोडून गेली असती. PC जाउ द्या , पण ह्यान्च्या घरी साधा टिव्ही सुद्दा नाही म्हणजे काय? Angry

हे गौरी आणि तिच्या बाबांचं पण मी एकवेळ फाल्तु माज म्हणून सोडून देईन. पण ऑफिसमधला बॉस सुद्धा?>>>> सहमत.

अरे यार पाचवी मधली पोरं पण हिंदी बोलतात रे, <<<< पाचवी मधली पोरं हिंदी बोलतात ह्याच तुम्हाला वाईट वाटते का?

ही सेरिअल आता राज ठाकरेंना दाखवायला पाहिजे<<<< का हो, सिरियल बन्द करायची आहे का काय तुम्हाला? Uhoh

आता हिंदी शिकायला मोजो आणि गौरी शिव कडे येतिल >>>>

पण मी म्हणतो घरात शिकवण्या घेणारी बायको असताना हा त्या पोराकडे का जातोय म्हणे शिकवणीला?

आणि ती त्या छोट्या मुलांना छान हिंदीत लिहायला सांगताना दाखविली आहे त्याची बायको एका प्रसंगात! ग्रेट सिरियल!!!

अरे यार पाचवी मधली पोरं पण हिंदी बोलतात रे, <<<< पाचवी मधली पोरं हिंदी बोलतात ह्याच तुम्हाला वाईट वाटते का? त्यांना हिंदी येते पण यांना (गौरी अँड संस् ) येत नाही याच वाईट वाटतं

ही सेरिअल आता राज ठाकरेंना दाखवायला पाहिजे<<<< का हो, सिरियल बन्द करायची आहे का काय तुम्हाला? ते महाराष्टात येऊन हे उत्तरभारतीय आपल्या मुलींना पटवून कसे पळुन जातात याचा मुद्दा प्रभावी पणे मांडू शकतात

अरे पण माका हे पटुचा नाय की मोजोला हिंदी येतच नाहीये. कसे शक्य आहे हे? शाळेत आपल्याला हिंदी कंपलसरी असते की. की मोजोच्या ( म्हणजे श्रीयुत सावंतांच्या ) काळात शाळेत हिंदी शिकवत नव्हते का? की शिव यांचा भविष्यातला जावई असल्याने हा प्रसंग ओढुन ताणुन फिट्ट केलाय? आणी सावंत तसेही आकाशवाणीवर अधिकारी आहेत, मग यांच्या संपर्कात कोणीच नॉनमराठी नाही? कैच्या कैच. अगदी खेड्यातला अशिक्षीत माणुस देखील मोडकं तोडकं हिंदी बोलतो, मग वॉट अबाऊट सावंत? आँ!

त्यांना हिंदी येते पण यांना (गौरी अँड संस् ) >> काय लग्न झाल नाही अजून तिच , बिनब्याही माँ बनविता का आता तिला ? गौरी अँड संस् ?

ते मोजोना शिवचे गुण कळण्यासाठी हिंदी track असेल. पण काही पटलं नाही की मोजोना बेसिक हिंदी येत नाही ते.

मोजो काही वेळा बेसिक हिंदी बोलताना दाखवले आहेत. त्यांना समजतं पण. आता ते रेडीओ वर हिंदी तून कार्यक्रम करणार आहेत, म्हणून त्यांना साहित्यिक हिंदी शिकायचंअसेल. जे बरोबर वाटतं. आणि आता भय्यापेक्षा शिव चं हिंदी जास्त सोफिस्टिकेटेड असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे या पुढची मोजोंची हिंदी शिकवणी आणि शिवची मराठी शिकवणी असे बघायला मिळणार बहुतेक. आणि या दोन्हीला थंडाक्का हजर असणारच! Wink

बघितला आजचा.

ती गौरी पोळ्या चांगल्या करते शु गो पेक्षा. रोज ट्युशनला मुलांना बोलावून वाद-विवाद. सारखा हा सीन दाखवायला हवा का. कळलं आम्हाला रोजचं नाटक आणि मुलांना लवकर पाठवून द्यायचं. मुलं पण महान दुसरीकडे जायचं ना ट्युशनला.

सुनेची शेड टोकाची निगेटिव्ह दाखवली आहे ते पटत नाही, इतकं कोणी नसतं इन जनरल. ग्रे दाखवणं ठीक आहे. ग्रे शेड थोडी फार असतेच सर्वांच्यात. सर्वांची आपापली बाजू असते. पण इतकं निगेटिव्ह अति वाटतं.

Pages